Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सगळ्यांचे नाही बघितलं पण
मी सगळ्यांचे नाही बघितलं पण अमृता देशमुख इंप्रेसिव्ह टीचर वाटली मला.
कालचा एपिसोड अत्यंत फालतू
कालचा एपिसोड अत्यंत फालतू होता!!
प्रसादला नाना पाटेकर सोडून इतर मिमिक्री अज्जिबात जमत नव्हती.... उगाच बोअर मारत होता!!
पण तरीही धोंगडेचा आक्रस्ताळेपणा अज्जिबात जस्टीफाइड नव्हता आणि ती नापास झाल्यावर तिने पुढच्या तासाला पण अतिशय नॉनसेन्स गोंढळ घातला
तीच गत अक्षयची.... त्याने एकही तास नीट होऊ दिला नाही!
मानेंचा तर अगदीच मामा बनवला सगळ्यांनी मिळून!!
शिक्षकाने बाकावरुन उठल्यावर सरळ नापास करायला पाहिजे होते आणि ऑलरेडी नापास असेल तर मुख्याध्यापकांनी त्यांना शिक्षा म्हणून थोड्या वेळाकरता जेलमध्ये टाकायला हवे होते!!
एकपण तास धड होऊ दिला नाही या व्रात्य मुलांनी.
किती इंटरेस्टींग बनवता आला असता हा टास्क पण कल्पकतेचा अभाव सगळ्यांमध्ये अगदी ठासून भरलेला आहे..... त्यातल्या त्यात अपूर्वाने बरे प्रयत्न केले आणि नापास झाल्यावर कुठलाही हल्लागुल्ला केला नाही हे आवडले (अर्थात तिचा स्वभाव बघता वेळ आल्यावर ती बोलून दाखवेलच!!)
बाकी विकास आणि मानेंमधल्या कुरबुरींचा आता अगदीच कंटाळा आला आहे..... कुणाला तरी एकाला बाहेर काढा तर कुठे प्रेक्षकांची या छळवादातून सुटका होईल!!
मला शिक्षकांमध्ये आणि
मला शिक्षकांमध्ये आणि स्टूडंट्समध्ये देशमुख आवडली,संयंमाने खेळली,तो अक्षय काय सारखा प्रत्येक टीचरच्या अंगाशी जात होता.अजिभात आवडला नाही.
प्रसादला नानाची मिमिक्री येते यावरून बिबॉसने त्याला मिमिक्री आर्टिस्ट ठरवल असेल ,म्हणून मिमिक्री हा विषय दिला असेल तर ती प्रसादची नाही तर बिबॉसची चूक आहे.
मला प्रसाद स्टूडंट म्हणून आवडला,शिक्षक म्हणून त्यातल्या त्यात जे जमल त्यात चक्क बरा वाटला,मला डिसिजन पटला,धोंगडेच्या गळ्यात सायलेंसर बसवला पाहिजे.
पण प्रसाद पर्सनल होत नव्हता,इतर घरातलेच वाद बाहेर आणत होते.
पण धोंगडे ने तर चक्क कबूल केल की माने पुढे जावेत म्हणून ती मुद्दाम देशमुखला त्रास देत होती आणि नंतर माने ,विकासच ठरलच होत की धोंगडे प्रसादला आऊट करेल ज्यावर बिबॉसने तिला मुख्याध्यापक करून पाणी टाकल,आणि हे दोघे अक्षय आणि अपूर्वा ला काढतील.
म्हणजे माने,धोंगडे आणि विकखस रडच खेळले.राखीने काडी टाकली.
अपूर्वा ओके होती पण तिच्या हातात काहीच नव्हत.
अक्षय मात्र स्पेशली टॉर्चर टास्कच्या नंतर लॉस्ट वाटत आहे.
आणि आतातर चक्क प्रसाद सारखा कनफ्युज्ड वाटत आहे.मध्येच अपूर्वाशी अबोला ,मग परत बोलण,मध्येच देशमुखला फुलस्टॉप ,मग परत तिच्याशी फ्लर्ट,मध्येच राखीच्या मागे काय जात आहे.ही कँप्टन्सी तर सपशेल फेल ठरली.
