४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Rupert Murdoch has reportedly warned Donald Trump his media empire will not back any attempt to return to the White House, as former supporters turn to the youthful Florida governor Ron DeSantis.
After the Republican party’s disappointing performance in the US midterm elections, in particular the poor showing by candidates backed by Trump, Murdoch’s rightwing media empire appears to be seeking a clean break from the former president’s damaged reputation and perceived waning political power.
Last week, Murdoch’s influential media empire, including right-leaning Fox News, his flagship paper the Wall Street Journal, and the New York Post, each rounded on Trump, calling him a loser and a flop responsible for dragging the Republicans into “one political fiasco after another”.

हे जर खर असेल तर ट्रंप रुपर्ट मरडॉकला काय “ टोपण नाव“ ठेवेल हे बघायला मजा येइल Happy

तात्या २०२४ ची घोषणा करेल असे मला वाटते फक्त डीओजेवर प्रेशर टॅक्टिक्स म्हणून. एकदा त्याने घोषणा केली कि काहि दिवसांनी मिडटर्म विसरून सगळे जीओपी त्याच्या मागे जातील. जान ६ च्या बाबत फारसे वेगळे झालेले नाही. इथले आईल च्या पलीकडच्या "पॅशनेट" पोस्ट्स यायला लागल्या कि समज कि शिडात वारे भरले गेले आहेत Wink

शिडात वारे भरले गेले आहेत >>> Lol

आता मागे जाणारे कमी होतील असे वाटते. एकतर तीच २०२० ची रडगाणी गाणारे हरले आहेत. त्यामुळे तात्याविरूद्ध लोक बिनधास्त बोलू लागले आहेत. दुसरे म्हणजे "टाउन मधे नवीन शेरीफ आलेला आहे". डिसॅन्टिस Happy

<<<खर म्हणजे इस्टॅब्लिश्ड व ट्रॅडिशनल रिपब्लिकन पार्टीकडे . ती हायजॅक झालेली पार्टी परत आपली खरी आयडेंटीटी शोधत आहे असा या निवडणुकीच्या निकालांवरुन तरी वाटतय!>>>
अनुमोदन.
मला पण असेच वाटत होते, पण गिन्ग्रिचपासून ही पार्टी मला आवडेनाशी झाली आहे. क्लिंटनसारखा खमक्या माणूस होता म्हणून त्याचे चालले, ओबामा फारच कमजोर निघाला.
आता राजकारणात काही अर्थच उरला नाही.

जॉर्जिया च्या सिनेट सीट साठी जी "रन ऑफ" निवडणूक होणार होती ती काल झाली आणि डेमोक्रॅट राफाएल वॉरनॉक त्यात विजयी झाला. तोच सध्याचा तेथील सिनेटर होता. हर्शेल वॉकर ने मात्र इतर अनेक "मागा" लोकांच्या पेक्षा वेगळा टोन वापरत निवडणूक "कन्सीड" केली आहे.

या पराभवाने ट्रम्पचा भाव अजून थोडा उतरेल, कारण वॉकर हा ट्रम्पने बॅकिंग दिलेला उमेदवार होता. तसेही त्याला या प्रचाराला येउ नको म्हणूनच रिपब्लिकन्सही सांगत होतेच. अर्थात "ट्रम्प गप्प है तो क्या, फिरभी ट्रम्प है". तो उलट आता म्हणेल बघा मी आलो असतो प्रचाराला तर हा जिंकला असता Happy

वरती आधीच्या पानांमधे या जॉर्जिया रन-ऑफ बद्दल आणखी माहिती आहे. या आधीच सिनेट मधे ५०-५० अशी विभागणी झाल्याने (व निर्णायक मत हे व्हाइस प्रेसिडेण्ट देत असल्याने) या निवडणुकीचा इतका इम्पॅक्ट असणार नव्हताच. पण आता व्हीपीच्या मताशिवा सुद्धा डेम्स कडे सिनेट राहिली आहे.

