कांतारा: एका आदिम संघर्षाची कहाणी चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 6 November, 2022 - 08:43

होंबाळे फिल्म्स चा कांतारा चित्रपट आज चित्रपटगृहात जाउन बघितला. ही कलाकृती मोठ्या पडद्यावर व उत्तम थिएटर साउंड मध्ये बघण्यासाठीच बनवली आहे. चित्रपटाची भरपूरच प्रसिद्धी व माहिती जालावर आहे. तथापि हा अनुभव व्यक्तिसापेक्ष आहे. लेखक दिग्दर्शक ऋषभ शेट्टी ह्यांनी अगदी अस्सल दक्षिणी मातीतली एक कहाणी संपूर्ण पणे आपल्या समोर सादर केलेली आहे. एक नितांत सुंदर अनुभव. चित्रपट बघून गोड गुलाबी प्रेमळ वलय वगैरे निर्माण होत नाही पण एक प्रकारचे आंतरिक समाधान नक्की मिळते.

तुळू नाडू म्हणजे दक्षिण कन्नडा, उडिपी हे कर्नाटका तील भाग व कासारगौड हा केरळातील भाग तुळु नाडू म्हणून ओळखला जातो. शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, व रुपसुं दरी ऐश्वर्या ह्यांची 'नेटिव्ह प्लेस.' येथील एका जंगलाच्या संरक्षणाची, त्यात राहणा र्‍या मूल निवासी लोकांची त्या जमिनीवर हक्क सांगणार्‍या दमन कर्मी व्यवस्थेची ही कथा आहे. मूलनिवासी लोकां चे जीवनच त्या जंगलावर अवलंबून आहे. ते फक्त तिथे राहतात व गरजे पुरतेच घेतात. परंतु नवीन आलेल्या व्यवस्थेनुसार ह्या जंगलाला राखीव घोषि त करायचे म्हणून आलेला अधिकारी जागेवर हक्क सांगू पाह णारा उच्चवर्णीय स्वार्थी जमीन दार व खेड्यातच राहणार्या जन्मलेल्या लोकांचा आपल्या जीवनासाठीचा संघर्ष चित्रपटात प्रभावी पणे दाखवला आहे.
जमीनदारातर्फे नागवल्या गेलेल्या जनतेच्या हिता साठी एक दैवी शक्ती उभी राहते. तिच्या सोबत क्षेत्रपाल दिक्पालही आहेत. जे दैवा व गुलिगा नावाने येतात.

शिवा हे मुख्य पात्र ऋषभ शेट्टी अक्षरशः जगला आहे. रासवट, जमीनदाराची काहीही कामे करुन देणारा , व्यसनी, तामसी प्रवृत्तीचा नायक त्याने उत्तम रेखाटला आहे व त्याच्या स्वभावातले अनेक कंगोरे सहज दाखवले आहेत. चित्रपटाचा शेवट तर थक्क करून सोडतो. कंबाला - म्हशींची शर्यत - हा सीन जरूर बघा. थ्रीडी नसले तरीही नदीतले मातकट पाणी आपल्यावर उडते कि काय असे वाट्ते . पुढील मारामारीचे प्रसंग सुद्धा त्याने लिलया पेलले आहेत. शिवाचे कैलासा म्हणून एक् ट्री हाउस आहे ते मला फार आव्डले. शिवाचे एक स्वभाव वैशि ष्ट्य म्हणजे बंडखोर पणा.

ह्याचा भाउ गुरवा हे चित्रपटा ता ले एक सुस्वभावी पात्र. सहज विश्वास टाकणारे, जीवनात नशीबी आलेले भोग पत्करुन तक्रार न करता खालमानेने जगणारे लोक असतात त्यातला एक. हा वंश परंपरागत आलेला भूत कोला दर वर्षी नाचवत असतो.

विधवा आई सर्वत्र सारखीच. ह्या रांगड्या बैलांना ती झोडपूनच रांगेत ठेवत असते. कायम कावलेली व त्रासलेली.

फॉरेस्ट ऑफिसर मुरली हे पात्र शिवा इतकेच रंगत दार रचले आहे. एकटाच पोस्टिंग वर राहणारा अधिकारी. वन वाचवायचे त्याचे प्रयत्न. खेडेगावातील लोकांचा हुच्च पणा. अनेक वाद होउन शेवटी हा शिवाच्या बरोबरीने टीम उभारतो.

