चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण खूप नैराश्यजनक असेल तर आपण आपलं इमानदारीत गोलमाल रिटर्न किंवा टोटल धमाल बघावा म्हणजे झालं >>>
नैराश्यजनक नाही. खूप उंचावर गेल्यावर पोटात गोळा येतो. काहींना व्हर्टिगो चा त्रास होतो. पण पट्टीचा गिर्यारोहक किंवा प्रस्तरारोहक असेल तरीही त्याला खाली बघितल्यावर जे फिलिंग येतं ते हा चित्रपट बघताना वारंवार येतं.
एक प्रस्तररोहकांची तीन जणांची टीम. त्यात दोन मुली. त्यातले दोघे कपल. सुरूवातीलाच उभा कातळ चढताना कुठल्या तरी प्राण्याच्या बिळात हात घातल्यावर त्याने मारलेल्या डंखामुळे त्यातल्या एकमेव मुलाचा हात सुटून हजारो फूट खाली दरीत कोसळून त्याचा मृत्यू होतो. त्याच्या दु:खात ती जवळपास वर्षभर दारू पीत राहते. तिने आत्मविश्वास गमावलेला असतो.
अशात एके दिवशी टीममधली दुसरी मुलगी येऊन तिला यातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेतील एके काळच्या सर्वात उंच टीव्ही टॉवरवर चढाईसाठी घेऊन जाते. जिथे हा टॉवर आहे तिथे आजूबाजूला वस्ती नाही. रखरखीत वाळवंट आहे. दूरवर एक हॉटेल आहे.
डॅनच्या मृत्यूचं सावट दोघींवरही आहे. अशात दोघी जेव्हां चढाईला सुरूवात करतात तेव्हां टॉवर गंजून त्याचे नटबोल्ट्स ढिल्ले झालेले आहेत हे दोघींच्याही लक्षात येत नाही. जी डिप्रेस्ड असते ती मी हे करू शकणार नाही असे सांगतेसुद्धा. पण ती तिला धीर देत वर घेऊन जाते.
पुढचे सांगण्यात अर्थ नाही.
पण दोघीही अगदी वर टोकाला पाय खाली सोडून बसलेल्या असताना किंवा खाली वाकून बघताना. खाली अ‍ॅन्टेनावर अडकलेली बॅग घेऊन पुन्हा वर येताना अशी दृश्ये पायात गोळा आणतात. कॅमेरा खूप प्रभावी आहे. आपणच तिथे आहोत असे सतत वाटत राहते.
त्यातल्या त्यात जी धाडसी आहे तिची दृश्ये पाहताना ताण येत नाही. थरारदृश्ये बारकाईने विचार करून घेतल्याने जास्त अंगावर येत राहतात.
धाडस असेल तर नक्की बघावा. मी धाडसी नाही.

Fantastic planet किंवा La planet sauvage हा १९७४ चा फ्रेंच ऍनिमेशनपट पाहिला. खूप आवडला.

दोन मानवसदृष्य परग्रहवासी लोकांमधल्या संघर्षावर सिनेमा आहे. ऍनिमेशन जुने आहे, आणि खूप प्राथमिक आहे. पण मूळ रेखाटने खूप सुंदर असल्याने जाणवत नाही.

Om ही प्रजाती म्हणजे नॉर्मल माणसासारखी असते. तर Draags हे निळ्या रंगाचे आणि अजस्त्र माणूस - सरपटणारे प्राणी मिक्स असतात. Draags हे प्रगत असतात, आणि Oms रानटी. Oms पाळीव प्राणी म्हणून काही Draags पाळत असतात. पण रानटी, न पाळलेले Oms हे Draags ना उंदरांसारखे उपद्रवी वाटत असतात. Oms कसे Draags समाजाच्या अन्यायातून मुक्त होतात ह्याची गोष्ट आहे.

