Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2023 - 00:43
मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.
तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?
दोन्ही मार्ग कोकणात जातात.
एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.
तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.
कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?
असल्यास कळवणे,
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्याच रक्त मासाच्या पुढच्या
आपल्याच रक्त मासाच्या पुढच्या पिढी चे भविष्य आपण अंधारमय करत आहोत ह्याची जाणीव आपल्या पिढी ला कधी होणार.
नको ऐश आराम ,नको फालतू सुख सुविधा.
फक्त माणसाच्या अत्यावशक्या गरजा भागल्या खूप झाले.
विपुल पाणी,स्वच्छ हवामान ,प्रवासाची वाहन पण मर्यादेत .
सकस अन्न.
आणि अतिशय प्रगत आरोग्य सुविधा.
Two wheelers ल ६५० cc चे इंजिन बुलेट बाईक ला असते.
त्या मुळे अवरेज कमी आणि इंधन जास्त विनाकारण जळते.
Car ची इंजिन विनाकारण जास्त ताकतीचे निर्माण केले जाते
फेरारी चे इंजिन ८०० एचपी चे आहे.
बसणार चार माणसं.
ह्याला ऐश म्हणतात गरज नाही.
विनाकारण इंधन ज्वलन
कथित प्रगती बस झाली.
मंगल ग्रह पण पहिला जिवंत होता तेथील जीवसृष्टी मधील हुशार प्राण्याने त्याची वाट लावली असावी हे कधी कधी मला खरे वाटते
हिरा, हरपेन, जि यांच्या
हिरा, हरपेन, जि यांच्या पोस्टस आवडल्या.
<< मानव जेव्हडा लवकर
<< मानव जेव्हडा लवकर पृथ्वीवरून नाहीसा होईल तेव्हडे बरे. >>
मानव नाहीसा व्हावा, अशी इच्छा नाही. पण माणसाने विसरता कामा नये की त्यालाच निसर्गाची गरज आहे, निसर्गाला माणसाची गरज नाही.
माणसासहित किंवा माणसाशिवायही, निसर्ग पुढेच जाईल. सर्वायव्हलसाठी माणसानेच निसर्गाच्या सोबत राहायला शिकले पाहिजे आणि वेळप्रसंगी स्वत:ला बदलले पाहिजे.
उपाशी बोका
उपाशी बोका
तुम्ही माणूस हा शब्द वापरला हे एक बरंं केलेत.
मी "मानव" म्हटल्यामुळे गैरसमज झाला.
बाकी तुमच्या पोस्टशी पूर्ण सहमत आहे.
डोमा बाहुली पण टाकली होती हो!
डोमा बाहुली पण टाकली होती हो!
तरी गैरसमज झाला असे वाटत असेल तर त्या कॉमेंट बदल माफी मागतो.
--
उबोंच्या वरच्या पोस्टशी सहमत.
"पृथ्वी वाचवा" या मोहिमेला खरे तर "मानव वाचवा मोहीम" असे म्हणायला हवे. मानवा शिवाय निसर्गाचे / विश्वाचे काहीही अडणार नाही.
i am a joking!
i am a joking!
------चंकी पांडे
i am a joking!
i am a joking!
------चंकी पांडे
गाडी एकदाची विकास कशाला
गाडी एकदाची विकास कशाला म्हणायचे यावर आली.
रिफायनरी कोकणात प्रदूषण करेल अन्यत्र नाही हे कसे काय गृहीत धरले आहे ?
रस्ते चांगले हवेत पण त्यासाठीचा पैसा इतर प्रांतातले पर्यावरण संपवून तिथे शहरांची निर्मिती करून तिथून यावा असे काही ठिकाणच्या लोकांना वाटते. केरळ, कोस्टल कर्नाटक, हिमालयातले गढवाल, लडाख, हिमाचल प्रदेश इथल्या जनतेला (?) प्रदूषण नको आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हिमालयातल्या प्रदूषण मानकांची मी मागणी केली होती तेव्हां तिथे ग्रीन झोन असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन झोन मधे परमिसिबल काही पॅरामीटर असतील तर ते कळवा असे पत्र पाठवल्यावर त्यांचे उत्तर आले नाही. सोर्सेस कडून चौकशी केली तर अशी मानके तयारच केलेली नव्हती.
पुण्यासारख्या शहराच्या औद्योगिकीकरणाने मुळा, मुठा, पवना या नद्या आणि भूमिगत जलस्त्रोत कायमचे खराब झाले आहेत. मुंबईचा मूळचा भीमिपुत्र विस्थापित झाला. मुंबईच्या समुद्रात जे ड्रेनेज हे शहर ओतते ते प्रदूषण नाही का ? यात कोकणवासी आहेत, मलबारी आहेत, गढवाली आहेत, हिमाचली आहेत, कश्मिरी सुद्धा आहेत.
यांच्याकडे प्रदूषण नाही. त्यामुळे देशांतर करत हे अन्य ठिकाणी पोट भरतात आणि तिथल्या प्रदूषणाला हातभार लावतात.
