एका लोकल नर्सरीमधे असे ऐकले कि कांदे नि टोमॅटो/ भोपळी मिरची एका आड एक लावल्याने कांड्याची यील्ड जबरदस्त येते. काल कांदे लावले आहेत. महिन्याभरामधे मधे भाज्या लावून मे मधे कांद्यांचे काय होते बघेन.
या वर्षी हवामानातला बदल चांगलाच जाणवत आहे. अनिश्चितता वाढली आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत बागकाम करताना काही नवे प्रयोग करणार असाल तर त्या बद्दलची माहिती इथे जरुर शेअर करा.
मी यावर्षी मिल्क जग वापरुन विंटर सोइंग केले नाही. त्या ऐवजी मार्चमधे बाहेर कुंड्यांमधे बियाणं पेरणार आहे.
त्या ऐवजी मार्चमधे बाहेर कुंड्यांमधे बियाणं पेरणार आहे. >> ते आत बाहेर करण्याच्या त्रासापोटी आम्ही आता डायरेक्ट ट्रांसप्लांट करतो भाज्या , फळभाज्य वगैरे. इथे मे नंतर भसाभसा टेंप वाढल्यामूळे बियांपासून सुरू होणारी झाडे जून-ऑगस्ट तीन महिने ब्रेक घेतात हे परवडत नाही.
मोगर्याच्या झाडावर स्पायडर माइट्स झाले आहेत ते जायचं नावच घेत नाहीयेत. नीम ऑईल + डिश सोप मिक्स केलेलं पाणी मारून पाहिलं, अल्कोहोल मारून पाहिलं, नुसतं पाणी मारून पाहिलं पण थोडे दिवसांनी परत दिसायला लागतात. अगदी माझ्या डोळ्यांसमोर विजयी हास्य वगैरे करत पानांवरून चालत रहातात. सध्या आठवड्यातून एकदा नीम ऑईल + डिश सोप मिक्स पाण्याने पानं पुसून घेते आहे. पण हे जाम थकवणारं आणि पुष्कळ वेळ घालवणारं काम आहे. मोगरा फार मोठा नाहीये म्हणून जमतंय. पण मोठा झाल्यावर काय? कोणाला स्पायडर माइट्स वर काही जालीम उपाय / औषध माहिती आहे काय ज्यामुळे ते कायमचे जातील?
मोगरा गोडं झाड आहे.
कुणीतरी आपल्या कुंडीतले मोगरा झाड नको म्हणून( दहा महिने विश्रांती आणि दोन महिने फुलं) रस्त्यावरच्या न.पालिकेने लावलेल्या झाडाच्या पिंजऱ्यात टाकलेले. ते तिथे भरमसाठ वाढलेले आणि फुले पाहून मी त्याचे कटिंग आणून रोप वाढवले बाल्कनीत. त्यावर सर्व रोग पडले, ते रस्त्यावरचे मात्र निरोगी.
कडक ऊन मिळणे हेच औषध असावे.
तरीही त्यातल्या त्यात फांदीवर एकाच दिशेने पानांच्या जोड्या असणारा मोगरा (वेल मोगरा) लावून पाहा. जरा रोग कमी पडतील.
एका लोकल नर्सरीमधे असे ऐकले कि कांदे नि टोमॅटो/ भोपळी मिरची एका आड एक लावल्याने कांड्याची यील्ड जबरदस्त येते.
कांदे कमी पाण्यावर वाढणारे पीक आहे. मुळाशी पाणी साठलेले चालत नाही. टोमॅटो/ भोपळी मिरची, झेंडू हे पाणी फार पितात. आणि कांद्याच्या मुळाकडचे साचलेले पाणी कमी करतात.
माझा मोगराही बाल्कनीतच असतो एरवी. गेले काही महिने बाल्कनीत ऊन येत नाहीये म्हणून एका खोलीच्या खिडकीत हालवला आणि स्पायडर माइट्स उद्भवले. म्हणजे बाहेर असताना काही झालं नाही आणि घरात ठेवल्यावर घात झाला. बरं, ऊन्हाचं म्हणावं तर बाल्कनीपेक्षा या खिडकीत जास्त आणि जास्त वेळ ऊन असतं.
