Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बहुतेक तोच ! :
बहुतेक तोच ! :
मल्टीप्लेक्सला पैसे घालवून पाहिलेला
ओम जय जगदीश अनुपम खेरचा.
ओम जय जगदीश अनुपम खेरचा. तिन्ही मुलगे गुणी असतात. अनिल कपूर, फरदीन , अभिषेक. फरदीन मोटर मेकॅनिक असतो. तो नव्या मोटारीचं डिझाइन बनवतो. अभिषेक कॉलेजात शिकता शिकता अँटी हॅकिंग की हॅकिंग सॉफ्टवेअर बनवतो. अनिल कपूरची म्युझिक कंपनी असते.
वारिसु सारखी स्टोरी मराठीत दोस्त असावा तर असा या पिक्चरची होती. दोस्त रमेश देव. गुणी मुलगा रविराज. त्याची प्रेयसी रूही (बेर्डॅ). पल्लवी जोशी आणि तिचा भाऊ पुतण्या पुतणी (हे नक्की आठवत नाहीए).
अवतार, स्वर्ग या खन्ना पटांची
अवतार, स्वर्ग या खन्ना पटांची कथा सेम होती. अलिकडचा बागबान सुद्धा असाच होता.
ऊन पाऊस वरून असंख्य सिनेमे आले होते.
ओम जय जगदीशचा क्लायमॅक्स
ओम जय जगदीशचा क्लायमॅक्स बघायला मला आवडतो. मजा येते तो लिलाव आणि त्या थोडे आधीपासून बघायला. त्यातली अभिषेक बच्चनची स्टाईल आवडते. बाकी पिक्चर बोअर आहे. एकदाच पाहिला आहे. पण क्लायमॅक्स सात आठ वेळा.
पण मला तो पिक्चर बघताना एक प्रश्न नेहमी पडतो, त्यात ती जुन्या पिक्चरमध्ये हिरोईनचे काम करणारी बाई बोलते की तिच्या नवऱ्याची अशी ईच्छा होती की त्यांच्या तीनही मुलांचे नाव एकत्र घेतले जावे. म्हणून ओम जय जगदीश असे ठेवले. पण त्यांना आधीच कसे माहीत होते तीनही मुलगेच होणार. नालायकांनी मुली होऊ दिल्या नाहीत का? की मुली झाल्यास जया जगदीशा करणार होते?
वारिसु मराठीतल्या खिचडीची
वारिसु मराठीतल्या खिचडीची कॉपी वाटतोय. तो भारी होता - म्हणजे मसाला तोच पण रंजना, अशोक सराफ यांचा अभिनय आणि "नउवारी नउवारी" गाणं, यामुळे तो कायमच लक्षात राहिला आहे.
खिचडी म्हटल्यावर मला या
खिचडी म्हटल्यावर मला या गाण्याशिवाय दुसरं का ही आठवत नाही
लिंकवर क्लिक न करताही सांगता
लिंकवर क्लिक न करताही सांगता येईल.. प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश ना?
हो
हो
काय खतरनाक गाणे आहे मनोज
काय खतरनाक गाणे आहे मनोज कुमार कडून उत्तेजनार्थ पारितोषिक द्यायला हवे. पूरब और पश्चिम मराठीत काढला तर त्यात सहज खपून जाईल. अर्थात अर्चना जोगळेकर ओव्हरड्रेस्ड आहे मनोज कुमारच्या हिरॉइनच्या मानाने.
सुभाष घई चा "त्रिमुर्ती" का?
अशा पिक्चर्स मधे सहसा याला वाचव, तिला वाचव करत आयुष्यभर बचावात्मक पवित्रा घेतलेला हीरो असतो. तो किमान एकदातरी त्याच घरच्या उर्मट व मॉड मुलीला डिस्को/पब मधे गुंडांपासून वाचवून मग तंग कपडे घालण्याबद्दल प्रवचन देतो. मग ती थेट एकदम टोटल भारतीय संस्कृतीप्रधान कपडे घालते व हा जर खरा किंवा मानलेला भाऊ नसेल तर त्याच्या प्रेमात पडते.
फारेंड
फारेंड
त्रिमूर्ती नाही. ओम जय जगदीश.