पण यात काही ठिकाणी नाईलाज सुद्धा आहे. पुणे, नाशिक, बंगळुरू या शहरांच्या बेफाट औद्योगिकीकरणामागे एफएसआयचे राजकारण देखील आहे. विनाशकारी विकासामागे काही मूठभर भूमाफिया नेत्यांचे लागेबांधे आहेत. शहराच्या विकासापेक्षाही स्वतःचा विकास जास्त आहे.
अर्थातच काही प्रांतांची स्वार्थी वृत्ती हे काही प्रदूषणाचे समर्थन नाही. तर हीच वेळ आहे दुटप्पी वागणुकीवर बोट ठेवत एकूणच प्रदूषणाबाबत व्यापक भूमिका घेता यावी. प्रदूषण आमच्या इथे नको, अन्यत्र न्या असे नको.
पुण्यातले लोक कचरा करणार आणि त्या कचर्याचा डेपो मात्र फुरसुंगी, चिंबळी, वाडेबोल्हाई किंवा आळंदीच्या जवळपास असावे असे त्यांना वाटते.
आधी लोकांची ही स्वतःच्या पायापुरती पहायची वृत्ती बदलायला हवी. पुण्यातल्या लोकांना किंवा कुठल्याही जलस्त्रोत नासवणार्या शहरातल्या लोकांना खाली हे नासवलेले पाणी गेलेले चालते का ? या नद्यांच्या पाण्याने खालच्या लोकांत रोगराई वाढतेय. ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाही.
एकवटलेल्या विकासाने डेट्रॉईट हे शहर मरण पावले.
असा एकवटलेला विकास हवा कि विकेंंद्रीत हवा ?
विकास एकवटल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आताशा जाणवायला लागलेले आहे. अजून त्याचे खरे रौद्र रूप दिसायचे आहे.
आचार्य, +१११.
आचार्य, +१११.
पुण्यातले लोक कचरा करणार आणि
पुण्यातले लोक कचरा करणार आणि त्या कचर्याचा डेपो मात्र फुरसुंगी, चिंबळी, वाडेबोल्हाई किंवा आळंदीच्या जवळपास असावे असे त्यांना वाटते. >>>>>>>
याच पुणेकरांना वेताळ टेकडीवरून रस्ता नको असतो , त्यासाठी आमदार नगरसेवक ला विरोध करतील .
पण तळजाई , पर्वती टेकड्यांवर झोपड्यांचे अतिक्रमण का झाले हे नगरसेवक आमदाराला विचारू शकत नाही .
काही जागरूक कर्वे गँग पुणेकर मनपा च्या चुकीच्या कार्यपद्धतीला कोर्टात खेचून अद्दल घडवतात पण सोशल मीडियावर मात्र टिंगल चे बळी ठरतात
पंधरा वीस वर्षापूर्वी नदी पात्रातील रस्ता करण्याचा घाट मनपा ने घातला असता कर्वे गँग नी कोर्टात याचिका टाकली .
त्यावेळी थोडेफार शुद्ध पाणी असेल म्हणून नदी पात्रातील रस्त्यामुळे पाण्यातील जलचरांचे जीवन धोक्यात ही कर्वे गँग ची याचीका कोर्टाने मान्य केली व महिन्याभराचा स्टे दिला .
शनिवारी स्टे ची मुदत संपली तर मनपा ने रविवारी एका दिवसात अख्खा रस्ता तयार केला आणि कर्वे गँग ला सांगितले आणा सोमवारी स्टे !
पर्यावरणाची जाणिव असलेले वयस्कर कर्वे मंडळ या केस मध्ये प्राथमिकदृष्ट्या हारले पण ट्रॅफिक ला वैतागलेले पुणेकर पर्यायी रस्ता मिळाल्यामुळे सुखावले !
मग अशा वेळी पर्यावरण पाहायचे की ट्रॅफिक ला वैतागलेले नागरिकांचे सुख ?
फक्त आज च विचार केला.
फक्त आज च विचार केला.
फक्त आज च्या समस्या बघितल्या.
फक्त आज चे फायदे बघितले तर पर्यावरण कडे दुर्लक्ष करून,प्रदूषण कडे दुर्लक्ष ,हवा तितका निसर्गाचा विनाश करून.
सुख सोयी उभ्या करणे.
हे फायद्याचेच आहे .
सर्व लोक ह्या फायद्या ने खुश च होतात.
पण हा फायदा तात्पुरता आहे काहीच वर्षासाठी आहे .
जास्तीत जास्त 20 ते 25 वर्ष.
पण त्या नंतर आपल्या ह्या वागण्या मुळे जे परिणाम होणार आहेत ते दीर्घ कालीन असतील.
हे आज आपल्याला कळत नाही..
अतिशय भयंकर परिणाम काहीच वर्षात दिसू लागतील..
ह्याचे आपल्याला गांभीर्य नाही .
आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे
जेव्हा परिणाम दिसू लागतील तेव्हा त्या वर उपाय आपल्या कडे नसेल.
मानवी क्षमतेच्या बाहेरच्या त्या समस्या असतील.
आपण त्या वर उपाय करण्यास सक्षम नसू.
हताश पने विनाश बघण्या शिवाय काहीच उपाय आपल्या कडे नसेल .ह्याचे गांभीर्य आता तरी समजणे गरजेचे आहे.
हा एक उतारा वाचा.
पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची झलक आहे.
