Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी पण काल दृश्यम टू पाहिला.
मी पण काल दृश्यम टू पाहिला. काही गोष्टी अअ आहेत पण मला आवडला. जेवढी नवीन करेक्टर आणले आहेत तेवढ्या सगळ्यांचा उपयोग करून घेतलाय हे आवडलं. शेवट प्रेडिक्टेबल आहे पण तरी जास्त गुंतागुंत न करता दाखविल्यामुळे आवडला. प्रत्येक नवीन करेक्टर कुठे कुठे उपयोगाला येईल हे सस्पेन्स क्राइम थ्रिलर चित्रपट जास्त बघणाऱ्या माणसांना प्रेडिक्ट करता येतं
थेटर मध्ये लोक शिट्ट्या टाळ्या वाजवत होते त्यामुळे लोकांना आवडतोय.
मी पण काल दृश्यम टू पाहिला.
मी पण काल दृश्यम टू पाहिला. काही गोष्टी अअ आहेत पण मला आवडला. जेवढी नवीन करेक्टर आणले आहेत तेवढ्या सगळ्यांचा उपयोग करून घेतलाय हे आवडलं. शेवट प्रेडिक्टेबल आहे पण तरी जास्त गुंतागुंत न करता दाखविल्यामुळे आवडला. प्रत्येक नवीन करेक्टर कुठे कुठे उपयोगाला येईल हे सस्पेन्स क्राइम थ्रिलर चित्रपट जास्त बघणाऱ्या माणसांना प्रेडिक्ट करता येतं
थेटर मध्ये लोक शिट्ट्या टाळ्या वाजवत होते त्यामुळे लोकांना आवडतोय.
थेटर मध्ये लोक शिट्ट्या
थेटर मध्ये लोक शिट्ट्या टाळ्या वाजवत होते त्यामुळे लोकांना आवडतोय.
>>>>>
+७८६
एका सीनला जिथे सारे काही संपलेय वाटताना असे काही घडते की लोकं चक्क टाळ्या वाजवतात.
हा अनुभव नक्कीच थिएटरात घ्यायचा आहे.
सुरुवात संथ कोणाला वाटेलही पण तो माहौल तयार होत आहे त्या शेवटच्या अर्धापाऊण तासातील घडामोडींसाठी.
हा पिक्चर त्याच पेशन्सने चवीचवीने बघणार्यांसाठीच आहे.
अन्जू आम्ही थेट्रात पाहीला. >
अन्जू आम्ही थेट्रात पाहीला. >>> अच्छा, थँक यु.
पटाखा असाच आहे >>> हो, बघणार
पटाखा असाच आहे >>> हो, बघणार आहे.
काल गेमओव्हर सुरू केल्यानंतर अर्ध्या तासाने हा पाहिलाय हे लक्षात आले. पण अजिबात लक्षात नव्हता म्हणून पाहिला शेवटपर्यंत. तसंच बॉडी. पण तो लगेच आठवला पूर्ण.
व्होडका डायरी आत्ता संपवला. आवडला कि नाही हे सांगता येत नाही. अपने टाईप का नाही असा वाटला तरी पण भारी अनुभव आहे. सवय करून घ्यायला पाहीजे अशा सिनेमांची. शेवट समजला नाही. हल्ली पद्धतच आहे म्हणा तशी. सगळा रहस्यभेद झाल्यावर काहीतरी वेगळा धक्का देऊन चालू ठेवायचा आणि नावं दाखवायची.
राख ओटीटी वर नाही सापडला. युट्यूबवर आहे.
गेमओव्हर तापसी चा का? आवडला
गेमओव्हर तापसी चा का? आवडला होता.
हो. पुन्हा पाहिला काल.
हो. पुन्हा पाहिला काल.
काल आणि आज, टॉप गन आणि टॉप गन
काल आणि आज, टॉप गन आणि टॉप गन मव्हेरिक बघितले. दोन्ही आवडले.
दुसरा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या खूपच वरचढ आहे. थरारक अनुभव आहे.
