Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दहाड चांगली आहे. आम्ही
दहाड चांगली आहे. आम्ही वीकांताला बिंज वॉच केली. सोनाक्षीचे काही संवाद छान म्हटले आहेत तिने. शत्रु ची आठवण येते.
मिसोजिनी, एंट्रें च् ड पॅ ट्रार्कि जाती व्यवस्था व त्याचे वाइट परिणाम ह्या वर भाष्य आहे. स्त्रियांच्या मनातील असुरक्षिततेची भावना ओळखून त्यावर काम करुन त्यांना भूल थापा मार्णारे अनेक अस्तात पण त्या किती लवकर आकर्षित होतात हे ही बघण्याजोगे व त्यातून शिकण्या जोगे आहे.
फसवणुकीच्या अनेक केसेस बद्दल वाचले आहे. त्या मुलींबद्दल वाइट वाटते.
ब्रिजरटन ३ - प्रिन्सेस शार्लट
ब्रिजरटन ३ - प्रिन्सेस शार्लट स्टोरी बघून झाली. मला हा सीझन आधीच्या दोन्ही सीझन पेक्षा जास्त आवडला. स्टोरी वेगळी आणि इन्टरेस्टिंग आहे. सगळी कॅरेक्टर्स मस्त आहेत.
फसवणुकीच्या अनेक केसेस बद्दल
फसवणुकीच्या अनेक केसेस बद्दल वाचले आहे. त्या मुलींबद्दल वाइट वाटते. >>>
वाचलेल्या माहिती अनुसार हि सिरीज पकडल्या गेलेल्या एका खऱ्या भारतीय सिरीयल किलर वर आधारित आहे.
मोहन कुमार उर्फ सायनाईड मोहनने याच पद्धतीने 20 महिलांचे फसवून खून केले होते.
>>Hot star वर ' सास, बहु &
>>Hot star वर ' सास, बहु & फ्लेमिंगो ' नावाची वेब सिरीज पाहिली. <<
ब्रेकिंग बॅडचा तडका दिलेला आहे. बर्याच गोष्टि नपटणार्या आहे, अकार्यक्षम नार्कॉटिक्स त्यातली एक. तो एक टोमणा आहे का याची क्ल्पना नाहि...
दहाड बद्दल विवेक
दहाड बद्दल विवेक अग्निहोत्रीचे हे ट्वीट मजेशीर वाटले:
https://twitter.com/vivekagnihotri/status/1657287162281488387?s=20
दहाड मधेले दो सिन्स जबरदस्त
दहाड मधेले दोन सिन्स जबरदस्त आहेत, माझ्या मते..
१. अंजली तिच्या आईला फोटोवरुन झापते
२. अंजली सिनियर स्वर्णकाराला झापते, जेंव्हा तो तिला घरात जायला मनाई करतो...
दहाड बघायला हवी.
दहाड बघायला हवी.
सास बहु प्रोमोजवरुन फार बघावीशी वाटली नाही.
दहाड बघितली , पण खास असा
दहाड बघितली , पण खास असा ग्रीप घेतलाय असे कोठेच वाटले नाही.
शेवट देखील साधारणच दाखवला आहे .
मुख्य म्हणजे सिरीयल किलर कोण ते अगोदरच दाखवले ती घोडचूक त्यांनी केली असे वाटते .
सस्पेंस बाबत नेफि वरील चेस्टनट सिरीज खूपच उजवी म्हणावी लागेल .
दहाड मधेले दोन सिन्स जबरदस्त
दहाड मधेले दोन सिन्स जबरदस्त आहेत>>> अनुमोदन.
सिनियर स्वर्नाकार ला सुनवते तेंव्हा तर गुलशन देवरा आता टाळ्या वाजवेल का काय आता असे वाटलेले
अजून १..
सोनोग्राफी सीन च्या वेळेस & डोंगरावर जाऊन उद्विग्न रडतो त्या वेळी इन्स्पेक्टर (तुंबाड चा हिरो) function at() { [native code] }इशय सुंदर अभिनय आहे.
सिरीयल किलर कोण ते अगोदरच दाखवले ती घोडचूक>>>ती चूक नाहिये, ही कथा क्राईम इन्वेस्टिगेशन च्या मार्गाने जाते. ससपेन्स नव्हे. दोन्ही जॉनर मला तरी आवडतात.
