Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुंबाड प्राईमवर आहे.
तुंबाड प्राईमवर आहे.
तुंबाड पार्ट 2 ऐवजी राही
तुंबाड पार्ट 2 ऐवजी राही यांना रक्तब्रह्मण्ड पिक्चर काढायचा होता
जी ए कुलकर्णी यांच्या विदूषक कादंबरी वर.
एक कप च्या बघितला प्राईमवर.
एक कप च्या बघितला प्राईमवर..छान आहे.
इथे सुचवलेल्यांपैकी एखादा
इथे सुचवलेल्यांपैकी एखादा बघायचा प्रयत्न करीन. माय लिस्ट तशीच आहे अजून.
दिवसभर भरपूर ड्रायव्हिंग झालेय. झोप आली तर मग खरं नाही..
प्रेडिक्टेबल मोनिका वर उतारा
प्रेडिक्टेबल मोनिका वर उतारा म्हणून धोखा राउंड द कॉर्नर बघावा असे सुचवतो...
काल द्रिष्यम-२ पाहीला. ठिक
काल द्रिष्यम-२ पाहीला. ठिक वाटला. पण एकंदर ग्लॅमरशून्य नट नटी पाहून कांटाळा आला. आधीच कळकट (काळा नाही. शिसवी काळा रंग छान दिसतो. कळकट वेगळे) त्यात दाढी म्हणजे आधीच मर्कट त्यात ... असे त्या देवगणला पाहून वाटले. असो. ती हिरॉइन श्रिया शरण का कोणीतरी आहे तिचे थोबाड सतत टेन्स. सतत म्हणजे सतत टेन्शनमध्ये. उबग आला.
प्रेडिक्टेबल मोनिका >> +१.
प्रेडिक्टेबल मोनिका >> +१. तरीही ट्रीटमेंट खूप सुंदर आहे. तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत आवडला.
दृश्यम दोन कुठे आहे सामो.
दृश्यम दोन कुठे आहे सामो. मला अजय देवगण एक मध्ये आवडलेला. तो एकदम यंग असताना आवडायचा नाही पण नंतर आवडायला लागला.
मुळ दृश्यम ही बघायचा आहे, मोहनलालही खूप आवडतो.
अजय देवगण चा रंग कशाला बघता..
अजय देवगण चा रंग कशाला बघता.. त्याच्या डीप डोळ्यात बघा
चपड चपड यांनी रेकमेण्ड
चपड चपड यांनी रेकमेण्ड केल्याने कुठला बघायचा नाही हे समजते. सर्वातर्फे धन्यवाद वेळ वाचवल्याबद्दल.
बायडन चा कॉल आलाय.
अजय देवगण चा रंग कशाला बघता.. त्याच्या डीप डोळ्यात बघा >>> चपड चपड, तुम्हाला प्रत्येकाच्या कमेण्टवर मवाल्यासारख्या कमेण्ट करायला ठेवलेय का नोकरीवर ? कट्ट्यावर बसलेले मवाली येणार्याजाणार्याला छेडतात तसं वाटतंय.
अन्जू आम्ही थेट्रात पाहीला.
अन्जू आम्ही थेट्रात पाहीला.
अजय देवगण कधीकधी खूप अनटाईडी
अजय देवगण कधीकधी खूप अनटाईडी दिसतो हे खरे.पण आम्ही त्याचे, त्याने हम दिल दे चुके सनम मध्ये डबडबलेल्या डोळ्याने त्याने ऑपेरा हाऊस च्या वरच्या मजल्यावर पाहिल्यापासूनचेच फॅन आहोत(दाढी हा वेगळा विषय.हल्ली प्रत्येक पिक्चर मध्ये दाढीवालेच हिरो का असतात असा वैतागपूर्ण विचार कालच करत होते.)
Ajay Devgan cha ranga baghu
Ajay Devgan cha ranga baghu naka.. juba cha kesari rang bagha..
चपड चपड, तुम्हाला
चपड चपड, तुम्हाला प्रत्येकाच्या कमेण्टवर मवाल्यासारख्या कमेण्ट करायला ठेवलेय का नोकरीवर ?
>> तुम्ही फारच चिडलेले दिसता रघु उर्फ वीरू उर्फ अमरेंद्र .
मोहनलालचा दृश्यम दोन ओटीटीवर
मोहनलालचा दृश्यम दोन ओटीटीवर आला तेव्हांच पाहिला. दृश्यम १ सारखी मजा नाही त्यात.>>>>
+१
हिंदीत आत्ता आला का दुसरा भाग? जवळच लागला असेल तर बघायला हवा. थिएटरमध्ये सिनेमा बघून युगं लोटली.
