Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समु गेली, मला आवडायची>>> मला पण आवडायची आणि देशमुख पेक्षा ती deserve करत होती असं अजूनही वाटतंय...त्या आरोह पेक्षा आदिशला आणायला पाहिजे होतं...आरोह फारच बोअरींग आहे..

त्या गेस्टमध्ये जास्त फुटेज राखी सावंतलाच असेल.तिला बहुतेक एंटरटेनर म्हणून आणल असाव.
बघू ,त्याने तरी टीआरपी वाढतो का.
बाकी सँम तशी जाणारच होती पण त्याआधी देशमुख, रोहित,स्नेहलता यांचे नंबर लागायला हवे होते.
मला तर वाटत आहे की देशमुखला आता पाचात नेतात की काय?

बाकी सँम तशी जाणारच होती पण त्याआधी देशमुख, रोहित,स्नेहलता यांचे नंबर लागायला हवे होते. >>> हो. देशमुखला वोटिंग चांगलं होतं, ती प्रसाद तेजा यांना प्रचंड वोटिंग असतं.

मी अक्षय समृद्धीला वोटिंग केलं होतं. अक्षयला जरा जास्त केलं होतं पण दोघांना मिळून वीस वगैरे, हात दुखतात.

देशमुखला माने डोक्यावर चढू नयेत म्हणून ठेवलं असेल, त्यांना वाटेल बघा मी कसं घालवले हिला.

राखी सावंत बिग बॉसमध्ये कितीदा येणार आहे? बिग बॉस (हिंदी) च्या पहील्या सिझनमध्ये नियमीत सहभागी होती, व 14 व 15 व्या सिझनमध्ये चॅलेंजर म्हणून होती. ह्याशिवायही बहुतेक सिझनमध्ये पाहुणी म्हणून यायचीच. मला वाटत की तिचा इंडेमोल इंडीया (बिग बॉसचे निर्माता) व व्हायकाम 18 शी (कलर्स) शी करार असावा, ज्याद्वारे तिला गरज पडल्यास लगेच बोलवत असावेत. तिला भरघोस रक्कमही मिळत असेल, ज्यामुळे वर्षभराची कमाई होत असेल. एरवीही ती तशी सोशल मिडीयावर काही वादविवाद करण्याशिवाय इतर काहीही (मालिका, चित्रपट, वेबसिरीज वा रिएलिटी शो) करतांना दिसत नाही.

देशमुखला माने डोक्यावर चढू नयेत म्हणून ठेवलं असेल, त्यांना वाटेल बघा मी कसं घालवले हिला.>>>हो ते पण आहेच...तिला अगदीच चुकीच्या पद्धतीने nominate केले होते

कालच्या एपिसोडबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही!!

आता हे चार गेस्ट कुणाला काय सल्ले देतायत त्यावरुन बिगबॉसच्या मनात नेमके काय आहे ते स्पष्ट होईल!!
हे असले गेस्ट पाठवण्यापेक्षा एकहाती गेम बदलणारा वाईल्ड कार्ड पाहिजे
Youtube वर एक पोस्ट बघितली त्याखाली कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी माधवी निमकरचे नाव घेतले होते!!
समृद्धी बाहेर पडली.... फेअर खेळत होती ती!! यावेळी बाहेर पडताना बाहेर पडणारा/घरातले कुणीच जास्त सेंटी होताना दिसत नाहियेत..... जेवढया तेवढ्यापुरते सगळे एकमेकांबरोबर जुळवून घेतायत असे दिसतेय.... no real connection!!

हे चँलेंजर्स वगैरे प्रकार बिबॉस टरत कशाला,ते घरातले लोक काही मंद नाहीत की त्यांना कळणार नाही हे का आले आहेत.ममांना जुमानत नाहीत तर यांना काय जुमानणार.बिबॉसच्याच टीप्स घेऊन आले आहेत हे कळत त्यांना.
आता युट्युबवर एक व्हिडीओ पाहिला ज्यात मीरा अक्षयला प्रसादला नड अस सांगत होती आणि तो ही तिच्याशी स्वत:ची बाजू मांडतच बोलत होता पण बधत नव्हता.शेवटी हे लोक यांना हव तेच करणार आहेत कारण हे कॉम्पिटिटर्स नाहीत हे माहीत आहे.
टीआरपी वाढवण्यासाठी जबरदस्त वाईल्डकार्ड हाच पर्याय होता पण आता तोही गेला कारण साठ दिवसांच्या आत वाईल्डकार्डला आणायच असत.ःतर बिबॉसने यांना आणल.

