Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरुचा एक्स रे काढुन तिला
अरुचा एक्स रे काढुन तिला कुणीतरी पाठिचा कणा नावाचा अवयव दाखवा, कान्ची एक अट्ट्ल केस आहे, २५ वर्श या बाइने हिला दाबुन ठेवल हे ति स्वत:च तोन्डाने सान्गते, घराच्या कागदपत्रावरुन कान्ची-सन्जना एकत्र आल्या होत्या आणी अरुवरच आरोप करत होत्या.अन्या तिला परवाच तु आशु बरोबर रात्र घालवुन आलिये हे म्हणाल्यावर सगळे ठोब्यासारखे बघत बसले.म्हणे अरु माझी मुलगी... डोन्बल यान्च.
अरु लग्नाचं डिस्कशन ईतकं
अरु लग्नाचं डिस्कशन ईतकं जीवावर येऊन करत होती की आशुला ही खरचं तयार आहे का लग्नाला ही शंका न यावी तरच नवल.
जशी अपेक्षा केलेली तशा आशुच्या फाल्तु सवयींमुळे ही विचार बदलेल असं वाटलेलं त्याला. आशु हा तिचा चौथा मुलगाच होणारे.
प्रोमो - पत्रकार अरुवर आरोप आणि अरु रिक्षावर आपटून तिला दुखापत , नकटीच्या लग्नाला ..........
म्युझिक स्कूलच्या उद्घाटनाला
म्युझिक स्कूलच्या उद्घाटनाला सुद्धा तिला चक्कर येऊन हॉस्पिटलात भरती करावं लागलं होतं.
आशू ची कन्फेशन्स ऐकून तर मी
आशू ची कन्फेशन्स ऐकून तर मी पण खो खो हसत होते. ड्रायवर पण मनातल्या मनात कपाळावर हात मारत असणार. माझ्याबेड वर खूप पुस्तके असणार म्हणे. नो वरीज अरु तर उशी रग घेउन खालीच झोपणार एनीवेज. आज आशूच्या आईने अरु ला कानातली गिफ्ट दिली. व बरेच चिकट गूळ डायलॉग मारले. लगन झाले की हिला म्हातारीची बरीच डायमंड ज्वेलरी मिळेल. नाही का. त्या बदल्यात त्या पोराला संभाळायचे आहे. अशूचा ड्रेस कानफ टात मारणीय होता. लाइट टॅन शूज. ब्राउन मोजे बहुतेक. जीन्स. वर काय तरी शर्ट व तो भयानक कोट. अरु क्लास टीचर सारखे सर्व ऐकून घेत होती. हे लग्न नक्की कसे होईल. मुहुर्त विधी वगैरे का रजिस्टर कारण दोन्ही बोलणी एकदम चालू आहेत. रजिस्टरला एक महिना तरी नोटीस द्यावी लागते व ते मुहुर्ताच्या चौकटीत बसणार् नाही मग. लॉजिक तेलाच्याडब्यात भरुन ठेवले आहे.
आज आशूच्या आईने अरु ला
आज आशूच्या आईने अरु ला कानातली गिफ्ट दिली. >>>
हे वाक्य मी
आज आशूच्या आईने अरु ला कानाखाली गिफ्ट दिली.
असे वाचले. तसेही आईची काळजी न घेणाऱ्या आणि घटस्फोट होऊनही सासरचे घर न सुटलेल्या अरुंधतीला तेच योग्य झाले असते.
अमा..
अमा..
आम्ही आधीच इथे आशु काय बोलेल ते ताडले होते.
आंघोळ उशीरा करतो म्हणे..
त्या आधी चेहर्याला व अंगाला तेल चोपडून बसतो.. ते का नाही सांगितले?
म्युझिक स्कूलच्या उद्घाटनाला
म्युझिक स्कूलच्या उद्घाटनाला सुद्धा तिला चक्कर येऊन हॉस्पिटलात भरती करावं लागलं होतं. >>>>> हे मी विसरले आहे. अंधुक आठवतयं.
त्या आधी चेहर्याला व अंगाला
त्या आधी चेहर्याला व अंगाला तेल चोपडून बसतो.. ते का नाही सांगितले?>>>
नो वरीज अरु तर उशी रग घेउन
नो वरीज अरु तर उशी रग घेउन खालीच झोपणार एनीवेज. >>>>>> अगदी अगदी. तसही हल्ली सगळयाच सिरियल्समध्ये 'तु बेडवर झोप/ मी खाली झोपतो/ते' अशी नाटके चालू होतात लग्नानन्तर. मग ते लग्न अरेन्ज असो किव्वा प्रेम विवाह.
