Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Happy family मध्ये मुलीचा
Happy family मध्ये मुलीचा /मुलाचा बॉयफ्रेंड उगाच काहीतरी spicy टाकायचं किंवा धक्का द्यायचा म्हणून टाकलेल वाटलं . मला तर वाटलं रमेशच सांगेल असं काहीतरी , त्याचे किती रेफेरेंन्सस दिलेत . जॉन इब्राहिम वगैरे . कनकवली आणि दादा,दादी आवडली मला . अतुल कुलकर्णी थोडा मिसफिट वाटला रोलेला.
छान चालली होती मालिका, शेवट मात्र एक्दम बॉलीवूड टाईप केला .
वरती खिचडीचा उल्लेख आलाय, त्यातली कलाकारांची पात्रनिवड काय परफेक्ट होती .
चौकन्ना अन्ना अर्थात सुनिल
चौकन्ना अन्ना अर्थात सुनिल शेट्टी ची हंटर ही मालिका अमझोन मिनी टीवी वर आली आहे. स्टोरी काही खास नाहीय पण बॅकग्राऊंड स्कोर आणि प्रेझेंटेशन वेगवान आहे. खासकरून मारामारीच्या सीन मध्ये जी जुनी गाणी आहेत ती मला आवडली. अण्णा चे काही काही डायलोग्स तर गुंडा ची आठवण करून देतील. एकदा टाईमपास म्हणून ठीक आहे पहायला.
(No subject)
शेरलॉक मला आवडायची. पण नंतर
शेरलॉक मला आवडायची. पण नंतर नंतर अतिशय नावडती सिरीयल झाली. आता पहिले पहिले एपिसोड सुध्दा बकवास वाटतात.
चौथा सिझन तर अत्यंत भयानक होता, पण एकूणच पूर्ण सिरीयल बघितली तरी भरपूर प्रॉब्लेम दिसतात -
१. शेरलॉक सुपरहिरो सारखा घेतला आहे.
२. शेरलॉक काहीही बघून वाट्टेल ते आडवे तिडवे निष्कर्ष काढतो. काही उदाहरणे - पँट वर केस बघून माणसाकडे ३ कुत्री आहेत असा निष्कर्ष काढणे, डेड बॉडी बघून कोणता मारेकरी आहे हे शोधणे, डेस्कवरचे फोटो बघून आर्मी जनरलचा कंप्युटर पासवर्ड ओळखणे इत्यादी. अजून ढीगभर उदाहरणे आहेत.
३. शेरलॉक होम्सच्या गोष्टी एपिसोडिक आहेत. प्रत्येक लघुकथा स्वतः एक परिपूर्ण गोष्ट असते. शेरलॉक मध्ये पहिल्या एपिसोड पासून मोरियार्टी घुसाडला आहे. काही एपिसोड मध्ये स्वतःची गोष्टच नसते, मोरीयार्ती वैगरे फालतुगिरी असते.
४. मोरियार्ती पूर्ण फसला आहे. अतिशय क्रूर आणि लॉजिकल आणि नफाकेंद्रित क्रिमिनल मास्टरमाईंड ऐवजी वाचाळ बडबड्या सरकलेला जोकर टाईप व्हिलन का ?
५. गोष्टी मधल्या इंटरेस्टिंग गोष्टी राहिल्या बाजूला, शेरलॉक कसा विचित्र आणि जिनियस आहे ह्यावर अतिरिक्त फोकस.
बेनेडिक्ट आणि मार्टिन आणि एकूणच सगळ्या लोकांनी अभिनय चांगला केलाय त्यामुळे सबपार सिरीयल इतकी आवडती झाली असा निष्कर्ष माझ्यापुरता काढलाय.
शेरलॉक्स किंवा ओल्ड फॉक्स
शेरलॉक किंवा ओल्ड फॉक्स शाळा कॉलेजात असताना दुरदर्शनवर रात्री लागायच्या तेव्हा फार एन्जॉय केल्यात.
शेरलॉक बद्दल ची निरीक्षणं
शेरलॉक बद्दल ची निरीक्षणं हहपुवा.अगदी अगदी.त्यात आणि तो आयरीन चा पासवर्ड ओळखतो.
सुपरहिरो +१. मॉरियार्टी
सुपरहिरो +१. मॉरियार्टी फसलेला पण +१.
