Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वेटलाना एकदम अतरंगी दिसत
स्वेटलाना एकदम अतरंगी दिसत आहे. >>>>> लोल एकदमच. त्या बोटीवर कॅप्टन आणि तिच्याबरोबर असताना शाहिद म्हणतो माल दुसरीकडे उतरवू वगैरे तर ती एक्स्ट्रा पैसे मागते तेव्हाचा त्याचा डायलॉग फार फनी आहे.
फायनली बघून झाली फर्जी.
फायनली बघून झाली फर्जी.
शेवटचा भाग जबरदस्त थरारक होता. मायकेलपेक्षा शेखर सरस दाखवला आहे, तो मेघाला सांगत असतो, गाडीतून उतरू नकोस, ती उतरू का उतरू का करत असते, मायकेल सांगतो उतर आणि शेखर विरोध करतो तर दटावतो त्याला.
अनिस ऐनवेळी मदतीला येतो ते एकदम भारी वाटलं, मला वाटलं ह्याने पोलिसांना बोलावलं. शेवटी तो शाहिद मनसुरचा मस्त बदला घेतो. दुसऱ्या सीझनला हा मनसुरचा खून करेल आणि स्वत: त्याची जागा घेईल.
फिरोझ आणि त्याची ताटातूट झाली हे आवडलं नाही.
तो फोटो नीट दिसतो शेवटी (आपल्याला दाखवला नाही) तो सन्नीचा की फिरोझचा होता. सन्नी असेल म्हणा, ती झोपेतून जागी होऊन बघेल तोपर्यन्त हा दुसऱ्या देशात पोचलेला असेल.
स्वेटलाना एकदम अतरंगी दिसत आहे. >>>>> लोल एकदमच. त्या बोटीवर कॅप्टन आणि तिच्याबरोबर असताना शाहिद म्हणतो माल दुसरीकडे उतरवू वगैरे तर ती एक्स्ट्रा पैसे मागते तेव्हाचा त्याचा डायलॉग फार फनी आहे. >>> अगदी अगदी.
मंत्री फार पुर्वी सिरियलमध्येही असायचा.
फर्जी सिझन दोनची स्टोरी बरेच
फर्जी सिझन दोनची स्टोरी बरेच जणांना predict करता आली असेल. मायकेलचा div मेघाशी लग्न करण्यासाठी झाला असेल, तो सन्नीच्या बाळाचा बाप होईल, ते बाळच संदीपला पकडून देईल.
होप अशी करू नये सिनेमाटाईप.
बापरे अन्जू, कायच्या काय
बापरे अन्जू, कायच्या काय इमॅजीनेशन

फर्जी इफेक्ट
फर्जी इफेक्ट
काल १०० आणि ५० ची नोट मिळाली एटीएम मधून. बराच वेळ उलटपलट करत बघत होते
हाहाहा अंजली.
हाहाहा अंजली.
बापरे अन्जू, कायच्या काय इमॅजीनेशन >>> हाहाहा, असं दाखवू नये हीच अपेक्षा.
>> बाय द वे झाकिर हुसैन (तो
>> बाय द वे झाकिर हुसैन (तो मंत्री गेहलोट) चा रोल एकदम मस्त आहे.
हो एकदम मस्त. जॉनी गद्दार मध्ये पण होते ते.
फर्जी बघतोय, त्यामुळे spoiler
फर्जी बघतोय, त्यामुळे spoiler पोस्ट वाचल्या नाहीयेत.
शाहीदने वरवर एकदम casual असणारा आर्टिस्ट चांगला साकारलाय. त्याचा मित्र देखील भारीच.
अजूनतरी बोअर नाही झालाय
the consultant संपली.
the consultant संपली.
यासाठी केला अट्टाहास असं फिलींग आलं पण मस्त एंगेजिंग होती शेवटपर्यंत.
काही काही गोष्टी कळल्या नाहीत मधे.
स्पॉयलर अलर्ट
मिलानी चे बॉडी पार्टस कशासाठी बदलले असतात. गेमचा एक भाग /ट्रायल म्हणून का?
स्पॉयलर अलर्ट
स्पॉयलर अलर्ट
कोणास ठाऊक!
बाकी त्याचे तरी कशाला बदललेले असतात? आणि बदलायचे तर सोन्याचे का? त्याची आई त्याला सोन्या म्हणत असेल असं गृहित धरू एकवेळ. पण मग इतकी प्रोस्थेटिक लॅब मध्ये अपॉइनमेंट घेतो तर तिकडूनच पार्ट का नाही घेत? हे म्हणजे पुणेकरांसारखं झालं. बेकरीतून बिस्किटं विकत न घेता आपल्या घरुन बिस्किटं करुन बेकरीत फक्त 'बेक' करायला न्यायची. सोनाराकडून पार्ट बनवतो म्हणे.