"लग्न झाल्यानंतर आपल्या
"लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात फार काही बदलणार नाहीए - आशुतोष" - हे आम्हांला केव्हापासून माहीत आहे.
लग्नानंतर आपल्याला आणखी एक मूल सांभाळायचं आहे हे आज अरुंधतीला सुद्धा कळलं.
आजच्या भागात इशाचे तेच तेच
आजच्या भागात इशाचे तेच तेच रडगाणे. अरु हिरवीण बनणे
सोसायटीवाले अरु आली की तिला केळवण करणार घरा समोर मांडव पडणार.
इशाला बरेच बरे संवाद होते.
इशाला बरेच बरे संवाद होते.
अरुचा अपघात अन्याने घडवुन आणल्यासारखा तो तिला हात देणार आहे. अन्याची ही व्हिलनगिरी म्हणजे कमालीचं कल्पना दारीद्र्य आहे लेखिकेचं.
ह्या सगळ्या गडबडीत आशुतोष
ह्या सगळ्या गडबडीत आशुतोष च्या आईच्या नाचाकडे कुणाचं लक्ष गेले नाहीस दिसतंय. आशुतोष च लग्न ठलल्यापासुन अनिश उठसूठ चेकाळून नाचायला लागतो. ते कमी पडलं म्हणून एक दोन एपिसोड पुर्वी त्या नाचात नितीन आणि आशुची आई पण सामील झाले. नाचाच्या नावाखाली इला भाटेंनी जे काही केलय त्याच काय वर्णन करू? एकदम २ अ स्टाइल!
अनिश नाचायला लागण्याची चिन्ह
अनिश नाचायला लागण्याची चिन्ह दिसली की मी टी व्हीवरून नजर हटवतो त्यामुळे हे हुकलं.
बरं. अमेरिकेत एकटं राहायला लागल्याने बेड टीची सवय कशी लागू शकते? बेडशेजारी चहाचं मशीन की रात्री झोपताना चहा करून थर्मास मध्ये भरून तो कुशीत घेऊन झोपायचा?
<<<<<बरं. अमेरिकेत एकटं
<<<<<बरं. अमेरिकेत एकटं राहायला लागल्याने बेड टीची सवय कशी लागू शकते? बेडशेजारी चहाचं मशीन की रात्री झोपताना चहा करून थर्मास मध्ये भरून तो कुशीत घेऊन झोपायचा?>>>>>
पाॅइंट आहे. काहिही चाललंय सध्या.
आजचा भाग पण लै भारी
आजचा भाग पण लै भारी स्टुपिडिटी.
प्रेस कांड परत एकदा घडवून आणले अन्रुध्हाने. तरी कोणास संशय कसा तो नाही़ कांची किती निष्पाप गं बाई. अभी आग पाखडायचे काम करतो.
अप्पा उगीचच लग्नात लुड बुड करून फुटेज खात आहे. खरेतर केळकर फॅमिलीने मस्त गोव्यात डेस्टिनेशन वेडिन्ग करुन परत यायचे ना पण नाही. इदरिच मरनेका है.
अरु आज फार इर्विण अॅक्टिन्ग केलेली आहे. मला लागलेय. ( अन्या बेंड एड आणून देतो!!!! ) तो तिला परत रेटून सांगतो लग्न करणे चुकीचे आहे. अरु एकदम व्हल्नरेबल हिर्वीण अॅक्टिन्ग. मग अन्या गेल्यावर लगेच गुलाबी शर्ट घालुन आशू हजर. हा गेला नि तो आला. व पार्कातच
मिठी प्रकरण. त्यात चेहर्या खाली अंमळ गादी वाढली आहे. कुठे गेले ते पाकीट पत्रकार!!! चांगली आंबट स्टोरी मिळा ली असती ना. मग आशू तिचे रडणे ऐकून तिला घरी घेउन एतो इथे इबा लाडे ला डे. अनुश्का लाडे लाडे( हिला आता हाकलून द्यायला हवे.) नितीन अॅक्षन मोड मध्ये.
लगेच अप्पा यश इश पण येतात. सर्व तिला विचारतात लग्न पुढे न्याय्चे का नाही. पण ती फुटेज खाउन हो म्हणते. आशूच्या श्रिंगार गृहात शनी
मंगळ लुडो खेळत बसले आहेत.
ही लिटरली डोक्यावर पडलेली आहे. पण छान साडी आहे व आशू अरु जवळी क वाढलेली दिसली. बुढापे की शादी.