थेरडोबांच्या स्पेक्टाक्युलर राजनैतिक विजयाबद्दल कोणी लिहिलं नाही वाटतं अजून? 'मर्चंट ऑफ डेथ' च्या बदल्यात एक गांजाडी ऍथलिट रशियाकडून परत मिळवून दाखवली. ब्राव्हो! याला म्हणतात डिप्लोमसी!

मला अजिबात आवडले नाही.
उगाच हेर सोडून दिला.
गांजाडी बाई पेक्षा एक हेर गेली दोन वर्षांहून अधिक काळ कैदेत आहे. त्याला का नाही सोडवले?
खरी हुषारी करायची तर एखादी रशियन गांजाडी पकडून तिला तुरुंगात टाकायचे नि गांजाड्यांच्या बदलात गांजाडी नि हेराच्या बदलत हेर असे असायला हवे.
सिनेमा बाई पक्ष सोडून गेली! तुलशी पण आता डेमोक्रॅट च्या अंगनकी नही रही!

“सिनेमा बाई पक्ष सोडून गेली! तुलशी पण आता डेमोक्रॅट च्या अंगनकी नही रही!” Proud

पण मोरोबांशी १००टक्के सहमत! एका गंजडी बाईला सोडवायला “ मर्चंट ऑफ डेथ“ ची सुटका हे काही झेपले नाही.

आणी मुख्य म्हणजे अमेरिकेची अरेरावी ही की दुसर्‍या देशाचे कडक नियम या ड्रग अ‍ॅडडिक्ट बाईने मोडले तरी यांचे एकच टुमणे की तिला उगाचाच शिक्षा केली आहे. तिने त्या देशाचे कडक ड्रग नियम धाब्यावर बसवले व तिची रितसर कोर्ट केस झाली. त्यात तिने त्या देशाचे नियम मोडल्याचा कबुलीजबाबही दिला व तिला रितसर शिक्षा झाली. अश्या कैद्याला सोडवण्यात काय हशील? तेही " मर्चंट ऑफ डेथ" च्या सुटकेच्या बदल्यात? नॉन्सेन्स!

अमेरिकेत २१ राज्यात गंजडी असण्याला लिगली मान्यता आहे. या राज्यात कानाकोपर्‍यात सर्रास गांजा खुले आम विकायला व वापरायला लिगली मान्यता आहे. पण म्हणुन सर्व जगात सुद्धा गांजा वापरायला हरकत नसावी असा माजोरडा (गैर) समज अमेरिका करत आहे.

“एका गंजडी बाईला सोडवायला “ मर्चंट ऑफ डेथ“ ची सुटका हे काही झेपले नाही.”. - येस्स! राजकारण हा माझा प्रांत नाही पण ही ‘मुत्सद्देगिरी’ काही झेपली नाही हे खरं.

अनुमोदन.
सध्या एल जी बी टी क्यु चे प्रस्थ फार वाढले आहे,काळे, गरीब, बेकायदेशीरपणे येणारे यांचे डेमोक्रॅटिक पक्षाला फारच कौतुक. त्यांना पैसे देऊन मते मिळवायची - जनतेचा पैसा - उधळा!!
काळ्यांबद्दल माझा अक्षेप नाही. पण इतर दोघांनी आपल्या जागी स्वस्थ बसावे. सगळ्यांनाच ते पसंत असते असे नाही.
१८८० च्या दशकात काळ्या लोकांचे प्रस्थ वाढले म्हणून केकेके स्थापन झाले. आता ट्रंप सारखे लोक आले.

तसे पाहिले तर एका शिक्षकालाहि गांजा नेल्याच्या अरोपाखाली रशियात अडकवून ठेवले आहे. पण त्याच्या सुटकेचा प्रयत्न कोण करेल? त्यात काय मते मिळणार?
जेंव्हा विचारले तेंव्हा व्हाईट हाउस ची बाई म्हणाली, आम्हाला दोनच पर्याय होते -ती बाइ किंवा कुणि नाही!!!
हे म्हणजे रशियाची दादागिरी! मुकाट्याने सहन केली. असे दिसते की या बाईसाठी खूप जास्त प्रयत्न केले नि व्हेलन (हेर) किंवा दुसरा शिक्ष़क यांच्यासाठी नाही!! तसेच प्रयत्न त्या हेरासाठी केले असते तर तो तरी सुटला असता!