सुझल मधे ससपेन्स आणि गुन्हा उकल दोन्ही पॅरलल होत जातात. दहाड मधे तसे नाही.
सोनक्षी अभिनेत्री म्हणुन मला
सोनाक्षी अभिनेत्री म्हणुन मला फरशी कधीच आवडली नव्हती, तिला खूप चॅलेंगिंग रोल्स मिळत गेले तरी (उदा. शफाखाना) सामान्यच वाटलेली.
पण ह्यात आवडली, कॅरॅक्टर छान उभे केलेय.. मेहनती, कणखर, कर्तव्यदक्ष वगैरे. संवादफेक जरा अजून जमायला हवी.
मधूनच मला अरण्यक ची आठवण आली..रविना चा ओव्हर अॅक्टींग कडे जरा तोल गेलाय कुठे कुठे..
हरयाणवी अॅक्सेंट कुणाचा बरा वाटला लोकांनो?
हरयाणवी अॅक्सेंट कुणाचा बरा
हरयाणवी अॅक्सेंट कुणाचा बरा वाटला लोकांनो?>> दहाड मधे राजस्थानी पार्श्वभुमी आहे आणि आरण्यक मधे हिमाचलची. हरयाणा कुठेच नाही
सिद्धांत गुप्ताची (जय खन्नाचं
सिद्धांत गुप्ताची (जय खन्नाचं पात्र - हे राजकपूरवर बेतलेलं असावं असं वाटतं) फॅन झाले मी. आधी कुठेही त्याचं नाव ऐकलं नव्हतं.
>>>>
https://www.amarujala.com/photo-gallery/entertainment/bollywood/prime-vi...
इन्स्पेक्टर अविनाश सध्या
इन्स्पेक्टर अविनाश सध्या बघतोय , रणदीप हुडा साठी !
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचा बेस आहे .
पण त्याची larger than life इमेज बनविण्याच्या नादात सीरिज चे मुश्किल ने दोनच एपिसोड पाहू शकलो .
कथेचे बंडल आणि दिग्दर्शन खूपच बालिश वाटले.
उत्तर प्रदेश मधील गुन्हेगारी वर गँग ऑफ वासेपूर आणि मिर्झापूर या दोनच सिरीज वास्तवाच्या जवळ नेणाऱ्या वाटल्या
ज्युबिली जरा हळू आहे पण छान
ज्युबिली जरा हळू आहे पण छान आहे. पार्श्वसंगीत फार कमी आहे पण एकदम योग्य वेळी आहे व जबरदस्त.
कामं सुंदर झालीच आहेत सर्वांची.
दोन्ही खुराना बंधू फार टॅलेन्टेड!
दहाड बघितली, सिरीज खूप
दहाड बघितली, सिरीज खूप एन्गेजिंग आहे पण शेवट एकदमच गुंडाळलाय , बरीच लुप होल्स पण आहेत !
महिलां विषयी, त्यात दलित महिलांना रिगार्डलेस ऑफ देअर पोझिशन जी ट्रिटम्नेट मिळते ते पाहून सतत चिड येत रहाते तिथल्या मिसॉजनिस्ट सोसायटीची .
जातपात इन जनरलच किती मोठा इश्यु आहे अजुनही भारतात बर्याच ठिकाणी हे इतक्य॑त बर्याच सिरीज मधे येऊन गेलय !
सगळ्यांचा अभिनय आवडला , सोनक्षीचाही !
दहाड पाहिली.
दहाड पाहिली.
सुरवात स्लो वाटली.
मध्ये मध्ये देखील स्लो होते.
Parghee चे उपकथानक फारसं patch नाही झालं.
शिवाय त्याच मतपरिवर्तन देखील.
मुख्य विषय होत असलेले सिरीयल किलिंग, त्यात इतर undercurrent जे आलेत, जसे की मुलींच्या लग्नाची चिंता, पैशाचा अभाव, लग्नाला उशीर होत असल्याने मुलींची घुसमट, love जिहाद चा angle, त्याचे राजकारण, बाहुबली लोकांचे वागणे, सिस्टीम दाबणे, स्त्रीला उपभोग्य वस्तू सारखे ट्रीट करणे, जातपात असे जे काही आलेत ते एकदम भारी.
छोट्या शहरातील निवांत वातावरण, धूळ रेतीची दृश्य, बॅकग्राऊंड म्युजिक हे सगळे अनुभूती मध्ये भर घालते.
acting सगळ्यांची छान. व्हिलन तर जबरदस्त.
