उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Plum चे facial oil blend पण चांगले आहे....उजळ कांति माहित नाही पण facial glow साठी एकदम मस्त....!
(not recommended for oily skin)

अर्थात हिरॉइन्स च्या केस मध्ये हा सतत डिटॅन ट्रिटमेंट करुन करुन झालेला इफेक्ट आणि लायटिंग ची योग्य दिशा असल्याचा परीणाम असू शकतो.>>

लायटिंगची किमया Happy सावळ्या दिपिका आणि प्रियांकाही स्क्रीनवर लख्ख गोर्‍यापान दिसतात Happy

हा धागा म्हणजे एक मोठे स्ट्रेसबस्टर आहे. माझेच जुने प्रतिसाद वाचून आता खूप गम्मत वाटतेय. सगळे प्रतिसाद परत परत वाचून तेव्हाच्या मैत्रिणींच्या प्रेमाची ऊब परत परत अनुभवतेय...

कुठे प्रश्ण विचारु समजत नाहिये म्हणुन इथे विचारते
नाक टोचलं त्या जागी बाजुला एक फोड आलाय... दुखत वगैरे नाहिये फार...हाताचा धक्का लागला की दुखतोय... चमकी व्यवस्थित फिरवता येते आहे...नाक टोचुन साधारण २ महिने होतील आता...
तर हे बरं होण्यासाठी खात्रीशीर उपाय माहिती आहे का ?
sea salt कोमट पाण्यात घालुन त्याने क्लीन करा बाकी कसलेली मलम लावु नये असं बरेच ठीकाणी वाचलं
सुरुवातीला १ महिना तेल सोडत होते पण फोड आल्यापासुन बन्द केले...
कोणाला असा अनुभव असेल तर जरुर शेअर करा..
धन्यवाद.

असं म्हणतात शीर असते त्यावर टोचले गेले की दुखतं
मला कान टोचला तेव्हा झालेलं
6 महिने त्रास झालेला।
तुला घाबरवण्याचा हेतू नाही
पण बेटाडीन ने क्लीन करून त्यावर बेताडीन ची च क्रीम लावून ठेवायचं

खरतर मला दुखत नाहिये .. पण तो फोड आलाय तो कसा आणि कधी जाणार ते समजत नाहिये
काहि जण म्हणतात नुसतं समईतलं तेल सोड, काहिहि औषध लावु नको.. अपोआप जाइल...
पेशन्स ठेवावी लागतील असं दिसतय

तुला घाबरवण्याचा हेतू नाही, पण माझं नाहीच बरं झालं. काढून टाकलं मी, दुखायच नाही पण एक विचित्र elevated फोड दिसायचं.
समईतलं तेल कापसाच्या बोळ्याने लावा,फरक पडेल.

माझ्या मानेवर दोन्ही बाजूला फिकट लालसर डाग आले आहेत,जे सुरकुतलेले दिसतात पण स्पर्शाला चोपडे, गुळगुळीत लागतात,खाज नाही आहे . फॅमिली डॉक्टरनी एक्झिमा असू शकतो असे सांगितले आहे .तर यावर काही घरगुती उपाय सल्ला हवा आहे.

इथे केसर गोटी साबणाची बरीच चर्चा झालेली. मला दोन महिन्यापुर्वी हा साबण सावंतवाडीच्या एका दुकानात दिसला. विकत घेतला. साबणासारखा अजिबात दिसत नाही. दोन इंच लांब व दोन सेमी रुंद ठोकळा ४५ रु ला मिळाला. पण केशराचा सुंदर गंध आहे. त्वचेवर रेंगाळत राहतो, मस्त वाटते. आंणि महत्वाचे हे की दोन महिन्यात टॅन होऊन काळी पडलेली त्वचा बर्‍यापैकी उजळली.

मीही इथली चर्चा वाचून केशरगोटी साबण घेतला होता. पण माझी स्किन खूपच ड्राय वाटायला लागली. मग मी बंद केला वापरायचा. आता उन्हाळ्यात परत घेऊन पाहते एकदा.
सुगंध मात्र भारी होता.

बंदिस्त तलावात पोहोल्याने क्लोरिनमुळे त्वचा काळी पडते. तो tan कसा घालवावा? पाण्यात उतरण्यापूर्वी शरीराला तेल वगैरे लावतात. त्यापेक्षा पोहून झाल्यावर काही क्रीम, तेल वगैरे लावता येईल का?