जमी न दारही जगभर असे आहे रे वर्गातले लोक असतात तसाच आहे आतून कृर जनते बदल थोडीही सह अनुभूती नसलेला, स्वार्थी, बाईबाज
जातिवादी व ढोंगी. गोड बोलुन नुकसान करणारे असतात त्यातला हा व्यक्ति. निळ्या चिमणीच्या मालकाची च आठवण आली मला तर ह्याला बघुन. अश्या लोकांची पापे त्यांच्या संततीला भोगावी लागतात ह्या देशी समजातून ह्याचा मुलगा मनोदुर्बल दाखवला आहे. ते बघून वाइट वाट्ते. बिचारे पोर. जमीनदाराची बायको सर्व बघुन गप्प.नवरा परस्त्रीला भेटायला चालल्यावर शिवाच्या हातात टॉर्च देणारी.

चित्रपटातील कोणतीही स्त्री बंड करून उठत नाही. सर्व कामाने पिचलेल्या, गप्प बसलेल्या, नायिका पण मेहनतीने ट्रेनिन्ग पूर्ण करुन आलेली गार्ड बनलेली व नोकरी करणारी पण जमीन दार हिला ही वापरून घेत अस्तो कारण वशिल्याने नोकरी मिळवून दिली. त्यामुळे हिचा बॉस हिला कमी लेखत अस्तो. ( हिला दोन्हीकडून शिव्या बसतात पण तिची बाजू कोणीही समजून घेत नाही.) हिचे व शिवाचे सीन्स फार क्युट आहेत.
शिवा तिला मासे आणून कोर्ट करतो. दोघे काही करत असतात व घरचे लोक येतात तर शिवा नारळ खोवत साळसूद पणे बसलेला असतो. हे चित्रप टातले थोडे हलके क्षण आहेत. ही पारंपारिक मुलगी व स्त्रीच दाखविली आहे. तुलने साठी न्युटन सिनेमातील इलेक्षन अधिकारी मुलगी बघा. एकदम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ,सुशिक्षित . दोघी भारतीयच.

चित्रपटाची कथा व त्यासाठी केलेले संशोधन, संवाद एकदम उच्च कोटीचे आहे. व ते पूर्ण चित्रपटात दिसते. भूतकोलाचा ड्रेस व दागिने हेच एक स्वतंत्र प्रकरण आहे. ह्यावर एक डॉक्युमेंतरी तो बनता है.

अरविंद एस कामत ह्यांनी केलेले चित्रिकर ण नेत्र सुखद आहे. रात्रीच्या शॉट्स मध्ये सुद्धा जंगल आपली जादुई क्वालिटी राखुन ठेवते.
क्लायमॅक्स मध्ये घेतलेले शॉट्स रजनीकांतची आठवण करुन देतात पण शिवा आपल्या बल्क व अ‍ॅग्रेसिव पणे तारून नेतो तो पहिल्यापासूनच तसा दाखवला आहे. बी अजनीश लोक नाथ ह्यांचे संगीत मस्त आहे. वराह रूपम आपण ऐकलेच असेल एव्हाना . इतर गाणीही छान आहेत.
वराह रूपम ला चांगला रॉक बेस आहे व पुढे एक चांगली गिटार रिफ कि कायती टाकली आहे. थेटरात जायचे कारण म्हणजे पार्श्वसंगीत. हे तिथेच अनुभवायची बाब आहे. एकदम अंगावर काटा येतो काही क्षणी. चित्रपटात क्रिटिकल क्षणी मूळचे कन्नडा संवादच ठेवले आहेत. हे एकदम पैसा वसूल आहे. शिवाय पांजुर्लीची ती किंकाळी जबरी ऐकू येते. पण संगीत नुसतेच लाउड नाही आहे. साउंड डिझाइन पक्के केले आहे.
सर्व ओरि जिनल साउंड ट्रॅक स्पॉटिफाय प्रिमीअम वर उपलब्ध आहे. चांगले हेडफोन किंवा म्युझिक सिस्टिम वर बाहेर नक्की ऐका. अमेरिकेतला शेजारी नक्की बाहेर येउन बेल दाबेल.

खेडेगावातील जातीय उतरंड, स्नेह संबंध, गरीबांना पायाखालीच ठेचण्याचा व त्यांचा पूर्ण फायदा करून त्यांना नामशेष करून टाकायचा प्रस्थापित वर्गाचा प्रयत्न दाखवला आहे हे सिनेमाचे यश. चित्र पटाचा शेवट पॉझिटिव्ह दाखवला आहे व तोक्षण बघताना भरून येते. एक अस्सल भारतीय मातीतला सिनेमा म्हणून ह्याला रेझोनन्स भेटला आहे हेच त्याच्या यशाचे गमक. माझ्या तर्फे साडेपाच स्टार्स.