वीकेंड चे दोन्ही एपिसोड पाहिले. प्रसाद तेजा कौतुक सोहळा होता. जसं काही पुर्ण आठवड्यात त्यांनी काहीच चुकीचं केलं नाही.
प्रसाद ची मिमिक्री केली म्हणुन अपुर्वा आणि अक्षय ला बोलले पण नंतर स्वत: पण तेच केलं ते चाललं वाटतं.
प्रसाद ला टास्क पण कळत नाहित. ओझं टास्क कळलाच नव्हता त्याला. खरच मंद आहे राव तो. आणि चेहेरा एकदम मख्ख पुर्ण एपिसोड.
अपुर्वा ला अ‍ॅक्टींग ची कार्यशाळा म्हणाले ते पटलं. एरवी पण घरात काही ना काही किस्से सांगताना तिचा चेहेरा आणि एक्स्प्रेशन्स कमाल असतात.
अक्षय ला मुलींना नीट धरलं नाही म्हणून बोलले ते प्रसाद ला पण बोलायला हवं होतं. त्याने पण समृद्धी आणि अपुर्वा ला कसंपण धरलं होतंच टास्क मधे.
सॅम पेक्षा रोहित ला घालवायला पाहिजे होतं खरतर असं मला वाटलं.
वाईल्ड कार्ड/ किंवा पाहुणे मधे राखी ला का आणलंय ? अरे रे ... त्यापेक्षा बिचुकले चालला असता Wink

चॅलेंजर म्हणजे काय?.....
घरातल्या लोकांसोबत राहून टास्क वगैरे खेळणे,चँलेंज करणे.आपण खेळायला आलो आहोत ,आता आमच्याशी गाठ आहे वगैरे अर्थ असावा.
पण माझ्यासाठी ,या सिझनचा घसरता टीआरपी वाढवण्यासाठी बिबॉसने केलेला शेवटचा केविलवाणा प्रयत्न.असाच अर्थ आहे.
कारण हिंदीमध्येपण राखीला टीआरपी वाढवण्यासाठीच चँलेंजर म्हणून आणल होत,पण माझ्या मते फार काही टीआरपी वाढला नव्हता.

घरातल्या लोकांसोबत राहून टास्क वगैरे खेळणे,चँलेंज करणे.आपण खेळायला आलो आहोत ,आता आमच्याशी गाठ आहे वगैरे अर्थ असावा.>>पण मग ते wild cards नसतात का?

नाही,वाईल्डकार्ड नवीन असतात,हे आधीच्याच सिझन्समधले आणले आहेत,पण घरातल्यांना वाईल्ड कार्ड म्हणून सांगत असतील.
राखी म्हणे हिंदीमध्ये दोन वेळा चँलेंजर म्हणून येऊन गेली आहे.

>>प्रसाद ची मिमिक्री केली म्हणुन अपुर्वा आणि अक्षय ला बोलले पण नंतर स्वत: पण तेच केलं ते चाललं वाटतं.
माझी बॅट; माझी बॅटींग..... दुसरे काय!!

विशाल निकम आणि आरोह बोअर वाटतात चॅलेंजर म्हणून!!
राखी सावंत चे काही माहिती नाही पण मीरा जगन्नाथनेच काही मजा आणली तर काहीतरी हॅपनिंगवाला स्कोप आहे!

जय दुधाणे, आदिश वैद्य. नंदकुमार चौगुले, शिवानी सुर्वे, बिचुकले वगैरे लोकांना तरी आणायचे चॅलेंजर्स म्हणून!!

तो हॉटेलवाला टास्क अजुन झाला नाही ना या सीझनला? तिकडे एक सगळ्यांचा ॲटीट्यूड बाहेर पडतो!!

