कांतारा: एका आदिम संघर्षाची कहाणी चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 6 November, 2022 - 08:43

होंबाळे फिल्म्स चा कांतारा चित्रपट आज चित्रपटगृहात जाउन बघितला. ही कलाकृती मोठ्या पडद्यावर व उत्तम थिएटर साउंड मध्ये बघण्यासाठीच बनवली आहे. चित्रपटाची भरपूरच प्रसिद्धी व माहिती जालावर आहे. तथापि हा अनुभव व्यक्तिसापेक्ष आहे. लेखक दिग्दर्शक ऋषभ शेट्टी ह्यांनी अगदी अस्सल दक्षिणी मातीतली एक कहाणी संपूर्ण पणे आपल्या समोर सादर केलेली आहे. एक नितांत सुंदर अनुभव. चित्रपट बघून गोड गुलाबी प्रेमळ वलय वगैरे निर्माण होत नाही पण एक प्रकारचे आंतरिक समाधान नक्की मिळते.

तुळू नाडू म्हणजे दक्षिण कन्नडा, उडिपी हे कर्नाटका तील भाग व कासारगौड हा केरळातील भाग तुळु नाडू म्हणून ओळखला जातो. शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, व रुपसुं दरी ऐश्वर्या ह्यांची 'नेटिव्ह प्लेस.' येथील एका जंगलाच्या संरक्षणाची, त्यात राहणा र्‍या मूल निवासी लोकांची त्या जमिनीवर हक्क सांगणार्‍या दमन कर्मी व्यवस्थेची ही कथा आहे. मूलनिवासी लोकां चे जीवनच त्या जंगलावर अवलंबून आहे. ते फक्त तिथे राहतात व गरजे पुरतेच घेतात. परंतु नवीन आलेल्या व्यवस्थेनुसार ह्या जंगलाला राखीव घोषि त करायचे म्हणून आलेला अधिकारी जागेवर हक्क सांगू पाह णारा उच्चवर्णीय स्वार्थी जमीन दार व खेड्यातच राहणार्या जन्मलेल्या लोकांचा आपल्या जीवनासाठीचा संघर्ष चित्रपटात प्रभावी पणे दाखवला आहे.
जमीनदारातर्फे नागवल्या गेलेल्या जनतेच्या हिता साठी एक दैवी शक्ती उभी राहते. तिच्या सोबत क्षेत्रपाल दिक्पालही आहेत. जे दैवा व गुलिगा नावाने येतात.

शिवा हे मुख्य पात्र ऋषभ शेट्टी अक्षरशः जगला आहे. रासवट, जमीनदाराची काहीही कामे करुन देणारा , व्यसनी, तामसी प्रवृत्तीचा नायक त्याने उत्तम रेखाटला आहे व त्याच्या स्वभावातले अनेक कंगोरे सहज दाखवले आहेत. चित्रपटाचा शेवट तर थक्क करून सोडतो. कंबाला - म्हशींची शर्यत - हा सीन जरूर बघा. थ्रीडी नसले तरीही नदीतले मातकट पाणी आपल्यावर उडते कि काय असे वाट्ते . पुढील मारामारीचे प्रसंग सुद्धा त्याने लिलया पेलले आहेत. शिवाचे कैलासा म्हणून एक् ट्री हाउस आहे ते मला फार आव्डले. शिवाचे एक स्वभाव वैशि ष्ट्य म्हणजे बंडखोर पणा.

ह्याचा भाउ गुरवा हे चित्रपटा ता ले एक सुस्वभावी पात्र. सहज विश्वास टाकणारे, जीवनात नशीबी आलेले भोग पत्करुन तक्रार न करता खालमानेने जगणारे लोक असतात त्यातला एक. हा वंश परंपरागत आलेला भूत कोला दर वर्षी नाचवत असतो.

विधवा आई सर्वत्र सारखीच. ह्या रांगड्या बैलांना ती झोडपूनच रांगेत ठेवत असते. कायम कावलेली व त्रासलेली.

फॉरेस्ट ऑफिसर मुरली हे पात्र शिवा इतकेच रंगत दार रचले आहे. एकटाच पोस्टिंग वर राहणारा अधिकारी. वन वाचवायचे त्याचे प्रयत्न. खेडेगावातील लोकांचा हुच्च पणा. अनेक वाद होउन शेवटी हा शिवाच्या बरोबरीने टीम उभारतो.