नानबा लोल
तुम्ही फारच चिडलेले दिसता रघु
तुम्ही फारच चिडलेले दिसता रघु उर्फ वीरू उर्फ अमरेंद्र >>> वैयक्तिक बदनामीकारक कमेण्ट्स नकोच. उडवल्या जातील. >>> कमेण्ट्स उडवायची कमेण्ट याच धाग्यावर आहे ना चपड चपडची ? फिरायला जाऊन येईपर्यंत कमेण्ट उडवायची कमेण्ट करण्यापर्यंत मजल गेली. ब्रॅण्ड बदलला कि अजून वेगळ्याच आयडींशी नाव जोडतील.
चपड चपड, तुम्हाला स्वतःचं डोकं आहे ना ? मग स्वतःच्या कमेण्ट्स स्वतः लिहा. कोण काय लिहीतं त्याला आडवं लावणं हेच तुमचं नेमून दिलेलं काम असल्यासारखं करू नका. लोक येत नाहीत मग. मायबोली अजून खड्ड्यात जाते. तुम्ही एका धाग्यावर लिहीलंय कि नवदीप वडाली आला कि मी स्किप करतो. आधी वडाली म्हणजे कोण ते गुगल करा. तुम्हाला ते आवडायलाच पाहीजेत असं नाही. पण तुमची आवड काय ते कळतं त्यातून म्हणून तशी कमेण्ट केली. चिडू नका.
एक कप च्या बघितला प्राईमवर
एक कप च्या बघितला प्राईमवर.छान आहे.
हल्ली प्रत्येक पिक्चर मध्ये
हल्ली प्रत्येक पिक्चर मध्ये दाढीवालेच हिरो का असतात असा वैतागपूर्ण विचार कालच करत होते. >>> +१. काल राजकुमार रावला पाहताना हा पहिला विचार डोक्यात आला. दाढी केली तर जरा चांगला दिसेल तो. मोनिका पिक्चर मध्ये केवढा कळकट दिसतोय.
काल एका जाणकाराने बरेच
काल एका जाणकाराने बरेच पुरस्कारविजेते सिनेमे सुचवले .
सगळेच नाहीत पण लक्षात राहीलेले असे आहेत..
१. मिस लव्हली (नवाजुद्दीन सिद्दीकी ) २. बारह आना ( नसीरुद्दीन शाह. विजयराज) ३. राख (आमीर खान) ४. एक डॉक्टर की मौत ( पंकज कपूर, शबाना, इरफान खान) ५ रोड मूवी (अभय देओल) ६. व्होडका डायरीज (के के मेनन), ७. पटाखा (विजयराज, सान्या मल्होत्रा - विशाल भारद्वाज)
यातला राख आणि व्होडका डायरीज यापैकी एखादा आत्ता पाहू शकेन. बाकीच्यांसाठी तसा मूड पण पाहीजे.
आमच्यासारख्यांना मनोरंजन + सफाईदार असे पण डोक्याला त्रास न देणारे हवे असतात.
काल प्राईमवर बुढ्ढा मिल गया
काल प्राईमवर बुढ्ढा मिल गया बघितला. (रातकली एक ख्वाब में आई हे गाणं ज्यात आहे तो) हृषीकेश मुखर्जींचा आहे, पण 'ठीकठाक' म्हणावा असा आहे. चुपके चुपके किंवा गोलमालच्या लेव्हलचा अजिबात नाही. ओम प्रकाशचं काम एकदम भारी आहे मात्र. कथेतला सस्पेन्सही मस्त टिकवून ठेवलेला आहे. देवेन वर्मा आणि अरुणा इराणीचा अभिनयही मस्त. नवीन निश्चल आणि त्याच्या हिरॉईनचा मात्र अभिनयाच्या बाबतीत आनंदीआनंद आहे.
'रातकली', 'भली भली सी एक सूरत', 'आयो कहां से घनश्याम' ही गाणी सुरेखच आहेत.
आमच्यासारख्यांना मनोरंजन +
आमच्यासारख्यांना मनोरंजन + सफाईदार असे पण डोक्याला त्रास न देणारे हवे असतात.>>>>रानभुली, पटाखा असाच आहे प्राईमवर..मजेदार.. आवडलेला.. बाकीचे पाहिले नाहीत.. टाकते यादीत.
मला खूप आवडतो बुढा मिल गया
मला खूप आवडतो बुढा मिल गया.खूप अचाट अतर्क्य आहे पण देवेन वर्मा ने मस्त काम केलंय.
गोलमाल अंगुर चुपके चुपके ची लेव्हलच वेगळी.यात छोटी सी बात पण टाकून द्यावा.
हृषिकेश मुखर्जी, बासु
हृषिकेश मुखर्जी, बासु चटर्जींचे जवळपास सगळेच चित्रपट आवडतात. छलिया आठवत नाही. टीव्हीवर पाहिलेला लहान असताना. आनंद, बावर्ची, गुड्डी, झुठी, मिली, खूबसूरत, नरम गरम, गोलमाल, बुढ्ढा मिल गया, दामाद, बेमिसाल, जुर्माना, चुपके चुपके, रेल गाडी वाला आशिर्वाद केव्हढी अफाट रेंज आहे.
