चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्ध सत्य मी थेट्रात बघितलेला आहे. तेव्हा समांतर चित्रपटांची रेगुलर चळवळ होती. श्याम बाबु गोविंद निहलानी व असे अनेक प्रायोगिक तत्वांचे दिग्दर्श क चित्रपट बनवू शकत. आता ते शक्य दिसत नाही. आता प्रचारकी खोटे सिनेमे जास्त.

कांतारा (हिंदीत) कुठे पाहिला हे मुद्दामच नव्हते लिहीले. Wink समजणार्‍या भाषेत पाहिला तर बरंच की.
आता पाहीन कन्नडमधे ओटीटीवर .

zee5 वर नुकताच ‘चूप’ बघितला. आर बल्कि डिरेक्टेड थ्रिलर मूव्ही आहे.. सस्पेन्स न ठेवता मस्त डिरेक्ट केलाय. दुलकर सलमान तर आवडतोच पण सनी देओलला इतक्या वर्षांनी स्क्रीनवर बघून मजा आली. मस्ट वॅाच.

चूप मधला 'जाने क्या तूने कही' गाण्यातला एक मायक्रो पीस वापरला आहे तो खूप भारी आहे.

सनी देओलला इतक्या वर्षांनी स्क्रीनवर बघून मजा आली >>> +१ . बाकी सिनेमा ठीकठाक वाटला. थ्रिलरपेक्षा क्रूर जास्त वाटला.

धोखा पाहिला (का? का?) अगदी म्हणजे अगदीच थर्ड क्लास. नंतर नंतर कॉमेडी मूव्ही असल्यासारखे हसायला यायला लागले म्हणून बघितला शेवटपर्यन्त Happy कै च्या कै च्य कै.

भेडिया बघितला का कोणी... मी वरून धवन फॅन आहे मला आवडला...थेटर मध्ये बघा मात्र... शंभर करोड पोचवायचा आहे आपल्या सर्वाना हा चित्रपट....

मागे बच्चनचे चित्रपट थिएटरमध्ये लागले होते त्याच्या वाढदिवसानिमित्त तसा आता दिलीपकुमार फिल्म फेस्टिव्हल आहे. १० आणि ११ डिसेंबर. (त्याची जन्मशताब्दी) चारच चित्रपट आहेत...देवदास, शक्ती, आन आणि राम और शाम. एखादा बघू कुठलातरी. (मला मधुमती असता तर बघायला खूप आवडला असता थिएटरमध्ये)

IMG-20221127-WA0011.jpg

देवदास, शक्ती, आन आणि राम और शाम >>> भंसाळींनी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावावर काही (हास्यास्पद) बदल केल्याने त्यांचा 'देवदास' तसा सोसनीय होता, पण दिलीप कुमारचा देवदास अत्यंत भकास व कंटाळवाणा आहे. २००१-०२ च्या सुमारास जेव्हा भंसाळी 'देवदास' तयार करत होते, तेव्हाच बिमलदांच्याही 'देवदास' ची चर्चा होती. त्याचाच फायदा घेऊन एकदा 'झी सिनेमा' वर दाखवलेला बिमलदांचा 'देवदास' मी बघितला. मला केवळ भंसाळींच्या येऊ घातलेल्या 'देवदास' मध्ये काय असू शकेल ह्याच उत्सुकतेपोटी बिमलदांचा 'देवदास' बघायचा होता. भंसाळींच्या 'देवदास' मधील "कौन कमबख्त बर्दाश्त करने को पीता है, हम तो पीते हैं कि यहां पर बैठ सकें, तुम्हें देख सकें, तुम्हें बर्दाश्त कर सकें..." ह्या प्रसिद्ध संवादाप्रमाणेच माझी चित्रपट बघतांना अवस्था झाली होती. त्याबरोबरच दिलीप कुमारांना 'ट्रॅजेडी किंग' का म्हणतात हेही अगदीच पटले. अर्थातच पुढे भंसाळींचा 'देवदास' प्रदर्शित झाल्यावर तोही बघितला and I was neutral (Neither liked, nor disliked). तेव्हापासून मात्र अजूनही कोणताही 'देवदास' बघण्याचे धाडस झाले नाही.