Extreme heatwaves, droughts, floods, and storms are becoming more common and intense; the energy trapped by Earth's atmosphere and oceans fizzing up like a carbonated soft drink under pressure.
Now a new study simulating Earth's future out to 2100 shows just how fundamentally incremental changes in temperature and precipitation could alter climes on a local level, so much so that we would have to redraw maps first conceived in the 1880s.
"By the end of the century, 38 percent to 40 percent of the global land area is projected to be in a different climate zone than today," writes the team of researchers, led by senior author Paul Dirmeyer, a climate scientist at George Mason University in Virginia.
Depending on which climate models the researchers used to generate projections of future global change, those estimates could rise even further, such that close to 50 percent of Earth's land area could be thrust into an unfamiliar climate zone. The shifts became more pronounced with the latest generation of climate models, which are more sensitive to changes in climate and predict steeper rates of global warming.
.पर्यावरणाची जाणिव असलेले
.पर्यावरणाची जाणिव असलेले वयस्कर कर्वे मंडळ या केस मध्ये प्राथमिकदृष्ट्या हारले पण ट्रॅफिक ला वैतागलेले पुणेकर पर्यायी रस्ता मिळाल्यामुळे सुखावले !>> हाच तर मुद्दा आहे. पर्यावरण जरूर जपा. पण विकासही बघावा. मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधला जात होता तेव्हा त्यालाही विरोध झाला होता. युवराजांच्या बाल हट्टामुळे मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पाला खिळ बसली. आता या बाल हट्टामुळे प्रकल्पाची जी किंमत वाढली ती तुमच्या आमच्या खिशातूनच वसूल केली जाणार.
मुंबईत रेल्वेमार्ग टाकायलाही झाडे तोडावीच लागली असतील. विचार करा, जर पर्यावरणवाद्यांना घाबरुन गोर्या साहेबाने मुंबईत रेल्वेमार्ग बांधायचं टाळलं असतं तर..
<< पर्यावरण जरूर जपा. पण
<< पर्यावरण जरूर जपा. पण विकासही बघावा>>
मान्य. कसे करायचे हे?
अनावश्यक ,गरज नसताना फक्त स्व
अनावश्यक ,गरज नसताना फक्त स्व फायद्यासाठी पर्यावरण नाश केला जातो त्याला पण आपण विकास च्या पंक्तीत च बसवतो..
कळत ,नकळत.
शहराचे सांडपाणी पूर्ण पने प्रक्रिया करून ,त्या मधील शक्य होतील तितके सर्व विनाशकारी घटक वेगळे करून नदीत सोडणे,समुद्रात सोडणे
गरजेचे आहे .
पण तसे आपण करतो का ?
तर नाही!!!!.
असे शहराचे सांडपाणी नदीत सोडण्यास जागरूक नागरिकांनी विरोध केला .की आपण त्यांच्या वर विकासाचे विरोधक असा स्टॅम्प चिकटवतो.
महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावणे गरजेचे आहे.ब्रिटीश कालीन मुंबई मध्ये पण अशी झाडे आहेत.आज पण आहेत.
मुंबई पुणे exp way' आहेत का दुतर्फा झाडे.?
म्हणजे ब्रिटीश किती जागरूक होते आणि आपण किती जागरूक आहोत ह्या साठी हे उदाहरण.
आपली गंगा बघा आणि ब्रिटन मधील शहरातून वाहणाऱ्या नद्या बघा..
किती फरक आहे ते समजेल.
मध्ये गुजरात मधील झुलता पूल तुटुन पडला आणि किती तरी लोक मेली तेव्हा ज्या नदी वर हा पुल होता ती नदी गटार गंगा च झाली आहे हे लोकांना समजले
रघु आचार्य +१
रघु आचार्य +१
इथले किती लोक कायम स्वरुपी कोकणात रहातात?
तिकडे किती पायाभूत सोयी, करिअरच्या संधी पक्षी शिकल्यावर पैसे मिळवायच्या संधी आज.. बोल्ड.. आज आहेत? किती शेतकर्यांच्या मुला/मुलींना आज... बोल्ड ... आज शेतकरी व्हायचं आहे? शेत जमिनीचा सरासरी आकार किती आहे? त्या जमिनीला कसून जास्त भाव येईल का त्यावर रिसॉर्ट बांधुन जास्त भाव येईल?
पर्यावरण, समतोल, जैववैविध्य ह्या पोट भरल्यावर करण्याच्या गोष्टी आहेत. आपण आणि आपली पुढची एक पिढी आज ... बोल्ड... आज ...सुखात जमलं तर छानशौकित जगणार नसू .. तर निसर्ग गेला तेल लावत. काय जो काही अंत व्हायचा असेल तो होवो. तो बघायला ना मी असणार आहे ना पोरं. पुढच्या पिढ्यांना चांगलं पर्यावरण द्यायला आधी मी आनंदात जगलो पाहिजे, तर पार्टनर बरोबर पुढची पिढी तयार होईल ना?
आणि पुण्या मुंबईच्या लोकांच्या पुढच्या पिढ्या प्रदुषण मुक्त जगवायचा ठेका मी नाही घेतलेला. जगतील नाही तर मरतील. हे मला वाटतं कुणा कोकणी माणसाचं मनोगत असेल तर त्यात काही चूक नाही.
