Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाय द वे !
बाय द वे !
मी कार ची इन्शुरन्स पॉलिसी एक महिन्यापूर्वीच रीन्यू केली आणि टाटा ए आय जी च घेतली , तरी गुगल याच जाहिराती मला का दाखवत असेल ?
पॉलिसी घेतल्यावर त्यांच्या सिस्टीम मध्ये update होत नाही का ?
जरा इतर पण जाहिराती दाखवा म्हणावं
मिसेस अंडरकव्हर अत्यंत वाईट
मिसेस अंडरकव्हर अत्यंत वाईट सिनेमा आहे. गुप्तहेराच्या कामाविषयी घोर अज्ञान असणार्यांनी बनविला आहे हे सिद्ध करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये.
अॅमेझॉन प्राईमवर ज्युलिया
अॅमेझॉन प्राईमवर ज्युलिया रॉबर्ट्स आणि क्लूनीचा Ticket to Paradise बघितला.
हलकाफुलका, निसर्गरम्य बालीचे डोळे निववणारे दर्शन घ्यायला चुकवू नका.
<स्पॉयलर>देण्यासारखे सस्पेन्स वगैरे अर्थातच नाहीये पण तरीही.
एकमेकांना मिनिटभरही सहन करु न शकणार्या, लग्नानंतर पाच वर्षात घटस्फोट झालेल्या कपलची (ज्युलिया व क्लूनी) मुलगी वकील होऊ घातलेली आहे.
त्या चक्रात अडकण्याआधी ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती जिवाचं बाली करायला मैत्रिणीला घेऊन बालीला येते. तिथे सीवीड ची शेती करणार्या एका स्थानिक मुलाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडून त्याच्यासमवेत लग्न करुन तिथेच रहायचा निर्णय घेते.
हे कळताच आईबाबा अर्थातच तडक बाली गाठतात. बाकी कुठल्याही बाबती एकमेकांशी जमत नसले तरी मुलीने हा भलताच निर्णय घ्यावा हे दोघांनाही आवडलेले नसते त्यामुळे जोरजबरदस्ती न करता, पण गोड बोलून हे लग्न टाळता येईल का याचा प्रयत्न ते करतात. शेवट अर्थातच गोड होतो.
ज्युलिया आणि क्लूनीबद्दल काय बोलणार. दोघांमधली नोकझोक मस्त. बाकी मुलगी, मुलीची मैत्रिण, बालीमधला भारतीय चेहरेपट्टी असणारा प्रियकर इ. सर्वांची कामं मस्त, बहुतेक सर्व गुडी गुडी, रीच, एक्झॉटीक लोकेशन वरचा एक्झॉटीक एक्सपिरिअन्स देणारा, डोक्याला शॉट न देणारा
रॉमकॉम चित्रपट आहे. असे चित्रपट आवडत असतील तर हा चांगला पर्याय आहे.
शेहजादा पाहिला . २ तास फुकट .
शेहजादा पाहिला . २ तास फुकट . १९९० ची स्टोरी थोडी नव्या स्टाईलमध्ये . सगळी गाणी पुढे ढकलली. एकाही गाण्याची गरज नव्हती , खरं तर पिक्चर काढायचीच गरज नव्हती . ह्या !
मी पण कालच पाहिला Ticket to
मी पण कालच पाहिला Ticket to Paradise! मस्त लाइट मूव्ही.
हो चांगला होता टी टु पॅ. मला
हो चांगला होता टी टु पॅ. मला दोघेही फार आवडतात.
नवानवा Renfield टाईमपास अॅक्शन-हॉरर-कॉमेडी वाटला. Nicolas Cage चा Count Dracula खूप आवडला.
शहजादा, तेलुगू अलावैंकुठपुरम
शहजादा, तेलुगू अलावैंकुठपुरम चा रिमेक आहे..ट्रेलर वरून च कळले मेन सिनेमा ची वाट लावली...
कुठे अल्लू अर्जुन, कुठे कार्तिक आर्यन
A man called otto बघितला..
A man called otto बघितला.. फिल गुड सिनेमा.. आवडला..
कार्तिक आर्यन आजकाल खुप बोअर
कार्तिक आर्यन आजकाल खुप बोअर करतो.
ओरिजिनल पिक्चरच भंगार असल तर
ओरिजिनल पिक्चरच भंगार असल तर रीमेक काय करणार? कार्तिक आर्यन अल्लू अर्जुन पेक्षा केव्हाही भारी आहे. तिकडं काहीही डोक्यावर घेतात, एक पिक्चर चवबदल म्हणून हिंदीत चालला म्हणजे काय तो नॅशनल हिरो नाही झाला. त्याचा पण प्रभास होणार.
