Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
परोपकार + लोकांना जीवनाचे
परोपकार + लोकांना जीवनाचे तत्वज्ञान गाण्यात सांगणारा नायक यात क्रमांक एक वर हे गाणं आहे. दोन, तीन वर अमिताभचीच गाणी येतील. यात मागे पडलेल्या मुलाला सायकलवर डबलसीट बसवून ती सायकल हवेत उडवून सर्वात पुढे उतरवणारा अमिताभ खूपच आवडीचा.
प्रियकर प्रेयसीत रूसवा फुगवा झाला असता गाणे म्हणत म्हणत प्रियकराला एक ओळ तत्वज्ञानाची सांगत त्याच्यासामोर त्याच्या आयटेमचा हात धरून दोघात एकाच ओळीत सुलह करणे ही अचाट शक्ती अशा गाण्यात आणि नायकात असायची, भटजीला जसे लग्न लावायची अॅथॉरिटी असायची तशीच गाणे म्हणत असलेल्या नायकाला कुणाच्याही समस्येत नाक खुपसून ती क्षणात दूर करण्याची सुपरपावर असायची. अशी गाणी पाहणे हा एक सुखद अनुभव असायचा.
https://www.youtube.com/watch?v=2eJjHaSmgZ8
अशी गाणी कोण बनवतं ? कडक
अशी गाणी कोण बनवतं ? कडक निषेध.
रिपोर्ट केला आहे. तुम्ही तो व्हीडीओ अजून दहा ठिकाणी टाकून प्रसरवू नका...
बडबडे आणि इरिटेटिंग यात फरक
बडबडे आणि इरिटेटिंग यात फरक असतो का नाही
>> ओह मी हे कुणाला सांगतोय Happy
Submitted by आशुचँप on 15 November, 2022 - 14:41>>>>
गांधीजींच्या वरताण सत्याचे
गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन>>>>
गांधीजींच्या वरताण सत्याचे
गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन>>>>
वरचा प्रतिसाद संपादीत करायला
वरचा प्रतिसाद संपादीत करायला आलो होतो. पण चार तासाचं प्रकरण लक्षात नाही राहीलं.
इथेच आठवेल तसे टाकण्यापेक्षा एखादा धागा असेल तर सुचवा.
गांधीजींच्या वरताण सत्याचे
गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन>>> हाहाहा.
गांधीजींच्या वरताण सत्याचे
गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन>>> हाहा
हे बर्याच पिक्चर मधे अस्ते. बाई तु आधी गुप्चुप सुखरुप बाहेर पड आणी मग जे करायचे ते कर.. पण नाही..
अजुन एक, व्हीलन चांगला तावडीत सापडला असतांना पटकन त्याला मारुन मोकळं व्हायचा सोडुन त्याच्या शी गप्पा मारत बसतात..
हे तर भल्याभल्यांना चुकलं
हे तर भल्याभल्यांना चुकलं नाही. अगदी ब्रेकिंगबॅड पासून सगळ्यात असले प्रकार असतात.
आणि दुसरं एक.वेळ अगदी कमी आहे
आणि दुसरं एक.वेळ अगदी कमी आहे, एक सिक्रेट एकाच माणसाला माहीत आहे.ते दुसऱ्याला सांगण्यापूर्वी तो मरू शकतो हे माहीत आहे.अश्या वेळी पण समारंभाच्या आधी डिटेल गणेश वंदना म्हणावी तशी प्रस्तवाना वाक्य म्हणतात
'मुझे एक बहुत अहम बात कहनी है'
'अक्सर बात ये है की..'
'तुम जो समझते हो वैसा नही है'
'शैला का खुनी कोन है मै बता रहा हूँ, ध्यान से सुनो..'
तिकडे इतकं होईपर्यंत खलनायक मागून येऊन गोळी मारून निघून जातो.राज राज ही रह जाता है.