तरीही त्यातल्या त्यात फांदीवर एकाच दिशेने पानांच्या जोड्या असणारा मोगरा (वेल मोगरा) लावून पाहा >>> असं झाड अॅमॅझॉनवर शोधता आलं तर पहाते. पण आत्ता आहे या झाडाचं काय करू? मला टाकायचं नाहीये हे झाड.
र्म्द, आम्ही बर्यापैकी छाटून टाकलेला मोगरा नि उरलेल्या मोजक्या पांनांवर तू म्हणतेस तसेच आधी रबिंग अल्कोहोल नि मग नीम ऑईल चा प्रयोग केला होता. महिनाभर दर आठवडा हे करावे लागले होते.
मोगर्याच्या किड्यांचं माहित न्हवतं. आम्ही मोगरा जमिनीत लावलाय आणि काहीही काळजी न घेता बदाबदा स्नो पडला तरी बरोबर पुढच्या सीझनला वाढून फॉलला भरपूर फुलतो.
माझ्याकडच्या मोगर्याला गेल्या मोसमात फुले आली नाही. पण यावर्षी जोमाने वाढला आहे. फुलं येतील की नाही देव जाणे. बांबूही छान वाढलाय. घरात एक कोपरा किंवा मध्यवर्ती म्हणा जागेत सृष्टीचं हे हिरवंगार रुप शोभा देउन जातं.
spider mites फार त्रासदायक असतात.
कडिपत्त्यावर आले होते तेव्हा नीम ऑइल - डिश सोपने सतत धुण्यावर भागले होते. पण अक्षरश: एक एक पान धुतले होते. २-३ दिवसातून एकदा.
त्याची कुंडी आणि आजूबाजूची जागापण साबण्याच्या पाण्याने पुसली होती.
बाल्कनीमध्ये झालेले महाचिकट होते. नीम ऑइलला त्यांनी मुळीच दाद दिली नाही. त्यांना १० भाग पाण्यात १ भाग दूध हा उपाय कामी आला. पण दुधाचा एक वास राहतो. खाली कुंडीत newspaper टाकला तर दूध मातीत मुरत नाही, वास कमी होतो.
season संपल्यावर बाल्कनी आणि त्यातील एकूण एक गोष्ट क्लोरीन पाण्यात घालून त्या पाण्याने धुतली. पुढच्या वर्षी अज्जीबात झाले नाहीत.
आता मिरचीवर झाले आहेत. त्या झाडांना वेगळे ठेवले आहे. जास्त infected भाग सरळ काढून टाकला. शॉवरखाली धुतले. आता नीम ऑइल चालू केले आहे.
रूपा, झाडाभोवती ह्युमिडिफायर लावता येत असेल तर पहा. माती कायम ओलसर असेल आणि ह्युमिडिटी जास्त असेल तर स्पायडर माईट्सचा टिकाव लागणार नाही. रबिंग अलकॉहॉल स्प्रे २-३ दिवसांआड वापरत जा . घरातल्या इतर रोपांपासून मोगरा वेगळा ठेव .
Chioo आणि मेधा, थँक्यू!
दूध स्प्रे करणं जरा ट्रिकी वाटतंय.
पण मेधा, तुझा उपाय जमणेबल आहे आणि तुलनेने सोपा सुद्धा. ह्युमिडिफायर नाहीये पण झाडावर आणि मातीवर दर थोड्या वेळाने पाणी स्प्रे करता येईल. आजपासूनच करून पाहते. मला वाटतं झाड घरात असल्याने थोडं कोरड्या हवेत राहाते आहे आणि त्यानेच प्रॉब्लेम झालाय की काय देव जाणे.
झाड छाटून टाक शक्य होइल तेवढं. आत्तास्प्रिन्गमध्ये अंडी हॅच व्हायला लागतात. योगायोगानं कुंडी हलवल्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली असेल. फांद्या छाटल्यावर उरलेल्या झाडावर आणि मातीवर नीम ऑइल स्प्रे करत रहा.
