हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.
आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.
त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.
https://www.bbc.com/marathi/india-59472935
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !
-------------------------------------------------
आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.
आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.
आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.
मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.
माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.
हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!
हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.
का?
एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,
"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)
तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.
हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.
आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.
त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.
त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.
आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.
आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो
-------------------------------
उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल
-------------------------------
अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो
धन्यवाद,
ऋन्मेष
आज ddlj थिएटर ला लागला होता
आज ddlj थिएटर ला लागला होता
पठाणचे टीझर आले आहे. फास्ट
पठाणचे टीझर आले आहे. फास्ट-फ्यूरिअस सिरीज इतकंच एकाचवेळी आकर्षक आणि बिनडोक आहे. तो पठाणचा धागा कुठे गेला?
आपण कोण आहोत? आपला शैक्षणिक
आपण कोण आहोत? आपला शैक्षणिक दर्जा काय? एकूण कर्तृत्व काय? याचा कसलाही विचार न करता #मत ठोकून द्यायचं...
- पु.ल.
हे घ्या सी
हे घ्या सी
पठाण
https://www.maayboli.com/node/81360
@ निलेश.. खरंच की
@ निलेश.. खरंच की
शाहरूखच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर...
Bollywood studio Yash Raj Films on Tuesday said superstar Shah Rukh Khan's iconic film "Dilwale Dulhania Le Jayenge" will be once again make its debut in theatres countrywide on his 57th birthday. The production house shared the news on Instagram, revealing that the romance drama will be screened in PVR, INOX and Cinepolix theatres on Wednesday.
ती BBCची पेर्फेच्त आहे. शिवाय
ती BBCची पेर्फेच्त आहे. शिवाय मराठीत आहे. (गुगल translate आहे. चालेल.) त्यात सगळे मुद्दे आले आहेत. ह्याच पानावर शाहरुख बद्दल एक क़्विझ आहे. प्लस शाहरुखच्या जीवनातील पन्नास घटनांचे संंकलन करणारा एक लेख आहे. शाहरुख प्रेमींसाठी मेजवानी. हे पान जपून ठेवा.
Say thanks टू रानभुली.
मला एक सांगा शाहरुख बद्दल लिहिताना लोकांना "कभी हाॅं कभी ना" आणि "बादशहा" ह्या नितांत सुंदर कलाकृतींची आठवण का होत नाही?
बादशाह चा वेगळा धागा हवा..
बादशाह चा वेगळा धागा हवा.. खूप लोकांचा आवडता आहे तो चित्रपट इथे...
जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर.
जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... >> बरोबर
आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. >> चूक
"हम तुम्हारे है सनम" आणि मनात
"हम तुम्हारे है सनम" आणि मन्नत वरची गर्दी पाहून "फॅॅन" आठवला.
Burj Khalifa All Lit Up For
Burj Khalifa All Lit Up For Shah Rukh Khan's 57th Birthday. Watch
https://www.ndtv.com/entertainment/burj-khalifa-all-lit-up-for-shah-rukh...
काय सन्मान आहे !!!
विडिओ जरूर बघा .. अभिमान वाटेल
मला एक सांगा शाहरुख बद्दल
मला एक सांगा शाहरुख बद्दल लिहिताना लोकांना "कभी हाॅं कभी ना" आणि "बादशहा" ह्या नितांत सुंदर कलाकृतींची आठवण का होत नाही?
>>>>>>>>
लिहितो यावर सविस्तर
इतका का आवडतो आणि इतका का राग
इतका का आवडतो आणि इतका का राग येतो हे वाचून सहाजिकच मनात प्रश्न निर्माण होतो की केवढे आवडणे आणि केवढा राग येणे हे नॉर्मल आहे? त्याचे मोजमाप कसे करायचे? आणि त्याची पातळी कोण ठरवते व कुठल्या निकषांवर? नॉर्मलच्या वर किंवा खाली याचे अजून विविध वर्गीकरण आहे का? यावर कुणाचा मार्गदर्शनपर लेख आल्यास वाचायला आवडेल.