आज काय प्रसाद आणि त्याच्यामध्ये फाईट मग नंतर अपूर्वाशी पण म्हणे भांडला आहे.
मला काल अक्षयचं स्टुडंट
मला काल अक्षयचं स्टुडंट बेअरींग आवडलं, मिन्स तो फिजिकली टीचरच्या जवळ जात होता ते नाही पण माज जो आहे तो परफेक्ट वाटला, आमच्या शाळेत होती अशी मुलं, त्यातली बरीच दहावी झाली नाहीत पण राजकारणात पुढे आहेत आणि बिल्डर वगैरे आहेत. त्यानेही कळव्यात अशी मुलं बघितली असावीत त्यामुळे ते बेअरींग मला तरी करेक्ट वाटलं.
बाकी तो काही सुधारणार नाही, त्याला इतकं सांगून व्हिलनगिरी करत असेल ते स्क्रीप्टेड किंवा त्याचा स्वभावच माज असणारा असेल. मला त्याचा राग देशमुखला नापास करुन मानेला पास केलं तिथे खूप आला.
आता लोकांना प्रसाद, देशमुख लवस्टोरी बघायची इच्छा आहे, ही पुढे दिसली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
अर्धा एपिसोड मी फक्त हसत होते
अर्धा एपिसोड मी फक्त हसत होते, काहीही चाललेले राखीचे. हीलाच काढा आता. खरोखर चेटकीण वाटत होती. चीप लेवल असते बरेचदा.
प्रसाद दिसत नाही, बोलत नाही म्हटल्यावर त्याने फार गाजवलं, अक्षयतर अतिरेकीपणाच करतो.
स्वयंपाक, जेवणखाण ह्यावरून भांडण होत नाही असा एकही दिवस जात नाही.
राखी, धोंगडे, विकास, माने मिळून ठरवलं होतंना अक्षय अपूर्वाला काढायचे, मग धोंगडे काय उगाच नंतर हा विषय घेऊन बसली. मानेना बोलायला लागली अक्षयला का नापास केलं.
कोणीच कॅप्टन नाही झालं, भारी झालं. हयात कोणी कसं होईल. अपूर्वाने मानेना मस्त सुनावले टास्कमध्ये.
हिंदी -मराठी दोन्ही बिग
हिंदी -मराठी दोन्ही बिग बॉसमध्ये वादावादी सुरू झाली की कोणीही थांबायचं नाव घेत नाहीत. जे बोलायचं ते बोलून मग गप बसा तर ते नाही. तेच तेच रिपीट करतात किंवा शाळकरी मुलांसारखं मी नाही तुच्च. जणू काही थांबलात तर त्याच क्षणी एव्हिक्ट करतील. काल ती अमृता देशमुख एवढ्यासाठी बरी वाटली. तिने आरड्याओरड्यात शक्ती वाया घालवली नाही. पूर्ण एपिसोड पाहवत नाही.
राखीला बघून मायकेल जॅक्सनची आठवण येते.
राखीला एंटरटेनर म्हणून आणल
राखीला एंटरटेनर म्हणून आणल आहे किंवा एंटरटेनमेंट करण्याचे जेवढे पैसे तिला मराठी मेकर्सकडून मिळणार आहेत तेवढ्या पैशात तिच्या परीने ती एंटरटेंट करत आहे,ती जे काही करत आहे तीच तिची एंटरटेंटची व्याख्या आहे जे हिंदीत चालत,पण इथे ते चालणार नाही हे काल तिला नक्कु कळल असेल ऑर काल तिची देशमुखची निवड चुकली.पीठ फेकल्यावर तिला वाटल देशमुख पण काहीतरी फेकेल किंवा मारामारी होईल पण तस काहीही झाल नाही,देशमुखने छान हँडल केल.राखीने अपूर्वाला निवडायला हव होत,पण बाईसाहेब चुकल्या.
राखीला कळून चुकल असेल एव्हाना की आपले सो कॉल्ड एंटरटेंट फंडे इथे वर्क होणार नाहीत.
पु.ल नी जसे अंतू बर्व्याच्या तोंडी संवाद लिहिले होते" स्वातंत्र्य मिळाले म्हणजे काय तर साहेबच कंटाळला आणि निघून गेला." तसच राखीच कंटाळेल आता आणि निघून जाईल.
