हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.
आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.
त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.
https://www.bbc.com/marathi/india-59472935
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !
-------------------------------------------------
आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.
आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.
आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.
मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.
माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.
हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!
हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.
का?
एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,
"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)
तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.
हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.
आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.
त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.
त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.
आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.
आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो
-------------------------------
उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल
-------------------------------
अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो
धन्यवाद,
ऋन्मेष
रंगीला
रंगीला
शाहरूख खान भारतीय महिलांना
शाहरूख खान भारतीय महिलांना ईतका का आवडतो?
कारण तो शाहरूखखानआहे.
छानलिहिलंय सगळ्यांनीच.
आमीर परफेक्शनिस्ट आहे म्हणजे नक्की काय आहे? सारखं तेच बोलतं पब्लिक.
मला तर रंगीला आणखी बाकी सर्वत्र त्याची ओवर ऍक्टी़गच वाटते.
थॅंक यू mrunali.samad .
थॅंक यू mrunali.samad .
आप बहुत समझदार है.
सर आणि मायबोली वरचे सर्व सिने रसिक हो.
आपण ह्या साईट भेट द्या.
https://podcasts.apple.com/in/podcast/khandaan-a-bollywood-podcast/id136...
ह्या जागी महान लोक एकत्र येऊन हिंदी फिल्म विषयी उच्च चर्चा करतात. तिथे जाऊन रंगीला आणि बादशहा बद्दल ऐका. मग तुम्हाला इथल्या सिनेपरीक्षण बद्दल काय वाटते ते तुमच्या मनातच ठेवा.
आमीर परफेक्शनिस्ट आहे म्हणजे
आमीर परफेक्शनिस्ट आहे म्हणजे नक्की काय आहे? सारखं तेच बोलतं पब्लिक.
>>>>
एखाद्या सीनच्या वा भुमिकेच्या बारीकसारीक डिटेलिंगबाबत तो खोलात जाऊन मेहनत घेतो.
त्याच्या मनासारखा शॉट होत नाही तोवर तो रिटेकवर रिटेक घेत राहतो.
या सर्वात तो दिग्दर्शकालाही त्रास देतो
ते असो, पण पर्रफेक्शनिस्ट म्हणजे हे (असावे). याचा अभिनयक्षमतेशी थेट संबंध नाही (नसावा).
केशवकूल छान ईंटरेस्टींग लिंक.
केशवकूल छान ईंटरेस्टींग लिंक.. कामातून निवांत वेळ मिळाला की चेक करतो. शाहरूखपटांबद्दल आणि एकूण चित्रपटांबद्दल जाणून घ्यायला आवडेल तिथे..
मला वाटतं.
मला वाटतं.
एक पण शाहरुख खान चा सिनेमा दर्जेदार नाही
भारतीय लोकांची मानसिकता बघून जे सुमार दर्जा चे सिनेमे निर्माण झाले आणि
आठ टक्क्या पेक्षा कमी लोकांनी ते थिएटर मध्ये जावून बघितलं
सुमार नायक सुमार प्रेक्षक .
असे सूत्र आहे .
भारतात दर्जेदार सिनेमा निर्माण झाले पण त्यांची संख्या अतिशय कमी अशें
शाहरुख सारख्या सुमार दर्जा च्य व्यक्ती वर धागा निघतो हेच अपमान कारक आहे
नायक हे बुद्धी हिन असतात लेखक आणि दिग्दर्शक ही लोक हुशार असतात
शाहरुख सारख्या सुमार दर्जा
शाहरुख सारख्या सुमार दर्जा च्य व्यक्ती वर धागा निघतो हेच अपमान कारक आहे >>> सुमार दर्ज्याची व्यक्ती की सुमार दर्ज्याचा कलाकार?
नायक हे बुद्धी हिन असतात लेखक आणि दिग्दर्शक ही लोक हुशार असतात >>> हे फारच सरसकटीकरण झाले. त्या गर्लस कॅन नॉट प्ले बास्केटबॉलसारखे..
असो, तरी आपल्या मताचा मान राखून सांगतो. शाहरूख हा मी पाहिलेला आजवरचा सर्वात बुद्धीमान कलाकार आहे. त्याच्या प्रेमात असण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे.
ईन्फॅक्ट तो आयकॉन आहे. आदर्श ठेवावे असे व्यक्तीमत्व आहे.
Country or organization -
यावर जरा नजर टाका
हे केवळ फिल्मी अॅवार्डस नाहीयेत.