ओम जय जगदीश ची भन्नाट चिरफाड
ओम जय जगदीश ची भन्नाट चिरफाड केलेला एक धागा होता
फारेंड चाच होता बहुदा
ओम जय जगदीश चित्रपट प्रचंड
ओम जय जगदीश चित्रपट प्रचंड डोक्यात जाणारा आहे पण एक गाणे कहर आहे
प्यार किसीसे कब होता हैं?
जब होना हो तब होता है
प्यार का मतलब क्या होता है?
प्यार का मतलब ( इथे एक मोठा पॉज) रब होता है
आणि ही प्रश्नोत्तरे एका पार्टित चालू असतात. कुटुंबातला प्रत्येक मेंबर ह्या ज्ञानात योगदान देत असतो.
फा, “ अशा पिक्चर्स मधे सहसा
फा, “ अशा पिक्चर्स मधे सहसा याला वाचव, तिला वाचव करत आयुष्यभर बचावात्मक पवित्रा घेतलेला हीरो असतो” - हा सगळा पॅराच सुपरलोल
>>> बचावात्मक पवित्रा
>>> बचावात्मक पवित्रा
तो किमान एकदातरी त्याच घरच्या
तो किमान एकदातरी त्याच घरच्या उर्मट व मॉड मुलीला डिस्को/पब मधे गुंडांपासून वाचवून मग तंग कपडे घालण्याबद्दल प्रवचन देतो. मग ती थेट एकदम टोटल भारतीय संस्कृतीप्रधान कपडे घालते >> हे सर्व नियम पाळलेले आहेत. मोठ्या भावाची मोठी मुलगी लपून सिगारेटी फुंकत असते. लपून म्हणजे एव्हढ्या राजवाड्यापेक्षा मोठ्या महालाच्या भव्य दर-बार सदृश्य हॉलच्या एका दरवाजाच्या मागे तिने कुंडीत चाळीस पन्नास १५% ओढून उरलेल्या ८५% कांड्या, ज्या अनेक गरीबांना कामाला आल्या असत्या, टाकलेल्या असतात. एव्हढ्या लांब कांड्या टाकण्यामागे नायकाला कांडी सहज दिसावी आणि प्रेक्षकांना सुद्धा लगेच ओळखता यावी. उगा थोटकावरून संशयकल्लो़ळ नको असा स्वच्छ हेतू असणार.
आपला नायक तिला जाब विचारतो तर त्याला उद्धटासारखे उत्तर मिळते. बॉयफ्रेंड असणे हे संस्कृती नसण्याचे लक्षण आणि बॉयफ्रेंडने थेट ह्युमन ट्रॅफिकींग च्या बॉसला तिला विकणे आणि पोलिसांपेक्षा जास्त चतुराईने नायकाने तिला पळवून नेणारी कार शोधून त्याच्या अड्ड्यात जाऊन तिला सोडवून आणणे असं साग्रसंगीत सगळं आलं आहे. इथे मोठा भाऊ नीट होतो आणि त्याची मुलगी सुद्धा पश्चात्तापाने एकदमच लाईनीवर येते.
(सुभाष घईंचा युवराज आणि ओम जय जगदीश हे दोन्ही महान चित्रपट एकाच महीन्यात एकाच स्क्रीनवर पाहिले, अनिल कपूर कॉमन असल्याने गोंधळ झाला. अजूनही डोक्यात दोन्हींच्या कथानकांचं (जेव्हढे लक्षात राहिलेय) मिश्रण झालेलं आहे).
उरलेल्या ८५% कांड्या, ज्या
उरलेल्या ८५% कांड्या, ज्या अनेक गरीबांना कामाला आल्या असत्या, >>>
स्वर्ग मधे गोविंदा बहुधा हेच करतो. अग्निपथ मधे मिथून.
ओम जय जगदीश
https://www.maayboli.com/node/3047
खिचडी मधले गाणे महेश काळेंनी
खिचडी मधले गाणे महेश काळेंनी गावे एव्हढीच इच्छा !
https://www.youtube.com/watch?v=3RmHHNgBTLk
कुत्ते - विशाल भारद्वाज च्या
कुत्ते - विशाल भारद्वाज च्या मुलाचा आहे.