फांद्या छाटणारच आहे. पण सध्या थोड्याफार कळ्या आल्या आहेत. त्यामुळे त्या फुलून गेल्यावर छाटाव्या असा विचार आहे. तोवर हे रबिंग अल्कोहोल आणि नीम ऑईल स्प्रे करत राहीनच. नीम ऑईल मातीत पण स्प्रे करून पाहते. गूड सजेशन. थँक्स.
माझा झोन 6A.
मी १-२ एप्रीलला माती किंवा त्याच्या आधीच्या विकेंडला ओनियन सेट्स लावणार आहे. माती कधी कोरडी असेल त्यावर नक्की कधी ते ठरेल.
इथे कुणी सीड्स ऑफ इंडीयातून रिमझिम, अंदाज , बिज्ली यापैकी वांग्याच्या बीया मागवल्या असल्यास प्लीज रिव्यू लिहाल का? मी पूर्वी कधीतरी त्यांच्याकडून बीया मागवल्या होत्या. आता तिथे इतके प्रकार आहेत की काय मागवावे असे झाले. माझ्याकडे गावच्या दुकानातून घेतलेले ब्लॅक ब्युटी आहे.
मेधा आणि सिंडी, तुम्हा दोघींचेही उपाय करून पाहिले. कळ्या उमलून गेल्यावर झाडाची छाटणी करून नीम ऑईल+डिश सोप+पाणी या मिश्रणाने सगळी पानं नीट पुसून घेतली. मेधाने सांगितल्यापासून झाडावर दिवसातून १-२ वेळा तरी पाणी स्प्रे करते. आणि एका दिवसाआड झाडाच्या मुळात आणि जनरलच मातीवर नीम ऑईल स्प्रे करते आहे. स्पायडर माइट्स ऑलमोस्ट गेलेत असं वाटतंय. निदान खूप कमी तरी झालेच आहेत. तुम्हा दोघींनाही स्पेशल थँक्स.
इथे कुणी सीड्स ऑफ इंडीयातून रिमझिम, अंदाज , बिज्ली यापैकी वांग्याच्या बीया मागवल्या असल्यास प्लीज रिव्यू लिहाल का? >> मी मागवल्या होत्या. हिट ऑर मिस केसेस होत्या. पण तोच अनुभव इथल्या लोकल कंपनींबद्दल पण होता तेंव्हा कंपनीपेक्षा इथल्या वातावरणाशी संबंध असावा असे वाटते.
वांग्याचं बी कधीच चांगलं निघालं नाही मी मागवलेल्यातलं तरी. मी आता लोकल नर्सरीतून मोठी वांगी आणि न्युजर्सीहून लहानी आणि हिरव्या वांग्यांची रोपं आणते. मोप पीक आलं गेल्या वर्षी.
एका लोकल नर्सरीमधे असे ऐकले

या वर्षी हवामानातला बदल

>>कांदे नि टोमॅटो/ भोपळी
>>कांदे नि टोमॅटो/ भोपळी मिरची एका आड एक>> इंटरेस्टिंग! मी नेहमी स्ट्रॉबेरीपॅचमधे कांदे लावते. आता थोडे असेही लावेन.
त्या ऐवजी मार्चमधे बाहेर
त्या ऐवजी मार्चमधे बाहेर कुंड्यांमधे बियाणं पेरणार आहे. >> ते आत बाहेर करण्याच्या त्रासापोटी आम्ही आता डायरेक्ट ट्रांसप्लांट करतो भाज्या , फळभाज्य वगैरे. इथे मे नंतर भसाभसा टेंप वाढल्यामूळे बियांपासून सुरू होणारी झाडे जून-ऑगस्ट तीन महिने ब्रेक घेतात हे परवडत नाही.