शिवाय 2 हिरो एकाच नायिकेच्या संपर्कात रोज असले, नायिका सुंदर सुशील असली, आजूबाजूला दुसरी कोणीही प्रेमात पडणेबल बाई नसली तरी दोघांना आपण एकाच बाईवर प्रेम करतोय अशी शंका शेवट पर्यंत येतच नाही.शिवाय दोघे एकमेकांशी बोलताना बाई व्हॉल्डेमार्ट असल्या सारखं तिचं नाव शेवट पर्यंत न घेता बाकी सगळं स्तुती स्तोत्र बोलत असतात
'वो धरती की परी है'
'वो एक लडकी मेरे दिल के सब से करीब है'
'आज मै तुमसे अपने दिल का राज बता रहा हूँ' वगैरे वगैरे
गांधीजींच्या वरताण सत्याचे
गांधीजींच्या वरताण सत्याचे प्रयोग करणारी हिरॉइन>> अगदी अगदी
अनू परफेक्ट वर्णन, विशेषतः पियानो वाल्या गाण्यात तर कहर टोमणे आणि गैरसमज भरभरून असतात कडव्या कडव्यात!
ते बच्चे की माँ बनने वाली च्या सिन चं ही अगदी तसंच! मैं सबको बता दुंगी..कपाळावर हात मारून घेणारी बाहुली.
सगळ्यात पोलीस अधिकारी अशी ओळख
सगळ्यात हुशार पोलीस अधिकारी अशी ओळख करून कधी त्याच्या हुशारीची झलक सुद्धा दाखवतात पण प्रत्यक्षात वेळ आली की तो मात्र ट्रेनी पोलीस करणार नाही एवढा मूर्खपणा करतो.
शक्ती मध्ये आपल्या मुलाला कुठे लपवून ठेवलेय हे कळताच दिलीपकुमार ताफा घेऊन मोठ्याने सायरन कोकलत तिकडे कूच करतो. सायरनचा आवाज ऐकुन सहाजिकच व्हिलन सावध होऊन मुलाला घेऊन दुसरीकडे पळुन जातो.
शफी इनामदारला राज बब्बरच रॉबिनहूड आहे हे कळतं. तेव्हा तो राज बब्बर घरी नसताना त्याच्या घराची डुप्लिकेट चावी बनवून दार उघडून आत जाऊन त्याची वाट बघत बसतो. राज बब्बर येतो दार उघडतो आणि मग हे महाशय तो अजून दारात असतानाच डायलॉग मारुन मला कळलंय तो तूच आहेस हे उघड करतात.
राजबब्बर दार लावून पळून जातो.
सर्वात हुशार पोलीस अधिकाऱ्यांची ही कथा असेल तर लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडणार नाही तर काय!
तरी नशीब , आजकाल 'वसीहत के
तरी नशीब , आजकाल 'वसीहत के कागजात पर दस्तखत' करण्यासाठी धमकावणारे व्हिलन दिसत नाहीत.
आणि घटस्फोटाच्याही. यांचा
आणि घटस्फोटाच्याही. यांचा घटस्फोट कसेही करून घटस्फोट अर्जावर सही घेतली की होऊन जातो.
तरी नशीब , आजकाल 'वसीहत के
तरी नशीब , आजकाल 'वसीहत के कागजात पर दस्तखत' करण्यासाठी धमकावणारे व्हिलन दिसत नाहीत. >>> दाखवता येईल. फक्त चित्रपटाच्या सुरूवातीला ये वो दौर था, जब भारत मे अभी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन के लिए रजिस्ट्रार ऑफीस मे जाना नही पडता था... असं निवेदन टाकावं लागेल.
मी अनु >> सागर मधे आहे हा सीन.
(No subject)
एक सिक्रेट एकाच माणसाला माहीत
एक सिक्रेट एकाच माणसाला माहीत आहे.ते दुसऱ्याला सांगण्यापूर्वी तो मरू शकतो हे माहीत आहे.अश्या वेळी पण समारंभाच्या आधी डिटेल गणेश वंदना म्हणावी तशी प्रस्तवाना वाक्य म्हणतात
@मी_अनु >>> अगदी अगदी
शिवाय दोघे एकमेकांशी बोलताना बाई व्हॉल्डेमार्ट असल्या सारखं तिचं नाव शेवट पर्यंत न घेता बाकी सगळं स्तुती स्तोत्र बोलत असतात
>>>>> तू मुझे सुना में तुझे सुनाऊ
धमाल झालाय हा धागा, हाहाहा.
