Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एवढा खर्च करून काम झालं की
एवढा खर्च करून काम झालं की पुन्हा राहुल रॉय व्हायचं , अरेरे! >>
पूजा भट ने कधीतरी '...धनी
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?
मी नेटफ्लिकवर ‘स्नोमॅन’
मी नेटफ्लिकवर ‘स्नोमॅन’ पाहिला. टॉप १० मधे आहे. स्लो आहे, भरपुर अॅक्शन आहे असंही नाही आणि नवंही नाही पण तरी शेवटपर्यंत पहावासा वाटला.>>>>>>>>>>
मलाही पहावसा वाटला म्हणून ने फी वर सर्च केले पण काही केल्या सापडेना !
मग गुगलून बघितले असता प्राईम वर असल्याचे कळले ....
पण नेफिवर Against the ice
पण नेफिवर Against the ice मूव्ही सत्यघटनेवर आधारित आहे .
N
१९०५ मधील नवनवीन प्रदेश आपल्या देशाशी जोडण्याच्या स्पर्धेत greenland या बर्फाच्छादित प्रदेशावर हक्क दाखवण्यासाठी अमेरिका ,ब्रिटन सारखे देश गिर्यारोहकांना पैसे पुरवून greenland मध्ये पाठवायचे .
त्यातील एका टीम ने प्रतिकूल परिस्थितीत त्या भागात कसे यश संपादन केले याचे उत्तम चित्रण म्हणजे हा मूव्ही.
मला तरी बर्फाच्छादित प्रदेशातील नयनरम्य शूटिंग आवडते बुवा !
खास करून आपल्या येथील ४० तापमानात !
किसी का भाई किसी की जान हा
किसी का भाई किसी की जान हा नितांत सुंदर चित्रपट बघा.
भर दुपारच्या शो ला जाणे.. स्विमिंग चे इयर बड सोबत असावेत..
हा घ्या जुनून https://www
हा घ्या जुनून
https://www.maayboli.com/node/2255
आशूचँप
किसी का भाई किसी की जान हा
किसी का भाई किसी की जान हा नितांत सुंदर चित्रपट बघा.>> आज मुलं जाणार आहेत. उद्या रिव्यु कळेल. गेटी गॅलेक्सीची तिकी टे काढली आहेत.
आज मुलं जाणार आहेत. उद्या
आज मुलं जाणार आहेत. उद्या रिव्यु कळेल
>>>>
आज एका वाक्यात एका शब्दात तरी टाका
आमच्याकडचेही उद्या जाऊया बोलत आहेत.मला बिलकुल ईंटरेस्ट नाही. अजून साधे ट्रेलर पाहिले नाही. काल रीलीज झाला हे सुद्धा त्यांच्याकडूनच समजले
मग गुगलून बघितले असता प्राईम
मग गुगलून बघितले असता प्राईम वर असल्याचे कळले >>>
मी पाहिलेला “स्नोमॅन” नेटफ्लिकवर आहे, २०१७ चा. प्राईमवरचा वेगळा दिसतोय.
हा घ्या जुनून>>>पानावर जायची
हा घ्या जुनून>>>पानावर जायची परवानगी नाही म्हणतात
तेव्हा बहुधा तो चित्रपट ग्रूप
तेव्हा बहुधा तो चित्रपट ग्रूप मधे आला होता. २००८ साली म्हणजे "नवीन मायबोली" नुकतीच सुरू झाली होते असे आठवते. तेव्हाच्या सेटिंग नुसार तो त्या ग्रूप मधे गेला असेल. चित्रपट ग्रूपचे सभासद झालात तर दिसायला पाहिजे.
इव्हील डेड राईज (Evil Dead
इव्हील डेड राईज (Evil Dead Rise) - थेटरात पाहिला.
इव्हील डेड फ्रॅंचाईस मधले सिनेमे आणि एकूणच हॉरर सिनेमांचे फॅन असाल, तर नक्की पहा.
माझ्या कडून टू थम्ब्ज अप.
हो का? मला हॉरर आवडतात पण
हो का? मला हॉरर आवडतात पण त्याचा ट्रेलर फारच ब्लडी होता म्हणुन मी पहायचा नाही ठरवलं होतं.
हो, प्रायर वॉर्निंग - सिनेमात
हो, प्रायर वॉर्निंग - सिनेमात हि भरपूर खूनखराबा आणि गोरी सिन आहेत.
नकोच मग.
नकोच मग.
फारएण्डचा जुनूनचा धागा वाचला.