अॅक्टिंग + वेग + हायटेक ट्रिटमेंट फॉर शेरलॉक यावर तरुन गेली.
वैयक्तिक मत पण शेरलॉक चं
वैयक्तिक मत पण शेरलॉक चं भारतीयीकरण करायची काही गरज नव्हती. ते पाहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही.
त्यापेक्षा ह्याच स्टारकास्ट ने जर ब्योमकेश किंवा फेलूदा सारख्या भारतीय डिटेक्टिव्ह ना मॉडर्न सेटिंग मध्ये आणले असते तर सिरीज नक्की पाहिली असती.
मराठीत शेरलॉक होम्स बनवायची
मराठीत शेरलॉक होम्स बनवायची झाल्यास
शेरलॉक होम्स - मकरंद अनासपुरे
डॉ. वाटसन - भाऊ कदम.
पात्रांच्या नावाचे मराठीकरण करू पाहीजे तर.
मलाही शरलॉक कंबरबॅच आणि
मलाही शरलॉक कंबरबॅच आणि मार्टीन फ्रीमन मुळेच आवडली हे खरे! काय अदा, काय केमिस्ट्री! लॉजिकल एरर्स तेव्हा इतक्या जाणवल्या नाहीत. कारण तेच. कंबरक्रश

हिंदी शरलॉक कसे करतील ? केके आणि रणवीर शोरी दोघेही चांगले अॅक्टर्स आहेत पण कथा पूर्ण नविन घेणार की त्याच कथा भारतीयीकरण करून घेणार? तसे केल्यास "चिराबाजारातील क्रुसाजवळ बर्फ पडत होता म्हणून निमकराकडची डुकराच्या मासाची भजी खाल्ली "असे काही नाही झाले म्हणजे मिळवले!
भारतीयीकरण करुन केलं तर मजा
भारतीयीकरण करुन केलं तर मजा येईल. शेरलॉक स्टोरी एकदम वर्सेटाईल आहे,
मला आवडेल भारतीय शरलॉक बघायला
मला आवडेल भारतीय शरलॉक बघायला. केके जरा म्हातारा वाटेल आणि mrs Hudaon म्हणून सीमा पाहवा आवडली असती.
मलाही शरलॉक कंबरबॅच आणि मार्टीन फ्रीमन मुळेच आवडली हे खरे! काय अदा, काय केमिस्ट्री! लॉजिकल एरर्स तेव्हा इतक्या जाणवल्या नाहीत. कारण तेच. कंबरक्रश >>> मै +10000000 .
त्यातले विनोदही इतके subtle होते. काही काही सीन्स त्यातला humour किंवा केमेस्ट्रीमुळे परत बघायला आवडतात.
जेव्हा वॉटसन , मिसेस हडसनला बरेच महिन्यानी भेटायला येतो आणि लग्नाबद्दल सांगतो .
Amobinable bride episode तुकड्या तुकड्यात बघायला आवडतो. एकतर कंबरबँच प्रचंड hot दिसतो
आणि काही dialogues एकदम witty आहेत.
जेव्हा शरलॉक आणि वॉटसन रात्री भुताची वाट बघत असतात.
किंवा सुरुवातीला
Sherlock : for god sake , give her some lines . She is perfectly capable of starving us .
वॉटसन आणि त्याच्या मेडचा सीन
शेवटी जेव्हा शरलॉक , वॉटसन आणि मेरी एकत्र भेटतात
Mary : no not him . The clever one .
Watson : I thought I m loosing u . We started neglecting each other.
Sherlock : you are the one who moved out
Watson : i was talking to Mary .
Prime वर Mrs Harris goes to
Prime वर Mrs Harris goes to Paris पाहिला. आवडला.
घरकाम करणाऱ्या बाईला एक सुंदर डिझायनर ड्रेस दिसतो. काहीही करून आपण तसा ड्रेस घ्यायचाच असे ती ठरवते. त्यासाठी पै-पै जमा करते. पॅरिसला जाते. तिला ड्रेस कसा मिळतो, पुढे त्याचे काय होते ते छान दाखविले आहे.
Submitted by sonalisl on 25 March, 2023 - 18:04
गंगुबाई नावाचा सरिता जोशी यांचा एक हिंदी चित्रपट याच कथासूत्रावर आधारित आहे.
कंबरक्रशला अनुमोदन. फारच भारी
कंबरक्रशला अनुमोदन. फारच भारी शोभलाय तो रोल त्याला.
