४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<कधी कधी आपला हात दगडाखाली असतो.>>
आँ!! एव्हढी बलाढ्य अमेरिका नि त्यांचा हात दगडाखाली?
तसे पाहिले तर आता सगळी अमेरिकाच दगडाखाली जाते आहे. अमेरिकेतले सगळे परदेशातून येते. त्या देशांनी ठरवले तर ते अमेरिकेची केंव्हाहि कोंडी करू शकतात. विशेषतः चीन. त्यांनी न सांगता, कसलिही भीती न बाळगता केमिकल वारफेअर सुरु केले नि अमेरिकेचे धाबे दणाणले. असेच काही एखाद्या अफ्रिकेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या राज्यातून व्हायरस आला असता तर अमेरिकेतले लोक त्या राष्ट्रावर धावून गेले असते नि तिथे जाऊन त्यांचे राष्ट्र बेचिराख केले असते. (शॉक अँड ऑ!). अहो खोट्या पुराव्याच्या आधारावर अख्खा इराक उध्वस्त केला.
चीनशी भांडायची हिंमतच नाही.
आजकालच्या जगात अणुबाँब नाही तर अक्कलहुषारी लागते. नि या आपाआपसातल्या भांडणात सगळ्यांनी अक्कल गहाण टाकली आहे.
त्या सुटलेल्या बाईचे भले होवो. प्रश्न खरा की हेच प्रयत्न जर व्हेलनला सोडवण्यासाठी केले असते तर?

बरे झाले, माझ्या वैयक्तिक जीवनावर याचा काहीहि परिणाम होत नाही मनात कधी कधी विचार येतात ते मोकळे करायला मायबोली छान.अनेक वर्षांपूर्वी मायबोलीवरील लिखाणाला कुणि म्हंटले होते कीघाणीने तुंबलेले गटार मोकळे व्हावे तसे इथे लेख पडताहेत. माझ्या मनातील असले घाण विचार मोकळे करायला कुठेतरी लिहायला पाहिजे. आता स्वच्छ मनाने मी पण देवाची प्रार्थना करत बसतो.

रशियाने काय कायदे करायचे आणि नाही ह्याबद्दल माझे म्हणणे नाही. रशियन कायदे तोडण्याचा अधिकार असावा असे मी अजिबात म्हणले नाही. पण म्हणून अमेरिकन नागरिकाचे मूल्यमापन अमेरिकन सरकारने रशियन मूल्यांवर का म्हणून करायचे ?

आणि विषय साईडट्रॅक होईल. पण कतार मध्ये एका मेक्सिकन महिलेवर बलात्कार झाला म्हणून तिला विवाहबाह्य संबंध म्हणून १०० फ्टक्यांची शिक्षा झाली. इथे विषय क्लिअर कट आहे की असल्या कायद्याचा आदर बिदर करण्याची काही आवश्यकता नाही. मला हे पूर्ण मान्य आहे की इथे विषय खूपच वन साईड आहे आणि ड्रग्स बाबत काय कायदे करावे आणि काय नाही ह्याचा संपूर्ण अधिकार रशियाला आहे. तेव्हा रशियाने स्मग्लिंग म्हणून तिला अटक केली हे ठीकच (जरी ती म्हणते आहे की हे संपूर्ण अनावधानाने झालेले...) पण म्हणून काही सरकारने तिला वाऱ्यावर सोडावे हे नाही पटले. आपल्या दृष्टीने काही ग्राम सीबीडी जवळ ठेवणे हे काहीच नाहीये. आपण त्या दृष्टीनेच अमेरिकन नागरिकांची मदत करावी. या केस मध्ये तर बाई म्हणत आहेत की अनावधानाने झाले .

एकूण काय, अमेरिकन दृष्टीतून निरपराध अमेरिकन नागरिकांची रशियावर कसलीही जोर जबरदस्ती न करता, डिप्लोमसी ने सुटका करण्यात काही गैर नाही. ह्यात अमेरिकन मते इतरांवर लादण्याचा कसलाही संबंध येत नाही.