Country or organization - Year - Award
France -
2007 - Ordre des Arts et des Lettres
2014 - Legion of Honour
India -
1997 - Best Indian Citizen Award
2002 - Rajiv Gandhi Award
2005 - Padma Shri
Indian Television Academy -
2017 - Yash Chopra National Memorial Award
La Trobe University -
2019 - Honorary Doctorate
Malaysia -
2008 - Darjah Mulia Seri Melaka
2012 - BrandLaureate Legendary Award
Morocco -
2011 - L'Etoile d'Or
2012 - Wissame al-Kafaa al-Fikria
Maulana Azad National Urdu University -
2016 - Honorary Doctorate
UNESCO -
2011 - Pyramide con Marni Award
United Kingdom -
2014 - Global Diversity Award
University of Bedfordshire -
2009 - Honorary Doctorate
University of Edinburgh -
2015 - Honorary Doctorate
University of Law -
2019 - Honorary Doctorate
World Economic Forum -
2018 - Crystal Award
आणि हो,
आणि हो,
शाहरूख हा माणूस म्हणून किती ग्रेट आहे हे ईथे बघू शकता
शाहरुख खान हा आपल्या देशासाठी कोणत्या प्रकारे तरी उपयोगी आहे का?
https://mr.quora.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4...
हा माणूस जर सुमार दर्ज्याची व्यक्ती असेल तर पुढच्या सहस्त्र जन्मात मला ईतकेच सुमार बनून जन्माला यायला आवडेल
कोणत्या ही कला कृती मध्ये
कोणत्या ही कला कृती मध्ये कलाकार हा शेवटचा घटक असतो.
उत्तम गीतकार ,उत्तम संगीतकार मिळाले नसते तर लता पासून मुकेश पर्यंत एक पण गायकाची आता उत्तम दर्ज ची गाणी नसती.
उत्तम गीतकार,उत्तम संगीतकार असता आणि लता,मुकेश नसते तरी ती गाणी दर्जेदार झाली असती.
सोनू निगम नी सारेगम सोडला आणि त्याचे करिअर च संपले..
ही रिॲलिटी आहे
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
सर
ही घ्या तुम्हाला पण डॉक्टरेट.
आपला तो कोण बरे हा तुमच्या नवी मुंबईचा नाव अगदी जिभेवर आहे...
त्याला पण डॉक्टरेट आहे.
कुठे गेला ऋनमेष
कुठे गेला
ऋनमेष
खऱ्या आयुष्यात हे सेलेब्रिटी
खऱ्या आयुष्यात हे सेलेब्रिटी कसे राहतात .त्यांचे खरे लाईफस्टाईल काय आहे ह्याची खरी माहिती मीडिया नी दिली तर चाहते हा मानसिक विकृत वर्ग थोडा माणसात येईल.
भ्रमात राहणार नाही
हेमंत जी
हेमंत जी
आता धागा कर्ता सुद्धा सुमार दर्जाचे धागे काढतो
केशवकूल,
केशवकूल,
पुर्ण लिस्ट वाचा. ईतके मान सन्मान बहुमान. परदेशातील कैक युनिवर्सिटी त्याला टेड टॉक द्यायला बोलावतात. ते तो बुद्धी हिन आहे म्हणून?
हेमंत, काही तरी बोला ओ यावर..
उत्तम गीतकार ,उत्तम संगीतकार
उत्तम गीतकार ,उत्तम संगीतकार मिळाले नसते तर लता पासून मुकेश पर्यंत एक पण गायकाची आता उत्तम दर्ज ची गाणी नसती.
>>>>
उत्तम गीतकार संगीतकार नसते तर लतादीदींचे गायन कौशल्य जगापासून लपून राहिले असते का?
बर्र हेच तुम्ही गीतकार आणि संगीतकार यांना हलके दाखवायलाही म्हणू शकता की उत्तम गायक नसते तर त्या गाण्यांची वाट लागली असती.
मग या आर्गुमेंटचा काय अर्थ घ्यायचा?
बर्र अभिनेत्याला काहीच वॅल्यू नसते तर मग हे शाहरूखखानपासून अमिताभपर्यंत सर्वांना लागू. की एकटे शाहरूखला हलके लेखायला हा मुद्दा हवेत उडवायचा?
खऱ्या आयुष्यात हे सेलेब्रिटी
खऱ्या आयुष्यात हे सेलेब्रिटी कसे राहतात .त्यांचे खरे लाईफस्टाईल काय आहे ह्याची खरी माहिती मीडिया नी दिली तर चाहते हा मानसिक विकृत वर्ग थोडा माणसात येईल.
