Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो.तेजु बाहेर गेल्याची न्यूज
हो.तेजु बाहेर गेल्याची न्यूज आहे.
अरेरे!! म्हणजे प्रसादला
अरेरे!! म्हणजे प्रसादला जिंकवतायत का आता??
तेजस्विनी नंतर अपूर्वाच त्यातल्या त्यात डिझर्विंग वाटतीय
तेजस्विनी बाहेर गेली असेल तर नॉमिनेशन्सचे काय होणार? का अजुन एक एलिमिनेशन या आठवड्यात??
एलिमिनेशन नसेल तर चॅलेंजर्सचा पचकाच झाला म्हणायचा
तेजु ला बहुतेक बाहेर आणलं
तेजु ला बहुतेक बाहेर आणलं नाहिये अजुन. सीक्रेट रुम मधे असेल कदाचित.
तिला हातामुळे रोजची स्वतःची कामं पण नीट करता येत नसावीत. असं असताना तिथे रहाण्यात अर्थ नाही.
कदाचित काही दिवस सीक्रेट रुम मधे ठेवुन अन्दाज घेतील की हाताचं कसं काय आहे ते. आणि ठीक वाटलं तर आत सोडतील
तेजु ला बहुतेक बाहेर आणलं
तेजु ला बहुतेक बाहेर आणलं नाहिये अजुन. सीक्रेट रुम मधे असेल कदाचित......
तस असेल तरी गेम नाहीच खेळता येणार.
म्हणजे जवळ जवळ बादच.
मला अपूर्वा नाही आता देशमुखचाच नंबर लागणार याची खात्री होत चालली आहे.
प्रसाद,देशमुख अक्षय हे त्रिकुट ठेवतील टॉप 3 मध्ये.नाहीतर मानेंशा घेऊन जातील,एक सिनियर म्हणून.
मला तर नववा आठवडा चालू असूनही तस कोणीही आवडत नाही आहे अजून.
अरेरे तेजा नको जायला बाहेर.
अरेरे तेजा नको जायला बाहेर. प्रसाद जिंकलेला बघवणार नाही.
घरी न जाता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर आणतील परत.
राखीच्या फालतू जोक्सवर का हसतायेत सगळे. ती दिसतेयही भयानक. प्रसादला मात्र परफेक्ट बोलते.
तेजस्विनी नंतर अपूर्वाच त्यातल्या त्यात डिझर्विंग वाटतीय >>> तिला नाही द्यायचे. दुसरी ठेवतील, प्रसादलाच देतील ही लोकं.
प्रसाद,देशमुख अक्षय >>> अक्षयला पब्लिक सपोर्ट अजिबात नाहीये त्यामुळे फायनलपर्यन्त नेलं तरी खूप. अपूर्वा असेल तीनात. तिने चांगला वाईट कंटेट जास्त दिलाय अक्षयपेक्षा. तेजा गेली नसेल तर तेजा प्रसाद अपूर्वा असतील पहिले तीन. उरलेले दोन सध्या देशमुख धोंगडे किंवा अक्षय सध्या वाटतायेत.
विकास मस्त नाचतो.
विकास मस्त नाचतो.
मी आठवड्यातून एकदाच बघतो त्यामुळे नाव आणि चेहऱ्याची समीकरणे लक्षात राहत नाहीत. इथले वरचे फोटोही उडालेत.
विकास टास्कही मस्त खेळतो,
विकास टास्कही मस्त खेळतो, पाचात त्याला नेतील की नाही याबद्दल मात्र शंका वाटते, तोही डिजरविंग आहे. खरी मजा तेव्हा येईल जर तो ट्रॉफी जिंकला तर. मला आवडेल, प्रसादच्या fansचा पचका होईल पण त्याला ठेवतील की नाही समजत नाहीये.
तेजु लईव्ह फीडमध्ये दिसत नाही
तेजु लईव्ह फीडमध्ये दिसत नाही म्हणून अस अनुमान काढल आहे.कदाचित काही काळापुरतीही गेली असेल,जर खरच गेम सोडला असेल तर मग वोटिंग लाईन्स बंद करतील बहुतेक.
त्या सोनालीताई सांगतायेत कुठे
त्या सोनालीताई सांगतायेत कुठे नाही गेली तेजु, मेडिकल रूममध्ये असेल.
