Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या episode च्या सुरवातीला माने विकाससोबत भांडत होते तेव्हा स्नेहलता आतमध्ये म्हणाली, "नंतरची भांडणं ...6-7 पेग नंतरची "आणि ते खरंच वाटत होतं ...माने कसे वागत होते...बापरे!!!काहीतरीच...

खरच मिळत का .कारण हिंदीमध्ये कोणीतरी सांगितल होत की नो अल्कोहोल पण स्मोकिंग चालत जे आपणही आधीच्या सिझनमध्ये पाहिल आहे.

काय माहीती खरं काय ते.

राखी आणि आरोह सध्या रीकामटेकडे आहेत का, त्यांना ठेऊन घेतलं.

रोहीत गेला, मला आवडायचा पण गेमसाठी योग्य नव्हता तेवढा.

ती धोंगडे विशालच्या खरंच प्रेमात आहेका, कित्ती रडत होती.

येणाऱ्या आठवड्यात आरोह आणि राखीलाही काढतील.
राखीच बजेट मराठी बिबॉसला परवडणार नाही.
लवकर का नाही संपवत.कारण मराठी ऑडियन्स राखीला एक आठवडा सहन करेल.

येणाऱ्या आठवड्यात आरोह आणि राखीलाही काढतील.>>>मलाही असंच वाटतंय ....
ती धोंगडे विशालच्या खरंच प्रेमात आहे का?>>>नक्की माहीत नाही..पण मलाही तीच सौंदर्या वाटते...कारण ती काल बोलली की विशाल आणि ती मध्यंतरी बोलत नव्हते...आणि बिग बॉस 3 संपल्यावर काही महिन्यातच विशालने त्याचं ब्रेक अप झाल्याचं सांगितले ...नंतर कदाचित पुन्हा जुळले असेल..त्यामुळे मला तरी त्यांची chemistry आवडली....विशालच्या येण्याने फारच खुलली होती अमृता...मला ती आधीच आवडते...या आठवड्यात तर खूपच मस्त दिसत होती ती...विशाल गेल्यावर मात्र चेहरा खूपच उतरला तिचा...
अपूर्वाला कोणी काहीच बोललेलं अज्जिबातच सहन होत नाही....आरोहने नाॅमिनेट केलं तर आठवड्यात किती वेळा तेच बोलून दाखवलं....रोहित मला पण छान वाटायचा....विनाकारण भांडायचा नाही पण टास्क मस्त खेळायचा...तो गेल्यामुळे अक्षय खूप रडला....पण मला ते फेक वाटलं...अक्षय अतिशय धूर्त आणि लबाड माणूस आहे...आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास अपूर्वाला होईल कारण ती अतिशय सच्चेपणाने मैत्री निभावतेय....प्रसादचा गेम अगदीच भरकटलेला वाटतोय...

तो अ‍ॅक्ट रायडर्स काल म्हणाला, सौदर्या कोण ते त्याला माहीतेय, रिविल करणार नाही पण ती धोंगडे नक्कीच नाहीये, एवढं सांगू शकतो. कोणी कोणी पहील्या सिरीयलची हिरॉईन अक्षया हिंदळेकर सौदर्या आहे म्हणतायेत, कोणी कोणी ती इंडस्ट्रीमधली नाही म्हणतायेत.

देशमुखला विनर करतील, इथेच बहुतेक युपिने लिहीलेलं का आधी, तेच खरं ठरतंय.

तो अ‍ॅक्ट रायडर्स काल म्हणाला, सौदर्या कोण ते त्याला माहीतेय, रिविल करणार नाही पण ती धोंगडे नक्कीच नाहीये>>> नसेल कदाचित...कोणालाच सांगायचं नाहिये....इतकं काय गुलदस्त्यात ठेवायचं...असो....

