मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतं आहे पुस्तक. वाचायला पाहिजे.

रच्याकने, मी तुमचे काही काही व्हिडीयो पाहिले आहेत. इथे दरवेळी लिहिलं जात नाही पण छान असतात. तुम्ही सगळं निवेदन आधी लिहून घेता का? ते खूप सोप्या भाषेतलं आणि गप्पा मारल्या सारखं वाटतं. अर्थात ते तसं वाटतं म्हणजे त्यामागे बरेच कष्ट असतील म्हणून हा प्रश्न. Happy
तसच तुम्ही पुस्तकांची निवड कशी करता ते ही जाणून घ्यायला आवडेल.

खटकलेल्या एक दोन गोष्टी म्हणजे काही काही ठिकाणी उगीच इंग्रजी शब्द येतात आणि बर्‍याचदा ते टाळता येण्यासारखे असतात. अर्थात गप्पा मारल्यासारखं वाटावं म्हणून ते तसेच ठेवले असतील तर माहित नाही Wink आणि दुसरं म्हणजे काही काही ठिकाणी पार्श्वसंगीत जरा विजोड आणि जोरात वाटतं.

मादाम क्युरी म्हंटलं की पहिली गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे रेडीयम पण मादाम क्युरीवरच्या ह्या १० मिनिटांच्या व्हिडीयोत रेडीयमच्या पहिला उल्लेख तब्बल आठव्या मिनिटाला आला आहे !! Happy

किती तपशीलवार प्रतिसाद दिला आहात पराग! आधी त्यासाठी आभार मानते. स्मित:
तुमचा अंदाज बरोबर. गप्पा मारल्यासारखं किंवा जरा तरी युवावर्गासाठी जवळचं (अर्थात हा सल्ला परिचित युवावर्गानं चॅनेल सुरू करण्यापूर्वी दिलेला) वाटायला हवं म्हणून अधूनमधून इंग्रजी बोललं जातं. (याचा अपेक्षित परिणाम अजून माझ्यापर्यंत तरी आलेला नाहीये ) ही रिक्षा नाहीये पण एक संदर्भ म्हणून सांगतेय. आपण माझ्या आज्ञापत्र व्हिडिओ मध्ये व्याख्यान लिंक पाहावी जमल्यास. मला खास(ओळखलं असेलच कुणाकडून ते. ) Wink Wink सांगण्यात आलं होतं की "यूट्युबवर हे व्याख्यान होणार नाहीये तर पुस्तकाची ओळख असणारे.."
पार्श्वसंगीताबाबत सूचना जरूर लक्षात घेईन. धन्यवाद.
आणि रेडिअम निरीक्षण भारीये तुमचं. Bw
पुस्तकाच्या घटनाक्रमाच्या ओघात तसं झालं असावं बहुतेक.
एकंदर आपल्या प्रतिसादामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आहेत. ::) :-

छान आहेत परिचय !! यातील काही पुस्तके लायब्ररी मध्ये होती , पण वाचली नव्हती आधी , तुमच्यामुळे ओळख झाली यांची !
वर पराग यांच्या प्रतिसादा वर तुम्ही दिलेले उत्तर वाचले , पण वाचण्याऐवजी तुम्ही ते व्हिडिओ मध्ये जसे बोलता तसेच ऐकू आले

प्राची आज तुमचे चैनल बघितले. किती ओघवती भाषा आणि स्पष्ट उच्चार. पुस्तकांचे सिलेक्शन पण उत्तम आहे. हे बघायचे राहून गेले होते. काचेपलीकडचे जग या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिळवून वाचेन हे पुस्तक. इतर हि व्हिडियोज बघायचे आहेत.
उपक्रमासाठी शुभेच्छा

जरूर पहावा सामो. तुझ्या उत्फुल्ल प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
आजच्या व्हिडिओ ची लिंक

https://youtu.be/IW_8n54dwXc
भारतीय भूसेना दिवस १५ जानेवारी निमित्ताने

"एका युद्धकैद्याची बखर" ची ओळख ऐकली. जबरदस्त आहे. तुझा प्रेझेन्स खूप अदबशीर व असा डिसेन्ट आहे ग. छान कॅरी करतेस.

निवृत्त न्यायाधीश आणि म. सा.सं.चे अध्यक्षपद भूषविलेल्या नरेन्द्र चपळगावकर यांच्या पुस्तकाची ओळख
https://youtu.be/ROoOc91in1w
न्यायाच्या गोष्टी.

Pages

Back to top