तेजुला खरंच जावं लागणार, मला
तेजुला खरंच जावं लागणार, मला वाईट वाटलं.
आज अक्षय खूप छान खेळला. विशालही चांगला खेळला, मीराही. कावळा म्हणून अक्षय बेस्ट होता, अपूर्वा टास्कस अजिबात चांगले खेळत नाही.
मी तर आजचा भाग नीट
मी तर आजचा भाग नीट पाहिलाचक्षनाही.सगळा गोंधळ,त्या राखीच विनाकारण ओरडण,नाटक,ते विकास अपूर्वाच कंटाळवाण फ्लर्टिंग .खरच कंटाळा आला.
आता.तेजूही गेली.सँम नाही ,यश नाहीआता टास्कमधली मजाच गेली.
बिबॉसचा टीआरपीही खाली येईल.
कठीण आहे या सिझनच.
त्या.राखापेक्षा मड त्रुप्ती देसाई ला तरी आणायच,तिने मागच्या वेळी छान केला होता टास्क.
हो फार बोअर होणार अजून.
हो फार बोअर होणार अजून.
आरोहने अडवलेना अक्षयला, तो सुटू शकला नाही पण तो टास्क भारी खेळत होता.
खरंतर तेजुबाबत साशंकता होती तर समृद्धीला काढायला नको होतं, रोहितलाच काढायला हवं होतं. समृद्धीचा वावर छान होता.
मी तर आजचा भाग नीट
मी तर आजचा भाग नीट पाहिलाचक्षनाही.सगळा गोंधळ,त्या राखीच विनाकारण ओरडण,नाटक,ते विकास अपूर्वाच कंटाळवाण फ्लर्टिंग .खरच कंटाळा आला.>>> मला उलट interesting वाटला टास्क....दोन्हीकडे equal strength असल्याने मजा आली पाहायला...B टीममधे सगळ्यांनी कावळ्याचं काम छान केलं...अमृताने सुद्धा...त्यात विशालचं प्रोत्साहन खूपच पॉझिटिव्ह वाटलं.. A टीममध्ये फक्त अक्षयच चांगला खेळला...स्नेहलताला बोलावलेच नाही ..ती चांगली खेळली असती...
अपूर्वा अक्षय एकदम टोन डाऊन झालेत...प्रसाद तर दिसलाच नाही काल...राखीने मात्र विकासला मस्त पिन मारली आहे...अपूर्वा विकास जोडी बाहेर आवडतेय हे सांगून...पण ती त्याला जरा जास्तच चढवून सांगतेय..अपूर्वा तुझ्यावर प्रेम करते वगैरे....विकासने स्वतः च्या डोक्याने विचार करायला हवा...
किरण माने किती दुटप्पीपणा करत आहेत...विकासला कोपर्यात घेऊन अपूर्वा बद्दल काहीबाही सांगतात आणि सगळे समोर असताना त्याची अपूर्वाच्या नावाने मस्करी करतात....
जर या चार जणांच ठरलेलच आहे की
जर या चार जणांच ठरलेलच आहे की कोणालाच कुठलीही फँसिलिटी मिळून द्यायची नाही,तर हे कावळाचिमणीचे टास्क ठेवतात कशाला? काल विशालची टीम जिंकूनही मूर्ख राखीने फेरु ड्रॉ केली आणि टॉयलेट फँसिलिटी काढून घेतली.
राखीला तर काही कळतही नव्हत ,नुसती किंचाळत होती,ती मीराच जाऊन सांगत होती,कोणाला बोलाव कावळा म्हणून ते.
कावळ्याला पकडायचच नव्हत तरी आरोहने अक्षयला पकडल,तरी ही काही बोलत नव्हती.नुसता गोंधळ घालत होती.
त्यापेक्षा मस्त हुकुमशाह टास्क देऊन मीरा ,राखीकडे माने,प्रसाद ,धोंगडे तर आरोह विशिलकडे अपूर्वाची टीम.मजा आली असती.मग जो हरेल त्याची फँसिलिटी काढायची.पण बिबॉसची क्रिएटिव्ह टीम सॉलिड गंडली आहे यावेळी.
नवीन अपडेटनुसार आता डान्स पार्टी आहे,जी असायलाच हवी राखी आहे म्हणजे,जोडी डान्स आणि मग कँप्टन्सीचा उमेदवार.