========================================================================================
अवांतर व्हिवीआना मॉल ठाणे येथील व्हीआयपी थिएटर व्यव स्था चांगली आहे. उत्तमच. तिथे गेल्यावर मेन्यू हातात ठेवतात. व तुम्ही चित्रपट बघत असताना सर्व्ह करतात. आम्ही मागील वेळी ग्रीक सलाड, मोमोज, ह्यावेळी एक हॉटडॉग व एक चायनीज राइस बोल, कॅफे फ्रापे घेतले होते. कोक पण उपलब्ध आहे. स्टाफ एकदम विनम्र हात जोडूनच बोलतो. खुर्च्या दोन दोन च्या सेट मध्ये व एकेका साइडला लँप शेड. अन्न ठेवायला ट्रेटेबल, पाणी काँप्लिमेंटरी( फुकट) एक वेट वाइप व टिशूज मिळते. मी ह्यावेळी शोधून( शेल्डन सारखी )बेस्ट सीट निवडली होती
शेजारच्या लोका नी तुम्ही मागे बसाल का विचारल्यावर नाही सांगितले. पण ह्या मुळे मला सर्वात बेस्ट अनुभव मिळाला. एफ रो ५. सीट घ्या शक्यतो. आस्च्रर्य म्हणजे एक लोड सारखे ठेवले होते त्यावर ब्लँकेट असे लिहिले होते व आत खरेच ड्राय क्लीन केलेले मौ ब्लॅके ट होते. मी थंडी वाजलीतर म्हणून ब्यागेतुन माझे डोक्याला बांधायचे चिरगुट नेले होते पण त्या ममव पणा ची गरज पडली नाही. तापमान जस्ट राइट होते. व समोर टेस्टो स्टेरोन - एड्रेनलीन मिश्रीत खेळ बघून थंडी विसरुनच जाता तुम्ही. शेवटचा अर्धा तास तर फिल्म इज फायरिन्ग ऑन ऑल
सिलिंडर्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिनटिन +१
मला मुळात साउथचे हिरो फारसे आवडत नाहित (प्रभास बाहुबलि अपवाद)कळकट्ट वाटत राहतात, तसेच मुव्हिज पण थोडे कळकट मळकटच असतात, पुष्पाही थोडा तसाच होता.. पण निदान पुष्पा यन्ग तरी दिसतो इथे हा शिवा २ टीनेज पोराचा बाप वाटावा असा दिसतो त्यामुळे तो रोमान्स अ‍ॅन्गल वैगरे अगदी टिपिकल साउथ मुव्हिज सारखा लाउड आहे.
बा़की जन्गलाचे चित्रीकरण ,भुत कोला, त्याच सगळ रुप मेकप वैगरे जबरदस्त खरतर त्याच चित्रीकरण अजुन दाख्वायला हव होत. मला शेवट थोडा घाबरवणारा असेल अस वाटल पण तसा होत नाही खर सान्गायच तर ते वॉव वॉव नकोच होते, (आम्ही ९०ज किड असल्याने वॉव म्हटल की उगाच सैफु आठवतो).

मला मुळात साउथचे हिरो फारसे आवडत नाहित (प्रभास बाहुबलि अपवाद)कळकट्ट वाटत राहतात, तसेच मुव्हिज पण थोडे कळकट मळकटच असतात>> तो अपर कास्ट ब्राम्हण नाही. डज धिस अफेक्ट युअर सेन्स ऑफ प्रिविलेज? ही सवर्ण नसलेल्या लोकांची कथा आहे. काळसर त्व च्या असलेल्या लोकांच्या जीवनात पण प्रेम देव श्रद्धा असते. ते दाखवले आहे.

स्वच्छ व्हायला त्यांना पुरेसे पाणी पण मिळत नाही. पब्लिक नळावरुन पाणी प्याले तर नळ गोमुत्राने धुवुन घेणारी जनता आहे देशात. साउथ चे हिरो गोरे पान नसतात म्हणून आवडत नाहीत का? प्रभासला डिजिटली गोरे करण्यात आहे आहे.

मला साऊथ च्या हिरोज चं एक कौतुक युक्त आश्चर्य वाटतं.अगदी बारीक,सिंहकटी, हलके वगैरे दिसत नसून, बॉडी वेट असूनही ते बऱ्याच स्वतःचं वजन तोलण्याशी संबंधित हालचाली सॉलिड करतात.
इथला हिरो छतावर सरसर चढतो, rrr मध्ये ते जे काही डबल कोलांटी उडी दाखवली आहे ती.
यामागे बराच वर्कआउट आणि सराव असावा.

अमा, तो हिरो खरच २ पोरांचा बाप वाटतो, मला त्याची प्रेमकथा बघण्यात हरकत नाही, पण तो थोडा तरुण असता तर मला बरं वाटलं असतं.
आणि हे ब्राम्हण वैगरे अगदीच उगाच वाटले.

आदिवासींचे थोडे नेगेटिव्ह चित्रण आहे . सतत दारू, व्यसन करणारे , स्त्रीलंपट , डोक्यात कायम राग घालणारे, असेच दाखवले आहेत .
>>>>>

+७८६
मलाही याचमुळे तो हिरो आवडला नाही. किंबहुना त्याला हिरो म्हणून दाखवले हे आवडले नाही.

