Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो >>> परफेक्ट !!
काल "केरला स्टोरी" सिनेमा
काल "केरला स्टोरी" सिनेमा बघितला. वीकडे आणि रात्री १० च्या शोला थिएटर साधारण अर्ध्याच्यावर भरले होते. लव्ह जिहाद, मुस्लिम धर्मांतर आणि शेवटी आयसिस टेररिस्ट बनणे अशी पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा मला तरी व्हायोलंट वाटला आणि अक्षरशः अंगावर काटा आला. पण सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे आणि शेवटी मुलीच्या आईचा इंटरव्ह्यू पण दाखवला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असे काही खरोखर घडले असेल/घडत असेल असेच वाटले. स्टोरीलाईन सोडली तर अभिनय यथातथाच आहे सर्वांचा. मन घट्ट असेल तर १ दा तरी सिनेमा बघायला हरकत नाही, असे माझे मत आहे.
तू झूटी मैं मक्कार >> १० मी
तू झूटी मैं मक्कार >> १० मी पाहिला कसाबसा. एवढा low IQ असलेला सिनेमा लोक कसा काय tolerate करतात देव जाणे.
Submitted by mandard on 9 May, 2023 - 00:
इन्दू की जवानी
आला. पण सिनेमा सत्य घटनेवर
आला. पण सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे आणि शेवटी मुलीच्या आईचा इंटरव्ह्यू पण दाखवला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असे काही खरोखर घडले असेल/घडत असेल असेच वाटले. स्टोरीलाईन सोडली तर >>>>>>>
मुलगी बापाला म्हणते " तुम्ही संस्कार द्यायला कमी पडले " वैगेरे डायलॉग आहेत का ?
आणि केरळी कम्युनिस्ट ना पण कोपच्यात घेऊन शाब्दिक फटके टाकलेत का ?
हो, तसे १-२ डायलॉग आहेत पण
हो, तसे १-२ डायलॉग आहेत पण मुख्य फोकस हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे मुस्लिम धर्मात धर्मांतर आणि आयसिसचे दहशतवादी हा आहे. सध्याचा सहिष्णुता/असहिष्णुता हा वाद लक्षात घेतला तर या चित्रपटाविरुद्ध मुस्लिम समाजाने विरोध दाखवला नाही का आणि चित्रपटावर बंदी टाका म्हणून दंगे कसे काय केले नाहीत? असे मनात आले कारण विषय ज्वलंत आहे.
बाई दवे,
बाई दवे,
छान आहे झूठी मक्कार. >>>>> सगळ्यांनी आवडला नाही सांगितलं की ......... (मी कसा वेगळा वेगळा )
मी पूर्ण पाहु शकले नाही. अति सामान्य चित्रपट आहे.
या विकेंड ला केरला स्टोरीज पहाणार आहे.
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो >> Lol अस्मिता हे फार अचाट होतं
नक्कि बघा
नक्कि बघा
हा धागा चिकवा पुरताच मर्यादित
हा धागा चिकवा पुरताच मर्यादित असू द्यात !
एव्हढा दंगा का चाललाय केरळ
एव्हढा दंगा का चाललाय केरळ स्टोरीवरुन? याच थीमची एक सीरिज होती नेटफ्लिक्सवर, नाव आठवत नाही, पण स्वीडनमध्ये घडणारी म्हणुन दाखवलेली, छान होती, तेव्हा नाही असा दंगा झाला, किंवा विषयपण नवीन नाही. Ott वर आला की बघेन. आणि अदा शर्मा किती लहान दिसते, कित्तीतरी वर्षांपूर्वी मी तीचा 1920 पाहिलेला, आता अजुन लहान दिसायला लागलीये.
मन घट्ट असेल तर १ दा तरी
मन घट्ट असेल तर १ दा तरी सिनेमा बघायला हरकत नाही, असे माझे मत आहे. >>> धन्यवाद. बघून कदाचित सुन्न व्हायला होईल म्हणून बघत नाहीये. मन तेवढं घट्ट नाहीये. तरी ott वर आला की काही भाग पुढे ढकलता येईल. तेव्हा बघायचा विचार करतेय.
छान आहे झूठी मक्कार. >>>>>
छान आहे झूठी मक्कार. >>>>> सगळ्यांनी आवडला नाही सांगितलं की ......... (मी कसा वेगळा वेगळा ) Happy
>/>>>>>
@ मीरा
या धाग्यावर कोणीतरी पहिले लिहिले की टाईमपास पिक्चर आहे. मी लगेच बघितला आणि मलाही आवडल्याची पोस्ट टाकली.
त्यानंतर मग पिक्चर न आवडणारे मैदानात आलेत.
मग आता मी आवडला म्हटल्यावर ते मुद्दाम आवडला नाही करत आले म्हणणार का तुम्ही
असो.
पिक्चर खरेच छान आहे. मला आवडला आहे. त्यातले गाणे तर मी रीपीटवर ऐकतोय. त्यावरही माझी पोस्ट सर्वांच्या आधी सापडेल.