पण कथा, संवाद मूळ सिनेमातले जास्त भरियेत.
वर्णनावरून एकदम वेगळा
वर्णनावरून एकदम वेगळा वाटल्याने नेफिवर "Eeb Allay Ooo!" हा पिक्चर पाहिला.
https://en.wikipedia.org/wiki/Eeb_Allay_Ooo!
दिल्लीच्या ल्युटेन्स भागात माकडांना सतत हाकलायला नेमलेल्या एका व्यक्तीची कहाणी. असा काही (कंत्राटी हा होईना पण) सरकारी जॉब आस्तित्वात आहे हेच माहीत नव्हते. सुरूवातीला एकदम एंगेज करतो पिक्चर. पण नंतर अगम्य होत गेला आहे. शेवट मला समजला नाही - वैचारिक मराठी पिक्चर आहे की काय अशी शंका येण्याइतका अगम्य आहे इन फॅक्ट शेवटचा अर्धा तास केवळ पूर्ण बघायचा म्हणून पाहिला.
दृष्यम2 पाहिला.मजा आली.बऱ्याच
दृष्यम2 पाहिला.मजा आली.बऱ्याच गोष्टी प्रेडीकटेबल असल्या तरी चांगलं वाटलं.अजय देवगण चांगला दिसतो.(दाढी पण ओके आहे.)
श्रिया सरण चा रोल बावळट असल्याने ती चांगला बावळटपणा करते.
अक्षय खन्ना थोडा चेहरा थकलेला वाटतो.वय हा एक भाग आणि त्याने काही डायट वगैरे केलं असावं.पण जरा भीती वाटते त्याची.छोटी अनु मोठी झालेली गोड दिसते.
प्रथमेश परब ला विशेष काम नाहीये.गायतोंडे नेहमी प्रमाणे छा गये. पण पिक्चरच लहान असल्याने काम लहान आहे.
तब्बू आणि रजित कपूर मधल्या 7 वर्षात दुःखी आईबाप दिसतील तितपत थकलेले आणि तणावाखाली दाखवले आहेत.
दृष्यम-२ अनेक प्रकारे शोधुन
दृष्यम-२ अनेक प्रकारे शोधुन ही प्राईमवर काही सापडला नाही. आता वरच्या सगळ्या कमेंट परत परत वाचुन पब्लिक थेटर मध्ये बघतंय वाटतंय! :वेड्याचा बाजार!:
'धोका' बघितला. अगदीच प्रेडिक्टेबल निघाला. पोलिसचा एक ट्विस्ट अपेक्षिला न्हवता, म्हणजे कोणातरी पोलिसचे लागेबांधे टेररिस्टशी असणार इतपत वाटलेलं. आणखी लिहिलं तर स्पॉयलर होईल. देसी न्यूज चॅनलची टर उडवणे बघुन ते चॅनल बदलतो तसा पिक्चर बदलावासा वाटला. कंटाळा आला ते देसी न्यूज पॅरडी का काय होतं ते बघुन बघुन.
अपारशक्तीने काम उत्तम केलं आहे. बाकी माधवन, माधवची बायको, सायकोलॉजिस्ट सगळ्यांनी केवळ पाट्या टाकल्या आहेत. कनविन्सिंग काही वाटतच नाही. माधवन चांगलं काम करायचा ना? इथे त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही! अंडरव्हेलमिंग!
माधवन फारच सुटला आहे.. थोडा
माधवन फारच सुटला आहे.. थोडा फिटनेस हवा...
दृष्यम-२ अनेक प्रकारे शोधुन
दृष्यम-२ अनेक प्रकारे शोधुन ही प्राईमवर काही सापडला नाही. >>> प्राइम वर "हा" पिक्चर शोधायला "या टर्म्स" ट्राय करा अशी एक वेबसाइट सुरू केली पाहिजे ते आपल्याशी टॅबू गेम खेळत असल्यासारखे चित्रपटाचे नाव सोडून इतर दुनियाभरच्या शब्दांवरून आपल्याला पिक्चर शोधायला लावतात.