इतकंच वाटत असेल तर नियम बनवा आणि ते पाळा. पर्यावरण खात्याची मंजुरी लागतच असेल ना हे करायला? ती जर ते खातं देत असेल तर यात पर्यावरणाचा काहीही धोका नाही. बरोबर ना? आणि तरीही धोका असेल तर जा कोर्टात जा. दरवेळी पैसे चारुन हवं ते काम मंत्रालयातुन तुम्ही करता मग त्यासाठी नियमांना पायदळी तुडवता. नोकरशहा, राजकारणी सगळे आपापली पोटं भरणार. मी का कसत बसू जमीन? टाकेन फुंकुन आणि जगेन मजा करत. नाही तर चांगली खानावळ काढेन. ते आंबे पिकवायला फार श्रम लागतात. त्यापेक्षा टमटम चालवेन.
भारतात श्रमांना किंमत नाही. आणि विकास म्हणजे काय तर माझा विकास. तो झाला आणि पोट भरलं की मग आजुबाजू पर्यावरण समतोल वगैरे विकास. जगातील कुठल्याही ( अपवाद दाखवा आणि १०० रु मिळवा) समुहाने आधी प्राथमिक गरजा... ज्या आज चक्रवाढ वाढलेलया आहेत... पण आज त्याही प्राथमिकच आहेत... दर दोन वर्षांनी चांगला स्मार्ट फोन, अनलिमिटेड डेटा, सोमीवर शेअर करायला दर तीन महिन्यांनी एक भारी मधली ट्रिप, सोमीवर सगळे करतात ते सगळे सण- समारंभ- वादि इ. दणक्यात. इ. इ. इ. या अन्न वस्त्र सारख्याच गरजा आहेत. ते सगळं झालं की जे उरेल ते खुलभर दुध त्या पृथ्वीच्या बोडक्यावर घालणार.
का विचारताय... तुम्ही आणि तुमच्या आधीच्या आणि पुढच्या पिढ्यांनी शहरांत आणि परदेशांत जाऊन तेच केलेत. आता मी करतोय तर तुम्हाला पर्यावरण आठवतय का!
आणि आठवल्यावर कायमचे रहायला येताय का कोकणात? तर नाही, वीकेंडच्या ट्रिपला ओरबाडायला येताय ना? यावा कोकण आपलोच असा!
>><< पर्यावरण जरूर जपा. पण
>><< पर्यावरण जरूर जपा. पण विकासही बघावा>>
मान्य. कसे करायचे हे?<<
बहुतेक त्यांना म्हणायचं आहे कि विकास हवा, विकासाची सूज नको..
सगळ्यांनी मिनिमलिस्ट लाइफस्टाइल अंगिकारावी. दररोजच्या वस्तूवापरांपासुन ते अगदि लोकसंख्या नियंत्रणापर्यंत. गरजा/लोकसंख्या आटोक्यात आल्या कि सहा लेन्सच्या ऐवजी तीन लेन्सच्या फ्रीवेत काम भागु शकतं...
विकासाची फळ चाखण्यासाठी.
विकासाची फळ चाखण्यासाठी.
विकासाची मजा घेण्यासाठी .
निरोगी शरीर गरजेचे असते.
आपली ज्ञान इंद्रिय च आपल्याला सुखाची जाणीव देतात.
२० वर्ष नाही ओलांडली तर .
मधुमेह,रक्त दाब,.
३० नाही ओलांडली तर कॅन्सर,गुडघे दुःखी, हजार आजार लागत आहेत.
कारण फक्त .
प्रदूषित हवा,प्रदूषित पाणी,प्रदूषित अन्न.
स्वतः जीवंत असू तेव्हाच संपत्ती उपभोगू ना.
माणसाचे अस्तित्व च प्रदूषण नष्ट करेल.
विचार करा एक वर्ष ह्या वातावरणातील बदल म्हणून मुंबई मध्ये पावूस पडला नाही..तर काय फ्लॅट,गाड्या,एसी,नी तहान भागणार आहे का,,,?
दोन कोटी लोकांस पाणी कोठून आणणार.
समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करू जे दिव्य स्वप्न आहे.
त्या साठी खूप ऊर्जा लागेल .
आणि परत प्रदूषण वाढेल.
आपले अस्तित्व टिकून ठेवायचे आहे.
तर प्रदूषण,पर्यावरण ह्यांना जपावं च लागेल.