अत्यंत टुकार चावडी. काहीही मुद्दे बोलायला नसणे हीच या सिझन ची हार आहे.
खरतर बोलायचं ठरवलं तर ममां ना या आठवड्यात पण बरच काही बोलता आलं असतं. विकास माने तु तु मै मै, कणीक गोळे, रोहित चा संचालक म्हणुन निर्णय, अपुर्वा ची आणि अक्षय ची भांडणे आणि अपु ची रडारडी ई ई.. पण ममां चा स्क्रीप्टरायटर बहुतेक सुट्टीवर होता आणि त्यामुळे तुम्हाला करायचय ते करा असं सांगितलं असेल त्यांना.
कधी एकदा चावडी संपते असं झालं पळवत पाहिला एपिसोड.
तेजा गेली त्यावर एक शब्द नाही. परत येणार की काय ?
देशमुख चं वारेमाप कौतुक. तिला आणी अक्षय ला टॉप २ मधे आणतील असं वाटायला लागलंय आता.
खरतर तिला आणि प्रसाद ला आणायचं असा मूळ प्लॅन असणार आहे पण प्रसाद इतका माठ वागतो की त्याला जर टॉप मधे आणलं तर लोकांच्या शिव्याच पडतील हे चॅनेल ला माहिती आहे.
काल पण फुल आणी काटे चा टास्क प्रसाद ला नेहेमीप्रमाणे कळलाच नव्हता. इतक्या महान माणसाला कसं काय आणतात ? जरातरी स्मार्ट्नेस पाहिजे ना.
आता या आठवड्यात बघण्यासारखं काही वाटत नाही. त्यातल्या त्यात राखी ला ठेवुन कदाचित अपुर्वा आणी राखी मधे तरी काही घडतं का बघतील असं वाटतय.

>>देशमुख चं वारेमाप कौतुक
आधीच्या काही आठवड्यांपेक्षा अमृता देशमुखने (काही क्रिस्पी चकमकी वगळता) फारसे काही वेगळे केलेय असे वाटत नाही!!
अमृता देशमुख आवडत्या स्पर्धकांपैकी असली तरी तिच्यात मला विनींग मटेरिअल दिसत नाही.... म्हणजे अजुनतरी दिसले नाही!!
बिगबॉसच्या घरात सगळ्यात हुकुमी अपील होणारा इमोशनल बॉंड मला तिचा कुणाबरोबरच होताना दिसला नाही..... प्रसाद आणि अक्षय बरोबर तिने प्रयत्न करुन पाहिला पण दोघेही तिला कधीच प्रायोरिटी देताना दिसले नाहीत आणि हे कळत असूनसुद्धा (कदाचित नाईलाज म्हणूनही) ती त्यांच्याबरोबर चांगलेच वागताना दिसली आणि तिच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये कायम प्रसाद आणि अक्षय इतरांच्या पुढेच राहिले!!
घरातला एकही स्पर्धक बाहेर पडताना अमृताला खुप दु:ख झालेय किंवा त्याच्या जाण्याने फार फरक पडलाय असे दिसले नाही आणि त्याच बरोबरीने बाहेर जाणारा देखील बाहेर पडताना अमृताला भरभरुन भेटलाय असे झाले नाही!! Individual खेळणे वगैरे ठीक आहे पण इमोशनल कनेक्ट वगैरे घरात तिला कुणाबरोबरच तयार करता आला नाही..... जो आधीच्या सीझनच्या विजेत्यांचा strong point होता Happy

मी आधीही इथे लिहले होते की अपूर्वा तिला खुपदा बोलता बोलता लागेल असे बोलत असते.... अक्षय अनेकदा तिला ग्रॅंटेड पकडतो पण त्याविरुद्ध ती कधीच रिॲक्ट होताना दिसत नाही..... कदाचित घरात अगदीच एकटे पडू ही भिती त्यामागे असेल पण मग अश्याने तिचा करारीपणा सिलेक्टिव्ह वाटायला लागतो..... माने, धोंगडे, विकास वगैरेंशी पंगा घेणे सोपे आहे कारण ते सॉफ्ट टारगेट आहेत आणि त्यांच्याशी भांडणे केल्यामुळे अक्षय आणि अपूर्वाच्या ग्रूपमधल्या तिच्या स्थानाला फारसा धक्का लागत नाही..... पण मग हे कुठेतरी फारच सेफ खेळणे झाले; अश्याने ती विनर होणार नाही!!
कचकच करणे; भांडत बसणे; मेलोड्रामा करणे हा तिचा खरा स्वभाव नाहिये (आणि म्हणूनच ती आवडायला लागली); काही गोष्टी ती स्वभावाविरुद्ध जाऊन करते हे तिनेपण मान्य केलय पण हे करायला माणूस मुळातून जरा श्रूड असावा लागतो..... हळवेपणाचा आणि आक्रमकपणाचा योग्य समतोल (फेक न वाटून देता) ज्याला जमतो तो लोकांना आवडायला लागतो आणि म्हणूनच लोकांना तेजस्विनी इतकी आवडायला लागलेली!!
आता ती नाही तर अमृता देशमुखला एलेव्हेट करुया असे चॅनेलला वाटत असेल तर मग काही सांगता येत नाही!!
अमृता देशमुखला विनर करायचेय चॅनेलला म्हणून तेजस्विनीला तिची दुखापत इतकी गंभीर नसताना बाहेर काढले असे म्हणणारे लोक भेटतात तेंव्हा त्यांच्या बालिशपणाची कीव येते!! बाहेर इतका सपोर्ट असणारी तेजस्विनी गेममध्ये असणे शोच्या लोकप्रियतेसाठी चांगले की वाईट?? कुणा अमुकतमुकला जिंकवण्यासाठी TRP शी खेळायला प्रॉडक्शन हाऊस किंवा चॅनेलवाले इतके दुधखुळे नसतात!!

