मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची तुझे विडिओ जसा वेळ मिळेल तसे पाहात असते. तुझा वावर प्रसन्न व सुखद आहे, वाणी शुद्ध आहे. ऐकायला बरे वाटते. तु पुस्तके वाचली असल्यास ऐकायला आवडेल.

नद्यांचा आक्रोश - काय सुंदर ओळख करुन दिलेली आहेस. मस्त वाटतय पुस्तक.
फक्त मला लेखकाचे नाव कळले नाही. तुला टायटलमध्ये पुस्तकाचे नाव - लेखका चे नाव असे देता येइल का?
खूप छान ओळख.
मागे कोकीळेचा आवाज काय गोड येतोय ग Happy कुठे रहातेस तू माहीत नाही पण आमच्या मुकुंदनगरमध्ये फार गोड पक्षी दिसतात त्यात कोकीळाही.

द. सा., मंजुताई आणि सामो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवर्जून पाहणं आणि प्रोत्साहन देणं यासाठी धन्यवाद.
सामो, डिस्क्रीप्शन मध्ये हे तपशील दिले आहेत बघ..डॉ. मोरवंचीकर हे लेखक आहेत. कोकिळेचा या वर्षी जरा जास्तच सूर लागलाय बघ. Happy

यू ट्यूब चानेल चालू ठेवण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात ते जमलं आहे. पुस्तकांबद्दलच आहे फक्त विषय विविध येत आहेत. नवीन पुस्तकांची ओळख कळली की शोध सोपा जातो.

पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति झाली. त्या अनुषंगाने वर्षभरातील या उपक्रमाचा आढावा.
https://youtu.be/7M5XTJ7lOvY>>>>> अभिनंदन!

उत्तम कल्पना, सातत्य !!
मी जमेल तसे बाकीचे video पण बघेन.

सर्वप्रथम अभिनंदन व शुभेच्छा! वर्षभर अखंडित एखादा उपक्रम चालवणे , त्यात औचित्यता व वैविध्यपूर्णता आणणे हे काम सोपे नाही ह्या सगळ्यातून तुझी वाचनाची आवड व कामावरची निष्ठा दिसून येते. खूप कौतुक!

Pages