कॉमी, जाउ दे. आपले विचार बर्‍याच बाबतीत जुळतात. या बाबतीत मात्र आपण “ लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री“ असे म्हणुयात. उगाच विषय भरकटत जाइल व काही रिकामटेकडे " अ‍ॅपोर्चुनिस्टिक" लोक या विषयाला कुठेतरी भरकटवत नेतील व आपल्या नेहमीच्या " अमेरिका हेट" अजेंडाला रेटत बसतील.

कॉमीशी सहमत. मुकुंदशी गांजाडी इ. सोडून सहमत. ब्लॅक- एलजीबीटीक्यू बॅशिंग ह्या अपॉरच्युनिस्ट मुद्द्यांशी तीव्र असहमत.
या केस मध्ये काय करावं इतका अभ्यास नाही त्यामुळे काहीच मत नाही. जे केले ते विचार करुनच केले असेल असं मात्र वाटतं. ऑप्टिक्स काय होतील हे विचारात न घेता हे नक्की केलेले नसेल, काही कारण असेलच. इतपत विश्वास अमेरिकेतील लोकशाही सरकारवर माझा आहे.

कॅनडात गांजा लिगल झाल्यावर अमेरिकेत जाताना काळजी घ्या, तिकडे काही राज्यांत लीगल असलं तरी फेडरली नाही. मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तरी ही चालणार नाही. बाकी जगात बहुतेक ठिकाणी क्रिमिनल ऑफेन्स आहे. हे परत परत आणि वारंवार सांगत असत. इंटरनॅशनल ट्रॅव्हल पेज मध्ये कायमस्वरुपी त्यावर माहिती करुन देणारे व्हिडिओ इ. मटेरिअल आहे. मला वाटतं अमेरिकेत प्रवेश करताना ब्रिजच्या आधी पाट्या ही आहेत.. नक्की आठवत नाही.
अर्थात रशियाने गांजासाठी अडकवलं की निव्वळ भूलथाप आहे. त्यामुळे गांजा हे निमित्त असेल कारण नक्कीच नाही.
तीच गोष्ट फायर आर्म्सची. सर्रास फायर आर्म्सना कॅनडात परवानगी नाही. तरी कित्येक बेपर्वा लोक डीक्लेअर न करता घेऊन येतात. मला अशा चुकुन केलेल्या चुकीच्या अमेरिकन्स बद्दल बिलकुल सहानुभूती नाही. त्यांना कायमचं ब्लॅक लिस्टीत टाकावे. गुन्हा दाखल करुन तुरुंगाची हवा ही खायला लावावी इतकी प्रचंड चीड एकंदरीत कॅनडात अमेरिकन गन लॉ बद्दल आणि ती बाळगणार्‍यांबद्दल आहे.

ती बाई काळी + एल जी बी टी क्यु आहे ना. व्होट बँक दुसरं काही नाही.

काहीही ! एल जी बी टी क्यु लोकांची संख्या नगण्य आहे. कोणत्याही मतदार संघात निकाल बदलू शकेल इतकी किंवा त्याच्या जवळपासही नाही. उगाचच त्या लोकांना झोडपू नये प्लीजच.

झोडपणे/बॅशिंग ज्याची त्याची समज/आरोप. मला अजिबात स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. तुमचा आमच्यापेक्षा मोठा मग तर झालं. उदारमतवाद हो!!!

कॉमी, काही नविन माहिती कळाली.
१. रशियन कायद्यामधे २ ग्रॅम गांज सापडल्यास ८ दिवस कैद नि ५०० रुबल्स दंड अशी शिक्षा होते. या बाईजवळ १ ग्रॅमपेक्षा कमी गांजा होता. तेंव्हा अर्थातच असे म्हणायला जागा आहे की तिला रशियाने केवळ राजकीय कारणांसाठी तिला धरून ठेवले.तो जो रशियन माणूस सोडला तो पुटीनचा अंधभक्त आहे आणि त्याची सध्या पुटीनला गरज आहे.
२. व्हेलन - इराकमधे अमेरिकन सरकारच्या १०,००० डॉ. ची अफरातफत करण्याच्या आरोपावरून या इसमाला लष्करातून काढून टाकले होते. त्याच्या कडे इंग्लंड आयर्लंड, कॅनडा या देशांचेहि पासपोर्ट आहेत. एकूण माणूस जरा संशयास्पदच आहे.

