Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी अजूनतरी कधी दारू प्यायली
मी अजूनतरी कधी दारू प्यायली नाही पण कधी इच्चा झाली तर असू द्यावा म्हणून हा धागा राखीव आहे
>>>
ओके....
पण या धाग्याने हेच होणार याची भिती होती
सर्वांना शुभदिपावली.
आणि उद्या नवीन वर्षाला तरी सर्वांनी हा मोह टाळा हि विनंती.
बेताने प्या काळजी घ्या...
हायवेवरून वेगाने जाताना रस्त्यात जे बोर्ड दिसतात ते तुमच्या भल्यासाठीच असतात..
तरी कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व _/\_
माझा प्रश्न दारूशी निगडीत
माझा प्रश्न दारूशी निगडीत नाही पण फ्लेवर्ड सोड्याशी (किंबहुना त्यात मिसळल्या जाणाऱ्या फ्लेवरशी) निगडीत आहे. आणि इथे बरीच तज्ञ मंडळी आहेत म्हणून विचारतो आहे.
आजकाल अनेक ठिकाणी जे सोडा पब उभे राहिले आहेत त्यांच्याकडे 'ब्लू बेरी / ब्लू लगून' नावाचा एक फ्लेवर्ड सोडा मिळतो, जो माझा खूप आवडता आहे. ३-४ वर्षांपूर्वी अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्या तरी राजकीय पक्ष / सामाजिक संस्थेद्वारे सरबत वाटप होते तेव्हा त्या फ्लेवरचे सरबत होते.
परंतु या फ्लेवरचे सरबत / सिरप कोठे आणि काय नावाने मिळेल??? मध्यंतरी एका दुकानात निळ्याशार रंगाच्या सिरपची बाटली दिसली (Blue Lagoon Syrup) ती आणली पण त्याला 'तो' स्वाद नाही! काहीतरी वेगळाच केमिकलसारखा वास आहे.
blue Curacao syrup बघा
blue Curacao syrup बघा
कदाचित ते असू शकते
ब्लु लागून मोकटेल्स मध्ये तेच असते
दारू कशी ही प्या .
दारू कशी ही प्या .
पण
सोडा,कोणते ही सॉफ्ट ड्रिंक बरोबर कधीच पीवू नका.
हाड कमजोर होतात.
पाणी किंवा ज्यूस हे ठीक
सॉफ्ट ड्रिंक,सोडा पूर्ण टाळा.
अनुमोदन
अनुमोदन
क्वचित ठीक आहे पण शक्यतो पाणी, बर्फ उत्तम
आपल्याकडे फार चुकीच्या पद्धतीने दारू घेतली जाते
एकतर जेवणाच्या आधी, त्यात सोडा, थम्पसप टाकून मूळ चव मारून ढोसली जाते
सोबत अत्यंत वेफर्स, तेलकट, पित्त वाढवणारे मसालेदार पदार्थ
आणि नीट न जेवताच मग झोपतात
सगळ्यात बेस्ट म्हणजे हलके जेवण करून मग एखादा पेग भरावा
जेवणात मैदा, तिखट, बिर्याणी सारखे पदार्थ नसले तर बरे
सोबत पाणीदार चखना म्हणजे काकडी, टोमॅटो खावीत
गाजराचे, मुळ्याच्या काप त्यावर लिंबू आणि चाट मसाला किंवा मीठ भुरभुरावे
शौक असेल तर एखादा चीजचा तुकडा थोडा थोडा करून
पेग आधी आणि नंतर ग्लासभर पाणी प्यावे
नुसतेच पेग वर पेग मारून तरर होऊन टांगा पलटी होणे म्हणजे दारू पिणे नाही ढोसणे आहे
हलकेच किक बसते, हलकं हलकं वाटू लागतं
त्यावेळी थांबावं कारणं नंतर कितीही प्यायला तरी ती झिंग नाही फक्त झोकांड्या व्हायला कारणीभूत होते
माझा कोटा इतका, आपण तर फुल टाकी आहे, मी कितीही प्यायलो तरी गाडी चालवू शकतो, मी आज बेदम पिणार हे सगळे वृथा अभिमान निववळ अपायकारक
दारू पिणे म्हणजे आपण दारूची मजा घेणे हे लक्षात ठेवावे
दारूला आपली मजा घेऊ देणे कटाक्षाने टाळावे
आपला ब्रँड हाच दुसरी चढत नाही वगैरे पण सोडून विविध ब्रँड, त्यांच्या खास चवी, त्यांचा गंध याचा आस्वाद घ्यावा
दारू ही पाण्यात च योग्य.