यूट्यूब वर उपलब्ध आहे.
https://youtu.be/svYte-qWbWs

फॉल अजिबात आवडला नाही
अत्यंत बेफिकीर आणि बेपर्वा ट्रेकर (ट्रेकरही म्हणवत नाही)
या असल्याचं जमातीच्या लोकांचे दर वर्षी सह्याद्री मध्ये अपघाती मृत्यू होत असतात आणि नाव ट्रेकर चे बदनाम होते

ही झाली कथानकाची गोष्ट
दिग्दर्शन मधेही प्रचंड त्रुटी आणि ढोबळ चुका आहेत

गुलमोहर बघितला. सिनेमा सुंदरच आहे पण...

त्यातला LGBT अँगल सिनेमाशी एकरुप होत नाही असं सगळ्या चित्रपटभर वाटत राहिलं. तो नसता तरी काहीच फरक पडला नसता असंच वाटत होतं. शेवटच्या वाक्याने तो चित्रपटाशी फटकून वागणारा तुकडा जिगसॉ पझलमध्ये फिट्ट बसवला. पण त्यामुळे सिनेमाची घट्ट वीणच उसवल्यासारखी झाली. नायिकेने लग्नच तडजोड म्हणून केलेलं असेल तर ती जे काही दीराला ऐकवते त्यातली हवाच गेल्यासारखी वाटली. "कभी किसीको मुकम्मल जहा नही मिलता" हे सांगायचा प्रयत्न असता तर चालून गेलं असतं, पण तसा तो नव्हता.

एक अचानक उघडली गेलेली, भळभळणारी जखम आणि त्याची मलमपट्टी एका तागडीत आणि शेवट्च्या वाक्यामुळे मिळणारी कलाटणी दुसर्‍या तागडीत. दोघांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न नसता केला तर सिनेमा खूप जास्त आवडला असता.

शर्मिला टागोरला सुरमा आणि केसातल्या घरट्याशिवाय वावरताना आणि अभिनय करताना बघताना खूप मस्त वाटलं. अमोल पालेकरना आक्रित नंतर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका करताना पाहिलं. त्या ग्रे भुमिकेला स्वतःचं असं काही सांगणं होतं, ते त्यांनी खूप सुंदर दाखवलंय. मनोज वाजपेयी - अफलातून! पण सगळ्यात आवडले ते विनोद नागपाल. अगदी नगण्य अशा लांबीच्या भूमिकेतही छाप पाडली आहे त्यांनी. हमलोग नंतर पहिल्यांदाच लक्षात राहिले ते. "तुम खुषीयां दे सकते हो क्यूं की तुम्हे वो दी गयी थी" - चर्र होतं ऐकताना.

आशुचँप,
गिरीभ्रमण, गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण यात थोडासा फरक आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल. गिरीभ्रमण (ट्रेकींग) डोंगरातून लांबच्या लांब अवघड वाटेने पायी चालत जाणे. गिर्यारोहणात ट्रेकींग करत शिखरावर पोहोचणे असते. तर प्रस्तरारोहण ( रॉक क्लायंबिंग) मधे उभा कातळ गिअर्स आणि बोटांच्या सहाय्याने चढून जायचा असतो. कातळातल्या भेगांमधे बोटं खोवत शक्ती लावून शरीर उचलून वर न्यायचे. काही व्हिडीओत तर दोर सुद्धा लावलेला दिसत नाही.
https://ggim.in/wp-content/uploads/2020/06/BRCC-e1614837164405.jpg

द लेज ( The Ledge) कुणी पाहिला आहे का ? सुरूवात पाहून बंद केला. फॉल पाहिल्यामुळे रिकमेण्ड झाला असावा. पण रॉक क्लायम्बिंग सोडून भलतीच कथा दिसतेय. बंद केला. पुढे चांगला असेल तर कळवा कुणीतरी.