बाकी प्रसाद ज्याप्रकारे घरात वावरतोय ते बघूनही प्रसाद आवडणारे खरेच कुणीतरी असतील असे अज्जिबात वाटत नाही..... सॅंपल साईझ म्हणून मायबोलीवरचे प्रेक्षक जरी म्हंटले तरी प्रसाद आवडणारे किंवा त्याचे फॅन असणारे किमान दोन चार लोक तरी इथे दिसायला पाहिजे होते..... ती एकतर पीआर/पेड आर्मी असावी किंवा मग वेगळे कुठलेतरी बिगबॉस बघत असावेत Wink

कोणीही विनर मटेरीयल नाहीये यावेळी. एक बरी होती ती गेली बाहेर.

एरवी व्हिलन लोकांना दोन नंबरला आणतात पण अक्षयला आणतील असं वाटत नाही. त्याला नडायला आणि प्रसाद अमृताला सपोर्ट करायला आरोहला ठेवलं आहे. प्रसादला वोटिंग तूफान असतं, पण तो तीनात येण्याइतका आत्तातरी वाटत नाही. आणतील त्याला पण पहिल्या तीनात.

अक्षयने अजून काही मारामारी, चूक केली तर बाहेर काढतील, त्याला जाम शिव्या पडतायेत आणि चावडीवर उद्धटपणा करतो तो त्यामुळे, म मां खार खाऊन असणार. धोंगडे बाई गेम चांगली खेळते पण बाकी भांडत असते पण ती असेल पाचात नक्की.

मला प्रसाद आणि अक्षय आता एका नाण्याच्या दोन बाजू वाटायला लागलेत एक अति positive रहायचे म्हणून काहीच करत नाही, एकाला व्हिलन म्हणूनच राहायचं आहे माज दाखवत, सुधारणा करायचीच नाहीये, अशी लोकं जिंकत नाहीत हे त्याला माहितीही असेल पण तो टास्क चांगला खेळतोय.

ती एकतर पीआर/पेड आर्मी असावी किंवा मग वेगळे कुठलेतरी बिगबॉस बघत असावेत >>> हाहाहा, असेलही तसं. सामान्य लोकं पण वाटतायेत त्याच्या बाजूने, इथे मा बो कर कोणी नाहीये मात्र. तेजु होती तेव्हाही तो वोटिंग मध्ये एक नंबर दाखवायचे. बरेच कमी जण म्हणतात प्रसाद काहीच करत नाही, अगदी नगण्य आहेत मग त्यांना इतर लोकं सो कॉल्ड प्रसाद fans नडतात. हे फक्त मी youtube खालच्या कमेन्टस वाचून लिहिलं.

राखी आणि आरोह ठरवून भांडतायेत का.

फेअर खेळायच्या नादात अक्षयने दोन्ही मैत्रिणींना नॉमीनेट केलं. स्नेहलता जाऊदे आता.

धोंगडेला केलं असतं तर आवडलं असतं मला, अपूर्वा बेटर वाटते टास्कवजा तिच्यापेक्षा. प्रसादला वाचवायला हवं होतं का त्याने. त्याच्या fans च्या गुडबुक मध्ये गेला असता, हाहाहा.

आरोहचे सगळे आडाखे चुकवले मात्र त्याने, आरोहला वाटलेले देशमुखला नॉमीनेट करेल, वाचवले त्याने. अपूर्वाला वाचवेल असं वाटलेले तर नॉमीनेट केलं त्याने.