बाकी,कँप्टन्सी टास्क विदाऊट फिजिकल फाईट किंवा बहुमत ,कंन्विन्स करण्याव्यतिरिक्त किती छान करता आला असता.
कोड दोन्ही बोर्डसवर लावून त्यातले लेटर्स घरात लपवून शब्दातूनच हिंट देऊन उमेदवाराने समर्थकाच्या साथीने शोधायचे आणि लावायचे .जो जिंकेल तो कँप्टशन.पण बिबॉसला कँप्टनच नको आहे.
बिबॉसच वाट बघत असेल कधी एकदा सिझन संपतो त्याची.
तेजस्विनीचा एक इंटरव्ह्यू
तेजस्विनीचा एक इंटरव्ह्यू बघितला:
https://youtu.be/PggWCzupJ9M
अजुनच आवडली यार ती!
बाकी काल राखीने मजा आणायचा प्रयत्न केला..... अक्षय आणि प्रसादचे भांडण बघून हंगामामधला डायलॉग आठवला "दोनो सिर्फ बातोंके शेर है.... एक दुसरेको हाथभी नही लगायेंगे"
धोंगडे चिडली की वाट्टेल ते आणि वाट्टेल त्या भाषेत बोलते!!
अमृता देशमुखने चांगला पचका केला राखीचा.... आता अन्नाची नासाडी केली म्हणून मांजरेकर बघू काय बोलतात का ते राखीला!!
बाकी बिग बॉसला या दोघांच्यातल्या कुणाला कॅप्टन होऊच द्यायचे नव्हते
अमृता खरंच योग्यरीतीने पुढे
अमृता खरंच योग्यरीतीने पुढे जातेय.
ती झाली असती कॅप्टन तर आवडलं असतं, तो माजोरडा अक्षय काय त्या माने यांच्या फेवरमध्ये असतो काय माहिती. नशीब काल एकदाही word दिला नाही त्यांना.
"दोनो सिर्फ बातोंके शेर है.... एक दुसरेको हाथभी नही लगायेंगे" >>> हाहाहा.
अमृता खरंच योग्यरीतीने पुढे
अमृता खरंच योग्यरीतीने पुढे जातेय.>>>> हो, आवडलं ती इतकी शांत राहिली ते!
मागच्या आठवड्यात पर्क्स आणि
मागच्या आठवड्यात पर्क्स आणि या आठवड्यात पिअर्सने तारले बिग बॉसला, हे दोघे स्पॉन्सर्स मिळाले bb ना, हाहाहा.
आज राखीच्या उचापती बघून
आज राखीच्या उचापती बघून काहीच्या काही हसलोय..... खर म्हणजे सगळाच बालिशपणा चालू होता पण कुणास ठाऊक तिथल्या लोकांचे चेहरे बघून खुप हसायला येत होते..... विकास तर अगदी केविलवाणा झाला होता
बाकी ते फिलर टास्क सगळे फालतू होते!!
ती स्नेहलता काय चीप हावभाव करत होती.... डोळे बिळे मारत होती!!
पण मार्क द्यायला असल्या माठ लोकांना बसवल्यावर सेंसिबल निकाल अपेक्षित नव्हताच म्हणा!!
मी नेमकं स्नेहलता आणि
मी नेमकं स्नेहलता आणि देशमुखचे नाही बघितलं. बरं झालं लिहिलंत, आता बघायला नको. आरोह स्नेहलता, स्नेहलता करत होता जास्त.
बाकीच्यात मला अपूर्वा आवडलेली खरंतर.
आज राखीच्या उचापती बघून काहीच्या काही हसलोय..... खर म्हणजे सगळाच बालिशपणा चालू होता पण कुणास ठाऊक तिथल्या लोकांचे चेहरे बघून खुप हसायला येत होते..... विकास तर अगदी केविलवाणा झाला होता >>> हो हो , हाहाहा.
बाकी अक्षय डोक्यावर पडलाय,
बाकी अक्षय डोक्यावर पडलाय, निगेटिव्ह लोकांना ट्रॉफी मिळते का कधी. पाचात असला तरी खूप.
