Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Waltair veerayya तेलुगू
Waltair veerayya तेलुगू नेटफ्लिक्स वर
दोन मित्रांची गोष्ट,एक मासेमार आणि एक ड्रग माफिया..इगोइस्ट एसीपी विक्रम..
ऐक्शन कॉमेडी सिनेमा... सिंपल आहे..चांगला आहे..आवडला...
चिंरजीवी काय भाव खाऊन गेलाय..रामचरणला कॉम्प्लेक्स येत असणार...
Critical Thinking
Critical Thinking नेटफ्लिक्स वर. सत्य घटनेवर आधारित फील गुड मुव्ही. इनर सिटी शाळेतली मधली एक चेस टीम. थोडासा संथ.
विकु - मलाही परवा तो दिसला
विकु - मलाही परवा तो दिसला होता. ब्राउजिंग करताना. या जॉनरा मधे अनेक चांगले पिक्चर्स आहेत बहुधा. इनर सिटी/गरीब किंवा व्रात्य मुलांच्या शाळेत एखादा शिक्षक येउन तो त्यांना चांगल्या मार्गावर नेतो, एखादे मोठे पारितोषिक मिळवून देतो ई.
- Freedom Writers - हिलरी स्वॅन्क शिक्षिका
- The Great Debaters - डेन्झेल वॉशिन्ग्टन. हा पिक्चर मी पाहिला आहे का लक्षात नाही.
- The Ron Clark Story - मॅथ्यू पेरी
- Akeelah and the Bee - लॉरेन्स फिशबर्न
आणखीही असतील. यातले मी पाहिलेले तिन्ही चांगले आहेत.
Schneider's list प्राईमवर.
Schneider's list प्राईमवर.
विषय:1939-पोलंडमधे ज्युंवर झालेले अनन्वित अत्याचार >> शिंडलर्स लिस्ट ना?
हो वावे टायपो मिस्टेक.
(No subject)
द फाऊंडर >>> हा मी थेट्रात
द फाऊंडर >>> हा मी थेट्रात पाहिला होता. चांगला आहे.
एक सर्वांगसुंदर मराठी चित्रपट
एक सर्वांगसुंदर मराठी चित्रपट.
दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय, पटकथा लेखन, कथा, संगीत या सर्वच आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी आहे.
https://www.youtube.com/watch?v=TL4Uecwa4FQ
अगदी याच दर्जाचा आणखी एक चित्रपट आहे. रसिक प्रेक्षकांनी इतर भाग शोधून मगच पहायला सुरूवात केलेली बरी. रसभंग नको.
https://www.youtube.com/watch?v=sfin5czP3Xg
या दोन्ही चित्रपटांपेक्षा ही वरच्या क्रमांकावर एक चित्रपट आहे पण त्याचा शेवट युट्यूबवर नाही. नाव लक्षात नाही. सापडला तर लोकाग्रहास्तव देईन.
Schneider's list प्राईमवर. >>
Schneider's list प्राईमवर. >>> हा बघायला हवा.
शिंडलर्स लिस्ट प्रचंड अस्वस्थ
शिंडलर्स लिस्ट प्रचंड अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे
आणि तो असा येता जाता जेवताना खाताना बघण्यासारखा नाही
मी केवळ एकदाच बघू शकलो, परत एकदा बघण्याचे धाडस नाही माझ्यात
आणि तो पूर्ण बघू शकलात तर त्याच धर्तीवर
पियानिस्ट पण बघा
तोही अंतर्बाह्य हलवून सोडतो
रघू आचार्यांनी दिलेले रत्न
रघू आचार्यांनी दिलेले रत्न वैरी मंगळसूत्राचा महाभयंकर महान दिसते आहे
शिंडलर्स लिस्ट प्रचंड अस्वस्थ
शिंडलर्स लिस्ट प्रचंड अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे
आणि तो असा येता जाता जेवताना खाताना बघण्यासारखा नाही
>>>>> खरे आहे. पियानिस्ट ही चांगला आहे.
'लाईफ इज ब्युटीफुल' मला सर्वात जास्त आवडला. तो ही जरूर पहा. रॉबेर्तो बेनीनीला बेस्ट डिरेक्टर का बेस्ट फॉरेन फिल्म अवॉर्ड मिळाला आहे यासाठी.
हो पाहिलाय
हो पाहिलाय
हे सगळे मूव्ही एकदाच बघावे
The boy in stripped pajamas
सुद्धा अशक्य भयानक आहे
The boy in stripped pajamas >
The boy in stripped pajamas >>> याचा शेवट तर अगदी अंगावर येतो.
'लाईफ इज ब्युटीफुल' मी बरेचदा पाहिला. कारण त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे .बाकीचे मात्र नाही पाहू शकत परत.
ww2 इतिहासाचे चाहते असाल तर Katyn आणि The Great Dictator ही पहा. कमाल म्हणजे मॅकार्थी काळात The Great Dictator साठी त्याच्या फेमस ऍक्टर/डिरेक्टरला कॉमी ठरवून छळले गेले.