फक्त झाले काय, की पुटीनने अक्कलहुषारीने डाव खेळून आपल्या माणसाची सुटका करून घेतली. अमेरिकेतले बास्केट बॉल खेळाडू रशियात, उत्तर कोरियात फार प्रसिद्ध नि लोकप्रिय आहेत. (असे त्या राष्ट्रातले राजकारणी म्हणतात) म्हणून त्यांना पैसे देऊन हे देश त्यांना बोलावतात. म्हंटले तर पैशासाठी, म्हंटले तर आपली स्तुति ऐकण्यासाठी हे खेळाडू तिथे जातात.
अमेरिकेचे दुर्दैव, फसले. त्या बिचार्‍या बाईला मात्र त्रास झाला.

बहुतेक हाऊस ऑफ कार्ड्स मध्ये असा एक प्रसंग होता ज्यात रशियात अरेस्ट झालेल्या अ‍ॅक्टिविस्ट की कोणाला तरी सोडवण्यासाठी फ्रॅ़क आणि क्लेअर मॉस्कोला जातात..
मिडिया मधून जेवढे आपल्याला कळते त्याच्या कितीअरी पट अधिक गुंतागुंत आणि सौदेबाजी ह्या प्रकारांत होते हे नक्की.
रशियन्स एवढेच अमेरिकन्स सुद्धा श्रूड आहेत त्यामुळे त्यांनी हा वरकरणी घाट्यात दिसत असलेलाच सौदा घाट्यातच केला असेल असे वाटत नाही.

<< आपल्या दृष्टीने काही ग्राम सीबीडी जवळ ठेवणे हे काहीच नाहीये. आपण त्या दृष्टीनेच अमेरिकन नागरिकांची मदत करावी. >>
दुसऱ्या देशात बेकायदा कृत्य करणाऱ्याची मदत करावी? तरी नशीब की ती रशियात पकडली गेली, सिंगापूरमध्ये नाही.

“इतकी प्रचंड चीड एकंदरीत कॅनडात अमेरिकन गन लॉ बद्दल आणि ती बाळगणार्‍यांबद्दल आहे”

अमित, तशीच प्रचंड चीड अमेरिकेतही माझ्यासकट अनेकांना त्याबाबतीत आहे.

“तुमच्या मताचा आदर आहे हे वे सां न ल.”, कॉमी द फिलिंग इज म्युच्युअल.

मुकुंद - तुला साष्टांग नमस्कार रे बाबा. इर्रॅशनल, इडियॉटिक मुद्यांवर तु स्पष्टिकरण देत बसतोस याबद्दल...

कालचा गेम काय मस्त झाला यार. द वे ब्रांकोज केम बॅक, अ‍ॅट वन पॉइंट आय थॉट दे वुड ब्रेक कँसस सिटिज विनिंग स्ट्रीक...

राज, अरे सॉलिड तिडीक गेली आहे डोक्यात असल्या फडतुस व्यक्तीला सोडवुन आणायला एवढे खटाटोप व एनर्जी या अ‍ॅड्मिनिस्ट्रेशनने वेस्ट केली म्हणुन व तेही त्या मर्चंट ऑफ डेथच्या बदल्यात!

आणी काय साले गुणगान व कौतुक चालले आहेत या बयेचे अमेरिकन मिडियात! जणु काही सावरकर/टिळक/गांधीजी काळ्या पाण्याची शिक्षा पुर्ण करुन ते परत मायदेशी आले आहेत अश्या थाटात या गंजडी बाईच्या परतीचे कौतुक ईथे होत आहे. आता फक्त मखरात बसवुन, तिची यथासांग पुजा करुन तीची आरती उतरावयाचेच बाकी ठेवले आहे या मिडियातल्या लोकांनी! अरे माझा आयफोन डिंग झाला या बातमीने माझी महत्वाची हॉस्पिटलची मिटींग चालु असताना! अ‍ॅपल न्युजची ब्रेकींग न्युज म्हणे! गिव्ह मी अ ब्रेक!