वरील चर्चेचा संदर्भ घेऊन सांगायचे झाल्यास माणूस त्याच्या रंगाने/सौंदर्याने/वर्णाने नाही तर त्याच्या वर्तनाने आवडीचा वा नावडीचा होतो. मी चित्रपट बघताना नकळत नायकाच्या जागी स्वत:ला ठेवत असतो. आणि लव्ह ॲंगल असेल तर नायिके जागी माझ्याच प्रेयसीला बघत असतो. त्यामुळे चित्रपटात असे काही दाखवलेले मला रुचत नाही.

शाहरूख आवडण्यामागेही कुठेतरी हेच कारण आहे. शाहरूखची पडद्यावरची जी हिरोची प्रतिमा आहे ती मला आवडते. मला स्वत:ला त्यात शाहरूखच्या जागी बघायला आवडते. मला प्रत्यक्ष आयुष्यात कुठल्या मुलीशी रोमान्स करायला आवडेल तर तो शाहरूख स्टाईलनेच. अशी कंबरेला चिमटे घ्यायची स्टाईल नाही.

एखाद्या डर वा अंजाम चित्रपटात शाहरूख सायको प्रेमी दाखवला आहे. पण त्यात तो हिरो म्हणून नाहीये. त्यामुळे जे चूक आहे ते चूक आहे हा संदेश क्लीअर जातो. अगदी डीडीएलजेमध्येही त्याचा बीअर चोरायचा सीन आधी फनी दाखवला असला तरी नंतर ते चूकच होते हे मान्य केले आहे.

पण ईथे या चित्रपटात हिरोच्या वर्तनानंतर ते चूक आहे असे कुठेच म्हटले नाहीये. त्यामुळे ते एकप्रकारे अश्या हिरोगिरीचे समर्थन वाटते. साऊथच्या प्रेक्षकांना यात काही गैर वाटत नसेल तर त्यांचे विचार त्यांना लखलाभ. पण हा चुकीचा पायंडा ईथे पडायला नको ईतकीच ईच्छा.

कंतारा प्राईम वर आलाय.पण हिंदी ऑडिओ नाहीये.4 जिलब्या भाषा मध्ये ऑडिओ उपलब्ध. सबटायटल इंग्लिश.
त्यामुळे ज्यांना बघायचा होता त्यांनी पाहिला नाही.
वराह रुपम कॉपी राईट मुळे काढलंय.त्याच्या जागी आणि एक रिमिक्स वराह रुपम आहे तेही तसं चांगलं वाटेल
ज्याच्या वरून कॉपी राईट वाद आहे ते मूळ गाणं ऐकलं आणि पाहिलं.खूप रडले.

फा चा प्रतिसाद वाचून खूप बर वाटल. मला वाटल की माझ्याच मेंदूत chemical लोच्या आहे की काय. कारण पुष्पाप्रमाणे हा ही चित्रपट सर्वसाधारण वाटला. इतका की बघितला नसता तरी काहीच फरक पडला नसता. टिपिकल भडक साऊथ सिनेमा आहे. आदिवासींवर होणार्‍या जाचाचे "जय भीम" मधील चित्रीकरण वास्तववादी आणि अंगावर येणारे आहे. चित्रपटात नेहमीचाच साऊथी अभिनय आणि कथा वाटली.

तसेच जंगल आणि general photography ही मल्याळी चित्रपटात जास्त छान आणि realistic असते. उदा: चुरुली, आमेन

मला आवडला कांतारा...मस्त आहे....जंगल, भूतकोला, त्याचा गेटअप फारच छान...
ऋषभ शेट्टी ने बरीच मेहनत घेतली आहे...

आनंद मोरे या नावाने कांतारा बद्दलचा त्यांचा लेख व्हॉट्स अ‍ॅप वर वाचला आहे. आता खूप मागे गेला असेल. कुणाकडे असेल तर द्या. लेख खूप सुंदर आहे. जास्त बारकावे आणि तपशील आहे.

आदिवासींवर होणार्‍या जाचाचे "जय भीम" मधील चित्रीकरण वास्तववादी आणि अंगावर येणारे आहे.
>>>>

हो अगदीच. जय भीम बघताना त्रास होत होता जीवाला.
यातला अन्यान अत्याचार भडक चित्रीकरणामुळे आणि हिरोच्याच गैरकृत्यांचे समर्थन/उदात्तीकरण केल्याने बिलकुल नाही पटत. मुळात भावना पोहोचतच नाहीत आत.