तेजू गेल्यामुळे तिची टीम आता नाहीच.मानेंना सिंपथी देऊन.नेतील पाचात.
आणि इकडून देशमुखलाच नेतील कारण तेजूनंतर कमी निगेटिव्ह असणारी ,स्पष्ट बोलणारी ,माने सोडले तर ऑलमोस्ट सगळ्यांशी जुळवून घेणारी,लव्ह अँगलपण देणारी आणि आपल्या कुवतीनुसार टास्क खेळणार,सोमिवर वोट्समध्ये प्रचंड सपोर्ट असलेली ती एकटीच आहे.
मला वाटत तिलाच जिंकवतील आता.
अरेरेरे काय भयंकर कालचा
अरेरेरे काय भयंकर कालचा एपिसोड... राखी मय झाला अगदी. कसली डेंजर आहे ही बाई.
एरवी वरती गॅलरी मधे बसुन टास्क च्या वेळी ओरडाआरडा करणारे सगळे राखी च्या आवाजापुढे गप्प होते.. बाकी फुटेज पण सगळं राखीचं दाखवत होते.आणि राखी ला टास्क मधे काही कळत नव्हतं. नुसतं आरडाओरडी. मीरा येउन येउन तिला सांगत होती. टास्क च्या बाबतीत तसही मीरा हुशार च आहे. रोहित चांगलं करत होता टास्क ते बघुन बरोबर बोलली की त्याला बाद करुन पुढच्या ला बोलंव. अक्षय सोडुन कोणालाच खेळता आलं नाही काल नीट.
अमृता दे ने काल मीरा ला मस्त गप्प केलं.. पहिल्यांदाच अदे आवडली. तसही मीरा उगीच उकरुन हुज्जत घालत होती.
विशाल निकम ला धोंगडे साठी आणलंय का ?
आणि या चार लोकांना स्पेशल जेवण येतंय का ? काल राखी साठी चिकन आलं होतं.
अपुर्वा ला चिकन च्या वासाने रडायला आलं.. हसुन लो़ळले मी... बिचारी ग अप्पु.. खवय्या लोकांची तडफड समजु शकते मी चांगलीच. आपल्या आवडत्या पदार्था चा वास येतोय पण खाता येत नाहिये हे दु:ख मोठं आहे
अपुर्वा चं तोंड एकदम बंद झालंय राखी आल्यामुळे किंवा आपल्याला एक तास फक्त राखीचंच फुटेज दाखवत आहेत त्यामुळे तसं वाटु शकतं.
विशालला बघितलं की मला अल्लू
विशालला बघितलं की मला अल्लू अर्जुनचा पुष्पाच आठवतोय...
सोमिवर तेजुच्या एव्हिक्शनवरून
सोमिवर तेजुच्या एव्हिक्शनवरून खूप संताप व्यक्त होत आहे की बिबॉसने मुद्दाम काढल, अपूर्वा ऑर अक्षयला जिंकवण्यासाठी.
सईपण कंबरदुखीमुळे इंज्युअर्ड होती,दातारला टण इंज्युरी झाला होती पण त्यांच्यावेळी असा नियम नव्हता ,मग तेजुच्या बाबतीत का?असा सूर आहे सोमिवर.
मलाही आधी ती इंज्युरी सिरियस वाटली नव्हती पण जर खरच असेल तर बिबॉस जबाबदारी का घेईल?
दातार मँडमना फ्रँक्चर नव्हतच ,तो स्टंट असावा,आणि सईची कंबरदुखी आठवडाभरच होती,नंतर ती बरी झाली.
बिबॉसने नियमाच कारण देण्याची गरज नव्हती ,सरळ फ्रँक्चरमुळे खेळू शकणार नाही ,हेही सांगता आल असत.
मला नाही वाटत,गंभीर इंज्युरी असताना घरात ठेवण,शेवटी बिबॉस सेफ राहणारच ना.
त्या बिचार्या सँमवर पण उठले आहेत, तिच्यामुळे झाल म्हणे.
मला आठवत नाही पण पहिल्याच राउंडला झाल होत,कस लागल आठवत आहे का?