आता तो चक्रम सोनार घडीव सोन्याचे पार्ट बनवतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बेसिक १०१ नियम आहे, पोकळ वस्तू जास्त मजबुत असतात तर तो नळी फुंकली सोनारे सॉलिड पार्ट बनवतोय.
आणि त्याच्यात माझ्या लग्नाची बोंब लागली सांगायला बायको अंगठी भट्टीत टाकते हे प्रतिक ! आरारारा.. मला तर झेपलं नाही याचं लग्न कसं मोडलं... पण असेल दुसरा टाईपरायटर याच्या बेसमेंटला म्हणून सोडून दिलं.
तर असले सॉलिड सोन्याचे पार्ट बसवल्यावर त्याला सगळ्यात जास्त त्रास काय होतो तर जिने चढणे.... उठाले रे बाबा!
सोन्याचे पार्ट का तर हत्ती काचेवरुन पडतो तर हा पडला पाहिजे ... आता करा रिवर्स इंजिनिअरिंग! हत्ती पडतो तर याला पडायला काय करता येईल? अरे! शॉल्लेट सोन्याचे पार्ट बसवा. ओके. मग कसं करायचं? काढा एक बॅक स्टोरी. असं अनेक लिहिता येईल. असो. दोन दिवस मजेत गेले. नॉट कम्प्लेनिंग!
गुलमोहोर बघितला काल.
गुलमोहोर बघितला काल. हलकाफुलका कौटुंबिक चित्रपट. ऊगाच ओढूनताणून आणलेले तणाव नाहित. मला मनोज वाजपेयी आणी त्याची बायको झालेल्या नटीचे काम आवडले. शर्मिला टागोर फार राॅयल दिसते.अगदी साऊथ दिल्ली रिच लुक परफेक्ट जमलाय.
साड्या आणी मोजके पण ठळक दागिने.
Spoiler alert :
Spoiler alert :
माझ्या बुद्धीला जे झेपलं , ते सोन्याचे पार्ट्स संपत्ती जमवण्यासाठी असतात. काय , कसे हे विचारू नका.
लग्न मोडत नाही , बायको मरते.
त्याला सगळ्यात जास्त त्रास काय होतो तर जिने चढणे... >>> हे मलाही पचलं नाही.
मिलानी चे बॉडी पार्टस कशासाठी बदलले असतात , तो party Venue दुसर्या दिवशी कुठे गायब होतो , हा सगळा अट्टाहास का ?? एलेन, laptop त्याच्या हातात देऊन टाकते , परत घेतल्यावर तिला संशयही येत नाही , ऑफिसचा दरवाजा कधी बाहेरून कोणला उघडता येत नाही , कधी आओ जाओ घर तुम्हारा.
पण मला तरीही आवडली सिरीज. शेवट ढेपाळलाच.
सध्या बॉश बघतेय. S4 चालू आहे.
सध्या बॉश बघतेय. S4 चालू आहे.
सगळ्या पोलिस वाल्यांच peesonal life troubledच असतं .
Bosch ला Good wife मध्ये पाहिलं होतं इथे तो हळूहळू आवडायला लागला.
स्पॉयलर अॅलर्टः
स्पॉयलर अॅलर्टः
कन्सल्टन्ट - त्यातल्या गोष्टी लिटरली बघणे अपेक्षित नसावे. आधी मी तसेच पाहिले आणि लॉजिक शोधत बसले पण नंतर वेगळे वाटले. इट्स अ स्पूफ, डार्क कॉमेडी, तो सोन्याचा कन्सल्टन्ट, सीईओ ला "**" करणे, ( ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पॅक्ट विथ डेविल असे काहीतरी ?) वर्कर्स ना होणार्या हार्डशिप्स, जसे वर्कर्स च्या पर्सनल लाइफ वर कंपनीने हक्क सांगणे, रिलेशनशिप्स रुइन होणे , लोक ब्रूटल होणे, बॉस कसा आहे हे समजून पण उलट स्वतः (निगेटिवली) बदलणे आणित्याच्यानंतर त्याची जगा घेणे, आणि या सगळ्या वाइट गोष्टी होऊनही कंपनी प्रॉफिटेबल, सक्सेसफुल होणे. असे काय काय संबंध लावले मी.
गेमिंग ची कंपनी असल्यामुळे मग व्हिलन /मॉन्स्टर ला मारल्यावर प्राइझ मिळावे तसा सोन्याचा तुकडा मिळतो क्रेग ला.