मुंबईत रेल मार्ग बांधताना
मुंबईत रेल मार्ग बांधताना ब्रिटिशांना झाडे नक्कीच तोडावी लागली असतील पण त्याच वेळी मुंबईत आझाद, क्रॉस, ओवल मैदानांची सुंदर हिरवळ, victoria गार्डन सारखी वनस्पती बाग,शिवाजी पार्क सारखे मोठे मैदान, वडाळ्याच्या पांच बागा, अशी ठिकाणे त्यांनी त्या काळच्या छोट्याशा मुंबईत राखून ठेवली. १९०९ सालचा सिटी improvement trust अहवाल आज वाचला तर ब्रिटिशांविषयी कौतुक आणि आदर वाटतो. जी आय पी रेल वेचे नियोजन करताना रूळ मार्गात अथवा शेजारी मोठ्या वस्त्या, पुरातत्त्वीय अवशेष यांना हानी पोहोचणार नाही हे त्यांनी कटाक्षाने पाहिले. अंबरनाथचे हजार वर्षांपूर्वीचे देवालय असे सर्वेक्षण करतानाच उजेडात आले. त्या काळी नुकत्याच स्थापन झालेल्या J J school of Art मधून विद्यार्थ्याची चमू त्यांच्या तत्कालीन प्राथमिक अवस्थेतल्या आरेखन अवजारांसह मधल्या खाड्या होडीने ओलांडत बैलगाडीने त्या ठिकाणी पाठवून मंदिराचे आरेखन, नकाशे काढवून घेतले. ( ते आजही दफ्तरी आहेत.)आणखी पडझड थांबवण्यासाठी काळजीपूर्वक डागडुजी केली. नोंदी केल्या. कान्हेरी गुंफा उजेडात आणून व्यवस्थित नोंदी आणि चित्रे काढवून घेतली. बोरिवली स्टेशनपासून गुंफांपर्यंत जाणारा इटुकला असा सुंदर रस्ता बांधला. कडेने आमराई जोपासली.
अनेक गोष्टी आहेत. आम्ही मात्र शिवाजी पार्क आक्रसवून टाकले. राष्ट्रीय उद्यानाचे लचके तोडले. अमर्याद झोपडपट्ट्या तिथे वाढू दिल्या. भौगोलिक ठेवा असलेल्या गिल्बर्ट हिलला खेटून उंच इमारती होऊ दिल्या आणि टेकडी जवळजवळ नामशेष केली.
अनेक गोष्टी लिहिता येण्याजोग्या आहेत.
ह्या अनेक गोष्टी मध्ये ४जी
ह्या अनेक गोष्टी मध्ये ४जी ५जी तंत्रज्ञान विकसित होताना आणि झाल्यावरचे सार्वत्रिक असणारे पण दुर्लक्षित केले जाणारे परिणाम ह्यावरसुद्धा बोलले पाहिजे आणि ते सुद्धा नोकिया ११०० वरती टाइप करून.
सतत ई कचरा निर्माण केला जातोय आणि त्याला आपण इकडे सर्वच जण हातभार लावतोय !! त्यामुळे प्रदूषण हां मुद्दा कितीही चर्चा केली तरी मायबोलीवर हिरीरीने मुद्दे टाइपणाऱ्यां सर्वांकडे पापाची इक्विटी समसमान असणारे.
सध्या समाधान इतकेच मानायचे की ४जी पेक्षा ५जी ..... डीजल पेट्रोल गाडीपेक्षा सीएनजी वगैरे थोडं थोडं कमी नुकसान करेल पर्यावरणाला.. पण कुठलेच आधुनिक तंत्रज्ञान पूर्णतः पर्यावरणप्रेमी असू शकत नाही. काही प्रमाणात ऱ्हास होतच राहणार म्हणजे फक्त आजचं मरण उद्यावर ढकलले जाणार.
सुद्धा नोकिया ११०० वरती टाइप
सुद्धा नोकिया ११०० वरती टाइप करून. Wink
सतत ई कचरा निर्माण केला जातोय आणि त्याला आपण इकडे सर्वच जण हातभार लावतोय !! त्यामुळे प्रदूषण हां मुद्दा कितीही चर्चा केली तरी मायबोलीवर हिरीरीने मुद्दे टाइपणाऱ्यां सर्वांकडे पापाची इक्विटी समसमान असणारे.
सध्या समाधान इतकेच मानायचे की ४जी पेक्षा ५जी ..... डीजल पेट्रोल गाडीपेक्षा सीएनजी वगैरे थोडं थोडं कमी नुकसान करेल पर्यावरणाला.. पण कुठलेच आधुनिक तंत्रज्ञान पूर्णतः पर्यावरणप्रेमी असू शकत नाही. >>>>>>>>>>
+१११११११
अत्यंत परखड स्पष्ट शब्दात आरसा दाखवला /\
हेच लिहायचे होते , पण इतके मुद्देसूद मांडता आले नसते .
पर्यावरणवाद्या मुळेच सरकारी अनिर्बंध योजनांचा लगाम ओढला जातो पण त्या योजना सरकारला वेळेवर पुर्ण
न करता आल्यामुळे सामान्य नागरिकांच्या वाढलेल्या त्रासास हेच पर्यावरण वादी जबाबदार असतात.
पुण्यातील मुळा मुठा नद्या तीस चाळीस वर्षापूर्वीच मृतवत झाल्या आहेत , तरी देखील त्या नदीपात्रातील रस्त्याची अडवणूक करून , तेथे नसलेल्या जलचरांच्या काळजीपोटी हजारो सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या पर्यावरणवादी मंडळी बद्दल काय बोलावे ?
बरं आता त्यांच्याच झेरॉक्स कॉपीज स्मार्टफोन , laptop वापरून ( शून्य कार्बन क्रेडिट वर ) जंगल/ टेकडी वरील रस्ते , मेट्रो साठीची वृक्षतोड विरूद्ध हिरहिरीने वाद घालत असतात .