हॅप्पी फॅमिली झाली बघून.
हॅप्पी फॅमिली झाली बघून.
मला ती टिस्का शेवटी त्या संजॉयला इनडीड म्हणते ते आवडलं, तिच्याकडून ती नातं संपवणार. दुसरा सीझन असेल तर ती सोडणार त्याला. तो संजयतर नंतर नंतर पार बावळट आणि त्या हीरोच्या प्रेमात वेडा दाखवला आहे.
अतुल कुलकर्णीनेही छान काम केलं. रत्ना तो छा गयी मात्र.
कंबरबॅच, मार्टीन फ्रीमन -
कंबरबॅच, मार्टीन फ्रीमन - दोघंही आवडतात. पण सुपरहिरोसाठी +१.
शेरलॉकच्या काही अतर्क्य निष्कर्षांमुळे ती सीरीज मला १-२ एपिसोड्समध्येच बोअर झाली.
शेरलॉक का गांडली आहे हे ४:३०
शेरलॉक का गांडली आहे हे ४:३० मिनिटात सांगणारी parody
https://youtu.be/eKQOk5UlQSc
इथे वाचून Hotstar वर Will
इथे वाचून Hotstar वर Will Trent पहायला सुरुवात केली . Ok ok आहे. Mysteries आणि विल त्या कशा सोडवतो ते फारच बेसिक आहे.
इथेही काही काही dialogues funny आहेत.
"Right , you have unreasonable boss , too " एकदा तरी माझ्या manager ला ऐकवेन म्हणतेय
काल युट्युब वर दिऑर चा फॅशन
काल युट्युब वर दिऑर चा फॅशन शो जो गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच झाला तो बघितला. कपडे तर छानच आहेत. पण पूर्ण इवेंट लै भारी वाटला. त्यात महिला तबला वादक आहे ती फार जबरी वा टली. पहिले तिने तोडे तालाचे बोल बोलुन दाखवले मग वाजवायला सुरुवात केली. इंडो वेस्टर्न म्युझिक होते. पण प्रफेक्टली सेट. बासरी सतार सारंगी व तबला होते. बाकी वेस्टरन ऑर्केस्ट्रा. सेट डिझाइन पण सुरेख होते. फुलांची रांगोळी व त्या समोर दिवे लावले होते दिवाळी सारखे. मुलींच्या पायात हाय हील्स नव्हत्या तर साधे फ्लॅट शूज पण अर्थात दिऑर कॅट्गरी. शेव टाला का कोण जाणॅ ओम नमःशिवाय. पाच सहा वेळा.
मागचे ताज हॉटेल पण लाल दिवे पिव ळे दिवे एकदम मस्त दिसत होते.
द सर्पंट पाहिली. कुठेही
द सर्पंट पाहिली. कुठेही शिव्यांचा फकफकाट नाही, एखादा सीन सोडला तर अतिरेकी सीन्स नाहीत. फक्त कोल्ड ब्लडेड मर्डरर, त्याचे पार्टनर्स, सगळयांनी मिळून केलेले खून. 70 च्या दशकातलं चित्रीकरण. एकदम पर्फेक्ट. मेन पात्राचं काम ज्याने केलंय, फार मस्त केलंय. सुरूवातीची मुलाखत, इतके कोल्ड डोळे आणि उत्तरं. सगळ्यांचीच कामं मस्त झालीत. 1-2 ओळखीचे चेहरे दिसले हिंदी इंडस्ट्री मधले.
Tahar Rahim solid acting.
Tahar Rahim solid acting.
तहार रहिम चांगला अॅक्टर आहे.
तहार रहिम चांगला अॅक्टर आहे. जमल्यास त्याचे हे दोन सिनेमे बघा. द मॉरिटेनियन आणि डे ऑफ द फाल्कन; दोन्हि नेफिवर आहेत...
Prime वर रीचर पाहिली.
Prime वर रीचर पाहिली.
Action धुमधडाका आहे.
शेवटी तर बॉलीवूड style एकदम.
रीचर एका शांत, कमी लोकसंख्या असलेल्या गावात येतो.