दारू ही पाण्यात च योग्य.
दारू जिथे बसून पिणार ती जागा मोकळी आणि हवेशीर असावी.
दारू पिताना कोणतेच गंभीर विषयावर चर्चा नको .किंवा तसे मतभेद निर्माण करणारे न्यूज चॅनल पण बघू नयेत.
WhatsApp किंवा fb बिलकुल त्या वेळी ओपन करू नयेत.
समाज माध्यमावर कोणतीच प्रतिक्रिया दारू पिताना किंवा पिल्यावर देवू नये.
नाही तर त्याचा कपिल शर्मा होतों
90 ml पिण्यासाठी एक तास तरी हवा.
हळू हळू तिचा स्वाद घेतला जावा.
हळू हळू पिण्याने मस्त हलकी नशा चढते आणि ती हवी हवी असते.
10 मिनिटात 180,ml संपवणे हे कृत्य वाईट च .
त्या मध्ये मजा नाही पण त्रास खूप आहे.
मनात विचार आला की या सर्व
मनात विचार आला की या सर्व दुष्ट दुष्ट लोकांचे मतपरिवर्तन झाले आणि ते पण सरांच्या बाजूने बोलायला लागले, तर सरांचे कसे होणार मग? मग ते बोलणार कशावर आणि सांगणार कुणाला? अशाने मायबोलीचे रेटिंग एकदम रसातळाला जाईल, अशी भीती वाटत आहे.
तू बाकी कुठंही जाऊन तडफड मला
तू बाकी कुठंही जाऊन तडफड मला घंटा फरक पडत नाही >> चूक
दारूला आपली मजा घेऊ देणे कटाक्षाने टाळावे >> बरोबर
बेताने प्या काळजी घ्या...
बेताने प्या काळजी घ्या...
हायवेवरून वेगाने जाताना रस्त्यात जे बोर्ड दिसतात ते तुमच्या भल्यासाठीच असतात.. >> १००%
हायवेवर जाऊच नका.. जवळच्या
हायवेवर जाऊच नका.. जवळच्या दारूच्या दुकानातून एक खंबा आणा -- घरीच न्यू इयर साजरा करा..
New year च्या दिवशी दारू पिणे
New year च्या दिवशी दारू पिणे ही प्रथा नक्की कोणाची.
ही प्रथा कोणत्या देशात चालू झाली.
भारताने ती का स्वीकारली.
दारू जिथे बसून पिणार ती जागा
दारू जिथे बसून पिणार ती जागा मोकळी आणि हवेशीर असावी.
दारू पिताना कोणतेच गंभीर विषयावर चर्चा नको
कोणत्या दिशेला किती अंश कोण करून बसायचे ते पण सांगा.
बाहेरील देशात अल्कोहोल फ्री बीयर मिळते. अल्कोहोलच नाही मग बीयर कसली? सरळ फ्रुट ज्यूस म्हणावे. की चव बियारच्या जवळ जाणारी असते म्हणून.
बरोबर.
बरोबर.
Vodkya मध्ये लिमका टाकला की लेमन ज्यूस सारखी चव येते.
म्हणून त्या मिश्रण लं लेमन ज्यूस म्हणता येणार नाही.
तसे बिअर मध्ये अल्कोहोल च नसेल तर ती बिअर कसली.
कोणत्या दिशेला किती अंश कोण
कोणत्या दिशेला किती अंश कोण करून बसायचे ते पण सांगा.
सरासरी तोंड हे दरवाजा च्या दिशेला हवं.
कोण येत तर नाही ना त्या वर नजर ठेवता येते.
अयोग्य व्यक्ती येत असेल तर वेळीच सावध होता येत.
रस्त्यावर,सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना तर नजर चोफेर असावी.कान टवकारले ले असावेत
पोलिस ह्या प्राण्याकडे नीट लक्ष ठेवावे.