जर पर्यायच नव्हता असे व्हाईट हाऊस म्हणते आहे तर काय प्रॉब्लेम आहे ? त्या बाईंची सुटकाच जर टेबलावर होती तर तिला सोडवणे हे योग्य नाही काय ? म्हंजे दोघांपैकी निवडीचा पर्याय नव्हताच तरी उगाच ओरडा चाललाय. त्यात उगा lgbt घुसाडले.

तो 'मर्चंट ऑफ डेथ' टेररिस्ट होहोतीम्हणुन, त्याला अमेरिकेत गुन्ह्याखाली अटक झाली होती. त्या ब्रिटनीबाईला रशियाने, उगाचच ओलिस धरले होते. अमेरिकेकडुन खंडणी गोळा करण्याकरता. ती खंडणी उकळण्यात ते यशस्वी झाले.
काही पर्याय नव्हता हे आपल्याला वाटते. बायडेन सारखा राष्ट्रपती सुद्धा तेच म्हणु लागला तर त्याची कर्तबगारी काय?
---------
एलजीबीटीक्यु बद्दल मला अजिबात काहीही उलट-सुलट मत व्यक्त करायचे नाहीये. काळे लोक जशी व्होट बँक आहे तसे एलजीबीटीक्यु व्होट बँक आहेत एवढाचह निर्देश आहे.
-----------------
बेसिकली रशियाला ना अमेरिकेकडुन सँक्शनचा धाक उरलेला आहे ना सवलतींचे अमिष. नाड्या आवळणर तर कशा. रशिया स्वतःच 'नंगे से खुदा भी डरता है' अशा अवस्थेला पोचलाय वाटतय. म्हणजे काहीच भीती उरलेली नाही, सर्वस्वच पणाला लागलय.

the substance, less than a gram of hash oil, was legally obtained in the U.S. through a doctor to treat chronic pain or that she had never intentionally violated Russian law
यावरून ती गंजेडी ठरते?

काही वाटाघाटी झाल्या का नाही झाल्या हे माहीत नसताना आणि त्याबद्दल कसलेही स्पष्टीकरण नसताना बायडनने काय केले आणि काय नाही हे कसे बोलणार ?

आणि इथे ब्लॅक आणि lgbt मुद्दा १००% अग्राह्य आहे असेच वाटते. दोन लोकांपैकी एका माणसाला सोडवण्याची ऑफर नव्हतीच असे व्हाईट हाऊस म्हणते आहे. जिथे चोईसच नव्हता तिथे व्होट बँक कुठून आली ?

“the substance, less than a gram of hash oil, was legally obtained in the U.S. through a doctor to treat chronic pain or that she had never intentionally violated Russian law
यावरून ती गंजेडी ठरते?”

याला “ हाइट ऑफ इनोसंस“ असे इंग्लिशमधे म्हणतात. असो!

कॉमी, मुद्दा “ चॉइसच नव्हता” हा नाही, अमेरिकेने या गंजडी बाइच्या बदल्यात मर्चंट ऑफ डेथ सोडला हा आहे. हे म्हणजे रशियाच्या अवाजवी मागणीला बिनडोकासारखे नंदीबैलासारखे मान डोलावुन हो म्हणुन त्या मागणीला शरण जाण्यासारखे आहे.याने “ अमेरिका विल रिलीज एनीबडी इफ वूइ हॅव एनी अमेरिकन अ‍ॅज अ प्रिझनर ऑर होस्टेज“ हा विचार जगातल्या टेररिस्ट लोकात व देशात द्रुढ होत जाइल.