आधी तेलाऐवजी वॅसलिन चोपडावे त्याने पाण्यातल्या क्लोरिनचा त्वचेशी संबंध येत नाही.नंतर संत्र्याच्या सालीच्या वस्त्रगाळ किंवा भगराळ‌ पावडरने घासून स्नान करावे. तरीही फार फरक पडणार नाही , हा त्यातल्या त्यात बरा उपाय आहे. आधी सनस्क्रीन लोशन लावलं तरी त्वचा कमी dehydrate होते. बेदिंग सूट जास्त अंग झाकणारा घालावा. Tan हे एक प्रकारे dehydration असतं.

त्वचा चकचकीत ठेवण्यासाठी मी हा उपाय करते,

पोहून आल्यावर लगेच शॉवर घ्यावा. आणि मग फेस पॅक लावते.

जायफळ किसलेलं , दही, मध आणि बेसन
दही आंबट असावं. २० मिनिटे लावून धूवून टाकावा चेहरा. मग त्यावर नारळचं तेल लावून चोळून मग आधी कोमट मग-थंड पाण्याने धुवावे. मग काहिच लावू नये.

<<<बंदिस्त तलावात पोहोल्याने क्लोरिनमुळे त्वचा काळी पडते. तो tan कसा घालवावा? पाण्यात उतरण्यापूर्वी शरीराला तेल वगैरे लावतात. त्यापेक्षा पोहून झाल्यावर काही क्रीम, तेल वगैरे लावता येईल का?

नवीन Submitted by हीरा on 28 April, 2023 >>>

हाच प्रश्न मी ( बहुदा याच धाग्यावर) विचारला होता तेव्हा नीधप नी कोरफड जेल लावायचा सल्ला दिला होता. मी ते पोहण्याआधी आणि नंतर लावायची. चांगला फरक पडला होता.

पुण्यात तरी स्विमिंग पुल मधे तेल, जेल, क्रीम लावण्याची परवानगी नाही. पुण्यातील एका नावाजलेल्या क्लबची membership आहे, तिथे नाही, सोसायटीच्या पुलमधे नाही आणि जिम मधे पुल आहे तिथेही नाही. म्हणजे हा कॉमन नियम असावा.
मुंबई आणि गोव्यात पाहिलं की स्त्रिया कॅप न घालता स्विमिंग करतात. पण पुण्यात मी जिथे जाते तेथील सगळ्या क्लब मधे केस बांधून कॅप mandatory आहे. नाही तर पाण्यात केस वाहतात, जे बाकी लोकांना अस्वच्छ वाटतं आणि फिल्टर्स मधे केस अडकुन फिल्टरेशन system ही खराब होते.

इथे आधी कुणी कोरियन ग्लास स्किन रूटीन लिहले आहे का? कुठले प्रॉडक्ट्स घ्यावेत. YouTube वर खूप व्हिडिओ आहेत पण जर काही प्रॉडक्ट्सच्या बाबतीत रेको असतील तर खूप आवडेल. एकदम जाऊन इतके products विकत घेणे आणि नाही आवडले तर टाकून देणे बरे वाटत नाहीये.

माझा केशर गोटी साबण आला आज. ६ साबणाचा पॅक.
खूपच क्यूट साबण आहे. मिठाई सारखाच दिसतो. बर्फी सारखा.
वापरून बघेन.

आंबटगोड.. नक्की आवडेल. मी आत्ताच तोंड केसर गोटीने स्वच्छ धुवुन कॉम्प्युटरवर टिपि करतेय. मस्त फ्रेश वाटतेय Happy

<<माझा केशर गोटी साबण आला आज. ६ साबणाचा पॅक.
खूपच क्यूट साबण आहे. मिठाई सारखाच दिसतो. बर्फी सारखा.>>
आंबट गोड फोटो टाकणार का?

हो बर्फी सारखाच दिसतो, मलाही पहिल्यांदा खावाच वाटला होता... . शिवाय त्यावर हिंदीत लिहिलेलं आहे. 'इसको लगानेसे फेशियल हो जाता है.' ते वाचून मला आणि आईला फार आनंद झाला होता, आता पार्लर मध्ये जायची गरजच नाही म्हणून. आम्ही सगळ्या चिठ्ठ्यांवर विश्वास ठेवतो. Proud
सुगंध छान मंद आहे, फार लवकर झिजतो.

नेटवर सापडला -
हाच ना?
https://i.etsystatic.com/27222851/r/il/dbd13f/2898356473/il_794xN.2898356473_fes0.jpg

Pages