मै +१
मै +१
स्पूफ डार्क कॉंमेडी म्हणून बघायला चालू केली मी ही नंतर. डाऊन टाऊन मध्ये हत्ती आणणे (अचाट गोल्स) + फक्त २०,००० ते करणे (अचाट डेड-लाईन्स), त्यात फक्त १०००० देणे (तात्पुरत्या फायद्यासाठी बस खाली ढकलणे) , चपला काढून अनवाणी भटकणे (काहीही नियम करुन .. ) पर्सनल ऑफिस साठी भांडण लावणे ( हे तर मी प्रत्यक्ष एका कंपनीत बघितलं आहे.. भांडणं लावून प्रॉडक्टिव्हिटी वाढते अशा अचाट विचारांचा एक मॅनेजर होता) ... ते सगळं ठीक आहे. पण असं बघू लागल्यावर ती सिरिअल भारी वाटायच्या ऐवजी गरीब वाटू लागली.
कारण शेवटी 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' हे आणि इतकंच दाखवलं.
अमितव आणि मै भारी कमेंट्स आणी
अमितव आणि मै भारी कमेंट्स आणी विश्लेषण
दोन दिवस मजेत गेले. नॉट कम्प्लेनिंग!:हाहा:++=१११११
रुपकात्मक गोष्टी दाखवणं आवडलं. इलेन आणि क्रेगचं कॅरेक्टर मस्त घेतलंय.
विजय सेतूपती यांचा super
विजय सेतूपती यांचा super deluxe पण छान आहे .+१
अमितव आणि मै भारी कमेंट्स आणी
अमितव आणि मै भारी कमेंट्स आणी विश्लेषण >>> + १०००
>>त्याला सगळ्यात जास्त त्रास
>>त्याला सगळ्यात जास्त त्रास काय होतो तर जिने चढणे... >>> हे मलाही पचलं नाही.<<
शरीरातली सगळी हाडं सॉलिड गोल्डची असतील तर वजन वाढेल ना? २५०-३०० पौंड वजनाचा माणुस शिड्या चढतोय अशी क्ल्पना करा.
एनीवे, सोन्याची हाडं रिप्लेस केलेला माणुस प्रत्यक्षात बघायला मिळणार नाहि. तो एक साटायर आहे, कॅपिटलिस्ट सोसायटीतले प्रोज अँड कॉन्स दाखवणारा. आता हाडं सोन्याचीच का, तर एक मेजर डिफरंशिएटर (प्रेशस मेटल) म्हणुन सत्तेची सूत्र एका विशिष्ठ व्यक्तीकडेच आहेत हे दर्शवण्याकरता...
कन्सल्टन्टमधे ज्यांना जे काही
कन्सल्टन्टमधे ज्यांना जे काही सांगायचे होते ते अजिबात पोचले नाही म्हणुनच छान सुरु झाली असुन मरगळली. आपल्यालाच अर्थ काढत बसावं लागतंय यातंच ते हरले.
राणा नायडू - सेक्स सीन आणि
राणा नायडू - सेक्स सीन आणि अंगावर येणारे विनाकारण घाणेरडे डायलॉग सोडले तर सिरीज भारी आहे.. इंगेजिंग आहे.. सर्वात मोठा यू एस पी अभिनय आहे. एकदा बघायला हरकत नाही..
18+ आणि फॅमिली सोबत नसतानाच पहावी.
आमच्याकडे सांस्कृतिक चष्मे
आमच्याकडे सांस्कृतिक चष्मे आहेत. पडद्यावरच्या हालचाली विशिष्ट पद्धतीने व्हायला लागल्या कि त्यातले सेन्सर अॅक्टीवेट होऊन काचांची व्हिजिबिलिटी १००% नाहीशी होते. त्यामुळे आता चिंता नाही.
रच्याकने , नुकतीच मनी हाईस्ट दोन सीझन्स पाहिली असल्याने आता वेबसिरीज लवकर पाहणे होणार नाही.
डिटेक्टिव्ह सिरीयल आमच्या
डिटेक्टिव्ह सिरीयल आमच्या घरातला आवडता जॉनर असल्याने गेल्या दोनेक महिन्यात या वेब सिरीज पाहून झाल्या.
पोकर फेस (पिकॉक वर) - केस ऑफ द वीक टाईप चा फॉर्मॅट आवडत असला तर नक्की पहा.
ग्लास ओनियन / नाइव्स आऊट फेम रायन जॉन्सन लिखित / दिग्दर्शित मालिका आहे. आम्हाला तरी आवडली. 7.5 /10 गुण देईन.
लॉ अकॉर्डीन्ग टू लिडिया पोएट (नेटफ्लिक्स) - मूळ इटालियन भाषेतली सिरीज असल्याने सबटायटल सोबत पहा.
एकूण ठीक वाटली. स्टाईल ओव्हर सबस्टन्स टाईप चा मामला आहे. बऱ्या पैकी न्यूडिटी असल्याने फॅमिली सोबत बघताना सांभाळून. 5/10 गुण देईन.