मोगर्याच्या झाडावर स्पायडर
मोगर्याच्या झाडावर स्पायडर माइट्स झाले आहेत ते जायचं नावच घेत नाहीयेत. नीम ऑईल + डिश सोप मिक्स केलेलं पाणी मारून पाहिलं, अल्कोहोल मारून पाहिलं, नुसतं पाणी मारून पाहिलं पण थोडे दिवसांनी परत दिसायला लागतात. अगदी माझ्या डोळ्यांसमोर विजयी हास्य वगैरे करत पानांवरून चालत रहातात. सध्या आठवड्यातून एकदा नीम ऑईल + डिश सोप मिक्स पाण्याने पानं पुसून घेते आहे. पण हे जाम थकवणारं आणि पुष्कळ वेळ घालवणारं काम आहे. मोगरा फार मोठा नाहीये म्हणून जमतंय. पण मोठा झाल्यावर काय? कोणाला स्पायडर माइट्स वर काही जालीम उपाय / औषध माहिती आहे काय ज्यामुळे ते कायमचे जातील?
मोगरा गोडं झाड आहे.
मोगरा गोडं झाड आहे.
कुणीतरी आपल्या कुंडीतले मोगरा झाड नको म्हणून( दहा महिने विश्रांती आणि दोन महिने फुलं) रस्त्यावरच्या न.पालिकेने लावलेल्या झाडाच्या पिंजऱ्यात टाकलेले. ते तिथे भरमसाठ वाढलेले आणि फुले पाहून मी त्याचे कटिंग आणून रोप वाढवले बाल्कनीत. त्यावर सर्व रोग पडले, ते रस्त्यावरचे मात्र निरोगी.
कडक ऊन मिळणे हेच औषध असावे.
तरीही त्यातल्या त्यात फांदीवर एकाच दिशेने पानांच्या जोड्या असणारा मोगरा (वेल मोगरा) लावून पाहा. जरा रोग कमी पडतील.
एका लोकल नर्सरीमधे असे ऐकले
एका लोकल नर्सरीमधे असे ऐकले कि कांदे नि टोमॅटो/ भोपळी मिरची एका आड एक लावल्याने कांड्याची यील्ड जबरदस्त येते.
कांदे कमी पाण्यावर वाढणारे पीक आहे. मुळाशी पाणी साठलेले चालत नाही. टोमॅटो/ भोपळी मिरची, झेंडू हे पाणी फार पितात. आणि कांद्याच्या मुळाकडचे साचलेले पाणी कमी करतात.
rmd, या सगळ्या उपायांबरोबरच
rmd, या सगळ्या उपायांबरोबरच मातीपण बदल. माती बदलताना त्यात थोडी नीम पावडर असेल तर घाल.
माझा मोगराही बाल्कनीतच असतो
माझा मोगराही बाल्कनीतच असतो एरवी. गेले काही महिने बाल्कनीत ऊन येत नाहीये म्हणून एका खोलीच्या खिडकीत हालवला आणि स्पायडर माइट्स उद्भवले. म्हणजे बाहेर असताना काही झालं नाही आणि घरात ठेवल्यावर घात झाला. बरं, ऊन्हाचं म्हणावं तर बाल्कनीपेक्षा या खिडकीत जास्त आणि जास्त वेळ ऊन असतं.
तरीही त्यातल्या त्यात फांदीवर एकाच दिशेने पानांच्या जोड्या असणारा मोगरा (वेल मोगरा) लावून पाहा >>> असं झाड अॅमॅझॉनवर शोधता आलं तर पहाते. पण आत्ता आहे या झाडाचं काय करू? मला टाकायचं नाहीये हे झाड.
मातीपण बदल. माती बदलताना
मातीपण बदल. माती बदलताना त्यात थोडी नीम पावडर >>> हे करून पहाते. फरक पडला तर नंतर सांगेन इथे. थँक्स अंजली.
र्म्द, आम्ही बर्यापैकी छाटून
र्म्द, आम्ही बर्यापैकी छाटून टाकलेला मोगरा नि उरलेल्या मोजक्या पांनांवर तू म्हणतेस तसेच आधी रबिंग अल्कोहोल नि मग नीम ऑईल चा प्रयोग केला होता. महिनाभर दर आठवडा हे करावे लागले होते.