Tàr पाहिला. केट ब्लांचेट ने काम सुंदर केले असले तरी बहुतांश सिनेमा बोर झाला. सिनेमा संपल्यावर सिनेमाचा पॉइंट काय होता असा प्रश्न पडला.

intrusion इंग्रजी नेटफ्लिक्स
पहिल्याच सीनला कळतंय कोण कोण आहे ते..काही थ्रीलींग नाही वाटला..शेवट तर अति प्रेडिक्टेबल..दिडतासाचा म्हणून संपवला बघून.

सोनी लिववर भूतकालम नावाचा भयपट पहिला. खूप दिवसांनी खरेच भीती वाटेल असा भयपट पाहण्यात आला. रेवती आणि चित्रपटात दाखवलेल्या तिच्या मुलाने सुरेख अभिनय केला आहे. Highly recommended for भयपट lovers.

Fall बघितला. (कारण मी धाडसी आहे) Proud
गोष्टीत खूप चूका वगैरे असून्ही बघत राहावासा वाटला. एकदम थरारक चित्रीकरण. काळजाचा ठोका चुकतो बर्‍याचदा.
Fall नावही समर्पक आहे सगळ्या दृष्टिने. बर्‍याच ठिकाणी त्या हंटर ला शिव्या पण घातल्या...
हे असे चित्रपट इंग्रजीमधेच बघवले जातात. हिंदी असता तर ढिगभर रडारड, जोशवाली गाणी, मेलोड्रामा हे टळलं नसतं.

नाईव्ज आऊटच्या तुलनेत ग्लास अनिअन सगळ्याच बाबतीत डावा वाटला. डिटेक्टिव थ्रिलर पेक्षा ब्लॅक कॉमेडी प्रकार वाटला... सगळ्यांचे अभिनय अतिशय लाऊड आणि ईरिटेटिंग वाटले.

गिरीभ्रमण, गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण यात थोडासा फरक आहे

थोडासा नाही बराच फरक आहे. माझा आक्षेप त्याला नाहीच. मी फ्री सोलो डॉक्युमेंटरी बघीतली आहे. माझा आक्षेप आहे ती जी इन्स्टावर लाईक मिळवायला काहीतरी आचरपटणा करत असते त्या मानसकितेला. कसल्याही प्रकारची तयारी न करता या तो टॉवर चढायला जातात. दोघीत एक पाण्याची बाटली, एक छोटी सॅक. ओ प्लिज यापेक्षा जास्त पाणी मी रन करताना सोबत ठेवतो.

एकंदरीतच त्या दोघींची मानसकिता भयंकर बेपर्वा वाटली आणि अशाच वृत्तीच्या लोकांचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे

पण बेपर्वा मानसिकता आहे हा विषयाचाच भाग आहे ना? मी थोडा बघितला आणि सोडला त्यातल्या आकलनाला धरुन लिहितोय.

त्या ज्या वेळी ढाब्यातून बाहेर पडून मेन रोडला येत असतात तेव्हां हायवेला जोरात ट्रक जाते. त्या दोघीही दचकतात. म्हणजे त्या तशाच असतात हे मुद्दामून दाखवलं आहे ..

प्राईमवर फॉल पाहिला.स्वतः अडव्हेंचर व्यक्तिमत्त्व नसल्याने पाहताना अर्थातच भीती वाटली.चित्रीकरण सॉलिड घेतलं आहे.सर्व्हायव्हल म्हणजे नेहमी सुंदर, अगदी लिमिटेड नुकसान वालं नसतं हे जाणवतं.
काही काही गोष्टींच्या लॉजिक बद्दल शंका आहे.पण ज्यांना थोडेफार थ्रिलर चालतात आणि अगदी लगेच घाबरायला होत नाही त्यांनी नक्की बघावा.