स्नेहलता आणि विकास फायनली नॉमिनेट झाले.
मला वाटत,आरोहऐवजी बिबॉसने आदिशला विचारल असेल,तो परफेक्ट होता,त्याने नाही सांगितल म्हणून आरोहला घेतल.
आज खरतर मला नीटस कोणाचच काही ऐकू आल नाही
पण देशमुखला जिंकवणार हे मेकर्स.

अक्षय फेअर खेळला ते चांगलं झालं.. पण खेळाच्या नवव्या आठवड्यात कोणत्या स्पर्धकांना नॉमिनेट करायचं हे एका स्पर्धकाच्या हाती असणं हे किती अनफेअर आहे...#unfair bigg boss
Overall कित्ती बोअर होता आजचा एपिसोड...काल मांजरेकरांनी तुम्ही दिसत नाहिये काय सांगितलं ...आज सगळे एकदम अलर्ट झाल्यासारखे जीव तोडून भांडायला लागले... Lol

प्रसाद काहीतरी बोलावा म्हणून राखी काहीही करते का, इतका बिनधास्तपणा, असभ्यपणा मराठीत नको. बघवत नाही. प्रसाद बिचारा गांगरला पण मस्त विरोध केला, चांगला वाटला तिथे

बाकी आरोहचे काही मुद्दे बरोबर असले तरी, बाप काढणे बरोबर नव्हतं. त्याने अक्षयला शिव्या दिलेल्या त्यामुळे तो देतो शिव्या हे अक्षयचे चुकीचे नव्हतं. मला राखी अति असभ्य वाटते, आरोह चम्या वाटतो, सभ्य आहे पण जितका दाखवतो तितका नाही. शिवच्या सीझनला व्हिलनगिरी तर करत होता.

बाय द वे प्रसादचे खरंच प्रेम आहे का अमृतावर, वाटतं. तिचं काही समजत नाही. मला त्यांचे डायलॉगज नीट समजलेच नाहीत.

तो तक्रारखोर, रड्याच आहे. त्याला अक्षयने कोलीत दिलं नाही, अपुर्वा स्नेहलताला वाचवून, त्यांना नॉमिनेट केल्याने, देशमुख आणि धोंगडे बरोबर अक्षयविरोधात गॉसिप करायचा एक चान्स गेला.

सत्तर टक्के वोटस एकट्या प्रसादला आहेत, त्यालाच ट्रॉफी द्यायला लागणार, हाहाहा.

प्रसादला मिळणारी प्रचंड वोट्स आता कमी होतील अस वाटत नाही,एक तेजूच आणि नंतर थोडीफार देशमुख त्याला टक्कर देत होत्या.प्रसादने पहिले दोन ,तीन वीक दणाणून सोडून स्वत:ला सेंटरला ठेवल आणि ज्याच्या त्याच्या तोंडी स्वत:चच नाव राहिल अशीही सेटिंग केली.
मग नंतर तो कन्फ्यूज्ड झाला रादर ते सोंग पांघरल पण तरीही चर्चेत राहिला.
त्याच्यावरून तो असताना वा नसताना भांडणही झाली,मानेंना त्याचा हा गेम कळला आणि त्यांनी चावडीवर सांगितलाही.पण असेच सिंपथी घेणारे लोक वोट्समध्ये पुढे असतात हे तेजूला कळल आणि उत्तम टास्क खेळणार्या आणि डोक लावणार्या धोंगडेला कळल नाही,म्हणून तेजूने प्रसादशी फारकत अशी कधीच घेतली नाही,आणि जबरदस्त सिंपथी मिळवून ती तर चक्क संभाव्य विजेती म्हणून गणली गेली पण दुर्दैवाने बाहेर गेली.
आता तिच्यानंतर लेडीज मध्ये प्रसादच्या तशी जवळ असणारी देशमुख ,तिच्यावर बिबॉसने फोकस केला आहे.
राखीला प्रसादला पहिला प्रसाद करण्यासाठीच अजून एक आठवडा दिला असावा.ह्याची थोडी झलक काल पाहायला मिळालीच.
देशमुख आणि प्रसादचा संवाद, नीटसा कळत नसूनही सोमिवर लोकांना आवडतो काल तिला तो आय लाईक यू म्हणाल्याच मात्र क्लिअर ऐकायला आल.
आता आज म्हणे त्यांच्यातल कडाक्याच भांडण मग पँचअप वगैरे दाखवणार आहेत.
प्रसाद सोमिवर फेमस आहेच,वोट्स मध्ये अव्वल आहे,टास्क छान खेळतो, यश कमी मिळत पण लॉयल्टी दिसते आणि झोकून देऊन खेळतो आता जर राखीमुळे बोलायला लागला तर त्याला विनर करतीलच.देशमुखही असेलच रेसमध्ये.
बघू काय होत आहे ते.