>>>>>>
हीच तर खरी गंमत आहे.
शाहरूख खर्या आयुष्यात जसा आहे त्यामुळेच तर त्याचे फॅन फोलॉईंग जास्त आहे
आता बोला
सर,
सर,
माझ्या मते तुम्ही आता शाहरूखचे देऊळ बांधले पाहिजे. म्हणजे इतर पामरांना त्याचे महत्त्व कळेल. जरा मनावर घ्या.
Birthday Shahrukh च.
Birthday Shahrukh च.
तो मस्त एसीमध्ये त्याच्या आर्थिक दर्जा शी सुसंगत असणाऱ्या लोकांबरोबर एन्जॉय करत आहे .
करोडो रुपये खर्च करत आहे .
आणि मानसिक विकृत असणारी चाहते ही जमात रस्तावर गर्मी मध्ये त्याची पूजा करत आहेत.
मानसिक गुलामी चे हे उत्तम उदाहरण आहे
@ हेमंत,
@ हेमंत,
जेव्हा तो गर्मीमध्ये मेहनत घेत काम करत असतो ते चित्रपट नंतर आपण घरी सोफ्यावर पसरून एसीमध्ये पॉपकॉर्न खात बघत असतो त्याला काय म्हणाल?
मी कबूल करतो की मी त्याच्यासाठी असा रस्त्यावर ताटकळत उभा नाही राहणार. उन्हात तर मुळीच नाही कारण मला पित्ताचा त्रास आहे.
पण जे लोकं हे करतात त्यांच्या भावनांची मी कदर करतो. मला तरी त्यात कुठलीही मानसिक विकृती वा मानसिक गुलामी दिसत नाही.
मी नास्तिक आहे. त्यामुळे मला लोकं दगडाच्या देवाची पूजा करतात याचे आश्चर्य वाटते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला रात्ररात्रभर ताटकळत कसे राहतात याचे नवल वाटते.
यातले काही खरेच श्रद्धेने राहत असतील, तर काही निव्व्वळ फॅड म्हणून. पण तरीही कोणाच्या भावनांना आपण जज करणे चुकीचेच.
शाहरूखने जे स्थान कमावले आहे ते स्वतःच्या कलागुणांवर आणि मेहनतीवर. लोकं जर त्याचा आदर्श घेत असतील तर एक चाहता म्हणून मला त्याचा अभिमानच आहे !
शाहरूख खान महिलांना ईतका का
शाहरूख खान महिलांना ईतका का आवडतो याचे उत्तर या ३ मिनिटांच्या विडिओतही मिळेल.
जरूर बघा,
https://www.youtube.com/watch?v=2XiEmHl2NVU
आवडला तर पुर्ण एपिसोडही शोधून बघू शकता.
हि महिला केबीसीमध्ये शाहरूखबद्दल मनात आकस ठेऊन आलेली.
पण पण पण ................
अखेरीस जेव्हा शाहरूखने तिच्या आईला मिठी मारली तेव्हा तिच्या चेहर्यावर दिसणारा स्त्रीसुलभ मत्सर तिच्याबद्दल बरेच काही बोलून गेला.
पण तो झाला तिचा स्वभाव.
त्याऊलट शाहरूखचे तिच्यासोबत असलेले वर्तन म्हणजे... जिओ शाहरूख.. फार फार म्हणजे फार आवडीचा विडिओ
आणि हो, विडिओ खालच्या कॉमेंट जरूर वाचा. शाहरूखचे चित्रपट न आवडणार्यांनीही आवर्जून त्याच्या या गुणाचे कौतुक केले आहे. प्रत्येक कॉमेंटला देखील हजारो लाईक आहेत.
ती बाईही आज कबूल करत असेल वा नसेल, पण तिलाही या प्रसंगानंतर शाहरूख जरूर आवडू लागला असेल.
ग्रेसफुली हॅन्डल केले शाहरुख
ग्रेसफुली हॅन्डल केले शाहरुख ने...
काय बाई आहे ती... मायबोलीवर हवी होती...
टोटली स्क्रीप्टेेड एपिसोड!
टोटली स्क्रीप्टेेड एपिसोड!
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे,
आमीर खान परफेक्शनिस्ट आहे, त्याला इटिंग डिसॉर्डर्स आहेत, तो ऑब्सेसिव्ह आहे असे काहीसे वाचनात आले होते. लिंक सापडल्यास देते.
https://www.ottplay.com/news/koffee-with-karan-when-ex-wife-kiran-rao-re...
https://youtu.be/7wjQJ8eqEaw
https://youtu.be/7wjQJ8eqEaw
सामो, काय असते हे ईटींग
सामो, काय असते हे ईटींग डिसॉर्डर?