लूप होल्स तर आहेतच.
त्या मुली गोळ्या का खातात हे पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणजे जरा अतिच वाटलं मला.
शिवाय हा व्हिलन एस्केप प्लान ह्यांना "परोसून " जातो हे ही कळत नाही पोलिसांना , ते ही सिमीलर " परोसून " फसवलेलं असतानाही.
सोनाक्षीचा तुझ्या बापालाही घाबरत नाही swag काही वेळा एकदम भावतो. बाकी अजून acting जमली असती पण थोडे लिमिटेड केले काय असे वाटले मला.
बघण्यासारखी आहे नक्कीच.
हो दहाड चांगली घेतली आहे!
हो दहाड चांगली घेतली आहे! स्लो आहे पण वेल मेड, वेल डायरेक्टेड सीरीज. कॅरेक्टर्स आणि अॅक्टर्स चांगले डेवलप झालेत. विजय वर्माने काय काम केलंय! अगदी सामान्य सभ्य भासणार्या माणसातला सिरियल किलर तंतोतंत उभा केला आहे त्याने. सोनाक्षीचे काम पण चांगले आहे. मी खरे तर असल्या मेन स्ट्रीम अॅक्ट्रेस ला बहुधा गरज नसताना, सेक्स सिंबॉल म्हणून कॅश करायला म्हणून घेतात या अनुभवावरून बायस्ड मनाने बघायला सुरुवात केली होती. पण तिला अजिबात तसे दाखवलेले नाही. डायरेक्षन ला क्रेडीट द्यायला हवे.
व्हिलन चे character बघताना
व्हिलन चे character बघताना मला dexter च्या एका सीजन मधला सिरीयल किलर आठवला.
ट्रिनिटी किलर.
फॅमिली मॅन बनून जे काही कवच मिळतंय ते घेणारा.
फक्त तो ट्रिनिटी किलर फॅमिली सोबत देखील कंट्रोल फ्रिक सारखा वागत असतो हा एक फरक.
बघण्यासारखी आहे नक्कीच. >>>
बघण्यासारखी आहे नक्कीच. >>> +१
विजय वर्माचे ते शाळेतील सीन्स फार भारी आहेत. ते हिंदी ऐकायला अतिशय सुंदर आहे. अजून घ्यायला हवे होते ते सीन्स.
हो ती प्रेमपत्र वाली कविता
हो ती प्रेमपत्र वाली कविता लक्षात राहिली माझ्या.
त्या मुली गोळ्या का खातात हे पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणजे जरा अतिच वाटलं मला. >>> बहुतेक आधीच्या केसेस मधे सायनाइड हे मॉर्निंग आफ्टर पिल मधून दिले गेलेय हेच कळलेलं नसतं, कारण तोवर ती पिल विरघळून गेलेली असते असे तो डॉक्टर सांगतो एका सीन मधे. अंजलीच्या लक्षात ती शक्यता येते तेव्हा ती ते डॉक्टर ला स्पेसिफिकली बघायला सांगते असे आहे ना.
अगदी पहिल्या भागातील "बल्ब्
अगदी पहिल्या भागातील "बल्ब्/ट्यूब" वाली कविता. नंतरची ती "प्रेत आयेगा" वाली. मधे एकदोनदा मुलींचे लेख/कविता तपासताना "पुढे तुम्ही कोणी लेखक बनू नका" म्हणून दिलेला मजेदार सल्ला. माणसाने पाप करणे सुरू केल्याने हिरव्यागार जमिनीचे वाळवंट झाले किंवा समुद्र खारा होत गेला वगैरे!
ओ येस्स, आठवले आता तेही.
ओ येस्स, आठवले आता तेही.
दहाड पाहिली.
दहाड पाहिली.
सुरवात स्लो वाटली.
मध्ये मध्ये देखील स्लो होते.
Parghee चे उपकथानक फारसं patch नाही झालं.
शिवाय त्याच मतपरिवर्तन देखील >>>>>>>>>> स्लो असल्यामुळेच वैतागून मी सुरवातीच्या दोन नंतर डायरेक्ट शेवटचा भाग बघितला आणि सिरीयल संपवून टाकली ......
@ फारएन्ड बरोबर आहे.
@ फारएन्ड बरोबर आहे.
