Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शेवपुरी पिझ्झा ची नो ब्रेनर
शेवपुरी पिझ्झा ची नो ब्रेनर रेसिपी आहे
.
कांदा , टोमॅटो - बारिक चिरुन , मक्याचे दाणे उकडून , फारच लाडात असल तर भोपळी मिरची किन्वा चिकन टीक्का वगैरे बारीक करून एकत्र करा त्यात रेडिमेड पिझ्झा स्प्रेडसॉस/) घाला , चांगलं ढवळून घ्या . मग शेवपूरीच्या पुर्या काचेच्या किवा मावेसेफ ताटलीत लावा . त्यावर एकेक चमचा बनवलेलं मिश्रण घालून नीट पसरवा. त्यावर चीज स्लाईसचे छोटे छोटे तुकडे करून एकेक तुकडा ठेवा . ( अगदीच फुरसतीत असाल तर ईवल्याश्या वाटीने/झाकणाने चीज स्लाईसच्या गोल चकत्या करून नीट लावा, आमच्याकडे देवाची साखरेची एक ईलुशी वाटी आहे मी कधीतरी तीने कापते) . घरी डॉमिनोजकडून आलेली पाकिटं असतातच . ते सीजनींग भुरभुरवा . मावेत अगदी १० सेकंदच गरम करा . आणि खाउन टाका .
कधीतरी चीज एक्दम गरम असते , पटकन पुरी तोंडात टाकाल तर टाळूला चिकटते . तेन्व्हा जरा दमाने .
मी कधी कधी खाकर्यावर रेडिमेड पिझ्झा स्प्रेडसॉस आणि चीज घालून मावेत गरम करते .
मैत्रीणीच्या रेसिपीने आज
मैत्रीणीच्या रेसिपीने आज पहिल्यादा तवा पुलाव ट्राय केलाय बरोबर थन्ड ताक्,बुन्दी आनी पुदिना घालुन.
वाह मस्त कॉम्बिनेशन आहे.
वाह मस्त कॉम्बिनेशन आहे. मसाला भात-पुलाव आदि मठ्ठा, दही-बुंदी वगैरेंबरोबर सुरेख लागते. छान दिसतोय मेनु.
धन्यवाद स्वस्ति हे ट्राय करता
धन्यवाद स्वस्ति हे ट्राय करता येईल
शेवपुरी पिझ्झा ची नो ब्रेनर रेसिपी आहे Happy >>>> म्हणूनच हवी होती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तवा पुलाव रेसिपी पाठव
तवा पुलाव रेसिपी पाठव प्राजक्ता! किती सुंदर रंगसंगती आहे पुलावात!
शोधक, नाचणीचे डोसे सोप्या पद्धतीने केले. म्हणजे दोन वाट्या नाचणीच्या पिठात अर्धी पाऊण वाटी दही घातलं, पाव वाटी डाळीचे पीठ घातलं आणि रात्री एकत्र भिजवून ठेवलं. सकाळी हवं तेवढं पाणी आणि मीठ घालून सरबरीत करून डोसे केले. छान आंबलं होतं पीठ.
धन्यवाद सगळ्याना!
धन्यवाद सगळ्याना!
प्राजक्ता ! विपू केलिये रेसिपी
जय महाराष्ट्र उचला एकेक..
जय महाराष्ट्र
उचला एकेक..
माझगावचा केप्सा
माझगावचा केप्सा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ म्हाळसा, फोटोत टॅग करतो तुला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा अफजलचा नसून त्यासमोरच्या मुंबई दरबारचा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण आठवणी जाग्या करायला पुरेसा आहे
.
या ताटाच्या चार बाजूला चार माणसांनी बसून खायचे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे आपल्याला बिककुल करायचे नाहीये
काल ईडली आज फ्राय
काल ईडली
आज फ्राय
.
हा अफजलचा नसून त्यासमोरच्या
हा अफजलचा नसून त्यासमोरच्या मुंबई दरबारचा आहे.>> हा केप्सा पण जबरदस्त दिसतोय.. अफजलचा केप्सा खाऊन कित्येक वर्षे झाली
त्या अफजलचे आमच्या नाक्यावर
त्या अफजलचे आमच्या नाक्यावर वाढत वाढत पाचसहा गाळे झालेत. आणि तरीही सारे फुल्ल असतात. एवढा त्यांचा धंदा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुकानाच्या नावातच त्यांनी किंग ऑफ केप्सा असे लिहीलेय
केप्सा हा (बहुधा) माझगावमधूनच मुंबईत पसरला आहे. गूगलला असेच लिहीलेय. केप्साच्या ईतिहासात पर्शिअन दरबारचेही नाव आहे. आता किर्ती दूरवर पोहोचून लांबून लांबून लोकं खायला येऊ लागल्याने त्यांचे आपापसात कॉम्पिटीशन सुरू झालेय.