सोमिवर तेजुच्या एव्हिक्शनवरून
सोमिवर तेजुच्या एव्हिक्शनवरून खूप संताप व्यक्त होत आहे की बिबॉसने मुद्दाम काढल, अपूर्वा ऑर अक्षयला जिंकवण्यासाठी. >>
हो मी पण वाचलं हे. पण तेजु मला तरी विनर मटेरीअल वाटत नव्हती.गेले ३ सिझन चा विचार केला तर यावेळी कोणीच विनर होण्यासाठी योग्य वाटत नाहिये.
सिझन १ - मेघा - जीव तोडुन टास्क करायची, घरात वावर मस्त होता. खुप एंटरटेन करायची.
सिझन २ - शिव - टास्क मस्त करायचा, लव्ह अँगल सेट केला होता तो लोकांना आवडायचा.सगळ्यांशी छान वागायचा.
सिझन ३ - विशाल - टास्क खुप मस्त करायचा, त्याचे जेल तोडणे वगैरे किस्से अजुन आठवतात, कंफ्युज होता सोनाली च्या बाबत पण तरी सांभाळुन घेतलं होतं ते प्रकरण त्याने. सगळ्यांशी एकदम अदबीनं वागायचा.
सिझन ४ -
अपुर्वा - एंटरटेनर आहे पण टास्क मधे कधी कधी कमी पडते. लाईव्ह मधे पाहताना छान वाटते पण १ तासाच्या भागात तिची निगेटीव्ह शेड जास्त पुढे आली आहे आत्तापर्यंत.
अक्षय - टास्क चांगले करतो पण खुनशीपणा करतो, एरवी घरात खुप दंगा घालत असतो. मुलींशी वागणुक बरेच जणांना आवडत नाही.
स्नेहलता - टास्क मस्त खेळते. पण एरव्ही जेव्हा दिसते तेव्हा अपुर्वा किंवा अक्षय मुळे दिसते. स्वतंत्र दिसतच नाही.
रोहीत - फक्त टास्क मधे दिसतो. एरवी घरात शुन्य.
माने - पॉलिटीक्स जास्त करत बसतात. एकच टास्क चांगला खेळले.
विकास - टास्क चांगले खेळतो पण बोलता येत नाही. बोअर होतं.
अमृता दे - आता आता दिसु लागली आहे. मस्त मुद्देसुत बोलते. टास्क मधे कमी वाटते.
अमृता धो - टास्क जीव लावुन खेळते. पण बोलुन सगळं घालवते. एरवी जेव्हा दिसते तेव्हा फक्त भांडणातच दिसते.
प्रसाद - माझ्या मते हा या गेम साठी सर्वात अनफिट माणुस आहे. त्याला टास्क कळत नाहीत. ईमोशनली गंडलेला दिसतो. बोलता येत नाही.
तेजा - सगळ्यांशी गोड गोड बोलुन सांभाळून वागायची. टास्क मधे ठीक ठाक. बाकी एंटरटेनमेंट मधे फार काही स्पार्क नव्हता.
खर आहे,यावेळी विनर अस कोणी
खर आहे,यावेळी विनर अस कोणी वाटतच नाही.
तेजु जर बाहेर गेली आहे तर वोटिंग लाईन्स बंद करायला हव्यात.
पण चालू आहेत,बिबॉसला काय एवढी घाई झाली आहे बाहेर काढायची?
तेजु म्हणे सिक्रेट ऑर मेडिकल
तेजु म्हणे सिक्रेट ऑर मेडिकल रुममध्ये आहे.काय रे हा सिझन!
पण अस असेल तरी तिथे सुध्दा ही एकटी सगळ कस करेल,म्हणजे दिमतीला कोणी देणार का बिबॉस?
तिथून म्हणे ती गेम बघणार.हिला फार काही नवीन शोध लागेल अस वाटत नाही.मानेंचच खर मत कळल तर.बाकी टीम आहे कुठे.
अपूर्वाच्या टीमच्या मताने तिला फार काही फरक पडणार नाही.
असो.आज काय ते कळेलच.
कावळ्याला पकडायचच नव्हत तरी
कावळ्याला पकडायचच नव्हत तरी आरोहने अक्षयला पकडल >>> हो तो ओरडून ओरडून सांगत होता, कोणी ऐकलं नाही.
त्या बिचार्या सँमवर पण उठले आहेत, तिच्यामुळे झाल म्हणे. >>> तेजुच म्हणाली होती एपिसोडमधे, पहील्या राऊंडला सॅममुळे लागलं. तरी बरेच जण अक्षयला शिव्या घालतायेत. बॉयकॉट अक्षय म्हणतायेत.