छान विश्लेषण युपि.

आता तोच जिंकेल वाटू लागलं आहे. अति सिंपथी मिळते त्याला मात्र. काल अक्षयने त्याला वाचवायला हवं होतं, लोकं अक्षयवर खुश झाले असते.

विनर मटेरियल मात्र कोणीही नाही खरं तर. तेजुच वाटायची जास्त.

अपूर्वा काल एक वाक्य मात्र बरोबर बोलली धोंगडेबद्दल, ती स्वार्थी आहे. अर्थात तो गेमचा भाग आहे.

मला तर प्रसाद अजिबातच deserving विनर वाटत नाही...तो जर जिंकला तर 60 दिवस काहीही न करता शो जिंकता येतो असं example set होईल...अशा नाटकी लोकांना न समजता sympathy देणारे पण ग्रेटच..

धोंगडे काल मानेंना सांगत होती की विकासला इग्नोर करा आणि विकासला सांगत होती की लोक तुला इग्नोर करतील पण तू तिकडे लक्ष देऊ नकोस!!
ती एकटी पडल्यासारखी झालीय त्यामुळे तिला विकास आणि मानेंमध्ये फूट पाडून मानेंच्या जवळ जायचय बहुतेक..... काल उगाच राखीच्या बाजूने आवाज लावत होती...... उगाच म्हणजे अगदी उगाचच!!
प्रसादला काहीतरी चुगलीचे सांगायला गेली तर ते चांगलेच बॅकफायर झाले आणि मधल्या मध्ये मानेंना फटका बसला Wink

प्रसाद आणि अमृता मध्ये अजुन एक प्रायोगिक नाटकातला संवाद झाला..... इतरांपेक्षा दोन टक्के जास्त काय, टक्कल काय, गुलाबी गाल काय, त्यावरची दाढी काय!!

आरोहचे बोलताना जरा चुकलेच पण राखीला एव्हढा राग यायचे कारण काय? थोड्या वेळापूर्वी तिने स्वताच अपूर्वाचे आईबाप काढले होते.... जेंव्हा अपूर्वा राखीला स्वयंपाक झाल्यावर गिळायला ये म्हणाली होती तेंव्हा!! राखीचे उगाच आपले वाढीव!!

अक्षय काल चांगला खेळला..... त्याचे चारही निर्णय फेअर वाटले..... अपूर्वा निकष सोडून बोलली नसती तर ती झाली नसती नॉमीनेट पण तिने जी जास्तीची बडबड केली त्याचा फायदा धोंगडेला झाला आणि चक्क अक्षयने योग्य निर्णय दिला!!

काल मानेंचा मीपणा परत एकदा जाणवला..... धोंगडेला म्हणाले की विकासला भिती वाटते की त्याला जश्या युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या तश्या तुला सांगितल्या तर!! अरे??
परवा पण कुठेतरी एपिसोडमध्ये का extra shots मध्ये विकास म्हणत होता की तो नाचण्यापेक्षा नाच न येणाऱ्यांकडून त्याने नाच करुन घेतला हे जास्त कौतुकास्पद आहे तर लगेच माने म्हणाले की माझेसुद्धा असेच आहे; अभिनय वगैरे म्हंटले की सर म्हणालेच ना की तू चांगले करणारच; तुझ्याकडून अपेक्षितच आहे का असेच काहीतरी म्हणजे स्वताचा मोठपणा सांगायची एक संधीसुद्धा सोडत नाहीत Wink

आजचे bb अति फालतू. टोकाची भांडणे, वाचाबाची आणि असभ्य.

अक्षयची आंघोळ वगैरे इतकं फालतू. ती देशमुख डोक्याला मालीश करत होती ते प्रसादही एंजॉय करत होता. राखीला bb ने सांगितलं का आंघोळ घालायला. किती घसरवतात पातळी, हे बघून दोन चार बघणारेही बंद करतील.