महिनाभर दर आठवडा हे करावे
महिनाभर दर आठवडा हे करावे लागले होते >>> हो रे! त्याचाच कंटाळा आलाय आता. आणि त्यात पुन्हा हे बेरकी माइट्स जायला काही तयार नाहीतच
मोगर्याच्या किड्यांचं माहित
मोगर्याच्या किड्यांचं माहित न्हवतं. आम्ही मोगरा जमिनीत लावलाय आणि काहीही काळजी न घेता बदाबदा स्नो पडला तरी बरोबर पुढच्या सीझनला वाढून फॉलला भरपूर फुलतो.
प्रयोग करूनच शिकायला मिळते.
प्रयोग करूनच शिकायला मिळते.
माझ्याकडच्या मोगर्याला
माझ्याकडच्या मोगर्याला गेल्या मोसमात फुले आली नाही. पण यावर्षी जोमाने वाढला आहे. फुलं येतील की नाही देव जाणे. बांबूही छान वाढलाय. घरात एक कोपरा किंवा मध्यवर्ती म्हणा जागेत सृष्टीचं हे हिरवंगार रुप शोभा देउन जातं.
spider mites फार त्रासदायक
spider mites फार त्रासदायक असतात.
कडिपत्त्यावर आले होते तेव्हा नीम ऑइल - डिश सोपने सतत धुण्यावर भागले होते. पण अक्षरश: एक एक पान धुतले होते. २-३ दिवसातून एकदा.
त्याची कुंडी आणि आजूबाजूची जागापण साबण्याच्या पाण्याने पुसली होती.
बाल्कनीमध्ये झालेले महाचिकट होते. नीम ऑइलला त्यांनी मुळीच दाद दिली नाही. त्यांना १० भाग पाण्यात १ भाग दूध हा उपाय कामी आला. पण दुधाचा एक वास राहतो. खाली कुंडीत newspaper टाकला तर दूध मातीत मुरत नाही, वास कमी होतो.
season संपल्यावर बाल्कनी आणि त्यातील एकूण एक गोष्ट क्लोरीन पाण्यात घालून त्या पाण्याने धुतली. पुढच्या वर्षी अज्जीबात झाले नाहीत.
आता मिरचीवर झाले आहेत. त्या झाडांना वेगळे ठेवले आहे. जास्त infected भाग सरळ काढून टाकला. शॉवरखाली धुतले. आता नीम ऑइल चालू केले आहे.
रूपा, झाडाभोवती
रूपा, झाडाभोवती ह्युमिडिफायर लावता येत असेल तर पहा. माती कायम ओलसर असेल आणि ह्युमिडिटी जास्त असेल तर स्पायडर माईट्सचा टिकाव लागणार नाही. रबिंग अलकॉहॉल स्प्रे २-३ दिवसांआड वापरत जा . घरातल्या इतर रोपांपासून मोगरा वेगळा ठेव .
Chioo आणि मेधा, थँक्यू!
Chioo आणि मेधा, थँक्यू!
दूध स्प्रे करणं जरा ट्रिकी वाटतंय.
पण मेधा, तुझा उपाय जमणेबल आहे आणि तुलनेने सोपा सुद्धा. ह्युमिडिफायर नाहीये पण झाडावर आणि मातीवर दर थोड्या वेळाने पाणी स्प्रे करता येईल. आजपासूनच करून पाहते. मला वाटतं झाड घरात असल्याने थोडं कोरड्या हवेत राहाते आहे आणि त्यानेच प्रॉब्लेम झालाय की काय देव जाणे.
झाड छाटून टाक शक्य होइल तेवढं
झाड छाटून टाक शक्य होइल तेवढं. आत्तास्प्रिन्गमध्ये अंडी हॅच व्हायला लागतात. योगायोगानं कुंडी हलवल्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली असेल. फांद्या छाटल्यावर उरलेल्या झाडावर आणि मातीवर नीम ऑइल स्प्रे करत रहा.
फांद्या छाटणारच आहे. पण सध्या
फांद्या छाटणारच आहे. पण सध्या थोड्याफार कळ्या आल्या आहेत. त्यामुळे त्या फुलून गेल्यावर छाटाव्या असा विचार आहे. तोवर हे रबिंग अल्कोहोल आणि नीम ऑईल स्प्रे करत राहीनच. नीम ऑईल मातीत पण स्प्रे करून पाहते. गूड सजेशन. थँक्स.