चोर निकल के भागा - यामि गौतमी ..
- नेट्फ्लिक्स
पठान - प्र्राइम
डबल एक्सेल बघण्याचा प्रयत्न
डबल एक्सेल बघण्याचा प्रयत्न केला. हुमा खान मला आवडते, सोनाक्षी नाही आवडत.
ह्यातले विनोद अगदीच ओढून ताणुन केलेले आहेत, एकदा दोनदा आपण जाऊ देतो..मग जरा अ ति होतं आणि अर्ध्यातच बंद केला जातो..
आजकाल चित्रपटात आई/वडील पैकी १ पात्र मुली/मुला ला समजून घेणारं असतं, आणि आजी हे पात्रं एकदम मॉडर्न विचारांचं आणि सपोर्ट करणारं असतं. हे खूप कॉमन झालय.... क्वीन पासून. ह्यात ही तसेच काहिसे आहे.
खान कि कुरेशी ?
खान कि कुरेशी ?
आजकाल चित्रपटात आई/वडील पैकी
आणि आजी हे पात्रं एकदम मॉडर्न विचारांचं आणि सपोर्ट करणारं असतं.
>>>>
हे परदेस चित्रपटातही पाहिले आहे
आणि आजी हे पात्रं एकदम मॉडर्न
आणि आजी हे पात्रं एकदम मॉडर्न विचारांचं आणि सपोर्ट करणारं असतं.>>>> चित्रपटातंच असतं असं नाही प्रत्यक्षातही असतं....
Gaslight -- predictable ,
Gaslight -- predictable , slow , childish , cliche
अरेरे. Gaslight ट्रेलर तर बरा
अरेरे. Gaslight ट्रेलर तर बरा वाटलेला.
छोडो ना यार नावाचा जिमी
छोडो ना यार नावाचा जिमी शेरगिलचा पिक्चर शेवटपर्यंत टिच्चून पाहिला. अशा पिक्चरमधे एक वेगळीच गंमत असते असा अनुभव आहे. पण तिथेही दगाफटका झाला. असा नाही तर तसा घास भरवायचा हे काही यावेळी जमले नाही.
बरं, चिरफाडमूल्यही नाही. त्यामुळे वेळ वाया गेल्याचं दु:खं झालं. तुकड्या तुकड्यात चिफा होऊ शकते. इतकाही टा़काऊ नाही.
घरचे बघत होते म्हमून मीही raw
घरचे बघत होते म्हमून मीही raw बघितला
साऊथ चा थळपती वाला
अशक्यप्राय आचरट संवाद, रानोमाळ पळून गेलेलं लॉजिक आणि एकंदरीत डेव्हिड धवन ला कॉम्प्लेक्स येईल असं काहीतरी होतं त्यात
बापरे
चिरफाडमूल्यही नाही. त्यामुळे
चिरफाडमूल्यही नाही. त्यामुळे वेळ वाया गेल्याचं दु:खं झालं. >>> हाहाहा.
भोला पाहिला(का?का?का?)
भोला पाहिला(का?का?का?)
अजय देवगण आणि तब्बू यांच्या साठी किती ग्राफिक हिंसा, ते ड्रम मधलं गाणं सहन करावं माणसाने?
व्हिलन ने सध्या पार्टीत गेलेल्या उच्चभ्रू बायकांच्या वरताण आय मेकअप आणि गेटअप करणे ही हल्लीची फॅशन आहे.ग्राफिक्स मारामारी ला वेळ पुरला नाही म्हणून कथेचा बळी दिलाय.
Kal Netflix var वध पाहिला.
काल Netflix वर वध पाहिला. थोडा डार्क आहे माहीत होतं ट्रेलर वरून, पण संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्यासारखे तगडे कलाकार आहेत त्यामुळे पहायचाच होता. खूप उत्तम कथा आणि सुंदर अभिनय. मला खूप आवडला. संजय मिश्रा नेहमीप्रमाणे दमदार अभिनय. एक आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही ताणला नाही आणि दीड तासात संपवला आहे.
Gaslight बघायला सुरूवात केलीय
Gaslight बघायला सुरूवात केलीय, सध्यातरी 'किती तो काळोख ' हे एकच फिलींग आहे.
Pages