नाही तर रंगाचा बेरंग होवू शकतो
हे सगळ्यात आधी तुम्हीच मनावर
हे सगळ्यात आधी तुम्हीच मनावर घ्या. तुम्हीच जाताय रिंगणाबाहेर कुस्ती खेळायला. >>>> आशु, खरच तुम्ही मनावर घ्या, याच धाग्यावर नाही तर बाकी सगळीकडे
मी मनावर घेतल्याने सर
मी मनावर घेतल्याने सर आत्मप्रतिक्षण वगैरे करू लागलेत हो
आता त्यानं परत मोकळे सोडलं तर चिमटीत सापडलेलं चिलट परत गादीवर नेऊन ठेवलं असं होईल
हे उदाहरण अपरिहार्य आहे कारण नैतर सर पुन्हा मला इतकं महत्व देऊ नका वगैरे सांगत येतील
त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा उपाय मागेच आजमावून झाला आहे, त्याने ते अजून चेकाळून जागोजागी पोस्टीं टाकू लागलेले
फारसा प्रॅक्टिकल नाहीये तो प्रकार
ओके
ओके
रस्त्यावर,सार्वजनिक ठिकाणी
रस्त्यावर,सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना
<<
दॅट्स अ नो नो.
सिद्दा खडी फोड्ने को जाना पड्ता, भ्राता. मत करना.
सोडा,कोणते ही सॉफ्ट ड्रिंक
सोडा,कोणते ही सॉफ्ट ड्रिंक बरोबर कधीच पीवू नका.
हाड कमजोर होतात.
<<
गल्लत बात.
सॉफ्ट ड्रिंक सोबत अनेक कॉकटेल्स बनतात.
उदा.
५ पांढर्या दारवा (जिन+व्होड्का+व्हाईट रम+तकिला+ट्रिपल सेक) + कोक = लाँग आयलंड आईस्ड टी. (यात एक गोम सिरप पण असतं. नसल्यास नुस्तं सिम्पल् सिरप चालतं.)
जिन्+लिम्का+लाईम कॉर्डिअल = जिम्लेट. इ.
दारू + सोडा उर्फ स्पार्कलिंग वॉटर हे क्लासिक काँबो आहे. सोड्याने अॅसिड रिफ्लक्स होत नाही, प्लस अल्कोहोल अॅब्सॉर्प्शन डिले होते. म्हणजेच हळू हळू चढते.
चखन्याला फॅटी + साल्टी - आंबट पदार्थ उत्तम. तळकट यासाठीच खाल्ले जाते. फॅटमुळे पुन्हा अल्कोहोल रक्तात मिसळण्याची क्रिया स्लो होते.
people crave a drink when the eat salty foods. However salty foods will change mouth chemistry temporarily and certain sensations and taste from alcoholic beverages become more apparent, which will aid in enjoyment of your beverage. आंबटही असेच टेस्ट बड्स उद्दिपीत करते.
तकिला शॉट सोबत, किंवा देशी दारू/महुआ मधवा इत्यादींसोबत मीठ डायरेक्ट चाटले जाते.
बाकी सोडा/सॉफ्ट ड्रिंक मिक्क्ष केल्याने हाडे कमजोर होतात वगैरे पुडी आहे.
आधी टून्न होईपर्यंत दारू आणि मग कसेबसे जेवण हा प्रकार पोटात शक्य तितकी जास्त दारू बसावी म्हणून केला जाणारा चुकीचा आयटम आहे, याबद्दल सहमत.
जेवणा आधी, दरम्यान व नंतर पिण्याच्या दारवा वेग-वेगळ्या आहेत. त्या एकाच सायंकाळी एकानंतर एक घ्यायच्या असतात. उगा पोटात कॉकटेल होईल वगैरे ला घाबरू नये. टोटल क्वांटिटी लिमिट करायची असते, म्हणजे बरोबर जमते. दारू सोबत मेजवानी झाल्या नंतरच्या व्हिस्की/ब्रँडी नंतर प्यायची लिक्युअर देखिल दारू च असते. वगैरे.
जौद्या. त्या विषयात पीएच्डी करून झालिये. आजकाल खूप दिवसांत चवही घेतली नाहिएय.
प्लस अल्कोहोल अॅब्सॉर्प्शन
प्लस अल्कोहोल अॅब्सॉर्प्शन डिले होते. म्हणजेच हळू हळू चढते.>>>
मी याच्या अगदी विरुद्ध वाचलं आहे
कार्बोनेटेड मुळे ही प्रोसेस फास्ट होते
Researchers at the University of Manchester have found that carbonated mixers increase the rate of alcohol absorption in the blood. The theory is that the gas in the bubbles is what speeds up the process. Instead, mix your liquor with fruit juice or water
सॉफ्ट ड्रिंक सोबत अनेक
सॉफ्ट ड्रिंक सोबत अनेक कॉकटेल्स बनतात.