(अवांतरः अरे महोम्स ने ३ इंटरसेप्शन टाकले म्हणुन त्यांचे २१ पॉइंट्स झाले नाहीतर मॅच एकदम वन साइडेडच होती. २७-० होता स्कोर महोम्सने टाकलेल्या त्या (३ मिनिटात ३ ) इंटरसेप्शनच्या आधी! महोम्सने टाकलेला तो नो लुक साईडवेज लुपींग्/आर्चींग पास पाहीलास का? अनबिलिव्हेबल! होप रसेल विल्सन इज ओके. आय लाइक हिम अ‍ॅज अ पर्सन. ही इज अ व्हेरी गुड क्वार्टरबॅक.

पण बफेलो बिल्स व फिलाडेल्फिया फिलीज मधे सुपरबोल होइल असे मला वाटते. त्या जेलन हर्टचे फार फार कौतुक होत आहे. माझ्या मते तो अजुन ए एफ सी मधल्या तगड्या टीम्स बरोबर खेळला नाही आहे अजुन. एन एफ सी मधे आनंदी आनंदच आहे. ६-७ असा लुजींग रेकॉर्ड असलेले टँपा बे बकिनिअर्स डिव्हिजन लिडर्स आहेत! इट्स अ जोक! )

>>६-७ असा लुजींग रेकॉर्ड असलेले...<<
थॅंक्स फॉर रबिंग इट इन...

अरे महोम्सचा तो पास रादर चक, वाज अनबिलिवेबल. ३ इंटरसेप्ट सोडले तर त्याचे बाकिचे पासेस एक्दम चाबूक होते. आय हॅव टु गिव क्रेडिट टु ब्रांकोज फॉर दोज इंटरसेप्शन्स...

महोम्स माझ्या आवडीचा आहे. त्याचा खेळ बघायला मजा येते.
जेलन हर्ट सकट सर्व फिलाडेल्फियाची टीम खेळाच्या प्रत्येक अंगात पहिली दुसरी वा तिसरी आहे.
पण आमचे जेट्स नि जायंट्स दोघेहि बाहेर. जायंट्स चांगले चालले होते पण महत्वाचे खेळाडू जखमी झाल्याने त्यांची संधि हुकली.

कॉमीशी सहमत. मुकुंदशी गांजाडी इ. सोडून सहमत. ब्लॅक- एलजीबीटीक्यू बॅशिंग ह्या अपॉरच्युनिस्ट मुद्द्यांशी तीव्र असहमत. >> +१ अपॉरच्युनिस्ट हा एकदम परफेक्ट शब्द वापरलास अमित.

इतके दिवस फारसे वाचले नव्हते याबद्दल. वरकरणीतरी घाटे का सौदा केला आहे अमेरिकेने असेच चित्र दिसते. ती घरी आली यात आनंद ई. ठीक आहे. पण तिचे आवर्जून गुणगान करण्याइतके काही दिसत नाही. अगदी रशियाने धादांत खोटे आरोप लावले असे एक मिनिट गृहित धरले तरी किमान निष्काळजीपणा तिने याबाबतीत केला आहे . रिपब्लिकन्सना देशभक्तीच्या टिमक्या गाजवाव्या लागतात तशा डेम्स ना वोक बेसला कधीकधी चुचकारावे लागते. एलजीबीटीक्यू मतदारवर्ग मोठा नाही. पण वोक मतदारवर्ग तुलनेने मोठा आहे आणि फंडिंग वाला आहे. त्यामुळे इथे "ऑप्टिक्स" चा विचार झालाच नसेल हे फार नाइव्ह होईल. शेवटी डेम्स हे काही संतसज्जन नव्हेत. ते ही राजकारणीच आहेत.

एरव्ही अमेरिकेत डोमेस्टिक फ्लाइटस मधे सुद्धा या गोष्टी (व्हेपिंग कार्ट्रिजेस, हशीश तेल) इतक्या सहजपणे नेता येत नसाव्यात. स्टेट बॉर्डर्स क्रॉस करून हे नेणे वगैरे बद्दल बरेच फेडरल कायदे आहेत. सिक्युरिटी चेक्स मधेही हे बहुधा कॅच करतील. मग तिने एकतर बिनदिक्कतपणे हे नेले, किंवा मुळातच काही नव्हते व रशियाचे आरोप चुकीचे आहेत. ती आता इथे आल्यावर सांगेल त्यातून काही आणखी कळेल.