जमी न दारही जगभर असे आहे रे वर्गातले लोक असतात तसाच आहे आतून कृर जनते बदल थोडीही सह अनुभूती नसलेला, स्वार्थी, बाईबाज
जातिवादी व ढोंगी. गोड बोलुन नुकसान करणारे असतात त्यातला हा व्यक्ति. निळ्या चिमणीच्या मालकाची च आठवण आली मला तर ह्याला बघुन. अश्या लोकांची पापे त्यांच्या संततीला भोगावी लागतात ह्या देशी समजातून ह्याचा मुलगा मनोदुर्बल दाखवला आहे. ते बघून वाइट वाट्ते. बिचारे पोर. जमीनदाराची बायको सर्व बघुन गप्प.नवरा परस्त्रीला भेटायला चालल्यावर शिवाच्या हातात टॉर्च देणारी.

चित्रपटातील कोणतीही स्त्री बंड करून उठत नाही. सर्व कामाने पिचलेल्या, गप्प बसलेल्या, नायिका पण मेहनतीने ट्रेनिन्ग पूर्ण करुन आलेली गार्ड बनलेली व नोकरी करणारी पण जमीन दार हिला ही वापरून घेत अस्तो कारण वशिल्याने नोकरी मिळवून दिली. त्यामुळे हिचा बॉस हिला कमी लेखत अस्तो. ( हिला दोन्हीकडून शिव्या बसतात पण तिची बाजू कोणीही समजून घेत नाही.) हिचे व शिवाचे सीन्स फार क्युट आहेत.
शिवा तिला मासे आणून कोर्ट करतो. दोघे काही करत असतात व घरचे लोक येतात तर शिवा नारळ खोवत साळसूद पणे बसलेला असतो. हे चित्रप टातले थोडे हलके क्षण आहेत. ही पारंपारिक मुलगी व स्त्रीच दाखविली आहे. तुलने साठी न्युटन सिनेमातील इलेक्षन अधिकारी मुलगी बघा. एकदम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ,सुशिक्षित . दोघी भारतीयच.

चित्रपटाची कथा व त्यासाठी केलेले संशोधन, संवाद एकदम उच्च कोटीचे आहे. व ते पूर्ण चित्रपटात दिसते. भूतकोलाचा ड्रेस व दागिने हेच एक स्वतंत्र प्रकरण आहे. ह्यावर एक डॉक्युमेंतरी तो बनता है.

अरविंद एस कामत ह्यांनी केलेले चित्रिकर ण नेत्र सुखद आहे. रात्रीच्या शॉट्स मध्ये सुद्धा जंगल आपली जादुई क्वालिटी राखुन ठेवते.
क्लायमॅक्स मध्ये घेतलेले शॉट्स रजनीकांतची आठवण करुन देतात पण शिवा आपल्या बल्क व अ‍ॅग्रेसिव पणे तारून नेतो तो पहिल्यापासूनच तसा दाखवला आहे. बी अजनीश लोक नाथ ह्यांचे संगीत मस्त आहे. वराह रूपम आपण ऐकलेच असेल एव्हाना . इतर गाणीही छान आहेत.
वराह रूपम ला चांगला रॉक बेस आहे व पुढे एक चांगली गिटार रिफ कि कायती टाकली आहे. थेटरात जायचे कारण म्हणजे पार्श्वसंगीत. हे तिथेच अनुभवायची बाब आहे. एकदम अंगावर काटा येतो काही क्षणी. चित्रपटात क्रिटिकल क्षणी मूळचे कन्नडा संवादच ठेवले आहेत. हे एकदम पैसा वसूल आहे. शिवाय पांजुर्लीची ती किंकाळी जबरी ऐकू येते. पण संगीत नुसतेच लाउड नाही आहे. साउंड डिझाइन पक्के केले आहे.
सर्व ओरि जिनल साउंड ट्रॅक स्पॉटिफाय प्रिमीअम वर उपलब्ध आहे. चांगले हेडफोन किंवा म्युझिक सिस्टिम वर बाहेर नक्की ऐका. अमेरिकेतला शेजारी नक्की बाहेर येउन बेल दाबेल.