यावर कुणाचा मार्गदर्शनपर लेख
यावर कुणाचा मार्गदर्शनपर लेख आल्यास वाचायला आवडेल. >>> प्रयत्न करतो
मला शाहरुख खान अजिबात आवडत
मला शाहरुख खान अजिबात आवडत नाही
मला शाहरुख खान अजिबात आवडत
मला शाहरुख खान अजिबात आवडत नाही>>>+ १००
मला शाहरुख आवडतो. भारतीय
मला शाहरुख आवडतो. भारतीय किंवा एकुणच महिलांना ज्या कारणासाठी आवडतो ती तर आहेतच, पण त्याहून इतर अनेक कारणांसाठीही आवडतो. त्याचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन प्रेझेंस फार सहज आहे. बुद्धिमान आहे. हळवा-संवेदनशील वगैरे असण्याची आणि एक माणूस म्हणूनही छान असण्याचीही दाट शक्यता आहे.
अभिमान वगैरे मात्र वाटत नाही. तोही माणूस आहे, त्याहून महत्वाचं म्हणजे कलाकार आहे. कलाकार आहे म्हणजे जरा मनस्वी असणारच. त्यामुळे अशा बाबतीत अभिमान-महान-उज्ज्वल-जाज्वल्य-गर्व-अस्मिता-परंपरा-अनुशासन-भक्ती वगैरे पदार्थ आले, की त्या बिचार्यावर आणि आपल्यावरही उगाच लोड येतो. मग देव्हारे आलेच. त्याची गरज नाही. कुणी देव्हारे मांडलेच तरी शाहरुखला फार फरक पडणार नाही, इतका तो जमिनीवर असावा असं वाटतं. आपल्यालाही पडू नये. मात्र तो आहे, त्या स्थानावर असण्याची ऐट, रोब-रूबाब साहजिकच आहे, योग्य प्रमाणात ते शोभूनही दिसेल. शेवटी माणूसच आहे तो.
'मन्नत' मी बघितले आहे. मात्र सेल्फी वगैरे काढावासा वाटला नाही. थोडा वेळ तिथं थांबून बघत मात्र राहिलो. तशात तो घराबाहेर आला असता तरी शांतपणे पाहून घेतलं असतं. उचंबळणं-चेकाळणं वगैरे काय झालं नसतं.
(हं, घ्या )
@ मानव - एका बाईच्या संजय
@ मानव - एका बाईच्या संजय दत्च्याच्या 'प्रेमाचा' पूर्ण दिस-इल्युजनल, कमालीचा ऑब्सेसिव्ह व पराकोटीचा 'तिला ट्रीटमेन्ट व औषधांची गरज' होती - हे दर्शविणारा एक लेख मी फार पूर्वी वाचला होता.या बाईलासंजय दत्त आपल्याशी लग्न करावे व कधी ना कधी तो करणारच याबद्दल खात्री होती. function at() { [native code] }यंत गंभीर मानसिक स्थिती दर्शविणारा तो लेख वाचून मला प्रश्न पडलेला - तिला कोणी वैद्यकिय मदत का सुचवत नाही.
साजिरा
साजिरा
दिव्यत्वाची जेथ प्रचीति तेथे कर माझे जुळती.
सामो, हं हा erotomania शकेल
सामो, हं हा erotomania असू शकेल.
लोक बहुतकरून यांची चेष्टा करतात आणि असे delusion असणारे वैद्यकीय मदत घेण्यास तयार होणे महा कठीण असते.
मायबोली वर आज शाहरुख आणि
मायबोली वर आज शाहरुख आणि ऋन्मेष दोघेही टॉप ट्रेंड मध्ये आहेत .
बुर्ज खलिफा ने देखील शाहरुखचा वाढदिवस साजरा केला .
मानव
मानव
सर्व साधारण लोकांप्रमाणे नॉर्मल वागणे हा देखील मॅॅनिया आहे.
सफरींग फ्रॉम नो मॅॅनिया इज New-मनिया. हा खूप कॉमन प्रकार .आहे.
शाहरुख आवडण्याचा काळ म्हणजे
शाहरुख आवडण्याचा काळ म्हणजे फौजी सिरियल ते पहिली दहा वर्ष साधारणपणे. फौजीमध्ये तर आम्ही कॉलेजीयन्स जाम फिदा होतो त्याच्यावर, त्यांनंतर मला काजोलबरोबर त्याची जोडी प्रचंड आवडायची. मी फक्त ddlj थेटरात बघितला बाकी टीव्हीवर लागतील तेव्हाच बघितले आहेत. त्याचा एक उत्तम चित्रपट स्वदेस मात्र अजून बघितला नाहीये, तो बघायचा आहे.