Blur पाहिला
Blur पाहिला
तापसीचा म्हणून लावला पण अशक्य बोअर झालं.
लॉजिक रानोमाळ भटकलेलं आहे.
काहीही चित्रपट. बघू नका.
त्यावर उतारा म्हणून मिसेस अंडरकव्हर पाहिला.
कॉमेडी जॉनर आहे. ह्यात लॉजिक शोधायला जाउ नये. राझी सारख्या अपेक्षा ठेवून तर बिलकुल बघू नये.
काही काही डायलॉग फारच हसवणारे.
Blur आधी पाहिल्याने आम्ही बिलकुल अपेक्षा ठेवून पाहिला नसल्याने इंटरटेनिंग वाटला.
लॉजिक शोधू नये, विनोदी म्हणून पहावा.
कुठे अल्लू अर्जुन, कुठे
कुठे अल्लू अर्जुन, कुठे कार्तिक आर्यन >> अगदीच, मी ट्रेलर बघूनच पिच्चर बघायचं टाळलं
मिसेस अंडरकव्हर >> हा देखिल बकवास.. अर्ध्यावरच सोडला
बघितला मिसेस अंडरकव्हर.
बघितला मिसेस अंडरकव्हर..टाईमपास सिनेमा आहे..
A man called Otto बघितला.
A man called Otto बघितला. सुरुवाती-सुरुवातीला फारसा आवडत नव्हता. पण नंतर हळूहळू पकड घेतली आणि मग आवडलाच. टॉम हँक्सचा प्रश्नच नाही. ती मारीसोलचं काम केलेली अभिनेत्रीही आवडली.
(अवांतर- प्रवासात विघ्न येण्याची टॉम हँक्सची परंपरा त्याचा मुलगा पुढे चालवणार की काय?)
कब्जा नावाचा पिक्चर गेले काही
कब्जा नावाचा पिक्चर गेले काही दिवस टिच्चून बघतोय. मायबोलीवरच्या कुणाही पेक्षा आपल्यात जास्त सहनशक्ती आहे हा समज गळून पडला.
केजीएफ पकाऊ असेल तर हा भ्रष्ट केजीएफ आहे. इतकी पात्रे येऊन आदळत राहतात कि वही आणि पेन घेऊन बसावे लागते.
आत्ता कोण आला ? हं. तो अमक्या याचा राईट हॅण्ड.
आधी आलेला तो तिकडचा राजा.
मग हा नवीन राजा कोण ?
ब्रिटीशांनी पिटाळले ते कुणाला ?
राज्य सोडून पळालेल्या आणि दर दर कि ठोकरे खात मुलांना भत्ता चारताना तो पावसात ओला होऊ नये म्हणून छत्री धरणार्या त्या माऊलीच्या दोन्ही लेकरांचा बीएमआय ३७ असावा इतकी ती गुटगुटीत तर राज्य असताना काय असतील असा प्रश्न पडतो. बहुतेक लॉकडाऊन मधलं शूटींग असावं.
आधीचा पोलीस अधिकारी कुठे गेला, मधेच तो त्या जंगलात भुताटकीचं रहस्य शोधायचा पिक्चर होता त्यातला हिरो का आला ? काळ नेमला कोणता चालू आहे ? राजाची मुलगी ब्रिटीश काळातल्या नायकाला जेल मधे भेटायला का जाते ? तिला अजिबात डोकं का नाही ? असेही असंख्य प्रश्न पडत राहतात.
हा एकदाचा जर संपला तर महाराष्ट्रभूषण किंवा गेला बाजार लता मंगेशकर पुरस्कारासाठी अर्ज करावा म्हणतो.
र.आ - हा नवीन कब्जा आहे काय?
र.आ - हा नवीन कब्जा आहे काय? ग्लोरियस ९०ज मधे संजय दत्तचा एक याच नावाचा होता हे आठवते.
हो. कन्नड सिनेमा डब्ड आहे.
हो. कन्नड सिनेमा डब्ड आहे. प्राईम वर आहे.
संजय दत्तचा कब्जा महेश भट वाला पाहिलेला आहे बस मधे.
संजय दत्तचा कब्जा महेश भट
संजय दत्तचा कब्जा महेश भट वाला पाहिलेला आहे बस मधे. >>> हो महेश भटचाच.
महेश भटचाच 'जुनून' ( राहुल
महेश भटचाच 'जुनून' ( राहुल रॉय => वाघ) बसमध्ये पाहिला होता आणी अजूनही जखम ओली आहे !
झाला पाहून पूर्ण. शेवटच्या
झाला पाहून पूर्ण. शेवटच्या पाच मिनिटात आणखी एका सुपरस्टारची एण्ट्री झाली.