मला वाटतं चूक बिग बॉसची च आहे , टास्कमध्ये हे होतंच त्यामुळे दोष कोणालाच कोणी द्यायला नको. तेजुला लागलं तर तिने खेळायला नको होतं, सर सलामत तर पगडी पचास, नंतर खेळल्याने जास्तच त्यावर लागत गेलं.
अपूर्वा जिंकायला नको, टास्कमध्ये अगदीच फुसकी आहे, वरुन दुसऱ्यांना आरडाओरडा करत सल्ले देण्यात एक्स्पर्ट.
तेजुला परत आणतील पण तीनात नसेल आता ती.
यावेळी कोणालाच जिंकवू नका. कोणीच लायक नाही. तो अक्षय फ्लर्ट करतो, दोन्ही अमृता एंजॉय करत असतात. प्रसादला दिली तर यापुढे येणाऱ्या सीझनमध्ये confused रहा, गोल गोल बोला आणि ट्रॉफी मिळवा हा संदेश जायचा .
स्मिता confused होती पण टास्क काय खेळायची, डोकं जाम चालायचे आणि वावर छान होता.
तेजुने रडवले.
तेजुने रडवले.
प्रसादला अति शिक्षा दिली. स्नेहलताला कमी दिली.
प्रसादला केवढी शिक्षा दिली, नाही आवडलं, बिचारा वाटला. प्रसादला सिंपथी मिळवून द्यायचं ठरवलंच आहे एकंदरीत बिग बॉसने. प्रसाद टास्क मस्त खेळला आज, तो जिन्यावरून लोटांगण घालत आला ते मला जास्त आवडलं. स्नेहलता चे पहिलं गाणं आवडलं पण लोटांगण टास्कमध्ये प्रसाद बेस्ट वाटला.
दोन्ही अमृता बिनधास्त नडतात. मीराचा पोळ्यांची कणिक फेकल्याचा मुद्दा करेक्ट होता. फ्रीजमध्ये बघून आदल्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी करू शकत होते. न बघता दुसरी कणिक भिजवून केल्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवस आधीची कणिक (गोळे केलेली) फेकली हे चुकच होते.
विशाल पूर्णपणे धोंगडे बाजूने आहे. अर्थात त्यांनी एकत्र काम केले आहे. ती केक टास्क छान खेळली.
राखी अतिशय वाईट दिसत होती, माने किती नी काय तिच्या मागे पुढे करत होते.
ह्या सगळ्यात मला मीरा आवडतेय. राखी अति डोक्यात जातेय , विशाल आणि आरोह बावळट वाटतायेत. हो विशालही काही चार्म नसलेला वाटतोय. बोअर तिघे आहेत, एकटी मीरा मस्त.
अरे अंजु! मी मीरा डोक्यात
अरे अंजु! मी मीरा डोक्यात जाते लिहिणार होतो!

राखीपेक्षा कमीच अर्थात. मला आपले मराठी मध्यमवर्गीय आरोह, विशाल बरे वाटले. राखी तर वरचा मजला रिकामा लाजिरवाणी आहे. तिला बघितलं की पोटात कसंतरी होतं.
हाहाहा.
हाहाहा.
आरोह विशाल गुडी गुडी आहेत, म्हणून बावळट वाटले. हे दोघे दोन अमृताना मदत करायला आलेत असं वाटलं.
राखीचे नडणे डोक्यात जातं त्यामानाने मीरा मस्त नडतेय आणि दोन्ही अमृता ह्या दोघीना नडतायेत तेही आवडलं.
हो. देशमुख भारी बोलते. तिरकस
हो. देशमुख भारी बोलते. तिरकस बोलते ते त्या माठ अक्षयला बराच वेळ समजलंच नाही.
राखी तर वरचा मजला रिकामा
राखी तर वरचा मजला रिकामा लाजिरवाणी आहे.>>> हो ना.... काल किती भयंकर दिसत होती...