खेडेगावातील जातीय उतरंड, स्नेह संबंध, गरीबांना पायाखालीच ठेचण्याचा व त्यांचा पूर्ण फायदा करून त्यांना नामशेष करून टाकायचा प्रस्थापित वर्गाचा प्रयत्न दाखवला आहे हे सिनेमाचे यश. चित्र पटाचा शेवट पॉझिटिव्ह दाखवला आहे व तोक्षण बघताना भरून येते. एक अस्सल भारतीय मातीतला सिनेमा म्हणून ह्याला रेझोनन्स भेटला आहे हेच त्याच्या यशाचे गमक. माझ्या तर्फे साडेपाच स्टार्स.

========================================================================================
अवांतर व्हिवीआना मॉल ठाणे येथील व्हीआयपी थिएटर व्यव स्था चांगली आहे. उत्तमच. तिथे गेल्यावर मेन्यू हातात ठेवतात. व तुम्ही चित्रपट बघत असताना सर्व्ह करतात. आम्ही मागील वेळी ग्रीक सलाड, मोमोज, ह्यावेळी एक हॉटडॉग व एक चायनीज राइस बोल, कॅफे फ्रापे घेतले होते. कोक पण उपलब्ध आहे. स्टाफ एकदम विनम्र हात जोडूनच बोलतो. खुर्च्या दोन दोन च्या सेट मध्ये व एकेका साइडला लँप शेड. अन्न ठेवायला ट्रेटेबल, पाणी काँप्लिमेंटरी( फुकट) एक वेट वाइप व टिशूज मिळते. मी ह्यावेळी शोधून( शेल्डन सारखी )बेस्ट सीट निवडली होती
शेजारच्या लोका नी तुम्ही मागे बसाल का विचारल्यावर नाही सांगितले. पण ह्या मुळे मला सर्वात बेस्ट अनुभव मिळाला. एफ रो ५. सीट घ्या शक्यतो. आस्च्रर्य म्हणजे एक लोड सारखे ठेवले होते त्यावर ब्लँकेट असे लिहिले होते व आत खरेच ड्राय क्लीन केलेले मौ ब्लॅके ट होते. मी थंडी वाजलीतर म्हणून ब्यागेतुन माझे डोक्याला बांधायचे चिरगुट नेले होते पण त्या ममव पणा ची गरज पडली नाही. तापमान जस्ट राइट होते. व समोर टेस्टो स्टेरोन - एड्रेनलीन मिश्रीत खेळ बघून थंडी विसरुनच जाता तुम्ही. शेवटचा अर्धा तास तर फिल्म इज फायरिन्ग ऑन ऑल
सिलिंडर्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks a lot.

कांतारा चे बजेट १५ कोटी आणि ४० व्या दिवसा पर्यंत कलेक्शन ३५० कोटी .
दोनशे पट पेक्षा जास्त !!!!!
काय चालतात यांचे सिनेमे , बाप रे .....

आत्ता हिंदीत पाहिला . प्राईमवर आहे पण दाक्षिण भारतीय भाषांतच आहे. इतके दिवस या सिनेमाबद्दलचे युट्यूब व्हिड्डीओज, परीक्षणं वाचायचे टाळले होते. पण हे परीक्षण खूप सुंदर आहे. सिनेमा पाहण्याआधी वाचले तरी चालले असते असे वाटले.
:स्पॉयलर अ‍ॅलर्टः
या सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून लोक वेडे होत आहेत अशी शीर्षकं टाळता नाहीत येत. त्यातच क्ल्यू असतात. एका ठिकाणी तर द भारतीय सिनेमे का चालताहेत अशा लेखात देवचार बद्दल लिहीले होते. त्यामुळे क्ल्यू मिळतात. न पाहिलेल्यांची पर्वाच करत नाहीत.

जैत रे जैत ची आठवण आली. त्यात गूढार्थ खूप आहेत. यात काढायचे म्हटले तर काढता येतील. सेमी क्लायमॅक्स च्या शेवटचा संदेश छान आहे. सरकार आणि जंगलातले आदिवासी यांनी मिळून मिसळून असायला पाहीजे. अस्सल मातीतला चित्रपट हाच युएसपी आहे बहुतेक.
परीक्षण आवडले हे वेसांनल. Happy

हिंदी मध्ये वराह रूपम गाण्याचे संगीत बरेच बेस डाउन केले आहे. सगळी मज्जा गेली.