मीही बघितला धोकाधोखा, राउंड ड
मीही नेटफ्लिक्सवर बघितला
धोकाधोखा, राउंड ड कॉर्नर . हे 'राउंड ड कॉर्नर' कशासाठी , नुसताच 'धोखा' द्यायचा!खुषाली कुमारी म्हणून ही नवीन मुलगी अगदी चकचकीत व मख्खं वाटली. ती एरवी मिनी,मॅक्सी घालते पण अतिरेकी यायच्या दिवशी 'लाल भडक माल कडक' मुहूर्त साधून लाल साडी गुंडाळून बसलीये. ( 'आहे का तर आहे'- पदर म्हणून साडी म्हणां. )माधवन व ही ललना जरठ-कुमारी विवाहात वाटले. अपारशक्ती खुराणाचे काम मस्त आहे. कश्मिरी लहेजा रिफ्रेशिंग वाटला. सायकॉलॉजिस्ट अस्थानी वाटली, बळंच घुसवल्यासारखी-अंडरएक्टिंग. पोलीस क्राईमपेट्रोल कॉपी पेस्ट-ओव्हरएक्टिंग, माधवन 'उरकून टाकूया, रॉकेट्रीत किती कष्ट पडलेत' मोडमधे. शेवट तर अचाट.
हिने पदर इतका सतत पाडलाय की तो अशोक सराफचा पदर पाडणाऱ्या बाईला स्टेपलर-फेविकॉल देतो तो सिनेमा आठवला.
टॉप गन मेव्हरीक मीही थेट्रात
टॉप गन मेव्हरीक मीही थेट्रात बघितला, जबरदस्त आहे!
**********स्पॉयलर********
दृश्यं २ मल्याळी होता प्राईम
दृश्यं २ मल्याळी होता प्राईम वर. हिंदी आत्ताच थिएटर मध्ये रिलीज झाला आहे
वाचलं बरं , अमित
वाचलं बरं , अमित
हिने पदर इतका सतत पाडलाय की
हिने पदर इतका सतत पाडलाय की तो अशोक सराफचा पदर पाडणाऱ्या बाईला स्टेपलर-फेविकॉल देतो तो सिनेमा आठवला >>> हा कोणता पिक्चर?
पदर पाडण्यावरून संजीव कुमारचा एक धमाल सीन आहे "हीरो" मधे
https://www.youtube.com/watch?v=4liIw6_taXQ&t=1151s
पटाखा सुरूवात केली आहे. मस्त
पटाखा सुरूवात केली आहे. मस्त आहे.
नंतर थोडा वेळ सीता और गीता पाहिला हवा के साथ साथ
चालबाज मक्खी टू मक्खी कॉपी आहे. इतकंच कि हेमामालिनी, धर्मेंद्र, संजीव कुमार सर्वांच्या चेहऱ्यावरची मक्खी उडत होती.
चालबाज सबकुछ श्रीदेवी. बल्लमा!
धोखा आधी येऊन गेला असेल तर
धोखा आधी येऊन गेला असेल तर बहुतेक पाहिलेला असेल. नुकताच आला असेल तर सध्या असल्या नावाचा, मार्केटिंग बिल्कूल नसलेला मूव्ही बघायचा उत्साह आणि उत्सुकता दोन्ही नाही. माऊथ पब्लिसिटी मुळे पहावा वाटला तर पाहीन.
माय लिस्ट सोडून असेच आगंतुक पिक्चर बघितले तर लिस्ट नाराज होईल.
शनिवार-रविवार मुलांनी 9-10
शनिवार-रविवार मुलांनी 9-10 वेळा राईज ऑफ ग्रु बघितलाय आम्हाला काहीच बघूच नाही दिले
शा पि
शा पि
मिनीअन्स चे आधीचे भाग प्राईमवाल्यांनी काढून टाकलेत वाटतं..लहान मुलांचे सिनेमे दिसतच नाहीएत प्राईमवर.
