चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि चहा देताना मोनिका त्या घनाकृती साखरेच्या ठोकळ्याला जे काय करते ते उगाच आपल्याला फसवायला?

>>>>
तेव्हाच मला कळलं ही कोणाकडून पोटूशी आहे. चहा देता देता 'आप हमारे पापा जैसे है' म्हणते ना 'मायेने' ... मोनिकाचा वावर केवळ प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी चलाख दाखवलाय. चलाख नाही फक्त स्वार्थी होती ती व्यक्तिरेखा...

कमाल डायलॉग! Proud
मला त्या डायलॉग वरुन नाही पण जनरली विजय केंकरेचं अफेअर आहे हे वाटतच होतं. एक वेळ लेस्बिअन टिकमार्क ही मिळणार अशी खात्री झालेली. कारण मोनिका आणि निक्की मधला एकही सीन नाही की संवाद नाही. म्हणजे यांचं लफडं आहे हे कळायला सोप्पं आहे. अशी अक्कल लावल्यावर कोणी मला 'मान गए' म्हटलं असतं तर माझी 'पारखी नजर' आहे हे पण मला म्हणता येईल. कारण चष्मा असला तरी अजुन आंधळा अंकल झालेलो नाही. Wink

'पारखी नजर' म्हणजे सस्पेन्स सिनेमात कुणाच्याही चारित्र्यावर विश्वास न ठेवणे, जे जसं वाटतंय त्याच्या विरुद्ध. हे मी इमानेइतबारे करते. एंटिने बसवले आहेत. जसं मोनिका चलाख दाखवली पण होती फक्त संधीसाधू, रारा महत्त्वाकांक्षी दाखवला पण होता फक्त असुरक्षित, राधिका intimidating दाखवली पण होती फक्त भ्रष्टं !
नवीन कोलित मिळालंय आपल्याला नं काय.... Lol

ती शाळू म्हणजे अमीर खान ची भाची का पुतणी आहे असं रिव्ह्यू वाचताना कळलं

पहिलाच सिनेमा आहे का तिचा?
त्याचा भाचा तो इम्रान खान होता तो कुठं गायब झाला दोन चार मुवि करून
तो कॉमिक रोल चांगले करायचा

कॉर्पोरेट कंपनीच्या इव्हेंटला आयटेम गर्लचा डान्स पाहून मी तिथेच हाय खाल्ली आणि बंद केला>>>>>>
पुढे बघायला हवा होता.. हाय खाण्याचा सहा महिन्याचा कोटा भरुन निघाला असता. ती आइटेम गर्ल नसुन साक्षात बिग बॉसची आइटेम असते. तिच्यावाचुन बोर्ड मिटिन्गा खोळंबतात आणि बिग बॉसच्या पोरासकट इतर सगळ्यांना ती इतकी झुलवत असते की तिच्या पोटातील पोर आपले नसणार हे खात्रीपुर्वक कोणीही सांगु शकत नाही.

तिच्या पोटातील पोर आपले नसणार हे खात्रीपुर्वक कोणीही सांगु शकत नाही.>>>> Happy Happy Happy

पोलिसाला जे सुचलं ते कुणालाच सुचू नये म्हणजे कमाल आहे

म्हणजे जितका वेळ ते मर्डर प्लॅन करण्यात घालवतात त्याच्या शतांश वेळेत हे उघड झाले असतं

पुलं नी लिहिलं आहे, नाटकाच्या पहिल्या अंकात बंदूक टांगलेली असेल दिवाणखान्यात तर तिसऱ्या अंकापर्यंत ती वाजलीच पाहिजे >> शिरीष कणेकर ना? फिल्लमबाजी.

“शिरीष कणेकर ना? फिल्लमबाजी” - नाही, पु. ल. कुठल्यातरी नाटकाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात आहे हे. बहुदा वस्त्रहरणच्या १७५व्या प्रयोगाच्या वेळी. ह्या वाक्याचा पूर्वार्ध, ‘रंगभूमी ही गोष्टच अशी आहे, कि इथे कुठलिही वायफळ गोष्ट चालत नाही, अध्यक्षीय भाषणाखेरीज.’ असा आहे Happy

रून्मेष, वाचतोहेस का हे ? देवा ! धरणीमातेने उदरात घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता एक धागा असताना त्याच विषयावर दुसरा, तिसरा चौथा धागा निघणार नाही. मान ठेवावा शहाण्यांनी.