फारतर यांनी विविध शहरातील नगर पालिका सांडपाण्याचे प्रकल्प नीट राबवत नाही , कचरा व्यवस्थापन , ओला कचरा री सायकलिंग साठी , टेकड्या वरील अनिर्बंध बांधकामे , झोपड्यांची वाढ या बद्दल सरकार ला कोर्टात खेचावें.
पुण्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे ७० %शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी फुकट देण्याचा प्रकल्प पुणे मनपा ने राबवला ! इथ पर्यंत उत्तम.
पण शेकडो कोटींचा मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्व पक्षीय नेत्यांना त्या प्रकल्पाचे दोन चार कोटींचा दुरुस्तीचा खर्च करवत नाही , आणि तो प्रकल्प बऱ्याच वेळा बंद असतो .
त्यामुळे ते सांडपाणी उजनी धरणा पर्यंत प्रवाहित असते .
नैसर्गिकपणे प्रवाहित झाल्यामुळे सांडपाणी उजनी पर्यंत गेल्या नंतर कितपत शुद्ध होते हा वेगळाच मुद्दा !
असल्या समाजपयोगी योजना मध्ये पर्यावरण वाद्यानी लक्ष घातल्याचे कधी ऐकले का ?
पण पुण्यातली वेताळ टेकडी वरील रस्ता, मुंबई मेट्रो स्थानक साठीच्या होणाऱ्या वृक्ष तोड विरोधात सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकायला एका पायावर लगेच तयार .....
पुणे - अहमदनगर आणि पुणे सोलापूर रस्त्यावरील शे दीडशे वर्षांपूर्वीची झाडे तोडली गेल्याची हुरहूर वाटते , त्याच्या दहापट झाडे लावून न टिकवल्या बद्दल सिस्टीम चा राग येतो.
आणि इतकी वृक्षतोड करून देखील त्या रस्त्यावरील रोजचे ट्रॅफिक जाम पाहून नैराश्य येते !
अज्ञानी.
अज्ञानी.
ह्यांच्या पोस्ट वरून इतकेच समजून येते की पर्यावरण हानी,आणि प्रदूषण ह्या मध्ये सर्व सहभागी आहेत.
पर्यावरण प्रेमी पण त्या मध्ये सहभागी आहेत.
कारण सर्व आधुनिक तंत्र ज्ञाना च ते पण उपभोग घेत आहेत.
सहमत आहे.
अस्तित्वाला जो पर्यंत हादरे बसणार नाहीत तो पर्यंत माणूस सुधारणार नाही.
ते दिवस मला तरी वाटत जवळ आले आहेत .
जगातील लोकांना पर्यावरण हानी चे दुष्परिणाम गंभीर पने घेण्याची वेळ आली आहे ह्याची जाणीव व्ह्यायला लागली आहे
तुम्ही फारच नैराश्यवादी दिसता
तुम्ही फारच नैराश्यवादी दिसता बुवा !
शुद्ध विकास आणि जनसोय व
शुद्ध विकास आणि जनसोय व जनसेवा हाच उदात्त विचार ठेवून केलेल्या विकासात पर्यावरणाचा थोडाफार ऱ्हास होत असेल तर तो चालवून घ्यायला पाहिजे हे बरोबर. पण आरे मेट्रो टर्मिनस, मुंबईतला किनारी मार्ग हे सर्व निव्वळ बिल्डरांची धन करण्यासाठी आहे. सध्याही जे दोन मार्ग नव्याने चालू झाले आहेत त्यांना भरघोस असा प्रतिसाद नाही. इंग्रजांनी वने उपवने निर्माण केली आणि विकासही केला. आरेची जमीन हडपायची हे अनेकांचे स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. जे कार् शेड ला पाठिंबा देत आहेत त्यांनी त्या पूर्ण प्रकल्पाचा आराखडा डोळ्यांखालून घातला आहे काय? मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे काय? घाटकोपर वेसावे मार्ग सोडला तर बाकीच्या मेट्रो मार्गांची आखणी सदोष आहे. त्यांची जोडणी झाल्यावर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रवासाचे तिकीट काढता येण्याची सोय उपलब्ध झाल्यावर कदाचित त्या मार्गांचा अधिक उपयोग होऊ शकेल.
कोस्टल रोड बांधण्यामागचे सत्य तर अधिक भयाण भीषण आहे.
त्यावर लिहीत नाही कारण तो ह्या लेखाचा विषय नाही.
दारु पिणे हे शरीर स्वस्थ साठी
दारु पिणे हे शरीर स्वस्थ साठी चांगले नाही.
जे सिध्द झले आहे.
कॅन्सर, बीपी वाढ,लिव्हर खराब होते,किडनी खराब होते.
हे सर्व सर्वांना माहीत आहे.
सरकार पासून डॉक्टर पर्यंत सर्व तसे इशारे देत असते.
अगदी दारूच्या बॉटल वर पण तसे लिहलेले असते.
पण ज्यांना दारू पिण्यात सुख मिळते ते कधीच हे सर्व इशारे गंभीर पने घेत नाहीत.
उलट १००० मधील एक असा असतो की त्याच्यावर वाईट परिणाम झालेला नसतो त्याचे उदाहरण देवून .
इशारे च कसे चुकीचे आहेत ह्या वर युक्तिवाद करत असतो.