एकदम पॅशनट शिक्षक आहे तो.
Btw, त्या प्रेमपत्राच्या उपकथानकाचं प्रयोजन कळालं नाही.
@ मैत्रेयी बरोबर आहे. तसेच आहे.
पण तरीही भले पोस्टमोर्तम मध्ये गोळी अथवा ट्रेसेस सापडणे कठीण असले तरी त्या पॅटर्न मध्ये लक्षात यायला हरकत नव्हती.
@पुरोगामी अहो पहिलाच एपिसोड स्लो होता, नंतर बऱ्यापैकी वेग पकडला की. मध्ये मध्ये उपकथानक काही अनावश्यक वाटली.
एक एपिसोड कमी होऊ शकला असता.
Btw, त्या प्रेमपत्राच्या
Btw, त्या प्रेमपत्राच्या उपकथानकाचं प्रयोजन कळालं नाही. >>> मलाही. बहुधा शाळेतील चांगली इमेज आणखी बळकट करायला असेल. पण पटकथेत्/दिग्दर्शनात तो भाग नीट पूर्ण केलेला नाही असे वाटते.
दहाड मलापण आवडली. कामं
दहाड मलापण आवडली. कामं सगळ्यांचीच मस्त झालीत. विजय वर्मा झकास. सहज नावे वाचली तर कळले की निर्मात्या, लेखिका, दिग्दर्शिका मुख्यत्वे बायका आहेत. झोया अख्तर फक्त माहिती त्यातली. मला हेही आवडले की शिव्या नाहीत मालिकेत. अगदी क्वचित आहेत.
स्लो असल्यामुळेच वैतागून मी
स्लो असल्यामुळेच वैतागून मी सुरवातीच्या दोन नंतर डायरेक्ट शेवटचा भाग बघितला आणि सिरीयल संपवून टाकली ......>>>> अर्र्रे देवा
Btw, त्या प्रेमपत्राच्या
Btw, त्या प्रेमपत्राच्या उपकथानकाचं प्रयोजन कळालं नाही. >>> मलाही. बहुधा शाळेतील चांगली इमेज आणखी बळकट करायला असेल. >>> थंक्यु. मी बरीच डोकफोड करून विचार केला त्या मुलीला बरं सोडलं ह्याने..का असे? वगैरे. शाळेतली इमेज हेच कारण असावे.. पण ते संवादातून यायला हवे होते, पोलिस शाळेत तपासाला जातात त्यावेळी.
ज्युबिली जरा हळू आहे पण छान आहे. >>> मी सुरू केलिये पण जरा बोर होतेय...बघू का नेटाने?
खुराना बंधू खरंच कमाल आहेत.
प्रेमपत्र कथा लेखिका विसरली
प्रेमपत्र कथा लेखिका विसरली नंतर.
ज्युबिली तिसर्या भागात पकड घेऊ लागली. आठव्यात पून्हा जरा हळु झाली पण नवव्यात पकड घेतली. १०व्याला संपलीच. त्यामुळे नेटाने पहायचा प्रयत्न करायला हरकत नाही. चौथ्या भागानंतरही पकड नाही घेतली तर मग पहाणे थांबवायला हरकत नाही.
दहाड सिरीयल पहायला घेतली.
दहाड सिरीयल पहायला घेतली. पुर्ण बघून झाली नाही पण आवडत आहे. मुख्य म्हणजे सर्वांचा अभिनय चांगला आहे आणि स्टोरी पण. विजय वर्मा तर बेस्टच...
काही चूका आहेत. विजय वर्मा कडे एक वॅन असते. त्याशिवाय अजून एक गाडी असते. ती गाडी कधी हॅचबॅक तर कधी सेडान अशी बदलत असते, पोलिस तपास चालू आहे हे लक्षात आले तरी विजय वर्मा आपले फसवायचे काम सोडत नाही,पोलिस लोकांच्या साईड लाईन स्टोरीज ज्याची काही गरज नव्हती, सर्वच ठिकाणचे पुरूष (एस पी सकट) सोनाक्षीला पाहिल्यावर लाळ टपकायला लागतात, टपोरी मुले सोनाक्षीला पोलिसाच्या वेषात बघूनही तिला चिडवतात, छेडतात तरी ती शिव्या घलण्याव्यतिरीक्त काही करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत पण ओव्हरऑल सिरीज चांगली आहे.
Pages