कांतारा नेटफ्लिक्सवर हिंदीत बघितला.
जेवढे कौतुक ऐकले, तेवढा खास नाही वाटला. रिषभ शेट्टी शिवाचे पात्र जगलायं. खरोखरचं शिवा वाटतो तो. रासवट, तामसी, मागचा-पुढचा विचार न करता पुढ्यात आलेले काम पैलवानी डोक्याने करून टाकणारा. त्याची तरूण आई व कोला-नर्तक बाबा आवडले. नंतरची आई वयाने त्याच्याएवढीच केस पांढरे केलेली बाई वाटली. काम तिचेही आवडले. वैताग खरा वाटतो तिचा. मित्रांचे काही काही विनोद आवडले. सर्वात उत्तम काम वन अधिकाऱ्याचे आहे. त्याची देहबोली सुद्धा फार apt आहे. त्याचं पात्र फार व्यवस्थित विकसित केलेले वाटले. त्यामानाने मित्रांचे व जमीनदाराचे तितके व्यवस्थित वाटले नाही. गुरवाचा चेहरा व वावर फार शांत आहे. छान वाटला. त्याला मारल्यावर खरोखरचं वाईट वाटले. जमीनदार आपापल्या भूमिकेत ठीक. त्याला शेवटी प्रवचन देताना शिवा म्हणतो 'आम्ही गरीब लोक कभी कभी तो हमें सुखी रोटी खाके गुजारा करना पडता है' माझ्या मनात आले सतत तर मटन, चिकन , डुक्कर, फिशकरी खाताना व स्कॉच पिताना दाखवलाय. उलट ओव्हरइटिंग झालेयं Proud

लीला बहुतेकवेळा गोंधळलेली वाटते, फार लो एनर्जी आहे, तिच्या गोडव्याचीही छाप पडत नाही. लव्ह स्टोरी गोड आहे पण कथेला खीळ बसवते, फक्त शेवटी कथेशी संलग्न वाटली. तोपर्यंत हे समांतर कथानक वाटत रहाते. गाणी आवडली नाहीत. हे कमी करून त्यांनी मूळ दंतकथेला अधिक फुटेज द्यायचे असते. कारण मी सतत दागिने घातलेल्या रानडुकराची वाट बघतेयं असं वाटू लागलं. जेव्हा जेव्हा पंजुर्लीची व राजाची गोष्टं, राजाची शांतीसाठीची तगमग, वराहरूपम् , कोला व ते कथकली सारखे नृत्यं होते, सिनेमा फार उच्च होऊन जातो. पण शिवा व वराहरूपम् हे कनेक्ट व्हायला फार वेळ लागला. मधेमधे तर पकड सुटली व संथही झाला. त्याने आधीच्या उच्च अनुभूतीचा प्रभाव टिकत नव्हता. मूळ कथा आध्यात्मिक वाटली. प्रत्येकाचा देव, श्रद्धास्थानं व पाळमुळं वेगवेगळी असतात. आपण तर प्राणीमात्रांत व निसर्गातही परमेश्वराचे अस्तित्व मानतो. त्यामुळे वराहरूपम् काय किंवा मच्छकच्छरूपम् काय दोन्ही तितकेच भावले असते. पण त्यावर फोकस ठेवायचा असता. 'वराहरूपम्' च्या प्रभावाबाहेरचा शिवा फक्त एक रँडम दाक्षिणात्य नायक म्हणूनच उरतो. उलट वनअधिकारी त्यापेक्षा कितीतरी स्वतंत्र व स्थिरबुद्धी वाटतो. शेवटचे सगळेच उच्च आहे, त्या आरोळ्या वगैरे निसर्गातल्या 'त्या'शी जोडणारा अनुभव !!! सुरवातीची व शेवटची वीस मिनिटे , मधले काही तुकडे व म्हशींची शर्यत आवडली. अगदी सुरूवातीच्या राजाच्या गोष्टीने 'चांदोबा'तल्या गोष्टी आठवल्या.

तीन वेळा पोस्ट लिहून खोडून टाकली.

एखादा सिनेमा वेळ (आणि तिकीट काढल्यास पैसा व बुद्धी) घालवलाच आहे तर आवडून घ्यावा या मताचा असल्याने चित्रपटातल्या अनेक गोष्टींकडे स्वतःतल्या वैगुण्याक्डे करावे तसे दुर्लक्ष करत मी बघतो. अगदी पीएस वन मधे ऐश्वर्याचं वय दिसतंय हे मान्य न करता ती अजून तशी दिसतेय अशी मनाची समजूत करून देऊन पाहिला. त्यामुळं कधी कधी आपण जो सिनेमा आत्ता पाहिलाय तो आपल्याला आवडलाय का हे बायकोला विचारावं लागतं. त्यावर तिचे विचित्र हावभाव येतात. पण के ड्रामा मधे बिझी असल्याने कंतारा बघायला ती आलीच नाही. दुसर्‍या कुणाला नेण्याचं वय राहिलं नाही म्हणून एकट्यानेच पाहिला. मग आतापर्यंत ज्या ज्या लेखातून भरभरून कौतुक आलेय तेच खरं असेल असं मानून अफाट कौतुक केलं. पण मायबोलीवर शक्यतो टीकाकार मोडमधे गेलेलं बरं असतं याचा साफ विसर पडला. गोविंदाचे सिनेमे बघताना तीन तास हसून घेऊन मायबोलीवर आल्यावर सडकून टीका करणे हे धोरण असायला हवे हे माहिती असूनही कंताराचे कौतुक केल्याने प्रेमात बसलेला पांजुर्ली म्हणाला " तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील असा आशिर्वाद का देऊ नये ?"