हल्ली अजिबात आवडत नाही, बायजू किंवा रम्मी खेळा सांगायला येतो किंवा कुठला तो पानमसाला अगदी बघवत नाही, वय झालं आपलं हे ग्रेसफुली accept करायला हवं त्याने असं वाटतं आणि तशा भूमिका करायला हव्यात. हल्ली अभिनयात पण तोच तोच पणा वाटतो त्याच्या (हल्लीच्या काही वर्षातल्या पिक्चरचे प्रोमोज बघून केलेलं विधान) .
या लेखाला केवळ शाहरूखच्या
या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !>> बीबीसी ला इतकं सिरियसली नका घेऊ सर.
मला आवडतो शाहरुख. रोमँटिक
मला आवडतो शाहरुख. रोमँटिक हिरो म्हणून सगळ्यात जास्त. कारण अश्या सीन्स मध्ये त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर जी intensity दिसते ती खूप भावते मला. त्याला उत्तम कॉमेडी करता येते. परफेक्ट टायमिंग जमतं. स्क्रीन प्रेझेन्स अप्रतिम आहे. आणि हिरो मटेरियल आहे कंप्लीट. शिवाय खलनायकी बाजाचा नायक तो फार ताकदीने साकार करतो.
मला तरीही सगळ्यात जास्त तो आवडला स्वदेस मध्येच. मास्टरपीस.
बाकी तो गुड्डू मध्ये किती बकवास होता आणि हल्ली कसा वयस्क दिसतो वगैरे चर्चेत काही अर्थ नाही. कधी असं कधी तसं... चालायचंच!
आता जरा ऑफ-टॉपिक प्रश्न वाटेल
आता जरा ऑफ-टॉपिक प्रश्न वाटेल पण कित्येक दिवस विचारायचा आहे आणि मायबोलीकर दयाळू आहेत, जरा शहाणे करून सोडतील म्हणून विचारते - इतके चाहते अन्न-पाण्याशिवाय तासंतास उभे असतात शाहरूखच्या दर्शनासाठी, तर तो निदान पाणी, पेढे असं काही करतो की नाय?? नुसतंच गच्चीत येऊन टाटा-बाय बाय हे काय....
ऑफ टॉपिक नाहीय.
ऑफ टॉपिक नाहीय.
किमान हाफ टॉपिक तरी आहेच.
अगदी रमड.
अगदी रमड.
त्याच्यासारखे भयंकर हुशार , हजरजबाबी, हरहुन्नरी, ऊर्जा असलेले कोणी नाही. कशातच अडकत नाही तो, स्मूद क्रिमिनल एकदम! त्या काळात बहुतेक हिरो हिरवणींवर कर्तव्य किंवा उपकार केल्यासारखे प्रेम करायचे. उदा. सुनील शेट्टी, तेव्हा शाखाने प्रेमाशिवाय मी जगूच शकत नाही किंवा 'यू आर वर्थ ईट, बेब' अशी नजर दिली. काहीजणांमधे अशी एनर्जी असते आपल्याला त्यांचं सगळं पटलं/आवडलं नाही तरी त्यांच्या वावराकडे ते आपल्याला आकृष्ट करतातच, त्यात येतो तो !! डेव्हिड लेटरमनच्या इंटरव्यूत मस्त बोलला आहे. प्रि स्टारडम हार्डशिप्स सांगितल्या आहेत. तो साधारण पंधराव्या वर्षी अनाथ झाला होता , मोठी बहिण नैराश्यात गेली व कधी सावरलीच नाही पण हा बाहेर पडला आणि काय बाहेर पडला !! आता तो तिचीही काळजी घेतो. कुडोस टू द गट्स!
ज्यांचं सगळं पटत नाही तेच
ज्यांचं सगळं पटत नाही तेच वावराने आपल्याला आकृष्ट करतात. (मीम जोगं वाक्य आहे पण आता त्यासाठी वेळ नाही!! )
जिथे सगळच पटलं नाही तिथे जाण्याचा प्रश्नच नाही, आणि जिथे सगळच पटलं तिथे काय नवे प्रश्न, आपलेच प्रश्न ...
बनके तेरा मीमजोगी घे !
बनके तेरा मीम जोगी घे !
मला शाहरुख खान अजिबात आवडत
मला शाहरुख खान अजिबात आवडत नाही>>>+ १०० >>> +७८६ यातला अजिबात हा शब्द फार आवडला.
मला शाहरूख फार आवडतो किंवा मला शाहरूख अजिबात आवडत नाही. अधलेमधले फार कमी असतात शाहरूखबाबत
Pages