भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुलं शिकत असतात, त्यांचे कुतूहल दांडगे असते. मी माझ्या सवंगड्यांना हे असे डबे, फटाक्याची माळ, मांजरीच्या शेपटीला बांधलेली पाहीलेली आहे.
मी सुद्धा लहानपणी एका चिमणीची शेपूट कापून तिला सोडून दिलेले होते Sad आणि ती चिमणी नंतरही आम्हाला , लहान मुलांना दिसायची व आम्ही हसायचो. आणि पक्ष्यांची पिल्ले दगड मारुन पाडून आणून, आपणच त्यांची आई होणे व नंतर ते पिल्लू मेले की दु:ख करणेही केलेले आहे. आई-बाबांचा अर्थात ओरडा खाउनच.

लारा ची पिल्लं कसली गोडाम्बा आहेत Happy
अजून फोटो आणि व्हिडिओ टाका

सारा आणि लारा एकत्र खेळतात का?
तारा चे वेगळं संस्थान वाटत आहे Happy

सिम्बाचा रूम्बाशी खेळताना व पायऱ्या चढताना किती गोड दिसलाय. लारा, तारा, सारा गोंडस आहेत. ओडीनचा काकडी व्हिडिओ मस्त आहे.

काल आम्ही एक पर्फेक्ट हेड टिल्ट फोटो मिळवला.
Screenshot_20230507_103220.jpg
*Screenshot_20230507_103316.jpg
Good-boy look
Screenshot_20230507_103417.jpg

मी पण कोकोनटचे व्हिडिओ यूट्यूब वर दिले आहेत. Happy
https://youtube.com/shorts/8CRpwQtDH3w?feature=share
हा बेबी असताना
https://youtube.com/shorts/dKFNBnQ1DA8?feature=share
पाण्यात खेळताना
https://youtube.com/shorts/gYhIqPKPvS0?feature=share

अरे वा एकदम बरेच व्हिडिओ आणि फोटोज बघायला मिळाले! सिम्बा ला फॉलो केले आहे माउईने. नारळु बाळ किती भराभर मोठा झाला! हँडसम बॉय !

काय सुंदर आहे हेड टिल्ट!!!
---------
हरीतात्या माझ्याकडे इन्स्टाचे अकाउंट नसल्याने, मला सिंबाचे फोटो बघता येत नाहीयेत.

नारळु बाळ किती भराभर मोठा झाला! हँडसम बॉय !>>> हो ना ! कित्ति पटकन मोठा झालाय. हिन्दी मुव्हिज मधे चिकणे हिरो कॅटगरी असते तसा चिकणा हिरो दिसतोय.

हो फार चिकणा आहे तो, त्यात गहिरे तपकिरी रंगाचे डोळे, शुभ्र फर, पॅचेस वगैरे. .... मी लाडाने त्याला कधी महेश बाबू कधी किआनू रीव्हज् म्हणते. Happy
सर्वांना धन्यवाद. Happy

आई ग काय गोडं गोडं आहेत एकेक फोटो... रुम्बा शी वॉर सगळेच डॉगीज करतात वाटतं.... आणि पोष्ट्मन! काय वैर असतं कुणास ठाऊकं

सारा आणि लारा एकत्र खेळतात का? हो आनि चावा चावि पण करतात
तारा चे वेगळं संस्थान वाटत आहे > हो madam घरात असतात .. तिला सारा लारा घरी आलेल्य आवडत नहित

अशक्य गोंडस Happy

फोटो बघायला गोड वाटतंय पण तीन वेगळ्या ब्रीड च्या भुभ्याना एकत्र सांभाळणे या साठी हॅट्स ऑफ

आणि त्यात त्यांची बाळंतपणे देखील

जबराच

तारा आणि लॅब पिल्लाचा फोटो तर कसला साहिये

धन्यवाद आशुचँप
हो
ओफिस
२मुल
आनी पाळिव प्राणी या गोंधळ् मधे पागल होते मी कधि कधि

अरे वा प्रितीभविका, खूप छान फोटो आहे. तुमची सगळी बाळे तुम्ही छान सांभाळत आहात. खूप धावपळ होत असेल इतके भूभू असतील तर, कारण भूभूना फार अटेन्शन लागते.

एक कुतुहल म्हणून विचारतेय, तुम्ही चंद्रपूर सारख्या गरम हवेच्या ठिकाणी हस्की सांभाळता? खूप मोठे आव्हान असेल ना हे?

@प्रितीभविका ---> खूपच गोंडस आहेत पिल्ले !!!

आशुचँप यांच्याशी पूर्ण सहमत, तीन वेगळ्या ब्रीड च्या भुभ्याना एकत्र सांभाळणे या साठी हॅट्स ऑफ.

आता तर काही दिवस जबाबदारी जास्तच असेल निदान पिल्लांना चांगले नवीन घर मिळेपर्यन्त.
तुम्ही ब्रीडर आहेत का कि आवड म्हणून ?

तुम्ही चंद्रपूर सारख्या गरम हवेच्या ठिकाणी हस्की सांभाळता? खूप मोठे आव्हान असेल ना हे? >
कूलर आहे .. आणि थंड पणा राहन्यासाथि .. पोतं टाकुन जुगाड केलाय

तुम्ही ब्रीडर आहेत का कि आवड म्हणून ?

>>

कोरोना मधे dog biscuits cha udyog kelela .. misteraanni
म्हन्ता म्हनता ३ ब्रिड
झाले..
आवड म्हनुन

Pages