मी काल "पुकार" बघितला. माधुरी
मी काल "पुकार" बघितला. माधुरी दीक्षित चा क्लासिक चित्रपट.
नौजवानो बात मानो कभी किसी से ना प्यार करना
हे के सरा सरा सरा जो भी हो सो हो
म्युझिक, डान्स, इतका अप्रतिम संगम कि बॉलीवूड वर वरताण!
राख (आमीर खान)
राख (आमीर खान)
>>>>व्हीसीआर वर कॅसेट आणून पाहायच्या जमान्यात आम्ही जेव्हा कॅसेट (भाड्याने) आणायला गेलेलो तेव्हा नविन सिनेमाच्या ज्या कॅसेट उपलब्ध होत्या त्यातील राख आम्ही मागितलेली. नेहमीचा ओळखीचा कॅसेटवाला होता तो तेव्हा ही नका नेऊ कॅसेट, नावाप्रमाणेच सिनेमात राख आहे बाकी काही नाही अस सांगितलेलं त्याने आम्हाला.
त्यानंतर थेट आज या सिनेमाचं नाव ऐकलं/ वाचलं
कॉलेजला असताना भावाची व्हिडीओ
कॉलेजला असताना भावाची व्हिडीओ कॅसेट लायब्ररी होती. तेव्हां त्याला काही काही सिनेमे सक्तीने घ्यायला लागायचे (नाहीतर नवीन धंदा करू शकतील असे द्यायचेच नाहीत). त्यातला एक ज्वेल ऑफ इंडीया अशा नावाचा काहीतरी मूव्ही आलेला होता. त्याची कॅसेट एक दोन वर्षांनी आली. ती गळ्यात मारली. कॅसेटचे दहा रूपये या हिशेबाने ती २० जणांना चिकटवली तर पैसे वसूल होत.
ज्वेल ऑफ इंडीया हा ज्वेल थीफचा सेकंड पार्ट म्हणून काही जणांना भावाने दिला होता. गिर्हाईक तणतणत यायचं "हा तर पंडीत नेहरूंच्या जीवनावरचा आहे "
" हो का ? कल्पना नाही. मी नाही पाहिलेला. पण मी याच समजुतीतून विकत घेतला. " असं साळसूदपणे भाऊ सांगायचा.
बाराह आणा पाहीला सिनेमा मस्त
बाराह आणा पाहीला सिनेमा मस्त आहे. पण शेवट नाही कळाला. नेट वर शोधू म्हटलं तर काहीच सापडलं नाही. कुणीतरी पहा आणी शेवट काय आहे ते सांगा पाहू. सिनेमा खुप मस्त आहे पण. विजयराज नी नसरूद्दीकाहीगीासिनेमात कमीत कमी एक तास नसरूद्दीन शहाला काहीही डायलोग नाही फक्त एक्टींगवरच सर्व भार. पाहण्यासारखाच.
बाराह आणा चा लिंक
बाराह आणा चा लिंक
https://youtu.be/hrWW7fmnFk0
ज्वेल ऑफ इंडीया हा ज्वेल
ज्वेल ऑफ इंडीया हा ज्वेल थीफचा सेकंड पार्ट म्हणून काही जणांना भावाने दिला होता. गिर्हाईक तणतणत यायचं "हा तर पंडीत नेहरूंच्या जीवनावरचा आहे "
" हो का ? कल्पना नाही. मी नाही पाहिलेला. पण मी याच समजुतीतून विकत घेतला. " असं साळसूदपणे भाऊ सांगायचा >>>>>>>>>
>>>>>>>
मस्त
लहानपणी करमणुकीची साधने नव्हती , खेळ आणि खेळच !
आमच्या गावात एक मारवाडी कलर टिव्ही कॅसेट व्ही. सी आर भाड्याने द्यायचा .
संध्याकाळी आम्ही त्याच्या दुकाना समोरील मंदिराच्या कट्ट्यावर ठाण मांडून बसायचो , तो सेट घेवून निघाला की त्याच्या मागे पळत जाऊन गावाच्या कोणत्या गल्लीत सेट लावलाय हे पुन्हा पळत येवून बाकीच्या मित्रांना सांगायचो .
मग रात्र भर जागून त्याने तिथे लावलेले दोन किंवा तीन सिनेमे सलग बघून घरी यायचो ( साहजिकच हे उन्हाळ्याच्या सुट्टीतील पराक्रम आहेत ).
रघु आचार्य, मस्त आठवण काढलीत.
रघु आचार्य, मस्त आठवण काढलीत.
मला दामाद आणि या लिस्ट मधले बरेच आवडतात.
केकू, पुकार एकदम मास्टरपीस आहे.सगळी गाणी ऐकण्या सारखी.माधुरी ने पण चांगली वेगळी भूमिका केलीय.
Pages