वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्ना चं इथलं पात्र म्हणजे साराभाई मधली माया आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा मधली परमारबेन यांचं मिश्रण आहे.

साराभाई हे एकमेव उदाहरणच आठवतंय. ओळख बनलीये म्हणजे बहुधा दीना पाठक म्हणायचं असेल. बोटातून रत्ना पाठक बाहेर पडली असेल.

तो तीचा सर्वात महत्वाचा रोल आहे.त्यामुळे सर्वाना तोच लक्षात असेल.
मला ती लहानपणी तारा मध्ये मुख्य नायिकेला यु बिच म्हणून थोबाडीत मारताना पण आठवतेय Happy

इधर उधर दोन्ही बहीणींची होतीना, रत्ना सुप्रिया. दोघी चांगला अभिनय करायच्या, कॉमेडी होती.

साराभाईचा रिपऑफच होता. दुष्यंत ऐवजी तो असंबद्ध फोटो दाखवणारा लॉयर जावई. असे आपले थोडे रुचीपालट! बस्स!
ठीक वाटली पण स्टिरिओ टाईप एकदा तयार झाल्यावर त्यातून साराभाई इतका ज्युस निघाला नाही. मजेचे सीन्स होते नाही असं नाही पण कंटाळा आला शेवटी. संपली ते बरं झालं वाटलं.

या व्यतिरिक्त कधी आणि कशात असा रोल केलाय ? माहितीसाठी विचारले आहे.
>>
साराभाई हे एकमेव उदाहरणच आठवतंय.
>>

प्रश्न तुमचा!
उत्तरही तुमचेच!
Happy

बर्र कोणाला फिल्मी चक्कर आठवतेय का?
सतीश शाह आणि रत्ना पाठक

प्रश्न तुमचा!
उत्तरही तुमचेच >>> ओळख बनण्यासाठी तशा भूमिकेत टाईपकास्ट झालेला असावा लागतो अभिनेता/त्री. ललिता पवार, बिंदू, शशिकला यांच्या असंख्य भूमिका आहेत. अशा अनेक भूमिका असतील त्या कदाचित माहिती नसल्यामुळे ही ओळख कधी बनली हे माहिती नाही. आपण काही प्रकास टाकाल अशी आशा होती..

खरंय. साराभाईची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. काहीच मालिकांचं रसायन असं २०० टक्के जमतं खरं. त्याचा भाग२ पण तितका जमला नव्हता.

काल दीड भाग पाहिले हॅपी फॅमिलीचे. ठीक वाटली. काहीकाही जोक मस्त जमलेत, काहीकाही ओढूनताणुन. पण एकंदर पुर्ण पाहीन असं वाटतंय.

साराभाईची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. काहीच मालिकांचं रसायन असं २० ० टक्के जमतं खरं. त्याचा भाग२ पण तितका जमला नव्हता.>>> +200000

एखादी भूमिका कलाकाराची ओळख असणे म्हणजे टाईपकास्ट होणे नाही
>>>

हो अगदीच.
रामायणात काम केलेल्या अरुण गोविल किंवा दिपिका यांनी पुन्हा एखाद्या पौराणिक मालिकेत काम केले असते तरी आपला वरचा संवाद तिथे लागू झाला असता. त्यासाठी त्यांना अजून चार पौराणिक मालिका करायची गरज नव्हती.
रत्ना पाठक म्हटले की साराभाईच आठवते. कोणाला ती नावाने माहीत नसेल तर साराभाईवाली हे सांगणेही पुरते. यालाच पेहचान बोलतात Happy

साराभाई आणि खिचडी या दोन मालिका आमच्याईथे रामायण-महाभारत जोडीसारख्या प्रसिद्ध होत्या.