अरुने होकाराची मान डोलावली
अरुने होकाराची मान डोलावली तेव्हा इभा चा जीव भांड्यात पडला.
फारच भोळी आहे अरु , समोरचा जे बोलेल ते सगळं पटतं तिला. आज अन्याचं पण पटण्याचा अभिनय केला तिने. स्वतः आशुने तिला लग्नासाठी विचारलं तरी अन्या भडकवत असताना तिला जणू पटत होतं की ती मधे आल्ये अनुष्का आशु च्या.
आशुबाळ शाळेत बक्षीस
आशुबाळ शाळेत बक्षीस मिळाल्याचं घरी सांगायचा नाही, बक्षीस समारंभ चुकवण्यासाठी शाळेला दांडी मारायचा कारण घरच्यांच्या अपेक्षा फार वाढवायच्या नाहीत, पहिला नंबर हुकलेल्या मुलांना वाईट वाटतं , इ.इ. ही कारणं आचरट आहेतच.
पण अरे बाळा, मग अशा स्पर्धेत भाग घ्यायचा नाही किंवा अक्षा परीक्षाच द्यायच्या नाहीत. दिला तर पेपर पूर्ण सोडवायचा नाही. मुद्दाम चुका करायच्या.
अनिरुद्धचं कॅरॅक्टर अगदीच घसरलेलं दाखवलंय. त्याचं वागणं डोक्यात जातं असं मिलिंद गवळीने म्हटल्याचं वाचलं.
एखाद्या व्यक्तीबद्दल बातमी
एखाद्या व्यक्तीबद्दल बातमी छापताना / करताना तिला विचारून तिची बाजू मांडायची संधी देऊन मगच बातमी प्रकाशित करावी असा संकेत अजूनतरी बरीच वृत्तपत्रे पाळताना दिसतात. अरुंधतीबद्दल जी बातमी छापली असं दाखवलं ती टॅब्लॉइड दर्जाची होती. टीव्ही नुज चॅनेलने दाखवली असती तर एक वेळ मानलं असतं कारण तिथे हा प्रकार दिसतो.
यानिमित्ताने देशमुखांकडे बातमीदार /पापराझ्झी आणि सेलिब्रिटी यांच्यावर एक मिनि परिसंवाद झडला.
डोक्याला मार लागलेल्या अरुंधतीला आशुतोष दिसल्यावर तिने त्याचे नाव स्लो मोशनमध्ये घेतले!
तो सो कॉल्ड गॉसिप प्रकार
तो सो कॉल्ड गॉसिप प्रकार फारच फ्लॉप होता. अनिरुध्द ने च हे केलय हे जवळपास प्रत्येकाने बोलुन दाखवल. मला वाटल होत ह्या सगळ्याच प्रयोजन अभिषेक च मतपरिवर्तन होण्यासाठि होत कारण कांचन ने त्यावेळिच ति अनिरुध्द गटाशि एकनिष्ठ आहे हे ताबडतोप जाहिर केल. पण तसहि काहि झाल नाहि. जी गोष्ट इतर लोकांना कळु नये अस आपल्याला वाटत तिच गोष्ट आपल्या वडिलांनि तिखट मीठ लावुन सगळ्यांना सांगितली ह्याने अभि ला ढीम्म काहि फरक पडला नाहि. मग यश आणि इशा ने मन वळवल त्याचाहि बहुदा काहिच फरक पडला नाहि कारण 'पुढल्या भागात' तो परत अनघावर करवादताना दाखला आहे.
<<<<डोक्याला मार लागलेल्या अरुंधतीला आशुतोष दिसल्यावर तिने त्याचे नाव स्लो मोशनमध्ये घेतले!>>>> हो तो फारच कॉमेडी प्रकार होता. मला वाटल आता हिची याददाश्त वगैरे जाते का काय. पण लेखिका दयाळु आहे!
इशा आणि कांचन ह्या 'टँट्रम ट्वीन्स' असल्याने इशा ला अरु चा निर्णय पटल्याने आता लवकरच कांचन ला तो पटणार अशि चिन्ह दिसताहेत.
बाकि अमा आज अनिरुध्द आणि आशुतोष मधिल संवाद द्वंद्व (जे दमदार वाटण्यासाठी बॅक्ग्राउंड म्युझिशिअन ला मेहेनत करावी लागली) बघताना मला तुमचि फार फार आठवण आलि. त्या बिचार्याच्या मेहनतीला योग्य न्याय तुम्हिच देउ शकता.