अमा, छान लिहिले आहे परीक्षण

शेवट मला योग्य वाटला. शिवा गावकरी आणि फॉरेस्ट ऑफीसर लोकांना एकत्र मिसळून राहा, त्यातच तुमचे भले आहे असा शेवट करतो ते आवडल.

मी प्रयत्न केला होता. पण सबटायटल्स वाचू कि सिनेमा बघू म्हणून सोडला प्रयत्न.
हिंदीत कशावर आहे ? आज बघीन.

समीक्षा चांगली पण शुद्धलेखनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणखी दोन चार प्रतिसादांत तोच प्रकार आहे. हिंदीमध्ये विभक्ती प्रत्यय तोडून लिहितात ती पद्धत मराठीत येणार बहुतेक.

योगायोगाने पी.साईनाथ यांनी भारतातल्या आदिवासींच्या जीवनावर टाईम्स ऑफ इंडिया पेपरासाठी रिपोर्ट तयार केले त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले होते १९९५ मध्ये - दुष्काळ आवडे सर्वांना. ते वाचत आहे. आदिवासींची सरकारकडून, स्थानिक, आणि सुस्थापितांकडून होणारी फसवणूक हा विषय. तोच चित्रपटात आहे वाटतं.

चित्रपट पाहिला आणि पॅचेसमध्ये आवडला. गाणी आवडली, चित्रण तर फारच छान. कथा तेवढी नाही आवडली. नायकाने केलेल्या चुका तो केवळ नायक आहे म्हणून विसरल्या जातात.
१. भूतकोलाच्या वेळेला फटाके उडवणे चूक आहे - हे त्या पोलिसाचं मत बरोबरच आहे. इथे नायक उगीचच आम्ही उडवणार, तुम्ही काय पाहिजे ते करा असा उर्मटपणा करतो. फटाके हा परंपरेचा भाग असल्याप्रमाणे इथेही दाखवलं आहे आणि मग जणू तो पोलीस मुळात परंपरेच्या विरुद्ध आहे असं दाखवायचा प्रयत्न केला आहे.
२. नायक आणि त्याची मित्रमंडळी स्त्रियांशी जसं वागतात त्यात काही चूक आहे असं कुठेच म्हटलं जात नाही.
३. अचाट आणि अतर्क्य मारामारी - ही सेमी क्लायमॅक्स नंतर ठीक आहे, पण पूर्ण चित्रपटात काही गरज नव्हती. किंबहुना ती तशी घेतल्यामुळे शेवटची मारामारी फार अंगावर आली नसती. पण त्याच्या एक्स्प्रेशनसमुळे तो सीन भन्नाट झाला आहे. तरीही, अशा संघर्षावर उत्तर हे हिंसा, मारामारी हेच आहे. नायिका सिस्टीममध्ये राहून काही करू शकत नाही. उलट तिलाही हिंसेत भाग घ्यावा लागतो. ही वस्तुस्थिती असली तरी हा संदेश म्हणून वाईट आहे.
४. प्रस्थापित हे कायम स्वार्थी आणि अन्यायी असतात व स्थानिक गोरगरीब हे मनानेही कायम गरीब, निस्वार्थी आणि भोळे असतात - ही ठोकळेबाज मांडणी आपल्या चित्रपटात अनादी काळापासून आहे, जी ह्यातही आहे. खरं म्हणजे प्रत्येकच जण आपला स्वार्थ बघत असतो. लोकांचे स्वार्थ एकमेकात गुंतलेले असतात. जोपर्यंत तो गुंता ताणला जात नाही, तोपर्यंत गोष्टी ठीक चालतात. जर ताणला गेला, तर संघर्ष उत्पन्न होतो. ह्यात कुठली एक बाजू बरोबर आणि दुसरी चुकीची असं नसतं. पण इतर जुन्या चित्रपटांप्रमाणे हा ही फारच टोकाची ठोकताळेबद्ध मांडणी करतो.

बाकी भूतकोला फारच नेत्रसुखद. सेमी क्लायमॅक्स नंतर त्याचे जे हावभाव आहेत, ते अशक्य भारी आहेत. स्पोईलर नको म्हणून त्याबद्दल फार लिहीत नाही. स्थानिक वाद्यांचा वापरही सुरेख. गावातली झाडं, मातकट रस्ते, चिखल, विडी, देशी दारू - सगळ्यांसकट खरा मातीतला चित्रपट वाटतो.