देवदासचं कथानक आताच्या आणि त्यांचे मम्मी पप्पा असलेल्या पिढीला अपील होणार नाही हे ओळखून जंजीरकार आदरणीय श्री. प्रकाश मेहरा यांनी त्याच कथेवर पूर्ण वेगळा असा मुकद्दर का सिकंदर काढला आणि म्हणाले,

Screenshot_20221128-104701_Chrome.jpg

भेडिया बघायचाय .
दृष्यम २ थेटरला बघून आले विकांताला . ओरिजिनल बघितला होता , तरी हा आवडला .
काही काही गोष्टी पटल्या नाहीत , पण कुठेही कंटाळा आला नाही.
टायटल सॉन्ग मस्त आहे , पहिल्या भागाचा रिकॅप आहे.
तब्बू यात जास्त आवडली . अजय देवगण पण बरा वाटला . अक्षय खन्ना फारच म्हातारा दिसू लागला आहे.

दिलीप कुमार चा नया दौर का नाहीय... एक नंबर चित्रपट आहे मी थेटरात पाहिला होता आणि शेवटची रेस म्हणजे गुजबम्पस ...

हो नया दौर हवा होता यात. दिलीप कुमारचे त्याच्या ट्रॅजिडी किंग इमेज चे पिक्चर लोकांना आता आवडणार नाहीत. पण त्याचे आन, कोहिनूर, आझाद, राम और श्याम, नया दौर वगैरे आवडतील. बाकी मुघल-ए-आजम, मधुमती असे बरेच आहेत. अगदी जुने अंदाज वगैरे कसे आहेत माहीत नाही.

हृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटांची नावं आलेली पाहिलं. त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेणारं एक पुस्तक वाचलं - भरत, ह्या पुस्तकाचे नाव सांगता? मी हृषीकेश मुखर्जींची फेन आहे. धन्यवाद!

दिलिप कुमार म्हटल्यावर नया दौर दाखवण खरतर मस्ट आहे. बाकी मधुमती, मोगले आझम मधे हिरोईनच जास्त भाव खावुन गेल्यात.

दिलीपकुमारचा हटके चित्रपट म्हणजे अमर. त्यात ग्रे शेडवाला नायक आहे. पण असा नायक त्याकाळच्या प्रेक्षकांना रुचला नाही बहुतेक कारण हा चित्रपट पडला. दिलीपकुमारही मग अशा भूमिकांच्या वाट्याला गेला नाही नंतर. मधुबालानेही फार सुरेख काम केलं आहे त्यात. गाणी तर सगळी अप्रतीम आहेत. 'जानेवाले से मुलाकात ना होने पायी', 'तेरे सदके बलम', 'ना मिलता गम', 'इन्साफ का मंदिर' सगळी एकसो एक!

दास्तान गेल्या तीन चार वर्षात पाच सहा वेळा पाहिलाय. दो अनजाने यावरूनच घेतलाय.
दोन अनजाने वरून पण कुठलातरी आला होता असं ऐकलं.

दिलीपकुमारचा सकिना चित्रपट म्हणून जबरदस्त आहे.

त्यात ग्रे शेडवाला नायक आहे. >>> गंगा जमुना सुद्धा बहुधा. दीवार ची मुळे त्यात आहेत असे वाचले होते.

दिलीपकुमारचा सकिना चित्रपट म्हणून जबरदस्त आहे. >> हा "सगीना", का आणखी दुसरा कोणता जुना आहे? सगीना मधे त्याला किशोरचा प्लेबॅक असल्यामुळे तो लक्षात आहे.

मशाल अश्रूंची झाली फुले वरून घेतला आहे. त्या नाटकावरचा आधीचा सिनेमा आसू जो बन गये फूल कि मोती असा काहीतरी होता. कमबॅक मधला सर्वात मस्त विधाता. त्यानंतर शक्ती .
क्रांती, कर्मा, सौदागर हे पीळ आहेत आणि गोविंदाचा तो रोटी वाला तर आवर्जून बघा. बायोटेक्नॉलॉजीवर आहे.

इथे माधवने सुचवला होता तो 'कुमारी' पिक्चर पाहिला नेफ्लिवर. तुंबाडशी साधर्म्य दाखवणारी काही दृष्यं आहेत. पण हा पिक्चर जास्त थरारक आहे. केरळचं चित्रण नेत्रसुखद. ऐश्वर्या लेक्श्मीचा वावर सहजसुंदर वाटतो. पिक्चर अगदी एंगेजिंग आहे. आवडला.

Pages