बाकि अमा आज अनिरुध्द आणि
बाकि अमा आज अनिरुध्द आणि आशुतोष मधिल संवाद द्वंद्व (जे दमदार वाटण्यासाठी बॅक्ग्राउंड म्युझिशिअन ला मेहेनत करावी लागली) बघताना मला तुमचि फार फार आठवण आलि. त्या बिचार्याच्या मेहनतीला योग्य न्याय तुम्हिच देउ शकता.>>> अरे हो हो हो. खरे च. त्यातही विनोदी म्हण जे सर्वांनी पोपटी कलर मधील शेड घातल्या होत्या. जितके कलर को ऑर्ड कपडे तितका सीन स्टुपिड होत जातो हे सिरीअल च्या अधिनियम १८४ नुसार आहे.
आज तर इशा व स्टुपिड गँग पण आशूच्या घरी प्लॅनिन्ग करायला. आशू फॅमिली खरेचश्रींमंत नाही आहे का? एका प्रोफेशनल प्लानर ला देता येत नाही का काँत्रॅक्ट. घरी अजून दोन भाग आहेतच. आजीला अरू कसे हातात खाणे आनून देत असे ते आठवले व त्या नादात दुधावर गरम ताटलीला हात लागुन भाजवून घेतले. असे कोन दूध तापवते? असेल बुढ्ढीचे काही नियम पूर्ण सीन संपे परेन्त ते दूध तसेच होते उतू गेले नाही.
बाहेर अभी अन्या उतू गेले
बाकि अमा आज अनिरुध्द आणि
बाकि अमा आज अनिरुध्द आणि आशुतोष मधिल संवाद द्वंद्व (जे दमदार वाटण्यासाठी बॅक्ग्राउंड म्युझिशिअन ला मेहेनत करावी लागली) बघताना मला तुमचि फार फार आठवण आलि. त्या बिचार्याच्या मेहनतीला योग्य न्याय तुम्हिच देउ शकता.>>> अरे हो हो हो. खरे च. त्यातही विनोदी म्हण जे सर्वांनी पोपटी कलर मधील शेड घातल्या होत्या. जितके कलर को ऑर्ड कपडे तितका सीन स्टुपिड होत जातो हे सिरीअल च्या अधिनियम १८४ नुसार आहे.
आज तर इशा व स्टुपिड गँग पण आशूच्या घरी प्लॅनिन्ग करायला. आशू फॅमिली खरेचश्रींमंत नाही आहे का? एका प्रोफेशनल प्लानर ला देता येत नाही का काँत्रॅक्ट. घरी अजून दोन भाग आहेतच. आजीला अरू कसे हातात खाणे आनून देत असे ते आठवले व त्या नादात दुधावर गरम ताटलीला हात लागुन भाजवून घेतले. असे कोन दूध तापवते? असेल बुढ्ढीचे काही नियम पूर्ण सीन संपे परेन्त ते दूध तसेच होते उतू गेले नाही.
बाहेर अभी अन्या उतू गेले
अभिषेक- अन्घाच्या लग्नाआधी
अभिषेक- अन्घाच्या लग्नाआधी अन्घाचा एक्स नवरा जसा वागत होता तसाच अनिरुद्ध आता वागतोय.
रिपोर्टर्सना खोटीनाटी माहिती देऊन आग लावण्याचा प्रकार आपल्या बाळाने केला हे समजूनही कांचनच्या डोळ्यावरचे कातडे निघत नाही.
अविनाश भावजी लग्नाला तरी येणार आहेत की नाही?
आणी शेखर भाउ निखिल? आशूची
आणी शेखर भाउ निखिल? आशूची आज्जी पुण्यात असते ती? वर्शा जिगर ?
आशु ची आजी...यू मीन....चिकट
आशु ची आजी...यू मीन....चिकट गुळाची सासू?
तसे तर केदार, विमल, शेखर भाऊजी अविनाश भाऊजी, अरु ची ती मैत्रीण, ..लिस्ट लांब आहे...
गुळाची आई
गुळाची आई
मी बघायला लागल्यापासून एकदाही विशाखाची सासू आणि मुलगी दिसल्या नाही आहेत.
निदान ह्या लग्नात तरी वर्षाला आणावं लागेल.
येस..प्राजक्ता..मागे त्या
येस..प्राजक्ता..मागे त्या गेलेल्या एकदा...आईला बरे नव्हते म्हणुन !
होप..ती वीणा का कोण अचानक उगवून..परत लग्न लांबणीवर टाका म्हणणार नाही!!
आणि आशू अरु चे ते अलिबाग चे मित्र जोडपे....ज्यांच्यामुळे ह्यांना कळले. की कदाचित आपण एकमेकांवर प्रेम करतो....