सुदीप, रिअल स्टार उपेंद्र आणि आता हा धुमकेतू. पुढचा भाग येणार आहे.
ब्रिटीश काळात एव्हढे माफिया भारतात होते आणि त्यांच्याकडे मिसाईल्स, तोफा होत्या हे शाळेत शिकवलंच नाही.
आचार्य, कब्जा पोस्ट
आचार्य, कब्जा पोस्ट
मी पण मनोज कुमारचा 'सावन की घटा' बघतेयं प्राईमवर. शर्मिला टागोर, मुमताज, प्राण, जीवन वगैरे. जीवनने इस्टेटीसाठी बाळ गरीबा घरी दिले व घातपात घडवून आणला. प्राण ऐश करतोय.
नाव सावन की घटा पण एकदाही पाऊस पडला नाही. प्राण सारखं कपाळावर आलेले केस मान हलवून मागे सारतोय. मकु शटाला घोड्यावरून शाळेत सोडायचा , घोडा मालकामागे शहरात गेला तर हाही शटाला सोडून घोड्यामागे गेला. शटा एकदम ह्याचं मन जिंकायला गांव की गोरी होते 'जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना हमभी पीछे है तुम्हारे' गाणं म्हणतेयं. आणि मुमताजला 'आपल्या' बाबुजीचे हे इलू-इलू न बघवल्याने ती आदिवासी नृत्य करतेयं. बघा सर्वांनी. काहीच नाही ह्यात.
अस्मिता
अस्मिता
रघू आचार्य आमच्या कडं बघितला लोकांनी (सासरे आणि त्यांच्या लेकाने) कब्जा तेलुगू मधे..मला तर सगळीकडे मटणाची दुकानं दिसत होती... मला सबटायटल्स पण ठेवावे वाटले नाहीत...
नेटफ्लिक्सवर 'हंगर' हा थाय
नेटफ्लिक्सवर 'हंगर' हा थाय चित्रपट आला आहे. जरूर बघा.
हंगर कधीपासुन दिसतोय पण
हंगर कधीपासुन दिसतोय पण कॅप्शन असतील म्हणुन राहिलाय पहायचा.
मी नेटफ्लिकवर ‘स्नोमॅन’ पाहिला. टॉप १० मधे आहे. स्लो आहे, भरपुर अॅक्शन आहे असंही नाही आणि नवंही नाही पण तरी शेवटपर्यंत पहावासा वाटला. बर्फात घडणारा असल्याने अजुनच गुढता वाढते रहस्यमय सिनेमांची. नॉर्वेचे १-२ बर्फाळ प्रदेशाचे शॉट्स फार सुंदर आहेत. तेवढ्याकरता तिथे भयंकर थंडीत पण जावसं वाटलं.
सेल्फी एका बैठकीतच पाहिला.
सेल्फी एका बैठकीतच पाहिला. अचाट आहे तरीही आवडला. ट्रीटमेंटच अशी आहे कि अ आणि अ ही कथा मानली तर एंगेजिंग आहे. ज्या वाईट रितीने पडला तितकाही वाईट नव्हता. अक्षयकुमार खूपच वयस्कर दिसतो. अभिमन्यू सिंगचं कॅरेक्टर धमाल आहे.
एका अडलेल्या निर्मात्याचंही मस्त कॅरेक्टर आहे.
बाकि मीडीया, न्यूज रूम्स हा आता नियमित झालेला मसाला भरपूर आहे.
महेश भटचाच 'जुनून' ( राहुल
महेश भटचाच 'जुनून' ( राहुल रॉय => वाघ) बसमध्ये पाहिला होता आणी अजूनही जखम ओली आहे !
>>>
छान होता की. आमच्याईथे हिट होता हा पिक्चर. वाघाचा एकवेळचा मेक अप करायचा सव्वा लाख खर्च होता.
एवढा खर्च करून काम झालं की
एवढा खर्च करून काम झालं की पुन्हा राहुल रॉय व्हायचं , अरेरे! वाघांची संख्या का कमी झाली हे कळलं आता .
जुनूनचा ओरिजिनल कॅट पीपल अलका
जुनूनचा ओरिजिनल कॅट पीपल अलका सारख्या थेटरात प्रौढांसाठी असूनही यशस्वीपणे पाहिला होता.
अलका याबाबतीत सर्वात कडक थेटर होतं. सिनेमा पाहण्याचं कारण वाघात रूपांतर हे अजिबातच नव्हतं.
याच्यावर फा ने चिरफाड केल्याच
याच्यावर फा ने चिरफाड केल्याच आठवतय "धनी माझा वाघावाणी असु दे" अस काहितरी पुजा भटने एरणिच्या देवाला सान्गितल.. नक्की काय होत रे फा?
अस्मिता
अस्मिता
Pages