फारएण्डचा जुनूनचा धागा वाचला. अतिशय धमाल आहे. ती कथा वाचून खालील ओळी सुचल्या. तिथेही प्रतिसादात दिल्या आहेत, पण इथे सर्व चित्रपटप्रेमींसाठी पुन्हा चिकटवतो आहे.
वाघाचाच (वाघ = शार्दुल) विषय आहे, तर त्याच्याच चालीत (शार्दुलविक्रीडितात) ही जुनून चित्रपटाची कथा सांगता येईल -
आदौ राहुल शुश्रुषार्थ गमनम्, पूजाविवाहोत्सुकम् |
हित्वा तम् अविनाश वाधवमयम् संगीतकारं प्रियम् ||
पूजा-राहुल-'चंद्ररात्र'गमनम्, कण्ठोद्भवम् दाहनम् |
भूत्वा शार्दुल-कामिनी-प्रहणनम् प्रातः पुनर्मानवम् ||
आंग्लं पत्रपठाविनाशसहितं कोलाहलं मृत्युदम् |
पश्येदं कथितम् जुनून-चरितम् 'हर्पा'-मुखे कौतुकम् ||
तेथेही लिहीलेच आहे पण हे फार
तेथेही लिहीलेच आहे पण हे फार खतरनाक भारी जमले आहे हपा मला स्टोरी माहीत असल्याने किती अचूक आहे ते ही लक्षात आले.
धन्यवाद फारएण्ड
धन्यवाद फारएण्ड
हपा -
हपा -
(No subject)
हपा, जबरी आहे हे
हपा, जबरी आहे हे
शार्दूल म्हणजे सिंह ना?
हपा जबरदस्त. असे अजून करा व
हपा जबरदस्त. असे अजून करा व धागा काढा वेगळा. पोटेन्शल आहे भरपूर. फोन वरुन वाचले होते.
किसिका भाई किसीकी जान वन वर्ड रिव्यु सिनेमा अगदीच बेकार आहे. सलमान ने मोजून पाच सहा वाक्ये आख्या सिनेमात बोलली असतील.
पण साउ थ चा आम्चा जुना क्रश वेंक टेश ( एंकन्ना) आहे. जो गोड दिसतो. व राम चरण पण एका गाण्या पुरता आहे.
हिट झाला का हा सिनेमा??
हिट झाला का हा सिनेमा??
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
आचार्य, अर्निकाच्या बांधणीच्या कविता वाहिनीवर ह्यावर चर्चा झाली आहे. मलाही पूर्वी शार्दुल = सिंह वाटत असे. पण मुळात शार्दुल म्हणजे वाघ. वाघ आणि सिंह दोन्ही जवळपास एका आकारमानाचे, एका कुळातले आणि दोन्ही हिंस्र. त्यामुळे त्या त्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्या शब्दाचा अर्थ त्यांना माहीत असलेल्या हिंस्र प्राण्याशी associate केला असावा. (जसा शेर म्हणजे सिंह, पण अनेकदा तो वाघासाठीही वापरला जातो.)
अॅन अॅक्शन हिरो प्रचंड
अॅन अॅक्शन हिरो प्रचंड एंटरटेनिंग आहे.
केऑस वॉकिंग : टॉम हॉलंड,
केऑस वॉकिंग : टॉम हॉलंड, मॅड्स मिकलसन इ. लोक दिसले म्हणून लावला.
डेस्टोपिअन जगात एका ग्रहावर रहाणार्या माणसांना एकमेकांचे विचार ऐकू येतात. मग दुसर्या एका मिशन मधली एक कॅप्सुल क्रॅश लँड होते आणि त्यातुन एक मुलगी वाचते. कन्सेप्ट भारी आहे, सुरुवात छान झाली पण मग काही फुलवता आला नाही चित्रपट. खिळवुन ठेवणारा आणि भारी करता आला असता असं वाटत राहिलं. सगळ्यांनी जितकी कामं दिली आहेत ती चांगलीच केली आहेत. पण स्टोरीतच फार दम नाहीये. एकदा बघायला ठीक आहे.
नाइट एजन्ट बघते आहे. वेगवान
चुकीच्या धाग्यावर लिहिले! वेब्सीरीज मधे हलवते आहे पोस्ट.
इथे बऱ्याच लोकांनी रेकमेंड
इथे बऱ्याच लोकांनी रेकमेंड केलेला जया जया जया जया हे आत्ता पाहिला. फुल धमाल.
(शेवटचा ट्विस्ट गेस केला होता)
Pages