मला प्रश्न पडला होता केपसा
मला प्रश्न पडला होता केपसा आणि नॉर्मल बिर्याणीतील फरक काय असतो मला हे उत्तर मिळाले -
Chicken kabsa (not to be confused with Chicken Biryani) is an Arabian chicken and rice dish which is a specialty of Yemeni cooks. Many consider this as the national dish of Saudi Arabia. Although it was inspired by the Indian biryani dish Kabsa does not use saffron and garam masala in its spices.
मला हे मिळाले
मला हे मिळाले
आणि माझ्या स्टेटसला केप्सा बघून हे नक्की काय विचारणाऱ्यांना मी हे चिपकवले
Kepsa gets its name from Kabsa, a traditional dish of Saudi Arabia, which is known as Mandi in Yemen, and Gouzi in the UAE. "They are variations of the biryani. In Hyderabadi biryani, meat is marinated and slow-cooked along with rice but here, both are flavoured and cooked separately.
साबुदाणा आप्पे, घट्ट दहि तिखट
साबुदाणा आप्पे, घट्ट दहि तिखट आणि जिरेपुड भुरभुरुन, खोबरा चटणी
![E048F0C0-8CFC-42CE-86D9-92A48F71296D.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/E048F0C0-8CFC-42CE-86D9-92A48F71296D.jpeg)
मस्त दिसताएत साबुदाणा आप्पे.
मस्त दिसताएत साबुदाणा आप्पे..दही , चटणी..
कसे केले सांग ना प्राजक्ता...
इडली सांबर ला झब्बू
इडली सांबर ला झब्बू
![IMG_20230505_092654.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/IMG_20230505_092654.JPG)
अरे वाह मृणाली ईंच का पिंच.
अरे वाह मृणाली ईंच का पिंच. मी आज सकाळी सुद्धा ईडली सांबर खाल्ले. आणि त्यासुद्धा चारच
फोटो नाही काढला. घरात सीसीटीव्ही नाही अन्यथा फूटेज टाकता आले असते ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
साबुदाणा आप्पे म्हणजे
साबुदाणा आप्पे म्हणजे रेग्युलर साबुदाणा वडेच-फक्त आप्पे पात्रात केले म्हणुन आप्पे म्हटलय.
वांगे बटाटा कितीही टेंपटिंग
वांगे बटाटा कितीही टेंपटिंग वाटले तरी आपण त्यातले फक्त बटाटा मेंबर..
श्या.. फोटो अपलोड होत नाहीत.. उद्या बघूया.. शुभरात्री
सिम्पल लन्च-सावरडो ब्रेड
सिम्पल लन्च-सावरडो ब्रेड ग्रिल मधे टोस्ट करुन त्यावर ग्वाकामोले.
(No subject)
लिट्टी चोखा
मस्त दिसतेय सगळं मंजूताई...पण
मस्त दिसतेय सगळं मंजूताई...पण ते लिट्टी चोखा असते ना?
खाल्लयं युपी मैत्रिणी च्या घरी..
हो हो लिट्टी चोखा!
हो हो लिट्टी चोखा!
मस्त दिसतोय लिट्टि चोखा
मस्त दिसतोय लिट्टि चोखा
बाउल मधली ड्राय वाली डिश काय
बाउल मधली ड्राय वाली डिश काय आहे ?
छान मंजुताई ..
छान मंजुताई ..
लिट्टीच्या आत भरलेला सत्तु !
लिट्टीच्या आत भरलेला सत्तु ! त्यात हिमि, कांदा, मीठ, कोथिंबीर, ओवा आणि लोणचं घातलं होतं. मी पहिल्यांदाच लोणचे घातलेलं पाहिलं/खाल्लं .
मंजूताई आणि प्राजक्ता, भारीच
मंजूताई आणि प्राजक्ता, भारीच फोटो आहेत सगळे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिट्टी जळाली. फोटोत एवढा वेळ
लिट्टी जळाली. फोटोत एवढा वेळ नाही घालवायचा.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
हा हाहा ! खाणाऱयाच्या मते हीच
हा हाहा ! खाणाऱयाच्या मते हीच तर खरी लिट्टी ! आवड आपली आपली! मला मात्र जळके सालासकट बटाटे फार आवडले
Pages