कोणाला ती नावाने माहीत नसेल तर >>> खूपच दुर्दैवी लोकांशी संबंध आलेला दिसतोय. मग अशा लोकांनी तिची पेहचान खाष्ट सासू कशी काय केली असेल बरे ? (हातमोजा आयडी येईल उत्तर द्यायला )

रघू आचार्य,
ऋन्मेषच्या प्रत्येक पोस्टवर वाद घालणे गरजेचे नसते. असे केल्यास स्वर्गात प्रवेश मिळतो ही केवळ अंधश्रद्धा आहे. "दिसला ऋन्मेष, घातला वाद" ही आपली पेहचान बनू देऊ नका कोणीही प्लीज _/\_
तसेही पर्सनल लाईफ बिजी झाल्याने तुर्तास शाहरूख आणि क्रिकेट वगळता मी माझा मायबोलीवरचा वावर आटोपशीरच ठेवलाय. त्यामुळे आधीसारखी मजा करायला वेळ मिळणे अवघड Sad
असो, या मुद्द्यावर माझे बोलून संपलेय. चहाही संपलीय. कामाला लागतो Happy

<<<हातमोजा आयडी येईल उत्तर द्यायला>>>

जर माझ्याशी काही बोलायचे होते किंवा माझ्या म्हणण्याला प्रत्युत्तर द्यायचे होते तर सरळ द्यायचे, हे असले आडून आडून कशाला ? मी चावत नाही. Lol

अर्थात, 'ओळख आणि टाईपकास्ट' गल्लत झाली आहे त्यामुळे उत्तर सुध्दा टोमण्याशिवाय काय देणार म्हणा.

ऋन्मेषच्या प्रत्येक पोस्टवर वाद घालणे गरजेचे नसते. >> हा धागा सोनाली यांचा आहे. जिज्ञासेपोटी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही वाद म्हणत आहात तर तुमच्याशी संवादच नको. Happy पब्लीक डोमेन मधे काहीही फेकाफेकी केली तर लोक विचारतात. त्यात सातत्य असेल तर सातत्याने विचारणार्‍याला लाज वाटेल पण विचारणार्‍याला तसं काही वाटत नसेल तर काही काळ इग्नोर करतात. त्यालाही मर्यादा असेलच ना ? Lol

तरी देखील नसेल आपल्याला ठाऊक, तुम्हाला कदाचित जास्त माहिती असेल म्हणून विचारले. तर उडवाउडवीची उत्तरे देताय. "तुमचाच प्रश्न तुमचेच उत्तर " अशा हुषार्‍या प्रत्येक वेळी करणे गरजेचे नसते. माहिती असेल तर स्वच्छ शब्दात सांगावे कि अमूक अमूक सिनेमात खाष्ट भूमिका केलेल्या आहेत. त्या ऐवजी दुसर्‍या आयडीने येऊन भलते वाद घालत बसताय. Lol

जर तुम्हाला रत्ना पाठक माहीत नसेल किंवा असेच ठोकून दिले असेल तर तसे सांगितले तरी चालले असते. ही काही सक्ती नाही हो. रत्ना पाठक काही खाष्ट सासूच्या भूमिकांसाठी फेमस नाहीत. Happy मुळात त्या खूप कमी भूमिका करतात.
साराभाई मधे पण त्या खाष्ट बिष्ट नाहीत. अर्थात साराभाई तुम्ही पाहिली असेल तर. Happy
( आय डी उडवणार आहात का ?)

सरजी, या वेळी योग्य आयडी घेतलाय. एक्स मॅन , मार्मिक नंतर आता पायातला मोजा !
पायात घालायची वस्तू ही तुमची "ओळख" आता लक्षात ठेवता येईल. पायातली पायातच ठेवावी असे म्हणतात.

सरळ साधे मत ? Lol
अहो, उगीचच तिची ही ओळखच आहे असे ठोकून दिल्यावर विचारणा केल्यावर सरळ साधे मत न मांडता , स्वच्छ मनाने चुकले असे न म्हणता वेगवेगळे आयडी मदतीला आले कि न कळायला माबोकर बोळ्याने दूध पीत असतील का ? या अशा आयड्यांनी येणार असाल तर आपला पास.

