उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुगंध छान मंद आहे, फार लवकर झिजतो>>>>

मी कित्येक दिवस वापरतेय. होता तेवढाच आहे. मी फक्त चेहर्‍यासाठी वापरते.

सामो, हा नाही. नंदिनी ब्रॅंडचा.

उर्जिता जैनची पण भरपुर चर्चा झडलेली आहे. गावी शिफ्ट होताना अलोए वेरा जेलचा ५०० ग्रॅम डब्बा सोबत आणलेला. तोच पुरवुन पुरवुन वापरत होते. केसाच्या मेंदीत दोन तिन चमचे अलोए जेल वापरुन केस मऊ ठेवायची युक्ती कळल्यावर जेल झपाट्याने संपला. मी इथे तिच्या फेस क्रिमची रेसिपी पण दिली होती. ते क्रिम संपुन तिन वर्षे झाली Happy

जैन प्रॉडक्ट ऑन्लाईन मिळतात का हे पाहात होते तर तिची साईट सापडली. सगळे प्रॉडक्ट्स आहेत व पाच पाच रुपयांचे घसघशीत डिस्काऊंटही उदारमने दिलेले आहे. मी जेलचे तिन डब्बे व काही इसेन्शियल ऑइल्स मागवलीत. केसांना लावायला जेल व फेस क्रिम तोंडाला फासायला बनवायचे असा प्लॅन आहे.

जेल तेव्हा ५०० रु ला होता. आता ६९० ला आहे. एसेन्शिअल ऑइल्सच्या तेव्हाच्या किंमती आता आठवत नाहीयेत पण आता खुप महाग वाटल्या. अवोकॅडो तेल ४८० रुला १० मिलि. पण ठिक आहे, भेसळमुक्त असणार.

हिमालयाचं केसर फेस जेल अ‍ॅलोव्हेरा + केसर समजून आणलं. छान आहे. नावात म्हटल्याप्रमाणे नॅचरल ग्लो देतंय. पण घटक फक्त केसर दिलाय. हे कसं शक्य आहे? बेस अ‍ॅलोव्हेराचा असावा असं वाटतंय.

नंदिनी केसर गोटी साबण ऑनलाईन च मिळतो का ? पुण्यात कुठल्या दुकानात मिळेल ? ऑनलाईन ६ साबणाचे पॅक दिसत आहेत . Trial म्हणून १/२ आणून बघायचे आहेत .

इथे लाजुर साबणाबद्दल बरीच चर्चा वाचली. अजूनही कुणी वापरता आहात का? आमच्या आसपास कोठेही मिळणं अशक्य आहे. Amazon वर दिसलाय.
मला खरं तर माझ्या ३ वर्षाच्या मुलीसाठी वापरायचा आहे. तिचा रंग माझ्या सारखाच सावळा आहे पण तिची स्कीन छान तुकतूकीत आणि तजेलदार होती. २ महिन्यांपूर्वी तिला शाळेत टाकलं आणि रोज येता जाता ऊन लागून फार काळवंडून गेलेय. स्कार्फ,छत्री, टोपी घालून काही उपयोग झाला नाही. लहान मुलं पण टॅन होतात हे आता कळलं. अगदी २-३ शेडस् डार्क झालेय. त्याहीपेक्षा सगळा तजेलदारपणा निघून गेलाय. पण लाजुर साबणाने स्किन कोरडी होत असेल तर आधी तेल लावून मग अंघोळ केली तर फरक पडेल का? बेसन लावून देत नाही अजिबात.

मी चिन्मयी तुम्ही शक्यतो उन्हातून जाताना तिची काळजी घ्या जसे की suncoat घालणे , hat Kinva स्कार्फ वापरा.
लहान मुलांचा sunscreen मिळतो तो वापरा.
मसूर पिठ आणि दूध vaprun बघा.

अमूपरी, सामो
लहान मुलांचं सनस्क्रीन असतं हे पण माहित नव्हतं. Uhoh
इथे मिळेल का बघते नक्की.
बाकी टोपी वगैरे गोष्टी वापरल्या. पण उन्हाच्या झळाच अशा लागतात की बाकी सबकुछ फिका. चिपळूणचे आम्ही. सगळेच ऋतू एकदम कडक.
आता महिनाभर शाळा बंद आहे.

>>>तिचा रंग माझ्या सारखाच सावळा आहे पण तिची स्कीन छान तुकतूकीत आणि तजेलदार होती.
सो स्वीट!!! मी गोरी आहे पण मला सावळा तजेला फार आवडतो. स्मार्ट दिसतात सावळ्या मुली. माझी मुलगी गव्हाळ आहे. आई सावळी होती.