आमच्या मोगर्याला सुरेख कळी
आमच्या मोगर्याला सुरेख कळी आली आहे.
बरं या वीकेन्डला कांद्याची
बरं या वीकेन्डला कांद्याची पेरणी करू का? मी नर्सरीतून कांदे आणून लावते, बियांपासून सुरूवात करत नाही.
माझा झोन 6A.
माझा झोन 6A.
मी १-२ एप्रीलला माती किंवा त्याच्या आधीच्या विकेंडला ओनियन सेट्स लावणार आहे. माती कधी कोरडी असेल त्यावर नक्की कधी ते ठरेल.
इथे कुणी सीड्स ऑफ इंडीयातून रिमझिम, अंदाज , बिज्ली यापैकी वांग्याच्या बीया मागवल्या असल्यास प्लीज रिव्यू लिहाल का? मी पूर्वी कधीतरी त्यांच्याकडून बीया मागवल्या होत्या. आता तिथे इतके प्रकार आहेत की काय मागवावे असे झाले. माझ्याकडे गावच्या दुकानातून घेतलेले ब्लॅक ब्युटी आहे.
मेधा आणि सिंडी, तुम्हा
मेधा आणि सिंडी, तुम्हा दोघींचेही उपाय करून पाहिले. कळ्या उमलून गेल्यावर झाडाची छाटणी करून नीम ऑईल+डिश सोप+पाणी या मिश्रणाने सगळी पानं नीट पुसून घेतली. मेधाने सांगितल्यापासून झाडावर दिवसातून १-२ वेळा तरी पाणी स्प्रे करते. आणि एका दिवसाआड झाडाच्या मुळात आणि जनरलच मातीवर नीम ऑईल स्प्रे करते आहे. स्पायडर माइट्स ऑलमोस्ट गेलेत असं वाटतंय. निदान खूप कमी तरी झालेच आहेत. तुम्हा दोघींनाही स्पेशल थँक्स.
बाकी सगळ्यांनाही थँक्स ज्यांनी वेगवेगळे उपाय सुचवले.
इथे कुणी सीड्स ऑफ इंडीयातून
इथे कुणी सीड्स ऑफ इंडीयातून रिमझिम, अंदाज , बिज्ली यापैकी वांग्याच्या बीया मागवल्या असल्यास प्लीज रिव्यू लिहाल का? >> मी मागवल्या होत्या. हिट ऑर मिस केसेस होत्या. पण तोच अनुभव इथल्या लोकल कंपनींबद्दल पण होता तेंव्हा कंपनीपेक्षा इथल्या वातावरणाशी संबंध असावा असे वाटते.
वांग्याचं बी कधीच चांगलं
वांग्याचं बी कधीच चांगलं निघालं नाही मी मागवलेल्यातलं तरी. मी आता लोकल नर्सरीतून मोठी वांगी आणि न्युजर्सीहून लहानी आणि हिरव्या वांग्यांची रोपं आणते. मोप पीक आलं गेल्या वर्षी.
मोप पीक आलं गेल्या वर्षी. >>
मोप पीक आलं गेल्या वर्षी. >> कृष्णाकाठच्या वांग्यांची चव होती का पण सिंडी ?
मी 8A मधे आहे. Etsy मधून
मी 8A मधे आहे. Etsy मधून खूपदा बिया मागवल्या आहेत. पांढर्या वांग्याच्या मागच्या वर्षी मागवल्या होत्या. भरपूर आले वांगे.
https://www.etsy.com/listing/908078593/30-casper-eggplant-seeds-french-h...
आमच्या कनेटिकट नदीकाठच्या
आमच्या कनेटिकट नदीकाठच्या वांग्याची चव कृष्णेला लाजवेल.
धन्यवाद असामी, सिंडरेला आणि
धन्यवाद असामी, सिंडरेला आणि स्नेहा.
Pages