धमाल झालाय हा धागा, हाहाहा.
आपलेच सिनेमे असे नाही
आपलेच सिनेमे असे नाही
बॉंड्या च्या सिनेमात पण हेच
आता व्हिलन ला माहितीय की बॉंड्या लै करामती आहे, नाना कळा त्याच्या अंगी आहेत
त्याला वेळ न घालवता सरळ गोळी घालावी हे काही त्यांच्या मनात येत नाही
त्याहून वाईट म्हणजे स्वतः न मारता कोणा राक्षसी पण मंद बुद्धीच्या हस्तकावर काम सोपवून खुशाल तिथून निघून जातात
मग काय बॉंड्या अगदी शेवटच्या क्षणी तिथून पोबारा करणार नई तर काय ही माझी कसली उपेक्षा, असल्या अनुल्लेखाने मारण्यापेक्षा फाशीच द्या म्हणणार का?
मला एक त्या के ड्रामा सागं
मला एक त्या के ड्रामा चं कळत नाही.ज्यांना गोळी नायिकेच्या दिशेने येतेय इतकं बघण्याचा चलाख पणा असतो ते नायिकेला घेऊन बाजूला वाकू किंवा पडू का शकत नाहीत?नेहमी हिरोला नायिकेला मिठी घेऊन फिरून गोळी स्वतःच्या पाठीवर का झेलावी लागते?
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी पाठ माझी असं म्हणायचं असेल त्याना
आणि तुम्ही पण भलत्याच शंका काढता, नायिकेला मिठीत नई घेणार तर मग काय गव्हाची गोणी असल्यासारखं पाठीवर घेणारे का
सगळेच
सगळेच
एखाद्या अर्धमेल्या
एखाद्या अर्धमेल्या व्यक्तीकडून तो गचकण्यापूर्वी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळते अशा अनेक सीन्स चे महाधमाल स्पूफ "नेकेड गन" सिरीजच्या या सीन मधे आहे
https://www.youtube.com/watch?v=rJWLdQ9vylA
"Who else is almost dead?"
आशुचँप, साखरेचं पोतं तरी
आशुचँप, साखरेचं पोतं तरी म्हणा हो
हा के ड्रामा एकता कपूरच्या के ड्रामा सारखा आहे की काय.
ब्रह्मास्त्र मधे नागार्जुनाने कंसमापकासारख्या उडीने शिवाला वाचवले, तिच उडी तो जरा पलिकडे घेऊन गोळी न खाताही शिवाला वाचवू शकला असता. तेवढेच श्रम लागले असते फक्त गोळी वाया गेली असती. योग्यचय म्हणा,वाया घालवायला पार्ले पॉपिन्स थोडीच आहे.
धमाल चालू आहे इथे असा एक
धमाल चालू आहे इथे असा एक फॉरमॅट मिथुनचाही होता. तो व्हीलनला मारण्याआधी त्याने याचं काय घोडं मारलं होतं याचा पाढा वाचत असे.
हे सर्व फारएन्ड च्या धाग्यात
हे सर्व फारएन्ड च्या धाग्यात हवं.
कोणत्या धाग्यात अनु, फा ने
कोणत्या धाग्यात अनु, फा ने उचलून डकवले तर चालेल मला !
हा धागा आणि पहिला भाग गं
हा धागा आणि पहिला भाग गं अस्मिता
https://www.maayboli.com/node/30221
आता इथे फेक विनयपूर्ण कसे
आता इथे फेक विनयपूर्ण कसे लिहावे विचार करत आहे पण सिरीयसली, कोणत्याही धाग्यात असू दे. नाहीतर सरळ नवीन धागा काढा. ते आधीचे धागे जुने झाले आता.
Pages