बेलास्काओरान (नेटफ्लिक्स) - स्पेन / मेक्सिको मधल्या सुपरहिट पुस्तकांचं रूपांतरण आहे. मूळ स्पॅनिश मध्ये असल्याने सबटायटल सोबत पहिली. आम्हाला तरी आवडली. 7/10 गुण देईन.
प्राईमवर 'बोन्स' नावाच्य्या
प्राईमवर 'बोन्स' नावाच्य्या मालिकेचे तब्बल १२ सिजन्स दिसले. चांगली आहे म्हणायची का ती मालिका?
"ताज- डिवायडेड बाय ब्लड" -
"ताज- डिवायडेड बाय ब्लड" - ( झी ५)बघायला घेतली आहे. नासीरुद्दीन शाह ला आवर्जून का घेतले असावे हे (अजून तरी) कळले नाही. वयस्क अकबर बादशहाचा रोल आहे त्याचा. अजून पण बरेच मोठे कलाकार आहेत. संध्या मृदुल (जोधा), राहुल बोस ( अकबराचा सावत्र भाऊ हाकीम), झरीना वहाब ( अकबराची अजून एक बेगम), सुबोध भावे( बिरबल), अदिती राव हैदरी ( अनारकली) वगैरे. इतक्या सगळ्या कलाकारांना न्याय देणारा कॅन्व्हास आणि कथानक (पोटेन्शियली) असेलही, पण तरी लिमिटेड सीरीज मधे त्यातले काय काय दाखवणार, कोणाला किती वाव मिळणार आणि इतकी सगळी पात्रं किती अन काय करू शकणार आहेत असे वाटत आहे. हे फक्त २ भाग पाहून म्हणत आहे. (सुबोध भावेला १ तासाच्या २ भागांमधे मिळून दोन वाक्यं असतील आतापर्यन्त. ) एकून ८ भागांचा पहिला सीझन दिसतो आहे.
सेट्स, व्हि एफेक्स बर्यापैकी चांगले आहेत, बिग बजेट दिसतेय सीरीज.
** हिंसा आणि अॅडल्ट सीन्स आहेत.
ग्लोरी पाहिले दोन्ही सिझन.
ग्लोरी पाहिले दोन्ही सिझन.
सॉंग ह्ये क्यो फार सुंदर दिसते.पण सूड एकदम शॉर्टकट मध्ये किरकोळीत आवरला आहे.
फर्जी झाली पाहून.
फर्जी झाली पाहून.
ठीकठाक ते भारी असा वर खाली प्रवास.
लूप होल्स आहेत, शिवाय कुठे कुठे "आवरा" कॅटेगरी झाली लॉजिकबाबत.
एकदा पाहिलीत तरी अगदीच वेळ वाया गेला असे वाटणार नाही.
त्यामुळे बघा.
Acting सगळेच भारी.
फिरोजचे काम करणारा नवखा वाटत नाही अजिबात.
चेलम आणि तिवारीचा वापर आणि लिंकअप भारी केलंय.
सुनिधी, बोन्स आधी टीव्हीवर
सुनिधी, बोन्स आधी टीव्हीवर आली होती. तीच असेल तर मस्त आहे. फोरेन्सिक्सवर आधारित. सगळी कॅरॅक्टर्स मस्त रंगवली आहेत.
'राणा नायडू" नेफिवर.
'राणा नायडू" नेफिवर. इंटरेस्टिंग आहे. "रे डोनोव्हन" चा रिमेक आहे. त्यातले काही भाग पाहिले आहेत - काही सीन्स अगदी हुबेहूब तसेच आहेत, पण बाकी इतर मसाला देशी आहे. कलाकारांमधे वेंकटेश व सुशांत सिंग सर्वात मस्त. राणा दगुबती चा रोल लीड रोल आहे पण अगदी एकच भाव चेहर्यावर टाइप आहे. पुलं म्हणतात तसे - एकच भाव किंवा कोणत्याही भावाचा अभाव.
अशा सिरीज मधे लागणारे सगळे चेकमार्क पहिल्या एपिसोड मधेच चेक झाले
आमच्या कॉलेज मधे काही अस्सल पांढरपेशा एरियातील लोक कॉलेजात डॅशिंगपणा ई दाखवायला बोलताना तोंडात कृत्रिमरीत्या शिव्या आणायचे. ते लगेच कळत असे. या सिरीज मधल्या अनेक शिव्या तशाच आहेत.
शिव्या, सेक्स सीन्स व त्या संदर्भाचे संवाद वगैरेची भरमार आहे. हे रेकमेण्डेशन समजावे कि उलटे - ते प्रत्येकाने आपल्या इंटरेस्टवर ठरवावे
बघायला चालू केली पण इंटरेस्ट
बघायला चालू केली पण इंटरेस्ट टिकला नाही. कशाच्या जोरावर इतके भाग बघू असं काही सापडलंच नाही. सोडली मग.
Pages