अमेरिकेला आत्ता रशियाशी राजनैतिक दबाव आणायाचे मार्ग फार कमी उपलब्ध आहेत. अशा वेळेस लोकशाही देशाच्या नेत्यांवर दबाव आणायला लागणारे मार्ग वेगळे आणि पुतिनसारख्यांवर लागणारे वेगळे. या हुकूमशहांकरता त्यांचे वैयक्तिक इंटरेस्ट्स किंवा त्याला सपोर्ट करणार्‍या श्रीमंत लोकांचे/कंपन्यांचे इंटरेस्ट धोक्यात येतील अशा धमक्या द्याव्या लागतात. त्या सर्व सध्या ऑलरेडी अमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे आणखी फारसे पर्याय नाहीत.

सध्या पुतिनची पीछेहाट सुरू आहे. त्याला युक्रेनमधून व या पेचातून बाहेर पडायला काही सन्माननीय मार्ग उपलब्ध करून देऊन "वे आउट" द्यावा व त्याबदल्यात ज्या मागण्या मान्य करून घ्यायच्या त्यात असे अडकलेले लोक बाहेर काढायचे - यापेक्षा देशांतर्गत "बेस" च्या प्रेशरला जास्त महत्त्व दिले गेले आहे असे दिसते. तिला घरी परत आणायचे प्रयत्न करण्यात काहीच चूक नाही. पण त्याकरता फार मोठी किंमत दिली आहे असेच वाटले.

फारेन्ड माझा मुद्दा संयत शब्दात मांडल्याबद्दल तसेच गैरसमज न वाटून घेतल्या बद्दल आभार.

एलजीबीक्युटी यांचे इन्क्लिनेशन नैसर्गिक तर असतेच परंतु या कम्युनिटीमध्ये स्युसाईड रेट फार हाय आहे याची मला कल्पना आहे. इन्टेन्स एकाकीपण तसेच अनेक हार्मोनल अपहीव्हल्स या बाबींमुळे लोकांचे आयुष्य भयाण होते याची कल्पना आहे. तसेच या सर्वाला तोंड देत देत , इग्नोरंट व शत्रुत्वाचा भाव बाळगणार्‍या लोकांना, लढा द्यावा लागतो ते वेगळेच. आणि हे शत्रुत्व का तर अमक्याने तमक्यावरती प्रेम करु नये - हा मूर्ख व माणुसकीशून्य मॉरल स्टँड. आपल्यापेक्षा वेगळेपण स्वीकारण्याचा इनरशिआ व विरोध.

पण दर वेळेला हे स्पष्टीकरण का द्यावे लागावे? तसेच समजूती इव्हॉल्व्ह होउ शकतातच की, आपण काय मशिन आहोत का? परवा मला जे चूकीचे वाटत असेल ते मला आज योग्य स्पष्टीकरणांनंतर, अनुभवांती पटू शकत नाही का? यावर हे अ‍ॅझम्प्शन का की ऑपॉर्चुनिस्ट आहेत, झेनोफोबिक आहेत, अँटाय एलजीबीटीक्यु आहेत?

परंतु या लोकांची व्होट बँक असू शकत नाही का? डेम्स्ना त्याचा उपयोग होउ शकत नाही का?

हे म्हणजे सूर्य-वारा-माणूस कथेसारखे होते, वारा जितका जास्त वाहे तितका मनुष्य कोट घट्ट आवळे, काढणे तर दूरच. तद्वत विरोध होउ लागला की आपण डिफेन्सिव्ह बनतो. याउलट सूर्याने हळूहळू तापत जाउन त्या माणसाला कोट काढण्यास उद्युक्त केले. जेव्हा आपण दुसर्‍याला समजून घेतो निदान आरोप न करता, प्रयत्न करतो तेव्हा काहीतरी संवाद होउ शकतो असो.
तुमचे समज , गैरसमज , दुसर्‍यावरती प्रोजेक्ट करु नका.

