सल्ला मदत हवी आहे - ज्येष्ठपणा कडे झुकणा-या नातेवाइका साठी ,

Submitted by सरळ on 4 May, 2023 - 04:57

नमस्कार मायबोलीकर, मी बरीच वर्ष रोमात आहे मायबोलीवर आणी आज ब-याच वर्षानी इथे लिहितो आहे. एका गोष्टीविषयी तुमचा सल्ला / विचार हवा आहे.

एक जवळची नात्यातील चुलत बहीण आहे जिच्याविषयी सल्ला हवा आहे. ही बहीण सध्या नाशिक जवळ एका तालुक्याच्या ठिकाणी तिच्या नव-याबरोबर राहते पण तिच लग्न register नाहि. नव-याकडुन सतत बोलणी आणी त्रास आहे. माझे काका/काकु आता हयात नाहीत आणी तिला सख्खा भाउ/बहीण कीन्वा मावशी कोणी नाहिये.. बहीणीच वय ५४ आहे ..

तीला जर कुठल्या सन्स्ठेत किन्वा आश्रमात सुरक्शीतपणे रहायची सोय होण्यासारखी असेल तर pls. सुचवा. मी भारताबाहेर असल्याने मला ईछा असुनही सारख जाण शक्य होणार नाहिये आणी बहिणीच्या वयामुळे आणी शिक्षणामुळे तिला इथे आणणे शक्य नाहीये. नव-याशी भांडण आणी court Case हे शक्यतो नको आहे.

क्रुपया काही माहिती असेल तर सांगा जी उपयोगी होइल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेक अप केले की .
ह्या वयात नक्कीच काही ना काही आजार,शरीरात काही ना काही गोष्टींची कमतरता.
निघणार च .
रिपोर्ट चुकीचे आले की त्या नुसार उपचार आले.
गंभीर आजार असू शकतो असा संशय जरी निर्माण झाला की मानसिक स्वस्थ ढासळते एकट्या व्यक्ती चे जास्त ढासळते.
कारण मनीसिक आरोग्य उत्तम असण्यासाठी जी suport system असते ती त्यांच्या कडे नसते

कारण मनीसिक आरोग्य उत्तम असण्यासाठी >> चुकून झाले आहे कि कसे ?
एखाद्यासाठी संवेदनशील गोष्ट असते ती.

Reality तीच आहे.
रिपोर्ट नॉर्मल नाही आले की हजार प्रश्न मनात येतात.
आधार देणारे कोण असेल तर आधार वाटतो.
आधार देणारे कोण नसेल तर अजून जास्त एकटे वाटते
मोठी फॅमिली नसेल तर मित्र मंडळी तरी असावीच लागतात.
जी कमीत कमी मानसिक बळ तरी देतील.

बरोबर.
एरव्ही ते चुकीचं टंकन करत असतातच. पण अशा विषयावर जपून.

धन्यवाद रघु आचार्य,अश्विनीमामी,चैत्रगंधा.. मामी तुमचे सगळे मुद्दे अचुक आहेत.. तिला diabetes चालु झालेला आहे. मानसिक नुकसान किती झालं असेल त्याची तर काहि कल्पनाच नाही , जावे त्याच्या जन्मा.. पण ते सगळ आता एकदा checkup करुन घ्याव लागेल. तुम्ही सांगितलेल्या संस्थेची माहिती घेतो तुनळी वरुन..

नव-याच्या घरची शेती आहे त्यामुळे उत्पन्नाचा तोच एक मार्ग आहे. शेतीचे ७/१२ कसे आहेत , कोणाची नावे आहेत ह्याची काही कल्पना नाहिये. प्रश्न असा आहे की नेहमीच्या बोलण्यात ह्या सगळ्या गोष्टिंचा उल्लेख केला की कशाला तुम्हाला हे सगळ हवा आहे असा प्रश्न येतो त्यामुळे आता जेव्हा रुजवात करायची वेळ येइल तेव्हा हे सगळे मुद्दे काढावे लागतील .

सरळ, तुम्हाला शुभेच्छा. यातुन योग्य मार्ग लवकर निघु दे. आता थांबु नका. बहिणीला काही झाले तरी डायबिटीस कडे दुर्लक्ष करु नका सांगितले असेलच.
अमा, चांगले सल्ले दिले आहेत.

