बागकाम अमेरीका २०२३

Submitted by स्वाती२ on 16 February, 2023 - 13:07

या वर्षीच्या बागकामाच्या गप्पांसाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंक जस्मिन फारच सुंदर. जसा काय गुलाबी स्वप्नस्वर्ग झेपावलाय खाली !
हीच मुंबईतली सायली आणि गोव्याची जाई का?

ब्रोकोली
WhatsApp Image 2023-05-17 at 6.10.29 PM.jpegWhatsApp Image 2023-05-17 at 6.10.28 PM.jpeg

कोथिंबीर
WhatsApp Image 2023-05-17 at 6.10.28 PM(2)_0.jpeg

करडई कशी लावलीस >>> मातीत बिया पेरल्या Proud
इथल्या एका nursery मध्ये बिया मिळाल्या. Safflower नावाने सहज मिळतात.

मला करडई ओळखताही आली नसती. आमच्याकडे कधी केल्याचीही आठवत नाही.
दरवर्षी ह्यावेळी फार काही लावायचं नाही म्हणत झाडं आणलीच जातात पण मी भाज्या, फळं वगैरे नाही लावत. फारतर कढीपत्ता, बेसिल आणि मिंट एवढंच स्वैपाकघरात वापरता येण्यासारखं. हावरटासारखी पेरेनियल सक्युलंट्स लावते भरपूर. थंडीत ज्याचं बाळंतपण करावं लागणार नाही असं बरं वाटतं.

करडई दुसरी बॅच
WhatsApp Image 2023-06-09 at 7.54.59 PM(3).jpeg

चुका
WhatsApp Image 2023-06-09 at 7.54.59 PM(2).jpeg

झुकिनी
WhatsApp Image 2023-06-09 at 7.54.59 PM.jpeg

बटाटा
WhatsApp Image 2023-06-09 at 7.54.59 PM(4)_0.jpeg

भाज्या आवडल्या.
फोटो तिसरा - जाळीवरची करडईची भाजी /किंवा अशाच प्रकारची लहान मुळंवाली पेंडी पालक,लाल माठ,मेथी,चुका,चाकवत,अंबाडी आणून मी लावली आहे. ती लगेच वाढते. बिया आणून त्या उगवतात का हा बघण्याचा खटाटोप वाचतो. (खत घालून नका. फक्त नवी माती हवी.)

भारतातल्या घरी मागच्या अंगणात जाई जुईंचे भले थोरले वेल होते. आषाढ, श्रावण, भाद्रपदात अगदी भरभरून फुलायचे. श्रावणातले सगळे सणवार भरपूर फुलं मिळायची, गणपतीच्या दहाही दिवसांत गणपतीला भले थोरले जाई जुईचे हार काकू करायची. या फुलांचा बराच नॉस्तेल्जिया होता त्यामुळे इकडे बरीच वर्ष जुईचं रोप शोधत होते. दोन महिन्यांपूर्वी ऑनलाईन मिळालं. आज पहिलं फूल आलं. जाईची पण दोन फुलं आली. त्यात आज भरपूर पाऊसही पडला. बॅकयार्ड मधे बसून enjoyed the moment!

जुई
WhatsApp Image 2023-07-01 at 10.31.24 PM.jpeg

जाई
WhatsApp Image 2023-07-01 at 10.31.23 PM.jpeg

Namaskar , sorry for English typing as Marathi response typing will take a day.
I have been growing Indian vegis in my backyard for some years now and based on my own experience/ trial and error some inputs.

@ स्वाती२ - Seeds of India seeds Vangi variety seeds have been successful for me year over year. I start with seed starters and then transplant. I assume success rate/ yield as 50% so plan accordingly. But most of time 99% success rates so ended up buying chest freezer to freeze the cut vegis.
@rmd - on spider mites - I have been using very basic method as done all ways of spraying organically. Take faltu dabba with enough water to drown these , just cut a leaf or by wearing gloves pick these and put in water for drowning. I have been using this for squash bugs or any other bugs I can capture by wearing gloves. Early detection is the key. But it is really very tiring work - I have decent size of veg garden . When I started doing this mazya navryane khulyat kadhale hote . He had kept spraying neem/soap waer/ lasoon/mirchi kadha etc. etc.
But he was pleased with my collection in the water dabba. After this exp, I have been strategically placing few old paint buckets with filled with water and disla kida tar dhar pakad and budav Happy . (sorry for repetition if this method was already suggested by someone in this blog )

अंजली - sashtang _/\_ - khupach kamal . Your (y)hard work paid off. very beautiful and inspiring photos.
मीपुणेकर - Apratim pink jasmine

@Anjali ani मीपुणेकर – Are Methi seeds from Indian grocery ?