पांजुर्ली म्हणजे
डुक्कर. पांजर या शब्दाचा तुळनाड भागात हाच अर्थ आहे. वराहरूपम या रागदारीतल्या गाण्यामुळे हा हिंदुत्वाचा उत्सव आहे या समजातून अनेकांनी कंतारा डोक्यावर घेतला आहे. वराहरूप याचा अर्थ दशावतारातला वराह अवतार असा घेतला आहे. पण तसे नाही. दक्षिण भागात शैव परंपरा आहे. शिव ही आदीम देवता आहे. अथपासून इथपर्यंत पसरलेल्या असंख्य तुकड्यातुकड्यात विखुरलेल्या आदआर्य टोळ्यांना ही देवता वेदांच्या आधीपासून ठाऊक आहे. म्हणूनच तिला राक्षस, भूताखेतांचा सुद्धा देव म्हटले आहे. आर्य संस्कृतीत मूळ टोळ्यांच्या ज्या देवता स्विकारल्या गेल्या त्यातली प्रमुख शिव ही आहे. शिव ही या भागातली प्राचीन आणि मुख्य देवता आहे. पांजुर्ली हे शिवाचे रूप आहे जे डुकराच्या रूपात दर्शन देते. डुक्कर हा यांचा सर्वात उपयोगी प्राणी आहे. देशातल्या अनेक आदिवासी भागात जे जे प्राणी उपयोगी आहेत ते ते देवतेच्या रूपात पूजले जातात. त्यांचे मांस सुद्धा खाल्ले जाते.

थोडक्यात मारून खायच्या वेळी ही देवता आहे असा प्रकार नाही. त्या वेळी तो उपयुक्त पशुच असतो.
पांजुर्ली जंगलाचे रक्षण करतो. तो वराह रूपात फिरतो. ही आदिवासींची श्रद्धा आहे.
त्याच्याशी संवाद साधायचा असल्यास अर्धमानवी स्वरूपात देवऋषीच्या (डेमी गॉड) माध्यमातून तो संवाद साधतो. त्यासाठी देवऋषीला शुद्ध व्हावे लागते. ही आदीम संस्कृती बाहेरच्या बदलांनी बेखबर होती. मात्र राजाच्या जंगलातल्या आगमनानंतर तिला धक्के बसायला सुरूवात झाली. राजाने जमिनीच्या बदल्यात देवता नेली. गावकर्‍यांच्या वतीने डेमी गॉड , देवऋषीने मान्यता दिली. या वेळी देवऋषीतली लालसा जागृत झाली. जरी बांधवांसाठी केले असले तरी त्याने देवतेचा बळी दिला. देवता राजासोबत खूष नाही. पण करारामुळे ती राजाकडे गेली आहे.
या गोष्टीनंतर लगेचच देवऋषी पश्चात्तापाने दग्ध होऊन पांजुर्लीकडे धाव घेतो ( त्याला ते रहस्य माहिती असणे नैसर्गिक आहे). पांजुर्ली त्याला माफ करतो पण त्याची किंमत त्याला चुकवावी लागते व तो नाहीसा होतो.

पण त्यामुळेच त्याच्याच कुटुंबात देवऋषीपद राहते. पांजुर्लीच्या मान्यतेने. पुढच्या पिढीतले डेमी गॉड्स शुद्ध आहेत. त्यांनी प्रस्ताव नाकारल्याने पांजुर्लीने करार मोडणार्‍यांना शिक्षा केली असा समज आदिवासींमधे आहे. मात्र बाहेरच्या जगाचे आक्रमण , ब्रिटीशांचे कायदे यामुळे शिवा हा थोरला मुलगा परंपरेने डेमी गॉड होणार असूनही तो अशुद्ध आहे.

त्याचा भाऊ शुद्ध असल्याने देवऋषी आहे. मात्र शिवामधे असे काहीतरी आहे ज्याचे महत्व पांजुर्लीच्या दृष्टीने अधिक आहे. त्याचा भाऊ हा शांत, सज्जन, देवभोळा डेमी गॉड आहे. त्याला सगळे समजते पण तो काही करू शकत नाही.
पांजुर्लीचे भास मात्र शिवाला होत राहतात. फक्त पांजुर्लीच नाही तर त्याचे देवऋषी असलेले पूर्वज त्याला दिसत राहतात. बाह्य जगाच्या आक्रमणकारी संस्कृतीमुळे त्याचे अशुद्ध होणे प्रमाणापलिकडे गेलेय. इतकेच की आपण लायक नाही याचा शिवालाच जास्त विश्वास आहे.

