Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधनाची टीप मस्त आहे . मी
साधनाची टीप मस्त आहे . मी नुसती टोमॅटोची साल चेहऱ्याला चोळते. टॅन बरचस निघून जात .
सिंडरेलाची संत्राची युक्ती वापरून पाहायला हवीय . संत्र्याच्या सालीची पावडर सुद्धा मिळते अस ऐकले आहे. वापरली नाही . कोणाला अनुभव आहे का
टॅन म्हणजे काय?
टॅन म्हणजे काय?
टॅन = उन्हामुळे त्वचा रापणे.
टॅन = उन्हामुळे त्वचा रापणे.
चेहर्यावरचे खड्डे जाण्यासाठी
चेहर्यावरचे खड्डे जाण्यासाठी काही उपाय आहे का?
इथे लोकांना खायला टोमॅटो
इथे लोकांना खायला टोमॅटो नाहीत आणि याबायका केवळ गुलामगिरी टिकऊन ठेवण्यासाठी तो अंगाला फासताहेत. असहिष्णुता किती वाढावी याला काही लिमिट?
जाई आयुर्वेदिक दुकानात मिळते.
जाई आयुर्वेदिक दुकानात मिळते. मस्त असते, मी जन्मापासून गुलामगिरीत इंटेरेस्टेड असल्यामुळे मी हे सगळे प्रकार वापरलेले आहेत.
टोमॅटोची एक साल वापरली कि
टोमॅटोची एक साल वापरली कि गुलामगिरी होते ? ऐतेन
ओके साधना , वापरून पाहीन
खड्डे जाण्यासाठी काही उपाय
खड्डे जाण्यासाठी काही उपाय आहे का?>>> डॉक्टरांना दाखवा. खुप खोल असतील तर ते भरुन घेता येतात.अर्थात ही टीट्रमेंट खर्चिक असणार.
खड्डे जाण्यासाठी काही उपाय
खड्डे जाण्यासाठी काही उपाय आहे का?>>> डॉक्टरांना दाखवा. खुप खोल असतील तर ते भरुन घेता येतात.अर्थात ही टीट्रमेंट खर्चिक असणार. - अशी टीट्रमेंट पुण्यात करणारी reliable clininc मह्हीत असतील तर सांगा .
(काय करणार गुलामगिरीची सवय लवकर सुटणार नाही !)
टोमॅटोची एक साल वापरली कि
टोमॅटोची एक साल वापरली कि गुलामगिरी होते ? ऐतेन>>>>>>>>>>>>>
बराच वेळ वाचत होते पण ह्या कमेंटला फुटलेच.
साधना, थेंक्स ! टोमॅटो
साधना, थेंक्स ! टोमॅटो ज्युसचा स्कीनवर वापर करायचा कधी माहित नव्हतं. तुझी पोस्ट परवा वाचली होती. आज योगायोगाने एक भला टोमॅटो कट केल्यावर किंचीत वास येतो आहे असं वाटलं. पण खराब आहे असंही वाटत नव्हतं. खात्री नसल्याने भाजीची वाट नको म्हणुन भाजीत घातला नाही, पण हाफ कट करुन नुसताच स्कीनवर रब केला. १५-२० मि वाळल्यावर आंघोळ करताना धुवुन टाकला. गोव्याचा टॅन ( सॉल्ट वॉटर आणि कडक उन असल्या डेडली कॉम्बिनेशनने आलेला, जो महिनो न महिने टिकतो), तो सुद्धा लाइट झाला. म्हणजे अगदी जाणवण्याइतका.
आता तु सांगितलेलं सगळं मिश्रण करुन ते लावुन पाहिन विकेंडला.
काल टोमाटो ची भाजी करायला
काल टोमाटो ची भाजी करायला आईला ७-८ टोमाटो चिरून दिले… त्यातुन चांगला एक छोटी वाटी भरून रस मिळाला. रात्री थोडा वेळ चेहऱ्याला, हाताला आणि पायाला चोळला… tan थोडा कमी झाला आहे..
थंडीत कोल्ड क्रीम लावल्यावर
थंडीत कोल्ड क्रीम लावल्यावर थोड्या वेळाने स्किन काळसर होते . यावर काही उपाय आहे का
लाजूर साबण हाच आहे
लाजूर साबण हाच आहे का?
http://www.flipkart.com/sscpl-herbals-natural-fairness-soap/p/itmdwrdhfp...
पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते, प्लीज कोणी लाजुर साबण वापरला असेल तर सांगा म्हणजे मला ऑर्डर करता येईल.
चेहर्यावरील खड्डे जाण्याकरता मी एका फ़ेमस डर्माटोलॉजिस्ट कडे ४-५ वर्षांपुर्वी ट्रिटमेंट घेतली होती. खुपचं खर्चिक होती, आणि खुपचं त्रासदायक. ते आधी खड्डे भरुन येण्यासाठी कसलं तरी केमिकल टुथपिकने चेहर्यावर जिथे खड्डे आहेत तेवढ्याच भागात लावतात. मग तेवढ्याच भागात चॉकोलेटी रंगाचे पापुद्रे येतात स्किनला भाजल्यासारखे. मग १५ दिवसात ते जाउन नविन त्वचा येते, आधी चेहरा गुलाबीसर दिसतो. हा प्रकार साधारण चेहरा प्लेन होईपर्यन्त करायचा. मी लग्नाच्या आधी २ वेळा केल. होणार नवरा म्हणाला हे असलं काही करु नको चेहर्यावर खड्डे असले तरी चालतील. मग पुढची ट्रिटमेंट घेतली नाही.