पण मीरा जगन्नाथनेच काही मजा आणली तर काहीतरी हॅपनिंगवाला स्कोप आहे!.....
अपटेडनुसार मीराने आल्यावरच मी हे करणार नाही,ते करणार नाही करायला सुरूवात केली आहे.तीच काय करेल ते,पण त्यांना या लोकांना फार काही फरक पडेल अस वाटत नाही.
अपूर्वा, अक्षयला तर नाहीच नाही,प्रसादलाही नसेल .कारण आतापर्यंत आपण पहिल्या पाचात असू असा अंदाज त्यांना आला असेलच.

काही फार न करता ट्रॉफी जिंकू शकतो तो म्हणजे प्रसाद. त्याच्यापेक्षा तेजु जिंकली तर चालेल मला.

प्रेक्षकांना तो आवडलाय मग bb आवडून घेणार.

आदिश वैद्य आणि चौगुले हवे होते.

टीआरपीची अपेक्षा करूच नये आता, हिंदी मराठी सीझन बरोबरीने आणलाय त्यात तिथे शिव आहे, लोकं तेच बघणार.

टीव्हीवर बघणारे एकच बघतील. बिग बॉस बघणारं पब्लिक जास्त करून नेटवर पाहणारं असावं (इथलं नाही, जनरल) ते दोन्ही बघू शकतात.
शिवाय फक्त मराठी बघणारा एक ऑडियन्स असेलच.

टीआरपी कसा मोजतात, टीव्हीवर त्याच वेळी बघितलं की धरतात का एकंदरीत नेटवर बघितलं तरी जमेस धरतात आणि सगळं मिळून काढतात. माझा समज असा आहे की टीव्हीवर बघितलेलं धरतात.

काही लोकांच्या सेट टॉप बॉक्समध्ये ट्रॅकर लावतात. त्यावरून टी आर पी मोजतात. सँपल डेटा.
. नेटवरचं अ‍ॅक्च्युअल कळेत असेल.

मी मागे दोन चार सीझन पाहिलेत हिंदीचे.... मराठी सुरु झाल्यापासून हिंदी बघणे सोडून दिले..... दोन्ही दोन्ही म्हणजे खुप जास्त टाईमपास होतो आणि एकदा बघायला लागले की ॲडिक्ट व्हायला होते!!

पहिल्या सीझनला फुल्ल मेघा धाडे सपोर्टर होतो.... दुसऱ्या सीझनला नेहा शितोळेचा गेम आवडायचा..... तिसऱ्याला विकास आणि सोनाली आवडायचे आणि आता यावेळी तेजस्विनी, अपूर्वा आणि अमृता देशमुख (वेगवेगळ्या कारणांसाठी) आवडतात

शिवाय फक्त मराठी बघणारा एक ऑडियन्स असेलच.>>> माझ्यासारखा... Happy ...मी हिंदीचे छोटे छोटे शॉट्स बघते...पण पूर्णपणे मन लावून, पूर्ण एपिसोड्स फक्त मराठीचेच...हिंदी मधले भांडणं बघणं मेरे बस की बात नाही...मराठीत पण निरर्थक भांडणं चालू असेल तर आवाज कमीच करते...पण आवडतं मला मराठी bb बघायला..

राखी फुल एन्टरटेनर आहे. मजा आणेल थोडे दिवस तरी. पण कदाचित मराठी ऑडियन्स ला तिची एन्टरटेनमेन्ट "जरा जास्त" होऊ शकते Happy
बाकी मीरा ठीके, उत्कर्ष चालला असता, विशाल चा स्वभाव वेगळाच आहे. तो कुणाला दिशा दाखवण्याचे वगैरे काम करेल याची शंकाच आहे पण हुकुम्शहा टाइप टास्क मधे तो काय करेल हे बघायला आवडेल.

राखी हा शेवटचा प्रयत्नं असावा हा फ्लॉप सिझन अपलिफ्ट करायचा.
राखीने काहीतरी मजा आणु देत आता, घरातल्या मिळमिळीत कॉन्टेस्टन्ट्सना तडका मारा थोडा !

https://youtu.be/daZlaUOf3Lo
छान इंटर्व्ह्यू दिला आहे.
खरच हिला जाण्याआधी बिबॉसबद्दल ,किंवा मराठी बिबॉसबद्दल फारस माहित नव्हत का? स्प्लिट्सव्हिला मधून आली होती ना,मग काही गोष्टी माहित असायला हव्यात.
असो पण छान बोलली आहे.