त्याला झालेली उपरती हा या चित्रपटाचा कळसोध्याय आहे. या उपरतीनंतर सिनेमा मानसशास्त्रीय विश्लेषणे वगैरेच्या भानगडीत न पडता सरळच थेट दैवी शक्तींच्या अस्तित्वाबद्दल आडपडदा न ठेवता बोलतो. शिवाला उपरती होते तो क्षण आणि रक्षक देवतांना हवी असलेली त्यातली गुणवत्ता यातून बाह्य आक्रमणांचा मुकाबला होतो. त्या वेळी तो लालसा, स्वार्थ अशा नकारात्मक गुणांशीही होतो. त्यापासून या जमातींना देवतेने दूर ठेवले आहे. त्याची लागण इतकी वर्षे झाली होती ती शिवाच्या रूपाने दिसते. जंगलाची सोडवणूक झाल्यावर शिवातलं दैवरूप पांजुर्लीत सामावतं तेव्हां दोघांचा अवर्णनीय आनंद ते एकमेकांचे हात हातात घेऊना फुगडीसदृश्य नृत्यातून दाखवतात. ते मानवी दृष्टीने अस्तित्व विरघळणं आहे. कदाचित ते शुद्ध होणं असेल किंवा पांजुर्लीत विरघळून जाणे असेल.

काही वर्षांपूर्वी आदिवासी संस्कृती ही आदीम संस्कृती जपत असल्याने त्यावर बाह्य आक्रमणे होऊ नयेत यासाठी कायदे बनवण्याच्या चर्चा होत. त्याचा व्यत्यास म्हणजे मग आदिवासींनी विकासाची फळे चाखूच नयेत का ? आदिवासींनी कायम अंधध्रद्धाळू राहून अविकसित का रहावे असा होत असे. या चर्चा अनिर्णित आहेत. कुठेतरी या वादाची एक बाजू ठळकपणे मांडणे ही चित्रपटामागची प्रेरणा असावी असे वाटते.

मिस्टर आचार्य,
पोस्टची लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन कमी ठेवल्याने पोस्ट कुणाची आहे हे आधीच समजते आणि मग ती वाचली जात नाही. राईटचा इण्डेण्ट डावीकडे मध्यावर आणून ठेवून कवितेच्या फॉर्ममधे पोस्ट लिहील्यास फायदा होतो.
आपलेच नम्र..
कुणीतरी आहे तिथं

मात्र शिवामधे असे काहीतरी आहे ज्याचे महत्व पांजुर्लीच्या दृष्टीने अधिक आहे.>>> हम्म , पण काय आहे त्याच्यात हे स्पष्टं होत नाही. पित्याचा सेवाभाव बघून मिळालेली वारसा हक्कातली पुण्याई का नेतृत्वगुण का दोन्ही.
तुम्ही सुरेख लिहिले आहे. बऱ्याच गोष्टी कळल्या. वराहरूपम् मला विष्णूचा अवतार वाटला, महादेवाची आख्यायिका असेल असं वाटलं नाही. ही शक्यता पटली आहे. महादेवाला आदिवासी मानतात, कारण त्याने भिल्लाच्या रूपात दर्शन दिलेल्या अनेक लोककथा आहेत.

जंगलाची सोडवणूक झाल्यावर शिवातलं दैवरूप पांजुर्लीत सामावतं तेव्हां दोघांचा अवर्णनीय आनंद ते एकमेकांचे हात हातात घेऊना फुगडीसदृश्य नृत्यातून दाखवतात. ते मानवी दृष्टीने अस्तित्व विरघळणं आहे. कदाचित ते शुद्ध होणं असेल किंवा पांजुर्लीत विरघळून जाणे असेल. >>>> हे किती सुंदर आहे. फार फार आवडलयं. Happy

सर्वांचे आभार.
दोन तीनदा पोस्ट केल्याने महत्वाचा पॅरा निसटला. मूळ आनंद मोरे यांच्या नावे आलेले फॉरवर्ड न सापडल्याने त्यातले काही मुद्दे या पोस्टमधे उसने घेतलेले आहेत. मूळ पोस्टकर्त्याला त्याचे श्रेय मिळायला हवे. क्षमस्व , इथे ते नाव निसटले आहे.

अस्मिता. - शिवा मधे असलेला आक्रमकपणा काही काही वेळा स्वतःसाठी न्यायाच्या बाजूने उभा ठाकताना दिसतो. त्यातला स्वार्थ गळून पडला तर तो गावकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकतो. तसा त्याचा भाऊ नाही. ग्रामदैवतं किंवा शिव साधारणपणे तापट देवता असतात.