हपा,
चित्रपट अजून पाहिला नाही. पण अन्यायाबद्दलची तुमची मतं ही तुमच्या जडणघडणीतून आली आहेत. मी आदिवासी भागात खूप फिरलो आहे. आदिवासी जंगलाला आपली आई समजतात. बहुतेक ठिकाणी मातृसत्ताक पद्धत असते. बलात्काराचे प्रमाण नगण्य आहे. जगण्यासाठी म्हणून जेव्हढे लागते तेव्हढे जंगल आपल्याला देते हा त्यांचा समज आहे. तशा अर्थाची गाणी आहेत. ते जंगलाला ओरबाडत नाहीत. आदिवासी हे पर्यावरणपूरक जीवनशैलीचे पुरस्कर्ते नैसर्गिक रित्या आहेत. जंगलासंबंधी जे कायदे बनवले आहेत ते कायदे बनवताना आदिवासींचे मत शून्य विचारात घेतलेले आहे. त्यामुळे या कायद्यांची अंमलबजावणी ही त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालणारी आहे. तुमची आमची मतं ही कायदा बनवणार्‍यांची आहेत. आम्ही आपले कायदे आम्हाला सूट होणारे, हवी तिथे सूट घेणारे बनवलेले आहेत..

उद्या ड्रेनेज सिस्टीम नदीत सोडता येणार नाही असा कायदा आदिवासींनी सत्तेत येऊन बनवला तर तुमची आमची काय तारांबळ उडेल ? आदिवासी संस्कृतीत आता इतर प्रवाहांचे अतिक्रमण झालेले आहे. फटाके हा तशी चिनी परंपरा आहे. ती भारतातल्या मुख्य प्रवाहांच्या दिवाळीसारख्या सणांची परंपरा कशी झाली हे सांगता येत नाही तसेच आदिवासी जर उडवत असतील तर ते ही माहिती नाही.

ब्रिटीशांविरोधात ज्या सशस्त्र लढ्यांना सुरूवात झाली ती सर्वप्रथम आदिवासींनीच केली. कारण जंगलचे कायदे. या जंगलावर आदिवासींचा परंपरागत हक्क आहे. जसा गावावर गावकर्‍यांचा असतो. त्या विरोधातल्या एकतर्फी कायद्यांमुळे आदिवासीं भागात हिंसक क्रांतीने जन्म घेतला. आता जंगलातली नैसर्गिक संपत्ती आणि जमिनीखालची मौल्यवान संपत्ती यासाठी आदिवासींचे जे शोषण होतंय त्याची कल्पना तुम्हाला या संबंधातल्या रिपोर्ट्स पाहून येईल. पोलीस आणि नक्षलवादी दोन्हीकडून आदिवासी कसे मारले जात आहेत इत्यादी बद्दल फारसे बोलले जात नाही. त्यामुळे अन्यायाच्या कल्पना खूपच सापेक्ष आहेत.
https://www.amazon.in/Books-Govind-Gare/s?rh=n%3A976389031%2Cp_27%3AGovi...
रसिक, अक्षरधारावर चेक करू शकता. इतर रिपोर्ट्स हवे असल्यास गुगळून पाहू शकता.

भारतात एक भाषा संपली. ही भाषा बोलणारा शेवटचा आदिवासी काही वर्षांपूर्वी मृत झाल्याने भाषा संपली.
https://www.theguardian.com/world/2010/feb/04/ancient-language-extinct-s...
या भाषेच्या संवर्धनासाठी काही केले गेले नाही. याचाच अर्थ या जमातीसाठीच काहीही केले गेले नाही. जगभरात मूळच्या आदिवासी जमाती वसाहतवाद्यांनी संपवल्या. अमेरिका खंडातल्या रेड इंडीयन्स बद्दल आपल्याला माहिती आहे. पण ऑस्ट्रेलियात सुद्धा आदिवासी जमाती नामशेष झाल्या.