शेतीचे ७/१२ कसे आहेत , कोणाची नावे आहेत >>>
हे शोधणे आता खूप सोपे आहे.
7 12 नावाचे एक सरकारी ॲप आहे
त्यावर जिल्हा, तालुका , गाव असे डिटेल टाकले तर त्या गावातले सगळे सात बारा दिसतात. आपल्याला हवे त्या नावाचे बघू शकतो.

लग्न register kadhi ही करता येते.
त्या साठी proof म्हणून लग्न पत्रिका.
दोन साक्षीदार लागतात.
Web camera नी दोघांचे फोटो घेतले जातात
गाव असेल तर गावातील सरपंच ची सही शिक्का लागतो.
पालिका असेल तर पालिकेचा.
त्या नंतर ते paper registar कडे जमा करायचे.
दहा पंधरा दिवसात marriage certificate .
मिळते.
शेती सारख्या स्थावर मालमत्ता वर हक्क सांगण्यासाठी त्याची आवश्यकता लागेल.
समोरून विरोध झाला तर.
बायको म्हणून संपत्ती वर अर्धा हक्क महाराष्ट्रात तरी आहे.

शेती बरेचदा वडिलोपार्जित असते.
तसे असेल आणि वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी होऊन पतीला त्याचा हिस्सा म्हणुन मिळाली असेल तर पत्नीला त्यात अधिकार असतो अन्यथा नाही असे वाचले आहे. यावर जाणकाराचा सल्ला घ्यावा.

शेती वरती कर्ज (असल्यास) किती आहे ते पाहुन घ्या आधी, नाहीतर खाया पीया कुछ नहीं टाइप व्हायचं काहीतरी.
बाकी मानव ह्यांनी मुद्दा मांडलाय त्यात पतीच्या वडिलोपार्जित मिळकत / हिस्यामध्ये वाटेकरी नाही होणार. पतीच्या मृत्यु नंतर अधिकृत वारस म्हणून त्याना बायको ह्या नात्याने नंतर ते उपभोगता येईल, पण इकडे कायदेशीर विभक्त झाल्यावर हां पर्याय संपुष्टात निघतोय.

अज्ञानी,बरोबर आहे.
मुळात त्या बाई,नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बाहेर पडत असतील तर मरो ती जमीन आणि जायदाद असं मला तरी वाटते. आत्मसन्मान महत्त्वाचा नाही का?
मलाही सामोसारखाच, अमांचा पहिला मुद्दा पटला नाही.जितकी डोकी तितके सल्ले! मुळात या वयात बाई संसारातून बाहेर पडतेय म्हणजे आकाश कोसळतेय असे बऱ्याच जणांचे मत असतेय.

धन्यवाद सुनिधी, सावली, हेमंत३३३ , मा.पृ., देवकी.

कर्जाचा मुद्दा योग्य आहे , ही माहिती कशी मिळेल ते बघाव लागेल.

त्यांची शेती किंवा ७/१२ एवढ्यासाठी म्हटल की कोर्टाची वेळ आली तर पुढच्या पोटगी वगैरे च्या points साठी माहिती असावी.

घरकुल चा तुनळी वरचा कार्यक्रम बघितला पण तिथे प्रतीक्षायादी आहे , त्याना ह्या आठवड्यात संपर्क करुन बघतो.

एकट्या माणसाला बाहेर पडून पूर्ण पण स्वतःच्या हिम्मत वर सेटल होणे अवघड असते.
आर्थिक बाजू तुम्ही सांभाळ न्यास तयार आहात.
,75% अडचणी तिथेच संपल्या .
चुलत बहीण असून पण इतकी जबाबदारी घेत आहात.
खरेच तुम्ही खूप ग्रेट आहात .
मुल आई वडिलांची जबाबदारी घेत नाहीत त्या काळात तुम्ही असा विचार करत आहात

You ट्यूब वर येणारी माहिती कधीच खरी नसते.
सरकारी विशिष्ट खात्या ची माहिती हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेब साईट वर जावून ती माहिती घ्या.
यूट्यूब fb he vishvasu mahiti माध्यम नाही.

Pages