पण डॉ. ने सांगितलेली ट्रिटमेंट होती की त्यानंतर एक रोलर सारखं म्हणजे हेअर ब्रश सारखं दिसणारं पण अतिशय बारिक नीडल असणारं चेहर्यावर फ़िरवतात हे ५-६ वेळा. त्यात पण ते लोकल ऑनेस्थेशिया देतात. पण अश्याच ट्रिटमेंट येण्यार्या एका मुलाचा चेहरा मी रक्त आल्यासारखा लाल झालेला पहिला होता. याशिवाय लेझर पण करतात पण त्याबद्दल काही महिती नाहिये.
कोणाला माहिती असेल तर सुचवा.
मुग्धा, तोच आहे लाजुर सोप.
मुग्धा, तोच आहे लाजुर सोप. मी वापरला आहे. चांगला आहे.
जाई, स्किन तेलकट असेल तर
जाई, स्किन तेलकट असेल तर कोल्ड क्रिमने अशी काळी पडते. आणि थंडीत कोल्ड क्रिम लावले नाही तर तोंड उघडणे कठिण जाते, उघडल्यावर तोंडाच्या आजुबाजुला पांढरे होते.
यावर उपाय म्हणुन मी आधी बोरोसिल लावायचे. आता उर्जिता जैनचे अलो वेरा जेल लावते. जेल त्वचेत मुरुन नाहिसे होईतो हलके चोळावे. नाहीतर उगीच चिकट वाटत राहिल. नाहिसे झाल्यावर मात्र चेहरा मस्त गुळगुळीत लागतो हाताला.
थंडीसाठी दूध, किंचित साय,
थंडीसाठी दूध, किंचित साय, हळद, बेसन आणि तेलकट त्वचा असल्यास बेसनाच्या समप्रमाणात तांदूळ पिठी असे पातळसर मिश्रण करून त्याने अंघोळ करावी. म्हणजे साबणाच्या ऐवजी.
एक दिवसाआड हे मिश्रण वापरावे.
खूप फरक पडतो.
नी, छान उपाय. फक्त चेहरा
नी, छान उपाय. फक्त चेहरा की अंगसुद्धा. मला साबण लावल्याशिवाय स्वच्छ वाटणार नाही. कसल्या कसल्या गुलाम्या स्विकारल्यात देवजाणे.
साय-हळद-बेसन ला अनुमोदन.
साय-हळद-बेसन ला अनुमोदन.
साधना, बोरोसिल की बोरोलिन गं?
साधना, बोरोसिल की बोरोलिन गं?
अंगसुद्धा. साबणाशिवाय स्वच्छ
अंगसुद्धा. साबणाशिवाय स्वच्छ वाटत नसेल तर ना दू + उटणे + शिकेकाई असे स्क्रब वापरून बघ अंगासाठी. एकदम मऊ मऊ होते स्किन.
थंडीत वाटतं स्वच्छ.
बोरोसिल की बोरोलिन << केश्वे
बोरोसिल की बोरोलिन <<
केश्वे बोरोसिल कसे लावता येईल?
अगं तेच ते खुशबुदार
अगं तेच ते खुशबुदार अँटिसेप्टिक क्रिम बोरोलिन. चुकुन बोरोसिल टायपले.
नी, ओके ग. उटणे आणि शिकेकाई आहे. फक्त नादु काढावे लागेल. करुन बघेन नक्कीच. तो तुझा नादुवाला हेअरप्/अॅक नियमित वापरला जातो लेकीकडुन. तिला आवडते उटण्याने स्नान केलेले. मला थोडे यक्क होते, पण तरीही , तो सुगंध आवडतो.
ती जाहिरात माझ्याही मनात
ती जाहिरात माझ्याही मनात वाजली
साधना , नी थँक्स
साधना , नी थँक्स
अश्वे
अश्वे
मला हळद आणि उटणं दोन्ही चालत
मला हळद आणि उटणं दोन्ही चालत नाही. मी सकाळी ब्रश केल्यावर चेहर्याला आणि हातापायाला चक्क खोबरेल चोळते ५ मिनिटं. मग बाकी कामं. थोडं चिकट तलकट वाटतं पण चालतं तेवढं. आंघोळीच्या पाण्यात १ चमचा ग्लिसरीन घालते. मग मैसूर सँडल साबणाने आंघोळ. चंदन असूनही कोरडं नाही वाटत. मग वॅसलीन अॅलोवेरा लोशन. चेहर्याला बदाम क्रीम अयुर चं.
म्हणजे सक्त गुलामीच ना ही!
एवढ्या गोष्टी करायच्या माझ्या
एवढ्या गोष्टी करायच्या माझ्या तरी लक्षात राहणे अशक्य.
हो गं .. मला एक गुलाम
हो गं .. मला एक गुलाम ठेवावा लागेल आता हे सगळे लक्षात आणुन द्यायला. बाकी मला करायला आवडेल हा....
निवीया सॉफ्ट म्हणुन क्रिम
निवीया सॉफ्ट म्हणुन क्रिम येतं ते बघ गं लावुन.. चेहर्याला साबण नको लावुस. हिमालयाचं अॅलोवेरा फेस वॉश येतं ते वापर.
Pages