साधारणपणे माबोवर जसा क्राऊड आहे त्यांना असे चित्रपट आवडत नाही हे ही खरे आहे. त्यामुळे ज्याची त्याची चॉईस म्हणून घेणे ईतके अवघड आहे का
केरळ स्टोरी चित्रपटाच्या
केरळ स्टोरी चित्रपटाच्या वादविवादासाठी स्वतंत्र धागा आहे. लाभ घ्यावा ही विनंती.
https://www.maayboli.com/node/83425
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार >>> हे फार्फार आवडलंय माझंही हेच मत आहे.
'विश्वाचे आर्त माझ्या मनी'
'विश्वाचे आर्त माझ्या मनी' पोस्ट झालेली दिसतेय.
धन्यवाद सर्वांना.
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार >>>
अगदी अगदी!!
गार्डीयन्स ऑफ द गलॅक्सी ३
गार्डीयन्स ऑफ द गलॅक्सी ३ पाहिला. माझ्या मते हा मार्व्हलचा सगळ्यात चांगला सिनेमा आहे हा. इतकी भावनिक गुंतवणूक करून घेणारा सिनेमा या पूर्वी मार्व्हलने बनवला नव्हता असे वाटते. थेटर मध्ये बरेच लोक मुसमुसत होते. पहिले दोन GOTG आवडले असतील तर अगदी बघण्यासारखा आहे.
GOTG3 आला पण! आमचा लोकल फॅन
GOTG3 आला पण! आमचा लोकल फॅन विसरला बहुतेक!
प्राईमवर Air हा चित्रपट
प्राईमवर Air हा चित्रपट पाहिला. आवडला.
१९८४ मध्ये स्पोर्ट्स कंपन्यांची मायकल जॅार्डनशी करार करायला लागलेली चढाओढ, त्यात Nike चे विशेष प्रयत्न बघायला मजा आली. कास्टींग, ॲक्टींग, ड्रामा सगळेच छान!
प्राईमवरती फना पाहीला. फार
प्राईमवरती फना पाहीला. फार सुंदर चित्रपट आहे. मला उशीरच झाला पहायला.
नेफीवर यामी गौतम चा चोर
नेफीवर यामी गौतम चा चोर निकलके भागा पाहिला. पिक्चर फास्ट आणि मस्त आहे. यामीचे काम चांगले झाले आहे. बरेच ट्विस्ट असताना आपण सुरूवातीला विचार करत राहतो काय असेल पुढे. आम्ही काही अंदाज लावले आणि ते सगळे खरे ठरल्याने मजा वाटली. (सी आय डी / हिंदी खुप पिक्चर पाहत असल्याने सोपे पडले )
नेफ्लिवर टॉम हँक्स चा मॅन
नेफ्लिवर टॉम हँक्स चा मॅन कॉल्ड ऑटो बघितला.
खडूस, विक्षिप्त म्हातारा टॉम हँक्स बायकोशिवायच्या जिवनाला कंटाळून मरणाचे वेगवेगळे पर्याय आज्मावत असतो, ज्यात त्याला काही यश येत नसते. अशातच त्याच्या नेबरहुडमधे एक फॅमिली नव्याने राहयाला येते. त्यांच्याशी या ना त्या कारणाने सतत त्याची गाठ पडत राहते आणि हळूहळू थोडाफार का होईना तो कसा बदलत जातो याचा हा सिनेमा.
टॉम तर अगदीच ओल्ड ग्रंपी मॅन परफेक्ट दाखवलाय! शेजारी फॅमिलीमधली मेक्सिकन लेडी पण इतकं मस्त काम केलंय. दोघांचे संवाद फार हिलेरिअयस वाटतात.
वन टाईम वॉच नक्कीच..
नेफ्लिवरच मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे पाहिला. राणीचं काम खूप आवडलं. आईच्या रोलमधे खूप जेन्युईन वाटलीये. बंगालीच फॅमिली दाखवल्याने तर भाषा वगैरे सहजच जमलंय. फार वाईट वाटलं एका आईला मुलांपासून असं तोडलं गेलं बघून.
नेफ्लिवर टॉम हँक्स चा मॅन
नेफ्लिवर टॉम हँक्स चा मॅन कॉल्ड ऑटो बघितला.
>>>
मला बघायचाय हा.
पुस्तक वाचलंय - अ मॅन कॉल्ड ऊवे - भारी आहे ते.
>>पुस्तक वाचलंय - अ मॅन कॉल्ड
>>पुस्तक वाचलंय - अ मॅन कॉल्ड ऊवे - भारी आहे ते.<<
याच नांवाने सिनेमा पण आहे, प्राइम/नेफिवर. ऑटो पेक्षा उवे मस्त आहे...
Man called Otto, खूप छान आहे
Man called Otto, खूप छान आहे सिनेमा. अतिशय आवडला.
<<>>
<<>>
सहमत. टाॅम हॅन्क्सच्या अभिनयाबद्दल अजून काय लिहिणार?? ती मेक्सिकन शेजारीण आणि तिचा जरासा वेंधरट पण प्रेमळ नवरा हे surprise package आहे.