छत्तीसगड, झारखंड इथल्या कोळसा, हिरे आणि सोन्याच्या खाणींसाठी तिथल्या आदिवासींना विस्थापित केले जात आहे. कर्नाटकात आदिवासी भागात खाणी आहेत. प्रचंड मोठ्या मशीन्सचा आवाज ऐकला तर फटाक्यांचा काहीच नाही. या प्रकल्पांना वनखाते परवानगी का देते ?

रघु, तुमच्याशी सहमत आहे. मी कायदे बरोबर आहेत असं म्हटलेलं नाहीये. त्या (चित्रपटात) पोलिसाचं काम जे आहे ते ते करत आहेत, ह्यात त्यांची चूक नाही (इथला पोलीस म्हणतो आहे मी, जनरल सगळे पोलीस बरोबर आहेत असं नाही). असेलच तर कायदा बनवणाऱ्या लोकांची आहे. मी ज्या चुका वाटतात हे लिहिलंय, ते कथेतल्या पात्रांबद्दल आहे.

आदिवासी भागात तुम्ही काम केलं आहे, ह्याबद्दल आदर आहे.

कायदे एखाद्या समूहाचा विचार न करता केले गेले असतील तर संघर्ष होणारच. दुसर्‍या कुणाच्या समजुतीतून बनवले गेलेले कायदे आणि त्याची त्यांच्या सोयीने होत असलेली अंमलबजावणी हा त्या समूहाला अन्याय वाटणे साहजिक नाही का ? पर्यावरणाच्या तुमच्या आमच्या समजुतींपेक्षा तिथे राहणारे लोक जास्त पर्यावरणपूरक आहेत असे तिथे काम करणार्‍या अनेक संस्थांचे म्हणणे आहे. या गोष्टी वाचून आपले मत ठरवावे इतकेच बोलून थांबतो. हा धागा चित्रपटाचा असल्याने अशा विषयावर वेगळा धागा असावा असे वाटते. ( चित्रपटाचा उद्देश जर यावर चर्चा घडवून आणण्याचा असेल आणि धागाकर्तीचा आक्षेप नसेल तर इथेही होऊ शकेल चर्चा).

(आदिवासी भागात मी काम केलेले नाही).

धागाकर्तीचा आक्षेप नसेल तर इथेही होऊ शकेल चर्चा).>> हाय माझा काहीच आक्षेप नाही. पण जे ह्या चर्चे साठी उत्सुक किंवा माहितगार लोक असतील ते चित्रपट धागा म्हणून दुर्लक्ष करतील. असे वाट्ते. विष य मागे पडू नये. मोस्ट स्वागतम.

मी परवा थोडा सुरू केला बघायला कन्नडा मध्ये जास्तच नैसर्गिक वाट् ते. जाती भेदावरही चर्चा व्हावी. सवर्ण वर्गाची रिसोर्सेस वर मालकी अस्ते
त्यात बाकीचे होर पळून निघतात. त्यांचे जगाय्चे प्रयत्न पण जिवाशी बेतु शकताfunction at() { [native code] } त हे बरोबर नाही.

<खरं म्हणजे प्रत्येकच जण आपला स्वार्थ बघत असतो. लोकांचे स्वार्थ एकमेकात गुंतलेले असतात. जोपर्यंत तो गुंता ताणला जात नाही, तोपर्यंत गोष्टी ठीक चालतात. जर ताणला गेला, तर संघर्ष उत्पन्न होतो. ह्यात कुठली एक बाजू बरोबर आणि दुसरी चुकीची असं नसतं. >

अगदीच असहमत. व्यवस्थेने असमतोल हाच न्याय आणि नियम ठरवला असेल तर एका वर्गाला आपला स्वार्थ पाहायचा हक्क नाकारला जातो. इतकंच काय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायचा हक्क नसतो. त्यांना जेव्हा याची जाणीव होते, तेव्हा संघर्ष होतो.
चित्रपटांतलं याचं चित्रीकरण हा वेगळा मुद्दा.

आत्ता पाहिला पूर्ण चित्रपट. आधी जे कौतुक वाचलेलं आहे त्यामुळे अपेक्षा अव्वाच्या सव्वा वाढलेल्या होत्या. पाटी कोरी असताना पहायला हवा होता असे वाटले. मामींचा लेख त्या मानाने खूप संयत आहे. खरे खुरे रसग्रहण आहे.