काल पठाण बघितला. अचाट आणि अतर्क्यपणाची पातळी सुरुवातीच्या काही मिनिटांमधेच सेट झाली की बरं असतं. त्यानुसार पुढे अपेक्षा ठेवता येतात. Proud पठाणच्या बाबतीत पुढे अधूनमधून ती पातळी थोडी थोडी वर न्यावी लागली, पण हरकत नाही. 'तू है मेरी केरन' ला तर मनापासून दाद दिली. शेवटी मात्र 'हमें ये प्लेन गिराना पडेगा' वाला प्रसंग हे जरा जास्तच झालं!

A Simple Favor - अ‍ॅमेझॉन प्राइम वर काल पाहिला. ब्लॅक कॉमेडी थ्रिलर प्रकारातला धमाल सिनेमा. मला अ‍ॅना केन्ड्रिक फार आवडते. ती तिच्या हातखंडा रोल मधे आहे, सोबत ब्लेक लाइवली आणि क्रेझी रिच एशियन्स मधला हिरो पण यात आहे.
अ‍ॅना चे कॅरेक्टर म्हणजे स्टेफनी, एक सिंगल मदर, आयडियल, परफेक्ट पेरेन्ट कॅटेगरीतली. तिला नविन मैत्रिण एमिली - म्हणजे खरं तर तिच्या मुलाच्या मित्राची आई भेटते, तिच्या कम्प्लीटली ऑपोझिट पर्सनॅलिटी असलेली, अग्रेसिव, करीयर वुमन, पॉवरफुल, बिनधास्त. त्यांची मैत्री होते, एमिलीच्या करीयर डिमान्ड्स मुळे तिला उशीर होईल तेव्हा स्टेफनी तिच्या मुलाचे बेबी सिटिंग करत असते. एकदा असाच उशीर होणार म्हणून एमिली एक सिंपल फेवर - तिच्या मुलाला पिक अप करायला स्टेफनी ला सांगते. पण ती परत येतच नाही. ही मिस्टरी, स्टेफनी, तिचा व्लॉग याभोवती पुढची स्टोरी फिरते. मस्त डाय्लॉग्ज आणि क्रिस्प स्टोरी, मजा आली बघायला.

अ सिंपल फेवर मूव्हीपास अँप पूर्ण भरात असतांना पाहिलेला.

थेटरात शून्य अपेक्षा ठेऊन गेलो होतो आणि सिनेमा फार आवडलेला.

सध्या फॉल पाहत आहे
एक वर्ष डिप्रेशन मध्ये असणारा एवढे climb करू शकत nahi without practice आणि ते सुद्धा without ग्लोव्हस

वारिसु (वारीस) (हिंदी डब्ड). आउटडेटेड मेलोड्रामा. भारतातला कोणत तरी आघाडीचा उद्योग. त्याची तीन मुलं.
धाकटा (विजय थलपती) थेट ऑक्सफर्ड मधून शिकून आलेला. स्वतंत्र विचारांमुळे त्याला उद्योगपती बाप घराबाहेर काढतो.
मोठे दोन भाऊ स्वार्थी असणे. एकाचं पाऊल घसरणे, दुसर्‍याचे बाहेरून उचललेल्या पैशामुळे अडचणीत येणं याचा फायदा विरोधक घेतात.
हे घर मग बाहेर काढलेला धाकटा मुलगा सावरतो. दोन्ही मुलांचे संस्कार स्वार्थी असताना याला ऑक्सफर्डच्या शिक्षणामुळे वेगळे संस्कार मिळतात. तिकडे हाणामारी पण शिकवतात. ३ बिलियन डॉलर टर्नओव्हर असलेल्या इंडस्ट्रीचा मालक मारामारी करतो,
नाचकाम करतो. पोरगी पटवतो आणि मोठ्या भावांना अद्दल शिकवत वठणीवर आणतो.
अशा घासून गुळगुळीत लाईनवर आजही चित्रपट बनतात. सुभाष घईचा असलाच एक पिक्चर दणकून आपटला होता.

Pages