शिवाच्या कॅरेक्टरमध्ये कुठेतरी देवाचा अवतार शोधणे हे माझ्या देव या संकल्पनेला धक्का आहे Happy

माझ्या देव या संकल्पनेला धक्का आहे >>> मला प्रोफेसर मधली कल्पना आणि हरी ओम वाली कल्पना माहिती आहे.
ही संकल्पना कोणे ?

ओके Happy

आज अखेरीस पहिला
फार सुंदर सिनेमा आहे, जेवढा हाईप झालाय तेवढा नसला तरी वन टाईम नक्कीच बघावा असा
त्यानंतर मायबोलीवर काय काय लिहल आहे ते वाचलं
सरांचा धागा वाचला, पण त्यात त्यांची काही चूक नाही
त्यांना नायक म्हणजे एकाच पठडीतील माहिती आहे त्यामुळे ते केंद्रवर्ती भूमीका असलेल्याला नायक समजून त्याप्रमाणे विचार करतात आणि मग निकालात काढतात
कांतारा चा नायक हा हिरो नाहीये त्याला तसा कुठं दाखवलं
पण नाहीये, तो तामसी आहे, लंपट आहे, भ्रष्ट सुद्धा आहे आणि त्यामुळेच तो खरा वाटतो
हा सिनेमा अस्सल भारतीय मातीतला वाटतो, मला तर खूप ठिकाणी कोकणाची आठवण येत होती
वाडी, खोत, जनता, जंगलाचे रक्षण करणारी देवता, देवरूषी, देवराई, पालखी तुन मिरवणूक, सोंग सजवून नाचणे, अंगात येणे अगदी सही सही तेच
वन अधिकारी पण अगदी साजेसा घेतलाय
नंतर तो अचानक बदलला का ते कळत नाही, बहुदा जमीनदाराने आपल्याला फसवलं म्हणून तो गावकऱ्यांना साथ देतो किंवा त्याला वरिष्ठ सांगतात त्याप्रमाणे तो त्यांना विश्वासात घेतो असं समजून चालू

भूत कोलाच नाच, पंजरूली, गुलीगा हे तर निववळ अप्रतिम

रेटुन बघितला नेफी वर काहीच झेपला नाही. पुलंनी जसा चित्रकलेचा दोर कापुन टाकला होता तसा मी साउथ सिनेमाचा दोर कापुन टाकला Happy This is not my cup of tea.

सरांचा धागा वाचला, पण त्यात त्यांची काही चूक नाही
त्यांना नायक म्हणजे एकाच पठडीतील माहिती आहे त्यामुळे ते केंद्रवर्ती भूमीका असलेल्याला नायक समजून त्याप्रमाणे विचार करतात आणि मग निकालात काढतात
कांतारा चा नायक हा हिरो नाहीये त्याला तसा कुठं दाखवलं
पण नाहीये, तो तामसी आहे, लंपट आहे, भ्रष्ट सुद्धा आहे आणि त्यामुळेच तो खरा वाटतो
>>>

कांताराचा नायक हिरो नाही दाखवलाय हे वाचून गंमत वाटली. कारण ते तसे दाखवलेय म्हणून तर माझा आक्षेप होता Happy

असो, मद्यप्राशनाला स्टेटस समजणे आणि स्त्रियांची छेड काढण्याला पुरुषार्थ समजणे असाही एक मोठा समाज आहे आपल्याईथे. प्रत्येकाशी वाद घालून प्रत्येकाचे विचार बदलू शकत नाही. त्यापेक्षा आपले आक्षेप नोंदवावेत आणि पुढे जावे Happy

प्रत्येकाशी वाद घालून प्रत्येकाचे विचार बदलू शकत नाही. त्यापेक्षा आपले आक्षेप नोंदवावेत आणि पुढे जावे>>> सर अशाने तुमचा धंदाच बसेल की हो

प्रत्येकाशी प्रत्येकवेळी नाही असे करू शकत.
म्हणून कोणाशी कधीच करू नये असेही नाही.
आपल्या बेताने करावे. करत राहावे. सामाजिक भान कायम जपायला हवे.

जसे कोणी दारूचे उदात्तीकरण करत असेल तर मी आवर्जून त्याला टोकतो. मग कोणी मुद्दाम मला उकसवायला तसे करत असेल, किंवा निव्वळ मला विरोधाला विरोध करत असेल तर इग्नोर करतो.
माझे ध्येय ईथे कोणाला वादात हरवणे नसून लोकांनी त्या व्यसनाच्या उदात्तीकरणाला भुलू नये ईतकेच असते हे कायम ध्यानात ठेवतो.

Pages