"शिंडलर्स लिस्ट प्रचंड
"शिंडलर्स लिस्ट प्रचंड अस्वस्थ करून सोडणारा चित्रपट आहे
आणि तो असा येता जाता जेवताना खाताना बघण्यासारखा नाही
मी केवळ एकदाच बघू शकलो, परत एकदा बघण्याचे धाडस नाही माझ्यात" - +१
सिनेमा पाहून झाल्यावर कित्येक दिवस हाँट केलं होतं शिंडलर्स लिस्ट ने.
शिंडलर्स लिस्ट बद्दल वरच्या
शिंडलर्स लिस्ट बद्दल वरच्या पोस्टींना अनुमोदन..
ww2 इतिहासाचे चाहते असाल तर
ww2 इतिहासाचे चाहते असाल तर Katyn आणि The Great Dictator ही पहा. .>>>>
माझ्याकडे एक हार्डडिस्क भरून वर्ल्ड वॉर १, २, सिव्हील, गल्फ, अफगाणीस्तान आणि मध्ययुगीन युद्धपट आहेत. कात्यन बघितलाय पण त्यात घटना कमी आणि त्यामागची शोध कहाणी जास्त आहे.
कमाल म्हणजे मॅकार्थी काळात The Great Dictator साठी त्याच्या फेमस ऍक्टर/डिरेक्टरला कॉमी ठरवून छळले गेले
ग्रेट डिक्टेटर म्हणजे चार्ली चॅप्लिनचाच ना
नकोच बघायला शिंडलर्स लिस्ट,
नकोच बघायला शिंडलर्स लिस्ट, माझी अस्वस्थता बरेच दिवस टिकते, धन्यवाद सर्वांना. मी स्टोरी वाचली होती, एकदा दूरदर्शनवर लागलेला रात्री पण मला बघता आला नव्हता.
कमाल म्हणजे मॅकार्थी काळात
कमाल म्हणजे मॅकार्थी काळात The Great Dictator साठी त्याच्या फेमस ऍक्टर/डिरेक्टरला कॉमी ठरवून छळले गेले.
>>>>नोलनचा ओपनहायमर येतो आहे. रॉबर्ट ओपन्हायमरला सुध्दा बराच त्रास दिला कम्युनिस्ट आहे म्हणून.
ग्रेट डिक्टेटर म्हणजे चार्ली
ग्रेट डिक्टेटर म्हणजे चार्ली चॅप्लिनचाच ना>>>
हो. आणि याच्यासाठी चार्ली चॅप्लिनला देश सोडावा लागला.
शिंडलर्स लिस्ट म्हणुनच मीही
शिंडलर्स लिस्ट म्हणुनच मीही अजुन पाहिला नाही.
Oppenheimer पहाणार आहे. नोलन बंधू जबरदस्त आहेत.
त्न वैरी मंगळसूत्राचा
त्न वैरी मंगळसूत्राचा महाभयंकर महान दिसते आहे >>>>
वैरी मंगळसूत्राचा बघावा कि
वैरी मंगळसूत्राचा बघावा कि शिंडलर्स लिस्ट कन्फयुज झालो आता... दोन्हीपैकी बेटर कोणता आहे??
अर्थातच वै. मं. च. ह्यात
अर्थातच वै. मं. च. ह्यात जितकी करमणुक होणार आहे त्याच्या ०.००००१ टक्का करमणुक शिं. लि. मध्ये नाही.
अॅमेझॉन प्राइमवर ७०-८० च्या
अॅमेझॉन प्राइमवर ७०-८० च्या दशकांतले काही चांगले, मी अजून न पाहिलेले इंग्रजी सिनेमे सापडले.
Tarantino चे आहेत, काही ऑस्कर विजेतेही आहेत.
आता जमतील तसे एक-एक बघणार.
सुरुवात Cape Fear पासून.
Waltair Veeraiyya जो काही
Waltair Veeraiyya जो काही उच्चार असेल तो .. चालू केला. हिंदी, मराठी डबिंग नसल्याने लगेचच बंद केला.
तेच कि आता ते शिंडलर्स कि
तेच कि आता ते शिंडलर्स कि शांईडर्स काय असेल तो उच्चार असेल त्यात लगेच येऊन एकनॉलेज करण्यासारखं काय होतं..
ऑस्कर शिंडलर्स हे नाझी
ऑस्कर शिंडलर् हे नाझी पक्षाचे सदस्य होते आणि नाझींच्या हत्याकांडातुन वाचवण्यासाठी त्यांनी 1200 ज्यू लोकांना कारखान्यात काम देऊन त्यांचे प्राण वाचवले, त्यासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. हे जे ज्यू होते त्यानाची लिस्ट म्हणजेच शिंडलर्स लिस्ट. त्यांनी वाचवल्या ज्यू लोकांनी नंतर शिंडलर्स ज्यू असे नाव घेतले, ही सत्य घटना आहे
शिं लि आलाय का ओटीटीवर ?
शिं लि आलाय का ओटीटीवर ?
होय हो आशुचैम्प
होय आशुचैम्प
मी टायपो मिस्टेक लिहिलेलं एडिटलं वरती..
प्राईमवर, नेटफ्लिक्स वर आहे र आ.
Pages