केशवकूल, काहीही हं. केबीसी मध्ये आलेली सामान्य पब्लिक. तो कसा काय स्क्रिप्टेड एपिसोड असेल.
बाकी हे शाहरूखचे कौतुकच, त्या सिच्युएशनलाही त्याचे वागणे एवढे डिसेंट आणि कूल होते की स्क्रिप्टेड वाटावे.
>>>>>सामो, काय असते हे ईटींग
>>>>>सामो, काय असते हे ईटींग डिसॉर्डर?
माहीत नाही.
अर्जुन खडे हो जाओ, इटिंग
अर्जुन खडे हो जाओ, इटिंग डिसॉर्डरपे निबंध सुनाओ.
मॅम इटिंग डिसऑर्डर्स दो प्रकारकी होती है. एक जो सही मे डिसऑर्डर होती है और दुसरी जो सही मे डिसऑर्डर नही होती है.
ठीक ठीक से समझाओ.
मॅम मराठीत सांगतो.
काही लोकांना खाण्याच्या अशा खऱ्याच डिसऑर्डर्स असतात ज्याचे गंभीर शारीरिक आणि/किंवा मानसीक परिणाम ठळकपणे दिसुन येतात. वैद्यकीय शास्त्रातील लोक याबद्दल अधिक माहिती देऊ शकतात.
तर जगण्यासाठी खाणे आणि खाण्यासाठी जगणे अशी अतिशयोक्ती रस वापरून खाण्याची वर्गवारी करून त्यातील एका प्रकारातले लोक दुसऱ्या प्रकारातील लोकांना जे काही झाले आहे असे समजतात ती आभासी इटिंग डिसऑर्डर. वास्तविक यात थोडेफार कमी जास्त वजन या व्यतिरिक्त फारसा फरक नसतो, तेव्हा खऱ्या डिसऑर्डर मध्ये दिसुन येणारे शारीरिक आणि मानसीक परिणाम दोघांमध्ये दिसत नाहीत. परंतु एका प्रकारातील कुणाला काही झाले की त्याचा खाण्याशी संबंध आहे की नाही हे वैद्यकीय/आहार तज्ज्ञ सुद्धा सांगु शकणार नाहीत, पण दुसऱ्या प्रकारातील लोक हे त्या व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीमुळेच पक्षी त्याच्या इटिंग डिसऑर्डर मुळेच झालेय हे अगदी छातीठोकपणे सांगू शकतात आणि एकमेकांना काय कसे व किती किंवा कितीही खावे अथवा खाऊ/(च) नये म्हणजे पहा चार दिवसात ठणठणीत होशील की नाही असा खात्रीशीर सल्ला देऊ शकतात. वैद्यकीयशास्त्राने वर्गीकरण केलेल्या डिसऑर्डर मध्ये अगदीच अत्यल्प खाणे आणि अगदीच अति खाणे दोन्ही प्रकार असल्याने एक प्रकारचे लोक त्या व्यक्तीला दुसऱ्या प्रकारातील खरी डिसऑर्डरच झाली आहे याचे सुद्धा छातीठोकपणे निदान करून त्यावर गॉसिप करू शकतात. काही लोकांनी केलेली टोकाची उदाहरणे दोन्ही बाजूचे लोक देऊ शकतात. यामुळे कधीकधी त्या व्यक्तीला आपल्याला खरेच तर इटिंग डिसऑर्डर नाही ना असे वाटु शकते आणि आपला तो पिंड नसताना दुसऱ्या प्रकारात जाऊन आपले तात्पुरते नुकसान करून घेऊ शकते.
अर्जुन जोमात, मॅम रोमात.
हे वाचून माझ्या डोक्याचा
हे वाचून माझ्या डोक्याचा दुर्योधन झाला. पुन्हा वाचावे लागेल.
पण शाहरूखशी संबंधित नाही ईतके कळले तुर्तास हे पुरे
टीव्ही वर येणारे सर्व
टीव्ही वर येणारे सर्व कार्यक्रम हे अगोदर स्क्रिप्ट लिहून नंतर सादर केलेले असतात.
गरिबी विकणे.
अपंगत्व विकणे.
स्त्रीत्व विकणे.
हे चालू असते.
भारतात भोळे खूप आहेत त्याला पण खरे समजतात.
Pages