Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2023 - 00:43
मला ईथे माझे मत व्यक्त करावेसे वाटत नाहीये. कारण त्याने येणाऱ्या प्रतिसादांवर फरक पडू शकतो.
तरी आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे की तुम्हाला हे दोन मार्ग दाखवले तर तुम्ही कुठे जाल?
दोन्ही मार्ग कोकणात जातात.
एक निसर्गसौंदर्याने नटलेला मार्ग त्याच जुनाट कोकणात नेईल.
तर दुसरा रिफायनरीच्या प्रदूषणाने बरबटलेला मार्ग औद्योगिक कात टाकलेल्या आधुनिक कोकणात नेईल.

कि तुमच्याकडे कुठला तिसरा मार्ग आहे?
असल्यास कळवणे,
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रदूषणाचे कारण देत गडकरी
प्रदूषणाचे कारण देत गडकरी महोदयांनी कोराडी येथील प्रकल्प नको असे राज्यशासनाला पत्र दिल्याची बातमी वाचली. तो प्रकल्प अंबानीला दिल्यास जमनगरच्या धर्तीवर तिथे संत्र्याच्या बागा फुलवून देईल.
प्रदूषणाचे कारण देत गडकरी
प्रदूषणाचे कारण देत गडकरी महोदयांनी कोराडी येथील प्रकल्प नको असे राज्यशासनाला पत्र दिल्याची बातमी वाचली. >>>
कोकणातून असा लोकप्रतिनिधी निवडला जावो ही प्रार्थना
(No subject)
हर्पेन नानबा प्रतिज्ञा रघू
हर्पेन नानबा प्रतिज्ञा रघू आचार्य सर्वांच्या पोस्ट्स उत्तम आहेत.
बारसूमधील आंदोलनाच्या बातम्या आता मीडिया दाखवत नाही. मविआचे लोकही त्याबद्दल काहीही बोलत किंवा लिहीत नाहीत (कारण या बाबतीत ते उघडपणे सरकारच्या बाजूने आहेत. जैतापूर तर काँग्रेसनेच आणलेला आहे.) त्यामुळे हा खरोखर सामान्य जनता विरुद्ध एकत्र आलेले सत्ताधारी-विरोधक असा लढा आहे. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणांना गृहमंत्री फडणवीस उचलून तुरुंगात टाकत आहे. एका पत्रकाराचा खूनही त्याने दडपला आहे.पण लोक तरीही न भिता ठाम उभे आहेत.
मुळात मुंबईत रिफायनरी व अणूप्रकल्प दोन्ही असताना दुसरे अणुकेंद्र व रिफायनरी बाजूला कोकणात कशाला? आता इतर राज्यांना तो त्याग करू दे. बंगाल किंवा सदर्न स्टेट यांनी तो भार उचलावा. महाराष्ट्र म्हणजे निमूटपणे मुजोरी सहन करणाऱ्यांचा प्रदेश ही धारणा सर्वपक्षीय परप्रांतीयांची आहे. त्यामुळे जैतापूर कोकणात ढकला, मग रिफायनरी पण आणा- असं चालू आहे.
Pages