एकेक खून होत आहेत. त्याचा तपास, रिचरच्या भावाचा झालेला खून, मुळात तो तिथे का आला अशी सर्व सुरवात, त्या गावात असलेला संधीसाधू मेयर, पोलिस , त्यांचे आपापसातील तणाव, गावात पैसा ओतलेला एक अहंकारी इन्व्हेस्टर, त्याचा वाढीव पोरगा, गावातले लोकं, बाहेरून आलेले रीचर आणि एक।पोलिस अधिकारी असा बराच मसाला आहे.
Action, थोडाफार सस्पेन्स मुळे आवडली.
एंटरतेनिंग आहे.
नेटफ्लिक्सवर ‘बीफ’ मालिका
नेटफ्लिक्सवर ‘बीफ’ मालिका काही दिवसांपासुन पहिल्या दहात दिसत आहे. आज तर १ वर आहे. कोणी पाहिली का?
ह्म्म. पहिला सीन भारी होता. वेळ मिळाल्यास पहाणार.
Prime वर टॉम क्लान्सी'ज जॅक
Prime वर टॉम क्लान्सी'ज जॅक रायन सेरीज पाहिली.
एक्स मिलिटरी आणि CIA मध्ये काम करणारा analyst जॅक आहे.
त्याने काही फंडस् ट्रान्स्फर रडार वर आणलेत.
त्याचा शोध , त्याचे लागेबांधे, दहशतवाद, आणि त्याचा बिमोड ही स्टोरी line.
Spy story, वेगवान कथानक आणि घटना आणि सर्व पात्रांचे अतिउत्तम अभिनय ह्यामुळे आवडली ही सेरीज.
मग लगे हाथ 3 सिजन संपवले.
मला आवडले.
प्रत्येक सिजन।मध्ये वेगळी storyline
पाहिल्यात दहशतवाद
दुसर्यात वेन्येझुयेला आणि तिथे घडणाऱ्या घटना
तिसर्यात अमेरिका रशिया
ज्युबिली सिरीजबद्दल अजून
ज्युबिली सिरीजबद्दल अजून कुणीच कसं काही लिहिलं नाही? (प्राइम)
पिरियड ड्रामा. ४०-५० च्या दशकातली सिनेमेनिर्मिती, त्या व्यवसायातल्या कुरघोडी, सामान्य माणसांना असणारं सिनेमांचं वेड, ती स्वप्न विकणारी दुनिया, - असं सगळं वातावरण, कथानक छान उभं केलंय.
माझा पहिला भाग (५ एपिसोड्स) बघून झालेत. ७ एप्रिलला ५ एपिसोड रिलीज झाले. काल पुढचे ६-१० रिलीज झालेत. ते देखील बघणारच.
मी पण वाट बघत होतो कुणीतरी
मी पण वाट बघत होतो कुणीतरी लिहील याची. रिलीज झाली तेव्हांपासून पहिला भाग अर्ध्यापर्यंत झाला पाहून. वातावरणनिर्मिती उत्तम आहे.
पण अद्याप खिळवून ठेवलेले नाही. बहुतेक नंतर पाहिली तर आवडून पण जाईल...
हाय मी लिहिले होते. ज्युबिली
हाय मी लिहिले होते. ज्युबिली बद्द ल उत्तम सीरीज आहे. आज दुसरे भाग पण बिंज वॉच करुन बघितले. सर्वांची कामे फार छान आहेत. एकंदरीत ग्रेट सीरीज. संगीतही छान दिले आहे. आता ते लिहायलाच आले.
Netflixwar maid वेबसीरीज
Netflixwar maid वेबसीरीज पाहिली .
एक अमेरिकन तरुणी, तीची चार वर्षाची लेक..कौटुंबिक छळाला कंटाळून नवर्यापासून वेगळं राहणारी,
सरफिरी-चित्रकार आई, पैशांचा ताळमेळ बसवणे, स्वतः ची मेडची नोकरी सांभाळून लेकिला सांभाळणं, आईची काळजी घेणं..मुलीच्या कस्टडीसाठी कोर्ट कचेरी.. सगळ्याच पातळींवर तीची कुतरओढ सुरू असते..त्यातून ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं..अडचणीतून मार्ग काढणं याची धडपड सुरू असते तीची.. आता होईल सगळं व्यवस्थित म्हणता म्हणता प्रॉब्लेम्स येतात हळूवार....
सिंपल गोईंग... छान आहे सिरीज..
छान आहे मेड.. बींज वॉच केली
छान आहे मेड.. बींज वॉच केली होती मी.. खूप आशावादी आहे..
Pages