मीराचा पोळ्यांची कणिक फेकल्याचा मुद्दा करेक्ट होता>>> तिसर्या सिझनमधे नेहमीच किचनमधे वाद व्हायचे....या सिझनमधे ते नव्हतं....मीरा आली तर लगेच सुरू झाली भांडणं...मीराचा मुद्दा योग्य होता...पण इतक्या लोकांमध्ये होतं कमीजास्त....आणि काळी झालेली कणीक कोण वापरणार...त्याचा राखी आणि मीराने इतका मुद्दा बनवणे नाही आवडलं..याउलट विशाल आणि आरोहने छान समजून घेतले ते आवडलं...आरोह मला दुसर्या सिझनमधे आवडला नव्हता...कदाचित शिवानी सोबत होता म्हणून....पण यात बरा वाटतोय...
ती कोण आर्जे होती ती गेली का?
ती कोण आर्जे होती ती गेली का?
विकास, उत्कर्ष, मीरा आणि सोनाली यायला पाहिजे होते.
ह्यांचा टीआर्पी एकदम वाढला असता.
काल तेजस्विनी गेममधून बाहेर
काल तेजस्विनी गेममधून बाहेर पडली तो अतिशय हृद्य (बिग बॉससारख्या शो मध्ये क्वचित असे प्रसंग असतात) प्रसंग होता..... उगाच जास्तीचा इमोशनल ड्रामा नाही पण आतल्या लोकांना ती ज्या पद्धतीने बाहेर जातीय याचे मनापासून वाईट वाटलेले दिसत होते..... प्रेक्षकांना तर नक्कीच वाईट वाटलेले असणार!!
ती बाहेर पडताना सहस्पर्धकांकडून तिला मिळणारी टाळ्यांची दाद नक्कीच बहुमुल्य होती
जरा क्लिशे वाटेल पण तिने खरेच लोकांची मने जिंकली होती
विशाल आणि आरोह अपेक्षेप्रमाणे फुसके चॅलेंजर्स ठरतायत.... मनाने चांगले असणाऱ्यांचे तिथे काम नाही..... राखी आणि मीरा मिळून जो काही कंटेंट देण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यावरही हे दोघे पाणी फिरवतायत!!
तिथे थोडे क्रूर आणि श्रूडच लोक पाहिजेत
आता आज परत नाचगाणी म्हणजे बघायलाच नको एपिसोड
>>किरण माने किती दुटप्पीपणा
>>किरण माने किती दुटप्पीपणा करत आहेत...विकासला कोपर्यात घेऊन अपूर्वा बद्दल काहीबाही सांगतात आणि सगळे समोर असताना त्याची अपूर्वाच्या नावाने मस्करी करतात....
तो तरी कुठे सरळ होता..... मानेंसमोर अपूर्वाला नावे ठेवायचा आणि ते समोर नसताना अपूर्वाच्या मागेमागे करायचा!!
पण काही म्हणा मानेंनी सिक्रेट रूमच्या चान्सचा काही म्हणजे काही वापर करुन घेतला नाही.... फुकट गेला बिगबॉसचा तो डाव!!
>>पण बिबॉसची क्रिएटिव्ह टीम सॉलिड गंडली आहे यावेळी.
प्रश्नच नाही!! मुळात चॅलेंजर्स लोकांची निवडच चुकली आहे आणि त्यात हे नमस्कार घाला आणि बदाम मिळवा सारखे टास्क!!
आणि एकजण पण बंड करायला तयार नाही.... मुकाट ऐकून घेतायत.... काल स्नेहलताला चांगली संधी होती पण ती पण गेली लगेच पूलमध्ये उडी मारायला.... नाही करणार कारण बिग बॉसचा नियम मोडलाय तर बिग बॉस शिक्षा करतील; टास्क चालू असते तर गोष्ट वेगळी असे म्हणाली असती तर चमकली असती पण तिची सगळी हुश्यारी अपूर्वाच्या हो ला हो करण्यात व्यर्थ जाते!!
>>हो. देशमुख भारी बोलते. तिरकस बोलते
टिपिकल पुणेरी.... शालजोडीतुन मारते
>>आरोह मला दुसर्या सिझनमधे आवडला नव्हता...कदाचित शिवानी सोबत होता म्हणून
नेहा शितोळे म्हणायचय का तुला?
हो. देशमुख भारी बोलते. तिरकस
हो. देशमुख भारी बोलते. तिरकस बोलते
टिपिकल पुणेरी.... शालजोडीतुन मारते >>>मलाही आवडतं तिचं बोलणं, एकदम स्पष्ट clarity of thoughts आहेत.
Pages