बाकी सिनिअर आणि कन्सिस्टंट मेंबर्स ना तडातड बोलले असेन तर, माय अपॉलॉजीज. तसा उद्देश नव्हता.
------------------
त्या समदानी धाग्यावरही 'ब्लॅक' शब्द वापरला, व गोरीला ' श्वेतवर्णी' हा शब्द वापरला, म्हणुन कोणीतरी उगाचच रोस्ट करु लागले. का तर संस्कॄत ग्रेट भाषा आहे म्हणजे मी गोर्‍यांना ग्रेट समजते असे यांचे प्रोजेक्शन. नंतर ती व्यक्ती परत कधीच दिसली नाही. ब्लॅक हा शब्द अमेरीकेत सर्रास वापरला जातो. मग मला स्पष्टीकरण देत बसावे लागले - की आफ्रिकन अमेरीकन ही कम्युनिटी मला आवडते. (होय इन फॅक्ट आवडते) यांच्या रक्तात म्युझिक बीट असते, नाच व म्युझिक रक्तात असते. सेन्स ऑफ ह्युमर असतो. एक यांची संस्कॄती आहे, अ‍ॅक्सेन्ट आहे, स्वॅग आहे जो function at() { [native code] }इशय रोचक व लव्हेबल आहे. वगैरे वगैरे .... पण त्या धाग्याची वाट लावून ढुं ला पाय लावून ती व्यक्ती पसार. परत कधी अ‍ॅक्टीव्ह दिसलीच नाही. त्या धाग्यावर फक्त आरोप करण्याकरता हजेरी.
असो. जुन्या कढीला ऊत नको.
-----------------------------

व्होट बँक जरूर असू शकते. आणि आहेच. पण ती काही फक्त lgbtq लोकांची नाही. कारण ते लोक संख्येने नगण्य आहेत. व्होट बँक आहे ती त्यांच्या हक्काबाबत जागरूक बहुसंख्य जनतेची. (कोणताही पोल उचला. अमेरिकन जनता ठामपणे त्यांच्या सोबत आहे.)

बर. व्होट बँक आहे हा प्रश्न मुळात इथे अग्राह्य आहे. इथे दोन लोकांमध्ये निवड नव्हती. फक्त एकच अमेरिकन व्यक्ती परत देण्यासाठी टेबलावर होती.

करेक्ट!!! फारेन्डनी मांडलेला मुद्द - एलजीबीटीक्यू मतदारवर्ग मोठा नाही. पण वोक मतदारवर्ग तुलनेने मोठा आहे आणि फंडिंग वाला आहे. .......... अजिबात लक्षात आलेला नव्हता.
>>>>व्होट बँक जरूर असू शकते. आणि आहेच. पण ती काही फक्त lgbtq लोकांची नाही. कारण ते लोक संख्येने नगण्य आहेत. व्होट बँक आहे ती त्यांच्या हक्काबाबत जागरूक बहुसंख्य जनतेची. (कोणताही पोल उचला. अमेरिकन जनता ठामपणे त्यांच्या सोबत आहे.)
करेक्ट!!

>>>>व्होट बँक आहे हा प्रश्न मुळात इथे अग्राह्य आहे. इथे दोन लोकांमध्ये निवड नव्हती. फक्त एकच अमेरिकन व्यक्ती परत देण्यासाठी टेबलावर होती.
ओके. साउंडस गुड!!

कॉमी - पण एकच व्यक्ती टेबलावर होती हे रशियन आर्ग्युमेण्ट झाले. ते अमेरिकेने मान्य केले यात रशियाची सरशी झाल्यासारखे वरकरणीतरी दिसते. जगात इतक्या ठिकाणी बंडखोर, टेररिस्ट वगैरे लोकांना शस्त्रे विकणार्‍या व्यक्तीला त्याबद्दल्यात सोडवणे हा समान लेव्हलचा सौदा नाही. सहसा अशा वेळेस "प्रप्रोर्शनेट" एक्स्चेंज केला जातो. स्पाय लोक, किंवा अडकलेले सैनिक एकमेकांना परत देताना.

