भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

E4453A76-88B6-405A-8603-EE360313780F.jpeg5982B37C-8A0D-424F-B32F-4D3C474C1EF8.jpeg

खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही

खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही>>>काय भारी पोझ! एकदम हॅन्डसम बॉय दिसतोय.

ओड्याची इस्टेट

मी मागे टाकलं होतं ना, काठी म्हणजे ओड्याचा जीव की प्राण
त्यासाठी तो रिओशी मारामारी करतोच पण परवा त्याला वाटलं की आपण इथेच ठेऊन गेलो तर दुसरं कुणीतरी घेऊन जाईल म्हणून घरापर्यंत घेऊन आला. आणि आज्जी म्हणाली गंमतीत मी घेऊ का तर काठीवर पंजा ठेऊन बसून राहीला. आणि नंतर तर कॉटखाली कुठतंरी लपवून ठेवली.

जेवणाच्या वेळेपर्यंत विसरला आणि झोपताना त्याला आठवलं की आपण काठी कुठंतरी लपवली आहे मग पळत पळत जाऊन घेउन आला आणि मग चावून चावून त्याचा पार भुगा केला.

म्हणलं कोण उचलणार तुझा हा सगळा कचरा, तर काय माहीती म्हणत साळसूदपणे निघून गेला

-

https://www.instagram.com/reel/Crf-1ZaOstd/?igshid=YmMyMTA2M2Y=

ओड्याचे लक्ष नसताना मी काठी लांब टाकली झाडीत
आणि फक्त सूचना देत त्याला आणायला लावली
ओड्या ला सगळं कळतं बोललेलं हा माझा समज त्याने अगदी खरा ठरवला Happy
I m proud of my boy Happy

<<<म्हणलं कोण उचलणार तुझा हा सगळा कचरा, तर काय माहीती म्हणत साळसूदपणे निघून गेला>>>>
अगदी डोळ्यापुढे आले हे - ओडीन खांदे उडवून निघून जाताना....

<<<खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही>>>
नाक तोडलं त्या खारीचं, हात्त करू तिला...

खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही >>> क्युट Happy एखादी वाघाची मावशी असती तर हे आत्ता एक खार धरून आणली असती Happy

https://www.instagram.com/reel/CroMQidJsbQ/?igshid=YmMyMTA2M2Y=

रिओ आज घरी आलेला, दोघांनी मिळून इतका धुडगूस घातला की विचारू नका, ओड्या ने जितका आगाऊपणा करता येईल तितका आधी केला पण नंतर मग फुल मस्ती सुरू केली दोघांनी

एकच काठी,बॉल घेऊन खेळले, एकाच भांड्यातून पाणी प्यायले, आजी कडून घेऊन काकडी चे काप खाल्ले, तिच्या समोर इतके गुड बॉय झालेले विचारू नका
वरती टाकलाय तो
नुसता दिखावा, बाकी पूर्ण वेळ अशक्य मस्ती करत होते

हाहाहा - घरातील उशा, पाद्त्राणे, टॉवेल्स, टिश्यु पेपर्स - आल्ट + कंट्रोल+डिलिट - म्हणजे एकदम गायबच Happy

आमच्या ऑफिसमध्ये स्ट्रेस्बस्टर म्हणुन कुत्र्याची पिल्ले (पपीज) आणतात. आपण त्यांच्याशी खेळलं की आपला स्ट्रेस निघून जातो. अरे पण त्या पिल्लांचा काही विचार. इतकी लोकं त्यांना आंजारणार-गोंजारणार. त्यांना ते आवडत असेल का? माणूस अतिशय उर्मट आणि दीडशहाणा प्राणी आहे. स्वतः;च्या सुखा करता, अख्ख्या निसर्गाला वेठीस धरणारा.
.
कुठे लिहावे ते कळेना म्हणुन इथे लिहीलेले आहे.

प्रीती, काय क्यूट पिल्ले आहेत! अजून टाका फोटोज! मला ( स्वतः ला झेपणार नसले तरी) हस्की फार आवडतात. खूप क्यूट आणि सॅसी अ‍ॅटिट्यूड असतो!

@सामो अगदी बरोबर केवळ आपला स्ट्रेस जावा म्हणून दुसऱ्यांना किती स्ट्रेस देणार याचा काही हिशेब. मी कितीदा लोकांना लोकांना केवळ आमचा कुत्रा कित्ती cute म्हणून कसाही चोंबाळतांना पहिले आहे किंवा मग केवळ आपली गम्मत म्हणून गाढवाच्या किंवा कुत्र्याच्या शेपटाला डबे बांधले आणि ते बिचारे प्राणी घाबरून पळत सुटले म्हणून हसत बसतांना पहिले आहे

Pages