फ्रोझन,कोको,झुटोपिया वगैरे.. हॉटस्टारवर आहेत का?
हिने पदर इतका सतत पाडलाय की
हिने पदर इतका सतत पाडलाय की तो अशोक सराफचा पदर पाडणाऱ्या बाईला स्टेपलर-फेविकॉल देतो तो सिनेमा आठवला >>> Lol हा कोणता पिक्चर? >>>> शुभमंगल सावधान (१९९२)
नवरा हल्ली ब्रह्मास्त्र बघतोय
नवरा हल्ली ब्रह्मास्त्र बघतोय तुकड्या तुकड्यात. त्याला आवडतात असले पिक्चर्स. मला tp वाटतोय. मौनी रॉयला बरीच मोठी भूमिका मिळाली. मला हल्ली शाहरुख खानला बघवतही नाही, त्याची कुठलीही अॅड दिसली की मी चॅनेल चेंज करते पण चक्क यात मला तो बरा वाटला रादर चांगला वाटला, अगदी छान वगैरे नाही पण बऱ्यापेक्षा वर नक्कीच. अमिताभची एंट्री झालेली आहे, तो आवडला. बाकी उद्या किंवा नंतर. नवरा लावेल तेव्हा येता जाता मी बघणार.
थॅन्क्स रमड, मला नाव आठवत
थॅन्क्स रमड, मला नाव आठवत नव्हते, आगाव साधर्म्य तेवढे आठवत होते.
फा, 'पल्लू उपर करो' , बघितले
राभु , सीता और गीता, खूबसुरत, अंगूर , बॉम्बे टू गोवा, किसिसे ना कहना, चमेली की शादी आणि पडोसन कितीही वेळा बघू शकते. वरच्या रघू आचार्य यांच्या यादीतलेही.
शा पि
मृ
फ्रोझन,कोको,झुटोपिया वगैरे.. हॉटस्टारवर आहेत का?
>>>डिस्नेनं सगळं विकत घेतलंय. एकुणंएक आहेत तिथे.
हळूहळू सगळ्या फॅमिली कंटेटची मोनोपॉली होते आहे.
आता डिसएनचॅन्टेडही येतोय. मुलान, क्रुएला, ब्रेव्ह, आईसएज, सोल, एनकॅन्टो वगैरेही अनेक अप्रतिम सिनेमे आहेत. 'डेस्पिकेबल मी' आणि 'मिनियन्स' तेवढा आहे नेटफ्लिक्सवर.
शुभमंगल सावधान (१९९२) >>>
शुभमंगल सावधान (१९९२) >>> थँक्स र्म्द.
'पल्लू उपर करो' , बघितले >>> नंतर संजीव कुमारने फोन ठेवल्यावर सुद्धा त्याची बायको (देवश्री रॉय?) परत एकदा आरशात चेक करते
हो. डिस्नेने दोन
हो. डिस्नेने दोन महिन्यांपूर्वी फुकट/ स्वस्त दिलेलं तेव्हा घेतलं आणि आता ट्रॅप मध्ये (आनंदाने) अडकलो आहे. किती बघू आणि किती नको असं पोराला आणि मला झालंय. मार्वलचे सगळे अॅव्हेंजर इ. इ. सिरीज मधले बघायचे ही माझी युगानुयुगाची इच्छा पूर्ण होते आहे. बाकी इतर तर आहेतच.
नंतर संजीव कुमारने फोन
नंतर संजीव कुमारने फोन ठेवल्यावर सुद्धा त्याची बायको (देवश्री रॉय?) परत एकदा आरशात चेक करते Happy>>>
सीता और गीता, खूबसुरत, अंगूर
सीता और गीता, खूबसुरत, अंगूर , बॉम्बे टू गोवा, किसिसे ना कहना, चमेली की शादी आणि पडोसन कितीही वेळा बघू शकते. >> +१. यातला चकीशा फक्त नाही पाहिलेला.
Pages