त्यांनाही बोलवावे लागेल ना..
तसं तर आशुच लग्न अंबानी नाही
तसं तर आशुच लग्न अंबानी नाही गेला बाजार मराठी अभिनेत्याच्या तोडीचं तरी होयला हवं पण हाय रे कर्मा , अरुची सगळ्याला नकारघंटा आणि देशमुख घरात मांडव घालून लग्न
बहुतेक अभिला विस्मरणाचा आजार जडलाय , तो सारखा विसरत असतो की बायको विरुद्ध पार्टीत आहे.
Their memory is rebooted
Their memory is rebooted every night. Otherwise once divorce is final one should go on a 8 day Goa trip or Bangkok trip. And then just live your own life. Why see these nutters ever again.
देशमुख आणि मंडळींच्या अचाट
देशमुख आणि मंडळींच्या अचाट आणि अतर्क्य वागण्यामुळे इथे सगळे हतबुद्ध अवस्थेत आहेत का? मी पण आहे.
एकाच वकिलाने आधी कोर्टात वादी कडुन आणि मग प्रतिवादी कडुन युक्तिवाद करावा तशी 'ऍंटिअरु टीम' कडुन डेब्यु करुन आता संजना अरु ची प्रायमरी पाठराखिण बनली आहे. त्या दोघी म्हणे आता मैत्रिणी असणार आहेत इथुन पुढे. तिनेही अरु ला केळवण/व्याही भोजनाच्या आदले दिवशी आशुतोष च्या वागण्यासंबंधी काही गोष्टी क्लिअर करुन घेण्याचा सल्ला दिला. सामान्य पणे ज्या गोष्टी लग्नाचा विचार करताना किंवा ठरवण्याआधी डिस्कस केल्या जातात त्यांचा हे लोक आधी लग्न ठरवुन मग अंतरपाट दुर होत पर्यंत किस काढत बसणार असं दिसतंय.
बाकी इतर पीळ मागील पानावरून पुढे चालूच. वरती सगळ्यांनी व्यक्त केलेल्या वैतागाची समरी खालील प्रमाणे:
श्रीमंत, प्रसिद्ध इ. इ. केळकरांच्या घरच्या बर्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार्या लग्नाच प्लानिंग इशा करणार आहे आणि एग्झेक्युशन टीम मध्ये उर्सेकर आजींचा नातु तसेच काॅलेज आणि काॅलनीत दोन्ही कडे इशाची मैत्रीण असुन जिचं साधं नावही प्रेक्षकांना माहिती नाही ती मुलगी! लग्न आहे का ह्यांच्या सोसायटी चा सार्वजनिक गणेशोत्सव?
एकंदर नितीन हे (मेष)पात्र आशुतोष केळकर च्या तोडिस तोड मंद आहे. त्याने अल्बम रिलीज च्या वेळी अनिरुद्ध ने केलेल्या स्टंट मुळे लिगल ऍक्शन च्या दिलेल्या वॉर्निंग ला अजीबात भीक न घालता अनिरुद्ध ने परत पत्रकारांना गॉसिप सप्लाय केलं तरी हा काही करु शकला नाही आणि इतके दिवस जे लग्न ठराव म्हणून प्रयत्न करत होता त्या लग्नाच प्लानिंग करायला ह्याला यश इशा आणि त्यांचे मित्रमंडळ ह्यांची मदत घ्यावी लागतेय!
काॅलनितल्या लोकांनी पुढाकार घेऊन होणार्या केळवणाच प्लानिंग करायला 'प्रो अरु टिम' आणि त्याला विरोध करायला 'ऍंटि अरु टीम' बिझी आहेत. पण एका हाकेच्या अंतरावर असण्याचा दावा करणारे अरुचे सो कॉल्ड राखीबंधु केदार, अविनाश आणि शेखर गायब आहेत ह्याच अरु सकट कुणालाच काही सोयर सुतक नाही.
तीच गत केळकरांची. जिच्या आठवणीत सुलेखा-आशु ह्या जोडगोळिने मध्यंतरी अश्रु ढाळले ती वीणा आणि अनिश चे आई वडील लग्नात उपस्थित असतील अशी व्यवस्था कुणालाच करावी वाटत नाहीये.
अजब लग्नाची गजब कहाणी बघतोय आपण सध्या. आधी ते ठरता ठरत नव्हते आणि आता ठरलय तर त्यात उपस्थित रहाण्यातही कुणाला स्वारस्य नाही. धन्य ह्यांची नाती आणि ह्यांच त्या नात्यांना जपणं.
Pages