शरीराचे एक वैशिष्ठ आहे ७० ते ८० टक्के लिव्हर,किडनी खराब होई पर्यंत शरीर काहीच इशारे देत नाही.
पिनाऱ्याला भ्रमात ठेवते की तुझे शरीर तंदुरुस्त आहे .
आणि पिणारा अजून चेकळतो.
बीपी ११०/ १८०, पर्यंत गेला तरी शरीर जाणीव पण होवून देत नाही.
आणि अचानक एक दिवस पोटात दुखते .
चेक केले जाते आणि निदान होते.
लिव्हर,किडनी पूर्ण बाद.
काहीच दिवसाचा सोबती.
मग तो माणूस काय सज्जन होतो विचारू नका.
सात्विक आहार,वॉकिंग चालू,दारू बंद पण .
वेळ निघून गेलेली असते तुम्ही सुधारून स्थिती मध्ये काहीच फरक पडणार नसतो.
आणि अकस्मात मृत्यू होतो.
तसेच पर्यावरण न चे पण आहे.
ते अजून पण गंभीर इशारे देत नाही.
पूर्ण बाद झाल्या शिवाय जाणीव करून द्यायचीच नाही.
भ्रमात ठेवायचे हा निसर्ग नियम च आहे.
आज पण पावूस पडत आहे,जमिनीत अन्न धान्य,वृक्ष वल्ली फुलत आहेत , फळत आहेत.
माणसाला वाटतं आहे काही फरक पडत नाही प्रदूषण मुळे .
पण अचानक हे सर्व बंद होईल.
मागे फिरण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील.
पुढेच जावं लागेल.
आणि पुढे मृत्यू ची दरी असणार आहे.
इच्छा असो किंवा नसो.
ह्या स्थिती ला जबाबदार असो किंवा नसो .
मृत्यूच्या दारात ढकलले जाणार च आहात.
त्या विनाशाच्या स्थिती पर्यंत कधी पोचायचं किती वेळ घ्यायचा हे अजून पण थोडे फार माणसाच्या हातात आहे.
काही वर्ष फक्त ती स्थिती पुढे नेता येईल.
पण पर्यावरण पहिल्या सारखे जीवसृष्टी साठी पोषक मात्र कधीच होणार नाही.
ती वेळ निघून गेलेली आहे
जनरली कोकण म्हटले की कोकणेतर
जनरली कोकण म्हटले की कोकणेतर मंडळीना नारळी काजू आंब्याच्या बागा आणि मस्त पसरलेला समुद्र आणि भरपूर ताजे मासे हेच दृश्य दिसते किंवा भासवले जाते. पण कुठलीही कमर्शियल पिक म्हटले की ऑर्गेनिक फार्मिंगच्या नावाख़ालीसुद्धा अनेक फवारण्या केल्याच जातात. आणि पावसाळ्यात ह्याचे अंश ओढ़ा ओहोळ वहाळ करत नदी पात्रात किंवा खाडी मध्ये येऊन शेवटी समुद्रातच मिसळले (भेसळले
) जाते. हीच गोष्ट मत्स्य संगोपनाबाबत घडते. पिनियस व्हेनिम्मी असो की मोनोडोन.. आणि हल्लीचे बायोफ्लॉकच्या नावाखाली गिफ्ट तीलापीआ आणि पंगेसियस.. सर्वच गोष्टीमध्ये अतिजास्त स्टॉकिंग डेनसिटी म्हणजे तितके जास्त रोजचे फीडिंग आणि प्रोबायोटिक्स सारख्या सततच्या फवारण्या सुरूच असतात ज्या ठराविक कालावधी नंतर पाणी बदल करण्यासाठी कल्चर बॉडीमधून शेवटी लगतच्या नदी पात्रात किंवा खाड़ीमध्येच सोडल्या जातात. तात्पर्य एवढंच की - कोकण आणि कोकणी माणसे (अस्मादिकसुद्धा त्यातच
) दूध की धुले राहिलेली नाहीत. परकीय गंगाजळी वाढवण्याच्या नादात सरकार तर्फे ज्या शेतीपूरक उद्योगाना पाठबळ सतत लाभले त्या माध्यमातून अनेक वर्षे पर्यावरणाचा ऱ्हास सुरूच आहे.
फिनोलेक्स प्रकल्पानंतर रनपारच्या खाडीत उल्थापालथी झाल्या आणि छोटे मच्छीमार संकटग्रस्त झाले पण त्याच सोबत खोल समुद्रात माश्यांच्या ब्रीडिंग पिरेडमध्येसुद्धा पर्ससिन लावून अंदाधुंद मासेमारी करणारे अधिक नफा कमवायच्या मागे लागत पर्यावरणाचा नाश करतच आहेत.
पञ्चतारांकित एम आय डी सी नको कारण आंबा बागेला नुकसान होईल अश्या गवगव्याने खुप वर्षापुर्वी एक चांगला प्रकल्प स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे त्रिशंकु अवस्थेत लटकत राहिला आणि आता जिंदाल प्रकल्प आल्यानंतर पार अगदी २५ किमी पर्यन्त मुम्बई गोवा हायवेलगत निवळीच्या आसपास सुद्धा आंबा बागायतदारांचे नुकसान होऊ लागले. ह्या गोष्टी प्रगतीच्या नावाखाली अनेक ठिकाणी घड़तच राहणार. क्वचित कधी स्टरलाइटसारख्याना स्थानिक विरोधामुळे खरंच गाशा गुंडाळायची वेळ येते. अर्थात त्यामागची अंर्तगत कारणे भरपूर वेगळी आहेत हां भाग अलाहिदा !