जर समजा बिल लादेन अमेरिकेच्या तुरुंगात असता तर त्यालाही या गंजडी बाइच्या बदल्यात सोडला असता तर चालले असते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

उगाच बायडनने केले म्हणुन सगळे चांगलेच केले असा विचार करणे म्हणजे त्याचे अंधभक्त झाल्यासारखे आहे. ट्रंपच्या अंधभक्तांना हेच तर आपण इथे हजार वेळा सांगत आलो आहे की असे व्यक्तीचे अंधभक्त होणे हे लोकशाहीमधे लोकशाहीसाठी फार फार घातक आहे.

बायडनने केले म्हणूनच चांगले असे नाही. अमेरिकन व्यक्तीला मायदेशात आणणे हे चांगलेच आहे. मला टीका खरोखर पटली नाही. असे ह्या माणसाची किंमत ह्या माणसापेक्षा जास्त वैगरे गणित काय झेपले नाही. पडद्यामागे काय चर्चा झाली हे माहीत नाहीये.

पडद्यामागे काय चर्चा झाली हे माहीत नसले तरी़ जी काही झाली त्या चर्चेतुन मर्चंट ऑफ डेथला सिडुन देउन एक क्रिमिनल ड्रग अ‍ॅडडिक्ट अमेरिकन गंजडी बाई परत मिळवली या फायनल आउटकमवरुन त्या चर्चेत बायडन टीम पुर्णपणे निष्प्रभ ठरली व रशियाच्या अवाजवी मागणीला शरण गेली हे मात्र स्पष्ट दिसुन येते.

अमेरिकन व्यक्ती जर इनोसंट असेल तर त्या व्यक्तीला जरुर मायदेशात परत आणायचा प्रयत्न केला पाहीजे. अ‍ॅग्रीड! ( जसे १९७८-७९ मधले इराणमधल्या अमेरिकन एंबेसीतले ओलीस ठेवलेले अमेरिकन हॉस्टेजेस). पण इथे आपण एका क्रिमिनल ड्रग अ‍ॅडडिक्ट बाईबद्दल बोलत आहोत हे जरुर लक्षात घे!

राहता राहीला माणसाच्या किंमतीबद्दल. माझ्या पुरते म्हणशील तर मी एकंदरीत डेंजरस कन्व्हिक्टेड टेररीस्ट ला सोडण्याच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे आणी तश्या डेंजरस माणसाला सोडण्याचा निर्णय व तोही एका क्रिमिनल गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट बाईच्या बदल्यात घेतला हे तर फारच अनाकलनिय आहे. अश्या वेळेला कोणाचीच किंमत खासकरुन अश्या गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट बाईची किंमत निश्चितच समिकरणात येउ नये.

अशी किंमत मोजणे तात्पुरते बर्‍याच लोकांना आवडेल पण त्या मर्चंट् ऑफ डेथने टेररिस्टना विकलेल्या बाँब्स,मशिन गन्स व क्षेपणास्त्रांनी हजारो इनोसंट अमेरिकन नागरिक मारले गेले तर त्यांच्या आयुष्याच्या किंमतीबद्दल हीच माणसे तेव्हा विचार करतील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

> क्रिमिनल गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट
ही थोडीशी अतिशयोक्ती होते आहे असे वाटत नाही ? अशा वाटाघाटीत बरेचदा सर्वनाशं .. अर्धं त्यजती.. वगैरे वापरावे लागते. कधी कधी आपला हात दगडाखाली असतो.

<<<<<<अश्या वेळेला कोणाचीच किंमत खासकरुन अश्या गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट बाईची किंमत निश्चितच समिकरणात येउ नये.>>>>>

आपण अमेरिकन नागरिकांचा विचार करताना आपल्या कायद्याच्या चौकटीतून का करू नये ? किरकोळ मात्रेत CBD OIL असणे हे अमेरिकन दृष्टीतून काहीच चुकीचे नाही. अश्या वेळेस एखाद्या व्यक्तीला रशियन तुरुंगात का खितपत ठेवावे ? ते रशियन दृष्टिकोनातून योग्य असेल सुद्धा. पण अमेरिकेने आपल्या नागरिकांचा अमेरिकन दृष्टीनेच विचार करायला हवा.