Just to be clear, एलजीबीटीक्यू हक्कांना माझाही सपोर्ट आहे. पण इथे तो फॅक्टर मुळातच नसायला हवा, जर रशियाने त्या कारणाकरता अडकवले नसेल तर. तसे काही कारण दिसत नाही. असा सपोर्ट करणारे सगळे रॅशनल नाहीत. त्यात अनेक वोक गट आहेत. मागा लोक जसे रिपब्लिकन पार्टीला एका बाजूला ताणत असतात, तसे हे वोक लोक डेमोक्रॅट्सना एका बाजूला ताणत असतात. हे टोटली शक्य आहे की त्यांचा दबावगट हा इथे फॅक्टर होता. नाहीतर हा सौदा किमान समान लेव्हलला होईपर्यंत अमेरिका ताणू शकली असती. युक्रेन युद्धात रशिया सध्या पेचात आहे. पुढच्या काही महिन्यांत पुतिनशी "पोझिशन ऑफ पॉवर" मधून निगोशिएशन करण्याच्या संधी मिळतील. तेव्हा हे करणे जास्त फायद्याचे ठरले असते.

वास्तविक जगाची काळजी असलेल्या वोक लोकांचाच याला कसा विरोध नाही हे आश्चर्य आहे. पाकिस्तान ते मिडल इस्ट देशातील लोकांना गरीब बिचारे म्हणून सतत "पेण्ट" करणार्‍या वोक ग्रूप्सना हा सोडलेला माणूस तेथेच परत उलथापालथ करू शकतो याची कल्पना नाही का? अमेरिकेविरूद्ध त्याने फारसे काही केलेले नाही (त्याला अटक झाली, ती तो काही करायच्या प्रयत्नात होता या माहितीवरून) आणि आता सोडताना अमेरिकेविरूद्ध पुन्हा काही करणार नाही याची किमान तोंडी हमी त्याच्याकडून व रशियाकडून घेतल्याशिवाय त्याला सोडण्याइतके बिनडोक कोणतेही सरकार नसेल. त्याच्याकडून धोका इतरांनाच जास्त आहे.

वोक दबावगट प्रेशर टाकत असल्याने हे डिल झाले असे काय मला वाटत नाही. तसे मानायला काहीतरी इंडिकेशन हवे. अर्थात ते काय अशक्य आहे असेही नाही, तसे असू सुध्दा शकते.

आणि सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत, डेस्परेट पुतीन रशियात बसला असताना अमेरिकेने किती कडकपणे वागावे आणि काय करावे ह्याबाबत काही बोलायला मी धाजावत नाही. पण, उगाच अमेरिकन नागरिकांना पकडून ठेवले असेल तर अमेरिकेने त्या नागरिकाला सोडवणे गरजेचे आहे असेच वाटते.

मला हा disproportionate exchange हेच इण्डिकेशन वाटले. सहसा वाटाघाटी अशा वेळेस अडून बसतात. मग यांनी ते का मान्य केले असा प्रश्न पडतो आणि त्यावर मला ही एक शंका आली. रशियाकडून दुसरा पर्याय नाही, पण हे करणे हिताचे नाही. तेव्हा दुर्दैवाने तसा पर्याय मिळेपर्यंत थांबावे लागेल वगैरे पीआर करू शकले असते.

हे मान्य करणे, किंवा अजून चांगल्या संधीची वाट पाहणे हे दोनच पर्याय होते. बाकी सँक्शन्स, मालमत्ता फ्रीज करणे वगैरे सगळे ऑलरेडी रशियाविरूद्ध केलेले आहे. एरव्ही ते पर्याय असतात.

मीही जाणकार वगैरे असल्याचा क्लेम करत नाही. आपल्या जनरल माहितीवरून आपण इथे लिहीतोय. तेव्हा "धजावलात" तरी हरकत नाही Happy

>>>>>>>>बाकी सँक्शन्स, मालमत्ता फ्रीज करणे वगैरे सगळे ऑलरेडी रशियाविरूद्ध केलेले आहे.
तेच तर ना! आवळण्याकरता, नाड्याच नाहीत. आता रशिया 'मेलेलं कोंबडं' झालय जे आगीला भीत नाही Lol

हो, आणि त्यातलाच एखादा उद्या सिनेट करता कॅण्डिडेट व्हायचा Wink महोम्सच्या तर शाळेचे नावच व्हाइटहाउस होते.

Pages