पाऊले चालती फिटनेसची वाट|

Submitted by कृष्णा on 31 January, 2023 - 03:58

आज वाड्यातल्या गप्पांमध्ये फिटनेस साठी किती पावलं कोण चालते ह्यावर चर्चा सुरु असताना सुचलेले.
दत्ता पाटील यांनी लिहलेल्या, मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या 'पाऊले चालती पंढरीची वाट' ह्या अजरामर गीताचा आधार घेऊन रचलेले विडंबन.

शब्द तितकेसे जमले नसतील पण लिहले. Happy

पाऊले चालती फिटनेसची वाट |
साखर झोपेची तोडूनिया गाठ ||

वाढले हे पोट अती खाऊनिया
वाढले हे पोट अती खाऊनिया
तरी भरीतसे मिष्टान्नाने ताट ||

पाऊले चालती फिटनेसची वाट|

आप्त इष्ट खाण्या आग्रह करीती
आप्त इष्ट खाण्या आग्रह करीती
तब्येतीची तुम्ही लावता हो वाट

पाऊले चालती फिटनेसची वाट|

करीता संकल्प निरोगी तनाचा
करीता संकल्प निरोगी तनाचा
मनी निश्चयाचा घालती घाट|

पाऊले चालती फिटनेसची वाट|

फिरणे सुरु होता सुखी होई जीव
फिरणे सुरु होता सुखी होई जीव
अवघ्या कायेचा होई हो पालट|

पाऊले चालती फिटनेसची वाट|

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol छान लिहिलेय.

धन्यवाद सर्वांना! Happy

ह्या विडंबनाचे श्रेय मानव यांचे. त्यांनी लक्षात आणून दिले आणि लगेच पूर्ण केले. Happy

भारी!

मस्त जमलंय! Proud
हे एक गाणं एकदा ऐकलं की लूप मध्ये डोक्यात सुरू कॅटेगरी आहे. साधं आहे खरंतर पण डोक्यातून जायला जालिम काहीतरी ऐकावं लागतं इतकं डोक्यात बसतं.

छान

Back to top