“> क्रिमिनल गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट
ही थोडीशी अतिशयोक्ती होते आहे असे वाटत नाही ?”

अजिबात नाही.

ही बाई गांजा ओढते… सत्य

या बाईने कोर्टात मान्य केले की तिच्याकडे गांजाचे तेल असलेले व्हेपींग इक्विपमेंट सापडले गेले… सत्य.

या बाईला रोज गांजा ओढल्याशिवाय जगता येत नाही.. पक्षी.. ही बाई गांजाच्या अ‍ॅडडिक्शनला बळी पडली आहे… सत्य.

हीने कोर्टात मान्य केले की हिच्याकडे गांजा आहे व कोर्टाने तिला त्यांच्या देशाच्या कडक पण रितसर अँटाय ड्रग नियमांप्रमाणे " क्रिमिनल" ठरवले… सत्य!

म्हणुन म्हटले की ही बाई कन्व्हिक्टेड क्रिमिनल गंजडी ड्रग अ‍ॅडडिक्ट बाई. तश्या बाईला तसे न म्हणता तिला कुठलेही शुगरकोटींग देउन आपण संत महात्मा वगैरे म्हणु शकता.

“आपण अमेरिकन नागरिकांचा विचार करताना आपल्या कायद्याच्या चौकटीतून का करू नये ? किरकोळ मात्रेत CBD OIL असणे हे अमेरिकन दृष्टीतून काहीच चुकीचे नाही. अश्या वेळेस एखाद्या व्यक्तीला रशियन तुरुंगात का खितपत ठेवावे ?”

कॉमी, मी कालच इथे लिहीले होते की बाकीच्या देशांनी अमेरिकेच्या नियमांचे पालन त्यांच्या देशात करावे ही अमेरिकेची अपेक्षा म्हणजे अमेरिकेचा शुद्ध माजोरडेपणा आहे. असे कुठल्या आंतरराष्ट्रिय नियमात आहे की अमेरिकन नागरिकांना दुसर्‍या देशात अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेनुसार वागवावे? वा रे व्वा! दुसर्‍या देशात जाउन त्यांचे नियम धाब्यावर बसवायचा अधिकार अमेरिकेला व अमेरिकन नागरिकांना कोणी दिला व का द्यावा?

< मर्चंट् ऑफ डेथने टेररिस्टना विकलेल्या बाँब्स,मशिन गन्स व क्षेपणास्त्रांनी हजारो इनोसंट अमेरिकन नागरिक मारले गेले > हसू आलं. जगातला सगळ्यात मोठा मर्चंट ऑफ डेथ कोण आहे बरं?

<<<पडद्यामागे काय चर्चा झाली हे माहीत नाहीये.>>>
ही मायबोली आहे. इथे लिहिण्यासाठी सत्य, माहिती यांची गरज नसते.
जे दिसते त्यावर लिहीत सुटायचे, टी आर पी वाढवायचा.
आजकाल त्रंपचे काय किंवा बायडेनचे काय, अंधभक्तांचे प्रमाण अमेरिकेत वाढले आहे. त्यातून पक्षबाजीला ऊत आला आहे.

“जगातला सगळ्यात मोठा मर्चंट ऑफ डेथ कोण आहे बरं?”

हा प्रश्न तुम्ही हसत बसत स्वत:लाच विचारा. तुम्हाला इतिहासाची आकलन शक्ती असेल तर त्याचे उत्तर मी देण्याची जरुर नाही. आणी तुमची तशी आकलनशक्ती नसेल तर मी त्याचे उत्तर दिले तरी ते तुमच्या डोक्यावरुन जाइल.

Pages