ऋन्मेषच्या प्रत्येक पोस्टवर वाद घालणे गरजेचे नसते. असे केल्यास स्वर्गात प्रवेश मिळतो ही केवळ अंधश्रद्धा आहे. "दिसला ऋन्मेष, घातला वाद" ही आपली पेहचान बनू देऊ नका कोणीही प्लीज >> स्वतःला इतके महत्व देऊ नको ऋन्मेष बाळा. तुझ्या मित्राला इमर्जन्सी मदत हवी होती त्या धाग्यावर कुणी वाद घातलाय का ? मायबोलीकरांना गांभीर्य कळते. सर्वांनी मदत केली आहे. त्या मायबोलीकरांची पेहचान अशी बनवताना थोडी तरी ठेवायची होती.

मॅनिफेस्ट चौथा सीजन .सुरुवातीला छान पकड घेतली , आता तेच तेच दळण चालू आहे, बोर झालं .

नेटफ्लिक्सवरची ‘द नाईट एजंट‘ आवडली. जरी नवं काही नसलं तरी चांगली थ्रिलर वाटली. मला व्हाईटहाऊस संबंधीत थ्रिलर्स आवडतात हे पण एक कारण आहे. अजुन संपली नाही.

Prime वर Mrs Harris goes to Paris पाहिला. आवडला.
घरकाम करणाऱ्या बाईला एक सुंदर डिझायनर ड्रेस दिसतो. काहीही करून आपण तसा ड्रेस घ्यायचाच असे ती ठरवते. त्यासाठी पै-पै जमा करते. पॅरिसला जाते. तिला ड्रेस कसा मिळतो, पुढे त्याचे काय होते ते छान दाखविले आहे.

Prime वरच House of Gucci पाहिला. चांगला आहे. Gucci परिवारातले मतभेद वाढत जाऊन तो व्यवसाय परक्याच्या हातात कसा जातो ते दाखविले आहे.

Happy family चे चार episodes बघितले आज...मस्त आहे सिरीज...एकदम स्ट्रेस buster....तुफान कॉमेडी...अगदी serious scene चालू असेल तरी दर दुसर्‍या मिनिटाला कॉमेडी करतात हे लोक...आणि सगळ्यांची acting चांगली आहे म्हणुनच फिस्सकन हसायला पण येतं...कॉमेडी सोबतच बरेच चांगले संदेशही देते काही ठिकाणी ही सिरीज....Ratna Pathak played amazing comic role perfectly...

मीही हॅपी फॅमिली बघायला सुरुवात केली, 3 बघितले. सगळे छान काम करतात, रत्ना आणि अतुल तर rocking. रत्ना अतिसहज करते, आत्तापर्यंत आवडलेला सीन म्हणजे चाट खाता खाता सुन आणि नातसून यांच्यात आग लावते, एकदम कुल आगलावी वाटली, हे करून चाट मस्तपैकी एन्जॉय करते Lol . बिच्चारा राज बब्बर नंतर त्यांच्यात समेट घडवतो.

नेटफ्लिक्सवरची ‘द नाईट एजंट‘ आवडली. जरी नवं काही नसलं तरी चांगली थ्रिलर वाटली. <<<<>>>>> मलाही आवडली. रेंगाळत नाही कुठेही. बिंज वॉच करुन संपवली. महत्त्वाचं म्हणजे सिझन अखेरीस गोष्ट संपवली आहे.

मीही हॅपी फॅमिली बघून संपवली . शेवटचा ट्विस्ट ईतका आवड्ला नाही , मध्ये मध्ये काही काही संवाद फॅमिली फ्रेण्डली नाही वाटले , पण सारख्या सारख्या एफ वर्ड्स पेक्शा बरेच वाटले .
काही काही ठिकाणी फिस्कन हसायला येतं
Awwwww , किसका आर्यन क्या , शाहरूख खान के आर्यन को लेके आये था क्या हम ?? , फोटो दिखाव , I need something stronger than water , betaa , भन्नाट टायमिंग आहे काही काही ठिकाणी .

रत्ना पाठक अमेझिन्ग , राज बब्बर , आयेशा झुल्का , अतुल कुलकर्णी , सना कपूर आणि ती तिस्का सगळेच मस्त .

शेवटचा ट्विस्ट ईतका आवड्ला नाही >>> हो..आत्ताच पाहिला तो एपिसोड....तो ट्विस्ट नसता तर जास्त छान वाटली असती सिरीज..

Pages