अफाट कौतुक वाचलेले असल्याने चित्रपटाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत असे बघताना वाटले. बर्‍याच घट नांचा अंदाज आधी येतो. पण नंतर काही वेळाने (चित्रपट डोक्यात राहतो) अपेक्षा ठेवणे ही चूक आपली आहे हे जाणवले, त्यानंतर पाहिलेल्या चित्रपटाला एक वेगळा अनुभव म्हणून मनातल्या मनात बर्‍यापैकी रेटिंग दिले. असे चित्रपट हे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव देत असलकौतुने कुणाचे अफाट कौतुक, टोकाची टीका यामुळे नेमकी विरूद्ध प्रतिक्रिया उमटते...

अमांनी शेट्टी लोकांचे मूळस्थान सांगितल्याने चित्रपटकर्त्याचं अनुभवविश्व त्याने मांडले आहे असे वाटले. त्याने आदिवासी नायक दाखवला आहे. शेट्टी हे काही जंगलवासी लोक नाहीत. ते तिथले मातब्बर जमीनदारच आहेत. त्यामुळे एखाद्या सहृदय व्यक्तीच्या नजरेतून त्याने दुसर्‍याचे विश्व मांडले आहे. हेच जर त्या जंगलातील एखाद्याने मांडले असते तर ती कलाकृती अधिक भिडली असती असे वाटून गेले. फँड्री मधे नागराज मंजुळेने जी गोष्ट मांडली आहे ती त्याची आहे. तो त्याची गोष्ट सांगतो त्यामुळे त्याच्या जाणिवा, त्याची अनुभूती याच्याशी आपण रिलेट होत जातो. दुसर्‍या
एखाद्याने हा चित्रपट केला असता तरी तो ग्रेटच वाटला असता, पण तो अनुभव नसता आला.

दक्षिणेच्या चित्रपटातली गोष्ट सांगण्याची पद्धत इथेही आहेच. क्लायमॅक्सचा विचार खूप आधी करून ठेवला आहे हे पाहतानाच जाणवत राहीले.
तरीही अशा विषयाला हात घालणे हे धाडसच होते. विशेषतः जंगलातल्या लोकांकडून आपले अनुभव जेव्हां मांडले जातील तेव्हां ते मांडले जातील, पण तोवर रिषभ शेट्टीसारख्या सहृदय लोकांनी त्यांचे मांडलेले प्रश्न लोकांना विचार करायला भाग पाडत आहेत हा सकारात्मक भाग महत्वाचा वाटला. जंगल, जंगलातले आदिवासी, त्यांचे विश्व, त्यांची संस्कृती, त्यावरचे आक्रमण, शोषण आणि संघर्ष हे जरी कमर्शियल अंगाने मांडले असले तरी ते मेन स्ट्रीम मधे आल्याबद्दल टीमचे अभिनंदन !

हा चित्रपट आवडला किंवा नाही या कॅटेगरीत येत नाही असे वाटले. अनुभव आहे. वेगळा आस्वाद घेऊन सवय करून घ्यायची गोष्ट आहे.

पाहिला. अ‍ॅमेझॉन प्राइम - कन्नड मधे, इंग्रजी सबटायटल्स. सबटायटल्स वरून अंदाज येतो व एकूण कन्नड न समजल्याने फारसे अडले नाही. काहीकाही शब्द एकदम ओळखीचे वाटत होते - हुडके (काहीतरी शोध सांगताना), जागृत (काळजी घे), धनी (जमिनदाराला उद्देशून) व इतर बरेच.

एकूण पिक्चर दोन लेव्हल मधे आहे - जेव्हा जेव्हा पंजुर्ली, गुलिगा आणि वराहरूपम् वगैरे सुरू असते तेव्हा फार वरचा दर्जा आहे. जबरदस्त आहेत ते सीन्स व गाणी. आणि पार्श्वसंगीतही.

बाकी इतके खास नाही. शिवा व इतरांची कहाणी सुरू असते ती एकदम टिपिकल तेलुगू पिक्चरमधले ग्रामीण हीरो असतात तशीच आहे. काहीकाही विनोद जमले आहेत. यात भाषेची अडचण वगैरे सगळे आले. पण एकूण तो भाग रेंगाळत जातो. जंगलाचे चित्रीकरण मस्त आहे.

