गोडाचा शिरा
ती आज एव्हडी खूश होती स्वतःवरच की त्या आनंदात, समाधानात बसूनच रहावे असे तिला वाटत होते. सकाळपासून विविध प्रॉब्लेम्स ना तिने यशस्वीरीत्या dodge केले होते आणि ते सुद्धा तिच्या आंतरिक शांततेचा भंग न होता. त्यामुळेच ती खूप आनंदात होती.
कितीतरी वेळा आपण खूप आनंदात असतो,असेच आणि आपला पूर्ण दिवस तसाच सुखाच्या डोहात डुंबत जावा असे वाटत असते पण अचानक काहीतरी होते, कधी कामवाली बुट्टी मारते, तर कधी कामाच्या गडबडीत मुलांचे लास्ट मिनिट काहीतरी आठवते. काही नाही तर अचानक धो धो पाऊस आणि एखादे वेळेस, मानच अवघडते किंवा मायग्रेन चालू होतो. अगदी मिठाचा खडा पडावा तसे.
पण आजचा दिवस खासच म्हणावा लागेल. संपूर्ण दिवस ह्यातले काहीही न होता, सुरळीत पार पडला होता म्हणूनच हा आनंद द्विगुणित करावा गोडाचा शिरा करून असे तिला वाटले.
झालं, रवा सुरेख गुलाबी हॉइस्त्वर तिने भाजला. कुठलीही घाई न करता,अगदी प्रेमाने,मंद आचेवर. त्याचा रंग पालटला आणि सुरेख खमंग भाजल्याचा वास आल्यावर त्यात मग दूध,अगदी सत्यनारायणाच्या प्रसादागत, केशर ,वेलची घालून वाफ काढली. मग साखर घातली. तेंव्हा ते साखरेचे छोटे छोटे स्फटिक त्या शिर्यात चमकू लागले. रात्री चांदण्या चमकतात तसेच. ते तसेच बघत रहावे असेही तिला वाटले. पण जसे आनंदाचे क्षण भुरकन उडून जातात तसेच हे साखरेचे स्फटिक ही त्या रव्यात मिसळून गेले. अगदी एखादी नवीन आलेली सून किंवा जावई जसे छान मिसळतात आणि कुटुंबाचा गोडवा वाढवतात तसे. आणि सुंदर, गोड असा गोडाचा शिरा तयार झाला. त्या आपल्याच creation कडे बघून तिला समाधानाची तृप्ती झाली असे वाटले. पावतीच जणू.
©झारा तांबे
गोडाचा शिरा
Submitted by Zara Tambe on 13 November, 2022 - 20:06
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
झारा तांबे, छान लिहिता.
झारा तांबे, छान लिहिता. मायबोलीवर स्वागत. लिहित राहा.
रच्याकने, तुमच्या नायिकेने केलाय तसा गोडाचा शिरा मला प्रचंड आवडतो.
झारा तांबे, छान लिहिता.
झारा तांबे, छान लिहिता. मायबोलीवर स्वागत. लिहित राहा.>> +१
मला पण तसा शिरा फार आव् डतो. इथे एक आंब्याच्या शिर्याची जबरी रेसीपी आहे नक्की पहा.
झारा तांबे,
झारा तांबे,
मायबोलीवर स्वागत.
लिहित राहा.
मायबोली वरील लेखनाची गोड
मायबोली वरील लेखनाची गोड सुंदर सुरवात.
झारा तांबे,
झारा तांबे,
मायबोलीवर स्वागत.
लिहित राहा....
+१.
वा मस्तच लिहिलंय.
वा मस्तच लिहिलंय.
मायबोलीवर स्वागत आहे.
छान .
छान .
झारा तांबे, छान लिहिता.
झारा तांबे, छान लिहिता. मायबोलीवर स्वागत. लिहित राहा.>> +१
झारा तांबे, छान लिहिता.
झारा तांबे, छान लिहिता. मायबोलीवर स्वागत. लिहित राहा.>>>>>+१११११
छान लिहलंय! लिहीत राहा.
छान लिहलंय!
लिहीत राहा.
छान सकारात्मक.
छान सकारात्मक.