यावेळी हिंदी बिग बॉस मध्ये राखीची जरूर नाही. तिथे तिची धाकटी बहीण अर्चना आहे. म्हणून मराठीत राखीला पाठवले.

कसला बोअर एपिसोड होता.

मला कोणीच आवडलं नाही चारात. बिग बॉसने पढवून पाठवलेले, कोणाला नॉमीनेट करायचं ते. प्रसादच्या सिंपथी घेण्यावर, कंफ्यूजनवर आणि अक्षयच्या anger, अतिशहाणपणावर वर सगळे बोट ठेवत होते. म मां हेच सांगतात की.

रोहित जाईल यावेळी बहुतेक. त्याच्याआधी समृद्धीला का काढलं हा प्रश्न आहे.

अक्षयला votes मिळत नाहीत म्हणून नॉमीनेट केलं नाही.

त्यातल्या त्यात मला मीरा बरी वाटली. तेजुलाही सुनावले तिने. देशमुख तिची अॅक्टिंग छान करते.

राखीने म मां च्या उलट सांगितलं मानेना ते बघून मजा आली. बिग बॉस मध्ये मुलगा मुलगी भेदभाव का करायचा, मुलीने पकडले तर तुम्ही सोडवून का नाही घेतलं स्वत:ला. ते चांगलं दिसत नाही असं आम्हाला सांगितलं, कोणी बिग बॉस असं सांगणार नाहीत. माने म्हणाले host नी सांगितलं. भारी वाटलं ते. इथे मला राखी rocked म मां shocked वाटलं.

अर्थात मी मुलीना चुकीच्या पद्धतीने पकडायच्या विरोधात असले तरी समहाऊ हा संवाद फुल एन्टरटेनिंग वाटला. बिग बॉसच्या मनात काय आहे समजेना. हे का बोलायला लावलं.

फार म्हणजे फारच बोअर एपिसोड होता.स्मिता,मिनल हव्या होत्या.त्यख राखीला काही क्षणच टॉलरेट करता येत नंतर नाही.
यावेळी रोहित जाईल.काढायचच होत तर मग सँमला ठेवून त्याला काढायच ना.
सरळ सरळ पढवून पाठवल आहे ते टळत होत.
मला नाही वाटत वाढेल टीआरपी.

कमी होईल trp .

आरोह बोअर आहेच पण विशालही बोअर वाटला.

अगदी पढवून पाठवलेल चक्क कळत आहे.
तेच तेच येऊन सांगत आहेत.
यावेळी रोहितला काढतील,अरे मग आधीच्याच आठवड्यात काढायच ना,सँम राहिली असती अजून एक आठवडा.
तिला वोटिंग असूनही काढल.
तेजू टास्क खेळू शकणार नाही, सँम नाही.अपूर्वा,धोंगडेचा आरडाओरडा जास्त,राखीला फार खेळवतील अस वाटत नाही.म्हणजे यावेळी मेल फाईट बघायची आहे.

राखी ला एक आठवडा बघायचं म्हणजे शिक्षा आहे.
अदे, प्रसाद, अपुर्वा आणि रोहित ... ठरवुन नॉमिनेशन केलेत रोहित ला काढण्यासाठी.
राखी काय फालतु बडबड करत होती काल. लोकांना हसु आवरत नव्हतं.
मीरा सोबत मीनल ला का नाही आणलं ? राखी कशाला ? मेघा धाडे पण चालली असती की
विशाल आला तेव्हा प्रसाद आणि विकास विचित्र पद्धतीने फ्रीज झालेले.. दोन पायांवर्/एका पायावर बसुन अवघडले होते. विशाल ने आधी त्यांना स्वतः उठवुन नीट बसवले आणि मग गप्पा मारल्या. आवडलं त्याचं हे वागणं.

तेजा इन्जुरी मुळे बाहेर पडली आहे अशी सोमी वर न्युज आहे. खरं खोटं देव जाणे.

Pages