बंद केला टीव्ही. राखी शिकवायला आली आणि सगळे विद्यार्थीही बिलो द बेल्ट विनोद करू लागले, ऐकायला अश्लील वाटलं मला.

मलाही तसाच वाटला पण कशासाठी ही पातळी. ह्याने trp वाढणार आहे का.

उद्या अक्षय प्रसाद मारामारी असं live वर बघून न्यूज टाकली आहे कोणीतरी. चाललंय काय.

उद्या अक्षय प्रसाद मारामारी असं live वर बघून न्यूज टाकली आहे कोणीतरी.....
ती मारामारी म्हणजे देशमुख टीचर असताना ती कोणाची यावरून झालेली आहे,लुटुपुटुची.कुठल्या शाळेत अस होत?.असो,टीआरपी के लिए कुछ भी.
पण कालचा भाग अपूर्वा आणि विकासच भांडण वगळता,सोमिवर सगळ्यांना आवडला.तो राखीचा सालसा,तिच अपूर्वा आणि अक्षयच्या अंगावर जाऊन पडण,अक्षयला अंघोळ घालण,प्रसाद आणि देशमुखच भांडण हे ही आवडल.मला अस वाटल होत दोघांच्याही एक सणसणीत द्यावी,प्रसादच रँप सॉंग पण आवडल,
आणि प्रसाद बोलला चा तो इफेक्ट असावा.
पण खूप एंजॉय केला लोकांनी.
शाळा मला फारशी नाही एंजॉय करता आली.कंटाळा आला.त्यातल्या त्यात.मग देशमुखच बरी वाटली.
म्हणजे हे जर लोकांना आवडत असेल तर राखीला झेलाव.लागणार ना.
न बघितलेल बर वाटायला लागल आहे.पण इता चारच आठवडे राहिले आहेत म्हणून सोडवत पण नाही.

कालचा भाग सुरुवातीचा काही वेळ नाही बघायला मिळाला पण मधूनच बघितला तेव्हढा आवडला!!
अक्षय, अपूर्वा आणि राखीची मस्ती छान चालू होती
प्रसाद इतका बेभरवशाचा आणि विक्षिप्त आहे की काल ज्या मुलीबरोबर इतके गुलूगुलू बोलत होता आज तिच्याशी काही कारण नसताना भांडला!!
PDA जमत नसेल तर ठीक आहे पण PDI तरी करु नकोस.... बिच्चारी अमृता!! कश्याला इतकी मागे लागती त्या येडपटाच्या कुणास ठाऊक!!

शाळेत शिक्षकांनी काही विशेष मज्जा आणली नाही तरी पोरे अवली होती त्यामुळे छान वाटत होते बघताना!!
अमृताचे "शीला की जवानी" आणि "अर्पुवा" भारी होते!!
किरण माने डायरेक्ट "उसातच" शिरले पण त्यांचे इतर one liners भारी होते..... खोटे असते पण खरे वाटते ते नाट्य वगैरे छान जमलेले!!

आजचा एपिसोड धमाल होता.

धोंगडे टारगटपेक्षा किरकिरीच जास्त वाटली, विरुद्ध टीमने उगाच डोक्यावर चढवले तिला, नापास झाल्यावर पारा इतका चढला की बास रे बास, प्रसादच्या अंगावर धावून जात होती. अक्षयने माने यांच्यापेक्षा देशमुखला सेव्ह करायला हवं होतं. माने यांना एवढा का भाव देतो तो.

टारगटपणा मध्ये अक्षय एक नंबर, त्याने जे बेअरींग पकडले तसे विद्यार्थी आमच्या शाळेत जवळून बघितले आहेत, फक्त शाळा त्यांच्या वडलांची नव्हती इतकंच. त्यामुळे मी ते खूप रिलेट केलं. फार भारी वाटलं ते.

अक्षय कुठपर्यन्त जाईल माहिती नाही पण त्याला व्हिलनचे रोल नक्कीच मिळतील बाहेर.

अपूर्वाने चांगलं केलेलं, विकासने उगाच नापास केलं तिला. अर्थात अपूर्वा आणि अक्षयला काढायचे आधी हे ठरलं होतं समोरच्या टीमचे.

उद्या प्रसाद, अक्षय ugly फाईट आहे.

Pages