मला तिचेच काम जास्त आवडले
मला तिचेच काम जास्त आवडले
प्रेमळ, इमोशनल आणि सगळे व्याप इतक्या आनंदाने सांभाळून नेणारी, वेळप्रसंगी ऑटो ला दटावणारी, जगण्यातला आनंद शोधणारी
अतिशय सुंदर अभिनय केलाय तिने
+++११ आशूचँप
+++११ आशूचँप
अगदी मनमोकळी, क्यू ट दाखवली आहे. प्रसंगी धाडधाड दार वाजवून त्याला इरिटेट करणारी, हॉस्पिटलमधे नर्स तिला सांगत असते ऑटो हॅज बिग हार्ट तेव्हा विरोधाभास जाणवून एकदम फिस्स्कन हसणारी, बर्फ अजून साफ केला नाही म्हणून काळजीने धावत जाणारी मॅरिसोल फार आवडली.
सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला
सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला "प्यार दिवाना होता है." क्लासिक चित्रपट. गोविंदा आणि राणी मुखर्जी. अप्रतिम अभिनय. चेकॉव किंवा ओ हेन्री स्टाईल कथा. ही घ्या लिंक
https://www.youtube.com/watch?v=PHT3J3BKpew&ab_channel=ShemarooMovies
दोन एका विषयावरच्या कलाकृती
दोन संबंधित विषयावरच्या कलाकृती बघितल्या/ ऐकल्या.
जास्त आवडलेली पहिला -
१. बुक ऑफ मॉर्मन
सांगीतिक आहे. सगळी गाणी spotify वरून ऐकली.
मॅट आणि ट्रे म्हणजे साऊथ पार्कचे सर्वेसर्वा. त्यांचे
टिपिकल साऊथ पार्क फॅशन विनोद आहेत. अश्या गोष्टीवर जोक असतात की हसताना गिल्टी वाटावे.
गोष्ट अशी आहे. Latter day saints Church अर्थात मॉर्मन चर्चचे दोन तरुण मिशनरी, केव्हिन आणि अरनॉल्ड
हे युगांडा मध्ये धर्मप्रसार करायला पाठवले जातात. केव्हिन हा स्वताला खरा भक्त समजणारा असतो आणि आपण काहीतरी भव्यदिव्य करणार त्याला खात्री असते. अरनॉल्ड हा मिशनरी लोकांमधला ब्लॅक शिप असतो. तो कायम आपला हेतू साध्य करण्यासाठी खोट्या नाट्या गोष्टी बनवून सांगत असतो. मग युगांडा मधल्या लोकांशी त्यांचा संवाद, ते दोघे काय काय करतात अशी गोष्ट आहे. गाणी मस्तच आहेत आणि मॅट आणि ट्रे चे विनोद तुम्हाला ठोसा मारून हसवतील असे आहेत. अर्थातच मॉर्मन धर्म, त्यांचा प्रेषित जोसेफ स्मिथ ह्यांची मुबलक प्रमाणात थट्टा केली आहे. तुम्ही मॉर्मन नसला तरी ऑफेंड होऊ शकता असे विनोद चिक्कार आहेत.
२. द मास्टर
नेव्ही मधुन युद्ध संपल्यावर निवृत्त झालेला फ्रेडी अस्थिर मनाचा असतो. कारण नसताना मारामाऱ्या करणे, खूप दारू पिणे इत्यादी. त्याला योगायोगाने एक श्रीमंत माणूस भेटतो आणि तो माणूस त्याला त्याच्या पदराखाली घेतो. त्या माणसाचा एक कल्ट/धर्म असतो, द कॉज नावाचा. फ्रेडी कॉज साठी काम करू लागतो, त्यानंतर काय काय होते हे सिनेमात आहे.
कॉज हा कल्ट scientology वर आधारित आहे. तो श्रीमंत माणूस scientology संस्थापक L. Ron. Hubbard वर आधारित आहे. फ्रेडी हा तसा कोरी पाटी घेऊन धर्मात प्रवेश करतो. तो इतर scientology मेंबर्स सारखा उगाच लहान सहान गोष्टींमध्ये अर्थ, सिम्बॉल शोधनाऱ्यांपैकी नसतो. त्यामुळे खरेतर सगळ्यात चंचल, अस्थिर, प्रसंगी हिंसक असलेला फ्रेडी सिनेमात voice of reason वाटतो. रोचक सिनेमा. बऱ्याच लहानसहान गोष्टी माझ्या पाहण्यातून निसटून गेल्या असाव्यात. पुन्हा एकदा बघेन म्हणतो. पण तरी सिनेमा कंटाळवाणा वाटला नाही, चित्रीकरण अगदी सुंदर आहे.
नेटफ्लिक्सवर कटहल बघितला
नेटफ्लिक्सवर कटहल बघितला.स्टोरिलाईन चान्गली घेतली आहे, सान्या मल्होत्रा छान काम करते.
Pages