@ सिंडरेला – Thank you for the website. I will definitely order for next year. I am in Zone 8A and will be too late as dealing with very hot 3 digit temps now.
@ sneha1 - Thanks for sharing about Etsy experience , will try it next year.
@अमितव – heard the same abt kadipatta, so this year I have planted one pillu in the ground. Hopefully it comes back next year , but looks like need to mulch without fail before first frost.
स्वाती२, असामी, सिंडरेला, Srd, sneha1, chioo, मेधा, अमितव – Thank you for all the useful tips.

@ sharpie : बाप्रे! खूपच दमवणारी पद्धत वाटतेय खरी. पण मी पहिल्या पानावर लिहीलंय तसं एकदा नेटानं बसून प्रत्येक पान पुसून घेतलं आणि त्यानंतर रोज झाडावर साधं पाणी स्प्रे करत राहिले. शिवाय झाडाच्या मुळात नीम ऑईल + पाणी असा स्प्रे एक दिवसाआड मारत राहिले. त्याने शेवटी गेले एकदाचे माइट्स. पण आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच थँक्स.

मी कॅलिफोर्निया बे एरियात आहे. कढीलिंबाचे रोप लावावेसे वाटतेय, माझ्याकडे ६ तास ऊन येते आत्ता उन्हाळ्यात. पण इथे हिवाळ्यात रोप जगेल का? कसे जगवायचे? त्या वेदर प्रोटेक्शन बॅग्ज इ. चा खरंच उपयोग होतो का?

वर्षा, माझे टिकले आहे. मी थंडी मध्ये विंडो सीलपाशी ठेवते. आताही बरीच हीट wave असल्याने आत ठेवलेय.

थँक्स मनमोहन, सायो. हो आत आणता येईल मलाही.
माझ्याकडील सदाफुली मी गेल्या विंटरमध्ये आत आणून ठेवली. आत काही जगत नव्हती, सर्व पाने गळून गेली, काड्या तेवढ्या राहिल्या त्यामुळे ती मेलीय असंच मला वाटत होतं. पण मी समहाऊ ती पूर्णपणे काढून टाकली नाही. थंडी कमी झाल्यावर परत बाहेर आणून ठेवली. आणि आता आश्चर्य म्हणजे पुन्हा तिला पाने फुटली, नवीन रोपेही उगवलीत बाजूला. आणि फूलही आलेय पहिले. मला हा आश्चर्याचा धक्काच होता कारण मला अगदीच अपेक्षा नव्हती. तसंच कढीलिंबाचे झाले तर बरंय!

आमच्या बागेचे काही फोटो
१. WhatsApp Image 2023-07-19 at 12.21.48 PM.jpeg
२. WhatsApp Image 2023-07-19 at 12.22.27 PM.jpeg
३. WhatsApp Image 2023-07-19 at 12.22.47 PM.jpeg
४. WhatsApp Image 2023-07-21 at 9.08.10 AM.jpeg
५. WhatsApp Image 2023-07-21 at 9.08.26 AM.jpeg
६. WhatsApp Image 2023-07-21 at 9.09.13 AM.jpeg
७. WhatsApp Image 2023-07-21 at 9.08.43 AM.jpeg
८. WhatsApp Image 2023-07-21 at 9.09.19 AM.jpeg
९. WhatsApp Image 2023-07-21 at 9.09.32 AM.jpeg
१०. WhatsApp Image 2023-07-21 at 9.10.16 AM.jpeg
११. WhatsApp Image 2023-07-21 at 9.10.48 AM(1).jpeg
१२. WhatsApp Image 2023-07-21 at 9.11.04 AM(1).jpeg
१३. WhatsApp Image 2023-07-21 at 9.14.24 AM.jpeg
१४. WhatsApp Image 2023-07-21 at 9.11.13 AM(1).jpeg
१५. WhatsApp Image 2023-07-21 at 9.55.28 PM.jpeg
१६. WhatsApp Image 2023-07-21 at 9.55.40 PM.jpeg
१७. WhatsApp Image 2023-07-21 at 9.56.30 PM.jpeg
१८. WhatsApp Image 2023-07-21 at 9.56.42 PM.jpeg
१९. WhatsApp Image 2023-07-21 at 9.56.55 PM.jpeg

या वर्षी थोडी ज्वारी लावली होती. लगे हाथ हुरडा पण भाजला Happy एका गोठ्यातून शेण आणून गोवर्‍या तयार केल्या :ड
२०. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.20 PM(3).jpeg
२१. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.20 PM(2).jpeg
२२. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.20 PM(4).jpeg
२३. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.20 PM(6).jpeg
२४. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.21 PM.jpeg
२५. WhatsApp Image 2023-08-08 at 10.14.21 PM(1).jpeg

भारीच बाग झाली आहे.
बारीक काटक्या,तुकडे खाली दिसताहेत ते बहुतेक mulch आहे ना? तेही बागेतील मोठ्या झाडांपासून मिळवले आहे का?
मांडव, वेल भाज्यांसाठी आधार trelis सुरेख.
हुरडा वा!

Pages