अजुन एक सनस्क्रीनची अ‍ॅलर्जी येउ शकते तेव्हा आधी हातावर नाजूक त्वचेवरती लावुन पहा.

Tanning कधी कधी permanent नसते उन्हाळा गेला किंवा कमी झाला की जाईल हळूहळू.
माझा भाचा शाळेत होता तेंव्हा खूप tanned झाला होता कॉलेज मध्ये गेल्यावर उन्हात etc जाणे बंद झाले परत पाहिल्या सारखा झाला tanning गेले सगळे .
आणि एक दुसरा भाचा आहे 4 वर्षाचा माझी बहिण त्याला sunscreen लावत नाहीत पण त्याच्या शाळेत उन्हात खेळायला नेण्यापूर्वी सगळ्या मुलांना sunscreen लावतात. त्या साठी तिने परमिशन दिली आहे .

मी चिन्मयी,
अव्हिनोचे kids सनस्क्रीन बेस्ट आहे. भारतात मिळते का नाही ते माहीत नाही. पण तत्सम काही तरी मिळेल.
https://www.amazon.com/Aveeno-Continuous-Protection-Sunscreen-Water-Resi...

सनस्क्रीन लावल्यास उन्हातून मिळणारं vitamin D अडवल्या जातं त्यामुळे त्याचाही अतिरेक टाळावा.

मुलगी लहान आहे तर स्किन वर प्रयोग नको. मसुर डाळ वस्त्रगाळ पीठ + हळद त्यात थोडी साय अन दुध घालून कालवा. पातळसर लेप पुर्ण हातापायाला लाऊन नंतर छान चोळुन आंघोळी घाला.. बराच फरक पडतो टॅनिंग वर
दुसरा ऊपाय टोमॅटोचा रस लाऊन तो वाळला की थंड पाण्याने धुवून टाकायचा.

हव तर फक्त हातावर एकदा प्रयोग करून बघा

चिन्मयी हे कांती उजळ करणारे इंस्टंट उपाय म्हणजे क्रीम्स, लोशन किंवा साबण असतात ना त्यात इंस्टंट इफेक्ट साठी ब्लिच/स्टेरॉइड्स/दोन्ही वापरले जातात कारण इतक्या कमी वेळात फक्त तेच परिणाम दाखवुन शकतात.

इतक्या लहान वयात त्यांचा उपयोग कटाक्षाने टाळा असंच मी सुचविन. आपली भारतीय त्वचा इथल्या वातावरणाचा सामना करण्यासाठी बनलेली आहे. त्वचा टॅन होणे हे एक प्रोटेक्टिव मेकॅनिझम आहे‌ कारण मेलॅनिन हे नॅचरल सनस्क्रीन आहे ते जेव्हा त्वचेत गरजेपेक्षा जितक कमी असेल तितकी त्वचेला सनस्क्रीन ची गरज जास्त असते. लहान मुलांच्या स्कीन मध्ये मेलॅनिन असलं तरी कधी कधी युव्ही किरणांची तीव्रता कमी करण्यासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो.

ब्लिच/स्टेरॉइड्स च्या वापराची मात्र काही च गरज नाही उलट नुकसानच आहे. शिवाय हे टॅनिंग सिझनल असते, उन्हाळ्यात काळवंडलेली त्वचा पावसाळ्यात उन्हाची तीव्रता कमी असल्याने आपोआपच पुर्ववत होइल. जर काही लावायची असेल तर प्रोटेक्टिव गोष्टी म्हणजे कोरफड जेल, सनस्क्रीन इ लावु शकता पण ते सिम्टोमॅटिक रिलीफ साठी.

सगळ्यांच्या टिप्स साठी थॅंक्यू.
पाणी हा आवडीचा विषय आहे लेकीचा. पिण्यासाठी आणि खेळण्यासाठी पण. फक्त आंघोळ आवडत नाही. बदामाचं तेल लावून मग अंघोळ घालते आहे सध्या. बेसन आरशासमोर बसून लावलं तर चालतंय हल्ली २-३ दिवस. मग अंघोळ. आता हे दर उन्हाळ्यात होणारच आहे बहुतेक.
थोडी मोठी झाली की टोपी नीट घाल, स्कार्फ काढू नको इ. गोष्टी कळतील. मग बसेल स्वतःहून आरशासमोर आणि मला अक्कल शिकवेल. Happy

माझी स्किन अतिशय सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे कोणतेही प्रॉडक्ट डायरेक्ट वापरू शकत नाही . allergy येते लगेच. इथे केशर गोटी साबणाची चर्चा बघून घ्यावासा वाटतो आहे. पण साबण वापरल्याने स्किन एकदम ड्राय होते . कोणी ड्राय स्किन वाल्यानी वापरला आहे का हा साबण ?

Pages