नवनवीन प्रकल्प येतच राहणार ..सत्ताधारी कट प्रैक्टिस करणार विरोधक मोर्चा काढणार .. पब्लिक मात्र उगीच गोत्यात येणार.
कहना क्या चाहते हो.
कहना क्या चाहते हो.
मुंबईत रेल मार्ग बांधताना
मुंबईत रेल मार्ग बांधताना ब्रिटिशांना ........
>>>>
मुंबईची पोस्ट छान हीरा
कोणत्याही प्रकल्पाचे लाभधारक
कोणत्याही प्रकल्पाचे लाभधारक प्रकल्प रेटण्यासाठी इन्फ्ल्युएन्सर्सची फळी मैदानात उतरवत असते. त्यांचे काम विरोधकांना निरूत्तर करणे असते. विरोधकांना पाठिंबा देणार्यांमधे गोंधळ माजवणे असते. विरोध किंवा समर्थन यातल्या प्रत्येक मुद्द्याला का / कसे असे प्रश्न असतात. तसेच त्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा असतात. पण लाभार्थी व्यावसायिक मदत घेत असल्याने आणि विरोधक हे अनेकदा भावनिक असल्याने त्या का / कसे ची उत्तरे मिळेपर्यंत प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले असते.
अशा प्रश्नांंची व उत्तरांची अन्यत्र रोज चर्चा होत असते. मायबोलीच्या धाग्याच्या मर्यादेत साग्रसंगीत सर्व मुद्दे आणणे व्यवहार्य नाही. वानगीदाखल एखाद दुसरे उदाहरण पाहता येईल.
विरोध मोडून काढण्यासाठी पेरले
विरोध मोडून काढण्यासाठी पेरले जाणारे (काही) मुद्दे
तुम्हाला विकास नको का ?
तुम्ही ज्या मोबाईलवरून / वाय फाय / अॅण्ड्रॉईड वरून लिहीताय तो विकासच आहे. त्यासाठी काही जणांनी शिक्षण घेतलेले असते. संशोधन केलेले असते. त्याची फळे सुद्धा नाकारायला हवीत.
ही गोष्ट नाकारता येऊ शकते का ?
पण एकंदर व्यवस्था, ट्रेण्ड बघता आयसोलेशन मधे एखाद दुसर्या व्यक्तीला विरोध करता येत नाही. व्यवस्थेशी फटकून राहणे शक्य नाही. जग चाललेय त्याच्या विपरीत धोतर, बंडी नेसून नांगर घेऊन शहरात शेती करणे ही अशक्य गोष्ट आहे. बहुमताने व्यवस्था कोणती हवी यासाठी प्रयत्न करण्याने प्रश्न सुटू शकतात.
पैसा, तंत्रज्ञान, वि़कास मूठभरांकडे एकवटला तरी इतरांची त्यात फरफट होणारच. ज्याच्याकडे पैसा तो पैसा पेरून हवे तसे जनमत तयार करू शकतो. त्याचे दुष्परिणाम हे कालांतराने दिसून येतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
<< ऊर्जा ही आपली गरज आहे, हे
<< ऊर्जा ही आपली गरज आहे, हे सर्वांना मान्य आहे आणि सर्वाँना विकास ही हवा आहे. मग अशा परिस्थितीत, पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून टाहो फोडणारे पर्यावरणप्रेमी clean nuclear energy ला पाठिंबा का देत नाहीत? >>
------- इतर स्त्रोतांच्या तुलनेत nuclear energy ला क्लिन चिट मिळेलही.
सुरवातीचा खर्च मोठा आहे, " spent nuclear fuel " कुठे आणि किती वर्षे सुरक्षित ठेवणार? high level waste चे आकारमान तुलनेने कमी असेल पण पुढची अनेक दशके / शतके ते सुरक्षित ठेवावे लागेल त्याचा खर्च पण गृहित धरावा लागेल.
चेर्नोबिल तसेच फुकुशिमा मधल्या घटनांचा लोकमानसावर खोल परिणाम आहे.
ऊर्जेचा कुठलाही स्त्रोत असला तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. कोळशामुळे हानी त्वरित दिसते, तर इतर स्त्रोतांमुळे झालेली हानी त्वरित दिसत नाही. Clean / Green वाटते तेव्हढेही clean / Green नाही आहे.
मानव निर्मीत CO2, CH4 कुठेही निर्माण झाला तरी परिणामांचे चटके सर्वांनाच बसणार आहेत, कोकणवासी याला अपवाद नाही. आज नाही तर उद्या...
मानवाने आपल्या गरजा शक्य तेव्हढ्या कमी करणे / ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रत्येक क्षणाला असे करणे शक्य किंवा व्यावहारिक नाही... आपण आपल्या मानवी मर्यादेत प्रयत्न करायचा.
Pages