ट्रॉफी प्रसाद किंवा अमृता देशमुखलाच मिळेल.
स्नेहलताच एव्हिक्शन होणार
स्नेहलताच एव्हिक्शन होणार असेल म्हणून तिला विनर करून फेअरवेल केल असेल.
बाकी,राखीला नॉमिनेट करून काढण्याची शक्यता कमी वाटत आहे,वेगळ काहीयरी कारण देऊन काढतील.
>>म्हणून तिला विनर करून
>>म्हणून तिला विनर करून फेअरवेल केल असेल.
मला पण तेच वाटले पण आतल्या लोकांना काय माहित कोण एव्हिक्ट होणार ते!!
का यांना instructions येतात आत की अमुकतमुक ला विजयी करा वगैरे??
स्वरूप यांच्यासारखंच मनात आलं
स्वरूप यांच्यासारखंच मनात आलं.
ती धोंगडे काल अक्षयच्या किती जवळ जाऊन खोड्या काढत होती, तो तर आडवा पडलेला बेडवर as usual. एका एक्स्ट्रा शॉटस मध्ये देशमुखपण सेम करत होती. तो आणि अपूर्वा बहुतेक झोपाळ्यावर बसलेले. मुलींना एवढं काय त्याचं अॅट्रॅक्शन आणि म मां नी मुलींनाही बोलायला हवं. हे तर टास्कमध्ये नव्हतं.
अपुर्वा काय अप्रतीम सुंदर
अपुर्वा काय अप्रतीम सुंदर दिसते यार!
अभिनय देखिल उत्तम.
उद्याचा टास्क प्रसादला विनर
उद्याचा टास्क प्रसादला विनर ठरवणार, मेघा सिझन आठवला, तिचा सगळ्यांनी तिरस्कार केलेला, सेम होणार.
आजचा एपिसोड sarcastic होता , मस्त. मला म मां ओरडलेले बघायला आवडलं असतं.
मला अजूनही देशमुख वाटते
मला अजूनही देशमुख वाटते.प्रसाद टॉप 2मध्ये असेल कदाचित पण विनर देशमुखला करतील.
वोटिंग जबरदस्त असतं प्रसादला.
वोटिंग जबरदस्त असतं प्रसादला.
अक्षय एवढं काय हेट करतो प्रसादला, की इथेही नाही आणि बाहेरही भेटणार नाही त्याला. काल तो सॉरी म्हणाला की याला.
दरवर्षी माज असणारी आणि व्हिलनगिरी करणारी माणसे भरतात. लोकं ह्यांना हेट करतात हे ह्यांनाही आता चौथ्या सीझनला माहिती नसेल तर काय उपयोग.
जेवढे बोअर आठवड्याचे एपिसोड्स
जेवढे बोअर आठवड्याचे एपिसोड्स होते ,त्यापेक्षा दहापट बोअर आणि बोगस चावडी...अरे कुठे नेऊन ठेवलाय बिग बॉस माझा...
दहा मिनिटांचं sarcasm ठीक आहे..यांनी अख्खा एपिसोड sarcasm वर काढला...मांजरेकरांना खरोखरच replacement ची गरजे आहे आता...
पुंबा तुम्ही बघताय बघून छान
पुंबा तुम्ही बघताय बघून छान वाटलं. हो अपूर्वा सुंदर दिसते, अभिनयही छान करते पण टोकाचा आरडाओरडा करते.
ती, अक्षय, धोंगडे टोकाचे ओरडतात, कटकट करतात, माज दाखवतात म्हणून व्हिलन कॅटेगरीत आहेत.
>>दहा मिनिटांचं sarcasm ठीक
>>दहा मिनिटांचं sarcasm ठीक आहे..यांनी अख्खा एपिसोड sarcasm वर काढला
हो ना!! मला वाटले आत्ता संपेल नंतर संपेल पण त्यांना त्यातून बाहेर पडायचा चान्सच दिला नाही आतल्या लोकांनी..... माठ कुठले!!
त्यातल्या त्यात माने आणि अमृता देशमुखला कळले होते की काय शालजोडीतून बसतायत त्यामुळे ते गप्प राहिले .... बाकीच्यांचे सुरुच!!