माझ्या मताशी मिळता जुळता प्रतिसाद आहे हा.
बाकी या चित्रपटात संदेश वगैरे दिला आहे हे पाहिल्यावर डोक्यातही आले नव्हते. कमर्शियल चित्रपट आहे.
एक आदिवासींच्या मतदानावरचा चित्रपट आहे (नाव आठवत नाहीय) तो खास त्या विषयाला हात घालण्यासाठी काढलेला चित्रपट आहे असे वाटले. हा चित्रपट आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास काढला असेल तर त्यात कमी पडला असे म्हणावे लागेल. एक कमर्शियल चित्रपट म्हणुन बघितल्यास विरस होणार नाही.

प्राईम वरच्या कॉपी मध्ये चित्रपटाचा शेवट आणि मूळ करूण बिंदू असलेलं वराह रुपम गाणं कॉपीराईट वादामुळे काढलं आहे असं ऐकलं.त्यामुळे थेटर चा फील येणार नाही बहुधा.

माझ्या मताशी मिळता जुळता प्रतिसाद आहे हा. >>> हो मानव. त्या दुसर्‍या धाग्यावरचे प्रतिसाद आज वाचले तेव्हा जाणवले.

प्राईम वरच्या कॉपी मध्ये चित्रपटाचा शेवट आणि मूळ करूण बिंदू असलेलं वराह रुपम गाणं कॉपीराईट वादामुळे काढलं आहे असं ऐकलं.त्यामुळे थेटर चा फील येणार नाही बहुधा. >> मला काल तीच शंका आली की यांनी काही सीन्स्/गाणी कापली असावीत. पण मी नंतर यूट्यूबवर शोधून ते ऐकले. ते गाणे जबरी आहे. एकूणच त्या पंजुर्ली किंवा गुलिगाच्या रूपात जेव्हा हे लोक येतात तेव्हाचा भाग जबरदस्त आहे.

एक स्पॉइलरः तो फॉरेस्ट ओफिसर एकदम नरम का होतो व यांच्या बाजूला का येतो याचे ठोस कारण समोर येत नाही. त्याचे व जमीनदाराचे पात्र नीट उभे केलेले नाही. एकतर फॉरेस्ट ऑफिसरला आदिवासी लोक हे तेथील प्राण्यांइतकेच जंगलाचा अविभाज्य भाग आहेत हे मुळात माहीत आहे असेच वाटत नाही - तो या गोष्टी (आदिवासी, त्यांच्या चालीरीती) नव्याने समजल्यासारखा वागतो. मग एका झटक्यात बदलतो. दुसरे म्हणजे यातला जमीनदार चालू आहे हे शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत कोठेही दिसत नाही. तो जमिनदार आहे म्हणजे तसाच असणार हे प्रेक्षकांनी समजून घ्यायचे असे असावे. शक्यतो प्रेक्षकांना हिंट्स दिल्या जातात तशा यात नाहीत.

बायकोला कन्नड येत असल्यामुळे मूळ कन्नड पिक्चर बघितला . भूत कोला, शेवटचे गाणे , छायाचित्रण एकदम उत्तम. रिषभ शेट्टीची मेहनत दिसून येते. पण आमच्या सौंच्या मते आदिवासींचे थोडे नेगेटिव्ह चित्रण आहे . सतत दारू, व्यसन करणारे , स्त्रीलंपट , डोक्यात कायम राग घालणारे, असेच दाखवले आहेत . बरे जंगलाचे रक्षक म्हणावे तर स्वार्थासाठी झाड कापणारे, हस्तिदंत काढायचा प्लॅन करणे, बिनकामाची डुकराची शिकार करणे (खरे तर त्यांच्या देवाला वराह मुकुट आहे ना ?) असे चित्रण वाटले . कुठूनही भोळे, शोषित वगैरे वाटले नाहीत.

एका सीनमध्ये मुंग्या चिलीमीत भरताना दाखवले आहे , हि कुठली नशा असते ?

ऑफिसमध्ये तुंबाडशी कंपॅरिझन चालू होते पण छायाचित्रण सोडले तर कुठेच सर नाही . तसा टिपिकल व्यावसायिक चित्रपट वाटला पण शेवटचे सीन आणि वराहरूपाम गाणे त्याला वेगळ्याच पातळीवर नेते.

Pages