नाटकाच्या पहिल्या अंकात बंदूक टांगलेली असेल दिवाणखान्यात तर तिसऱ्या अंकापर्यंत ती वाजलीच पाहिजे
हिंदी चित्रपटात हा फॉर्मुल्या पुर्वीच्या काळी फार वापरायचे. चित्रपटात सुरूवातीला हिरोला छोटी अवखळ चुलबूली सुंदर टाईप बहीण दाखवली की पुढच्या अर्ध्यातासात तिच्यावर अत्याचार झालेला दाखवायचेच. हिरोला इतर धर्मिय मित्र दाखवला की तो देशभक्तीचा अतिरेक करून व्हीलन कडून मारला जाणार किंवा आयत्यावेळी हिरोवर झाडलेली गोळी आपल्या छातीवर झेलणार हे ग्रुहीतच धरायचे.

व्हँप व्हिलनची आयटेम असायची पण तिचं प्रेम हिरोवर असायचं. शेवटी ती मधे यायची. हेलन खूप वेळा अशा पद्धतीने मेली आहे.
क्वचित बिंदू सुद्धा पश्चात्ताप दग्ध होऊन हिरोला वाचवायची. दुय्यम हिरॉईन, पिक्चरभर व्हिलनगिरी करून शेवटी अवघे धरू सुपंथ म्हणणारा हिरोचा धाकटा किंवा सावत्र भाऊ असे सगळे छातीवर गोळ्या झेलायचे.
हे सगळे परधर्मिय नव्हते. तसा स्वधर्मिय हिरो पण भलताच कनवाळू दाखवायचे. गाणं म्हणता म्हणता मोटरसायकल लावून गाण्यातच रस्त्यावरच्या भिकारी मुलांना कडेवर घेत जीवनाचे सार दोन ओळीत सांगायचा. लंगड्याला कुबड्या उचलून द्यायचा, आंधळ्याला रस्ता ओलांडून द्यायचा.

लंगड्याला कुबड्या उचलून द्यायचा, आंधळ्याला रस्ता ओलांडून द्यायचा.>>>
त्या गझनी ची हिरोइन पण अशीच परोपकारी गम्पू आहे
आंधळ्या माणसाने रस्ता ओलांडून दे म्हणलं तर जाताना वाटेत कोण काय करताय हे सांगत चाललीये
बाई तो आंधळा आहे, बहिरा नई हे कोणीतरी तिला कन्फटवुन सांगायला हवं होतं तिथल्या तिथं
व्हिलन ने वेळीच तिला मारलं म्हणून बरं झालं नैतर अक्खा सिनेमा भरून ही एकटीच बोलत राहिली असती

हो, गझनी मधली बाई जाम पीळ आहे.मुळात खलनायकाला पूर्ण प्लॅन सांगून नीट धमक्या पण द्यायच्या.एकंदर त्यातला हिरो पात्र पण पीळच आहे.आणि इन्स्पेक्टर पण.

नुसती पीळ नाही अतिशय सुमार बुद्धिमत्ता असलेली आहे

तमाम दुनिया ज्या माणसाला ओळखते तो डुप्लिकेट नसून खरा असावा अशी कणभरही शंका बाईच्या इवल्याश्या मेंदूत येत नाही Happy

याला निर्माते निरागसता वगैरे समजत असावेत

व्हिलन ने वेळीच तिला मारलं म्हणून बरं झालं नैतर अक्खा सिनेमा भरून ही एकटीच बोलत राहिली असती
>>>>>
Sad
छान बडबडे बोलके व्यक्तीमत्व असणे चांगलेच की. मला तर तिचे कॅरेक्टर आवडले होते त्या चित्रपटातील.
खूबसुरतमध्ये सोनम कपूर सुद्धा बडबडी होती ती सुद्धा आवडलेली.
जब वुई मेटची गीत आवडलेली.
शोलेची बसंती आवडलेली.
चालबाजच्या डबल रोल अंजूमंजू पैकी बडबडी श्रीदेवी आवडलेली
हम है राही प्यार के मधली जुही याच कारणासाठी आवडलेली.
खूप मोठी लिस्ट निघेल..

मुळात खलनायकाला पूर्ण प्लॅन सांगून नीट धमक्या पण द्यायच्या >>> म्हणजे हीरोला काहीच आठवत नाही आणि हिला नको तेथे नाही ते आठवते Happy

बाय द वे, खलनायकाला धमक्या हा प्रकार हिंदीमधे अफाट असतो. त्याच्याच अड्ड्यात उभी राहून त्याचेच साथीदार आजूबाजूला असताना तेथून वाचायची शक्यता वगैरे विचारात न घेता "मै ये सब पुलिसको बताउंगी" टाइप गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन पूर्वी खूप वेळा असे

"मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हूं"
" जानेमन, ऐसा नही कहते , कल ही हम इसे गिरा देते है "
"नही, तुम मुझसे शादी करलो, वर्ना मै पूरी दुनिया को चिल्ला चिल्ला कर कह दूंगी "
हे रणजित, प्रेम चोप्रा ला सांगणार्‍या हिरॉईनींचा सुसायडल आयक्यू यावर अधिक संशोधन व्हायला पाहीजे.

Pages