>>>>
कोकटेल्स ही वेगळी दुनिया आहे
पण बहुतांश वेळा आपल्याकडे 60 मिली ड्रिंक आणि त्यावर ग्लासभर सोडा किंवा कोला
मजबूत साखर असलेलं ते ड्रिंक घेताना आपण किती पितोय हे जाणवत नाही
आपल्याकडे दोन टोके आहेत ,
एक म्हणजे अट्टल नीट पिणारे पण ते बरेचदा देशी घेतात
मी कॅनॉल ला फिरायला जातो तिथं कडेला पिशव्या घेऊन बसलेले असतात अनेकजण
पिशवी डायरेकत तोंडाला लावून गटागटा मारतात
सोबत मिरची नैत्रर मीठ असतं कागदात बांधून अनेलला ते खातात
आणि दुसरं म्हणजे हे सोडा कोला बदाबदा ओतून ड्रिंक चा बाजार उठवणारे
पाणी आणि बर्फ सोबत घेतल्यास हँगओव्हर होत नाही हा आजवरचा अनुभव
सोडयासोबत किंवा कोलासोबत ते होते, म्हणजे दारू प्यायली की हंगोव्हर येतोच हा नियम असल्यासारखं
नंतर कळलं कीं ते नियमात प्यायलं तर बिलकुल टाळता येत
जसे चिकन बनवताना अनेक मसाले
जसे चिकन बनवताना अनेक मसाले वापरून gravy बनवली की मुळ चिकन ची चव दबुन जाते आणि मसाल्यांचीच चव तयार होते.
पोट खराब होते ते वेगळे.
तसे कॉल्ड ड्रिंक चे आहे .
चव तर बिघडवत असतात च परत त्रास पण होतो
असा माझा तरी अनुभव आहे.
आणि दुसरे नुकसान तुम्ही किती ड्रिंक घेत आहात ह्याचा अंदाज येत नाही.
कारण चव गोड होते
पाणी आणि बर्फ सोबत घेतल्यास
पाणी आणि बर्फ सोबत घेतल्यास हँगओव्हर होत नाही हा आजवरचा अनुभव
सोडयासोबत किंवा कोलासोबत ते होते,
>>> चांगला सल्ला....मला आजकाल जेडी आणि कोक ने हँगओव्हर होतो... आता नुसता पाणी ट्राय करेन ...
पाणी आणि परफेक्ट आइस. हे
पाणी आणि परफेक्ट आइस. हे कॉम्बिनेशन उत्तम
आणि हळू हळू एक एक घोट घेत पिणे. .
त्यांच्याकडे दुर्लक्ष
त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा उपाय मागेच आजमावून झाला आहे, >>> डेन्जर आहे हे
चखन्याला फॅटी + साल्टी - आंबट
चखन्याला फॅटी + साल्टी - आंबट पदार्थ उत्तम. >>> अरे वा म्हणजे मी दारूबरोबर बफेलो विंग्स हाणतो ते आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्यच वाटतंय
फॅटी भी.. सॉल्टी भी.. आंबट भी...
बफेलो विंग्ज मी गुगल करून
बफेलो विंग्ज मी गुगल करून पाहिलं
म्हणलं चिकन विंग्ज पर्यंत ठीक होतं
बफेलोला कधीपासून विंग्ज यायला लागली
बायको म्हणाली आपण प्रॉपर सेट
बायको म्हणाली आपण प्रॉपर सेट घेऊया
मग आम्ही बराच वेळ ऑनलाइन शोधलं पण मनासारखं नाही मिळालं
काही अगदीच साधे होते काही कैच्याकै महाग
मग दिवाळी स्पेशल म्हणून ब्लॅक डॉग रिझर्व्ह उघडली
ही पण एक सुख व्हिस्की आहे
हो हो. बफेलो विंग्ज आणि बिअर
हो हो. बफेलो विंग्ज आणि बिअर बेस्ट काँबो. बरोबर सेलरी आणि गाजर विथ रँच डिप. ब्लू चिज आवडत असेल तर त्यात. आता आयुर्वेदिक आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. म्हणजे प्रश्न न्हवताच काही..
"आता आयुर्वेदिक आहे
"आता आयुर्वेदिक आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला ' जगात जे जे काही नवीन संशोधन आहे ते अमच्या पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलंय' ह्या हायपोथिसिस ला सुद्धा गोंजारता येईल - इतका विचार बीअर उघडताना किंवा विंग उचलताना कधी केला नव्हता रे.
Pages