अक्षय आणि धोंगडे ने काल परत एकदा वैताग आणला..... काय तो अरोगन्स !!
प्रसाद नेहमी भांडणात करतो तेच कालपण करत होता..... "तुला वाटले का तू ठरवले?"..... अरे काय फरक पडतो त्याने??
अपूर्वा ज्याप्रमाणे बसते, बोलते, रिॲक्शन देते चावडीवर त्यातून माज अगदी ओसंडून वहात असतो..... अनेक कलागुण असून आणि लीडरशिप क्वॉलिटी असूनसुद्धा विजेतेपदासाठी तिचा विचार नाही झाला तर त्यामागे हा 'माज'च कारणीभूत असेल!!
उलट काल आरडा ओरडा नव्हता
उलट काल आरडा ओरडा नव्हता म्हणून मला बरं वाटलं.
मांजरेकर किती इंग्रजी शब्द वापरतात. तेही कठीण कठीण. त्या लोकांतल्या आणि प्रेक्षकांतल्या किती जणांना त्यांचा अर्थ कळत असेल.
आणि त्यांना इतके रंगीबेरंगी कपडे कशाला देतात?
राखीला काही कळतच नव्हते
राखीला काही कळतच नव्हते तिच्याबद्दल काय बोलतायत ते का कळून पण तिने तिचे आठवडाभराचे बेअरिंग सोडले नाही कुणास ठाऊक!!
आरोहला प्रत्येक गोष्टीत काय बोलायचे होते काल?? अरे ते होस्ट आहेत ना तेव्हढ्यासाठी!! "नाही म्हणजे मला असे वाटले होते पण मी बोललो नाही" कशाला ते?
Sarcasm पाच मिनिटं ठीक वाटतं.
Sarcasm पाच मिनिटं ठीक वाटतं. तासभर खेचल्यावर मांजरेकर बिचारे वाटले आणि डोक्यात गेले. अर्थात आठवडाभर काय झालं काही माहीत नाही.
स्नेहलता आणि अपूर्वा लेव्हल हेडेड वाटले आणि आवडले. उगा मांजरेकराना फालतू भाव दिला नाही ते आवडलं. आरोह ही आवडला. थोडीफार धोंगडे ही बरी वाटली कारण तिने बाजू लावून धरली.
नाही हो अंजूताई, मला नाही
नाही हो अंजूताई, मला नाही पहायला मिळत येथे. युट्युबवरच्या क्लिप्स पाहून लिहिले.
युएसमधली मंडळी कुठे पाहतात बिग बॉस?
यु एस मधली आता कंटाळून मराठी
यु एस मधली आता कंटाळून मराठी बघत नाहीत, पण सांगायला येतील कुठे बघतात ते.
मांजरेकर किती इंग्रजी शब्द वापरतात. तेही कठीण कठीण. >>> हो मलाही डोक्यावरुन जातं. तरी हल्ली सुधारलं आहे मराठी. त्यांनी मागे कारण सांगितलं की बाबांनी त्यांना इंग्रजी मिडीयम मधे घातलं होतं. तरीही त्यांचं मराठी चांगलं हवं होतं कारण ते जिथे वाढले तो पुर्ण भाग तसा मराठी बोलणाऱ्या लोकांचाच होता.
आरोहला प्रत्येक गोष्टीत काय बोलायचे होते काल?? अरे ते होस्ट आहेत ना तेव्हढ्यासाठी!! "नाही म्हणजे मला असे वाटले होते पण मी बोललो नाही" कशाला ते? >>> हो. बरं त्याला नॉमीनेट केलं हा खरोखर फेअर डिसीजन होता. अक्षय बऱ्यापैकी फेअर होता एकंदरीत त्या टास्कमध्ये तरी मांजरेकर यांनी त्यावर टीका केली. त्यामुळे आरोह चढणार.
जस्ट एक निरिक्षण: अपूर्वा
जस्ट एक निरिक्षण: अपूर्वा नेमळेकर चावडीवर निम्मा वेळ साडीच्या निऱ्या, चुन्या काय असेल ते नीट करत असतात!!
Pages