तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

मी मध्ये एक वाचलं होतं त्याप्रमाणे ओल्ड मंक च्या बाटलीत काही लवंगा आणि दालचिनीची पाने टाकून एक महिनाभर ठेवली
आता त्याला जबरा फ्लेवर आणि आरोमा आलाय
आणि जे काही रसायन झालं आहे ते जहाल आहे
म्हणजे अल्कोहोल कंटेंट नाही पण लवंग दालचिनी पूर्णपणे त्यात दिझोल्व्ह झालीय आणि ओल्ड मंक काढा झालाय
सर्दी खोकल्यावर एकदम रामबाण होईल असे वाटल्याने ती बाटली आता तशीच ठेऊन दिली आहे
पावसाळ्यात नक्की कामाला येईल Happy

Rise and hold up the curved glass,
And pour us wine of the morning, of El Andar.

Pour wine for us, whose golden color
Is like a water stream kissing flowers of saffron.

Pour us wine to make us generous
And carelessly happy in the old way.

Pour us wine that gives the miser
A sumptuous generosity and disregard.

- Ibn Kolthum

ओल्ड फॅशन्ड कॉकटेल आहे.. रम नसते त्यात- व्हिस्की असते>> ह्यापूर्वी दोन तीन वेळा व्हिस्की ट्राय केलेली पण कधी आवडली नाही.. काल ओल्ड फॅशन्ड ट्राय केली आणि फार आवडली..कदाचित बर्फ टाकून पाच मि. डायल्यूड होऊ दिली म्हणून आवडला असेल.. तरीही खास घरी आणून पिणार नाही. 1800 silver टकिला पण मस्त आहे. त्याची अक बाटली आणून ठेवेन
जवळून काढलेला फोटो
4FAA03E2-E5A3-487A-8530-FD2677E1F8BF.jpeg

हि दालचिनी फ्लेवरची अजून एक व्हिस्की होती पण ट्राय केली नाही
6B3E53A0-E5FE-4C97-9621-E15C7C7AD96F.jpeg

ओल्ड फॅशन बोलतॊ बर्बन किंवा राय व्हिस्की पासून बनवलेलं कॉकटेल.

व्हिस्की मध्ये हर्बल बिटर्स, साखर, संत्र्याच्या सालीची झेस्ट आणि भरपूर बर्फ.

सारखी फटाके आणि दारू चर्चा वाचून हा धागा आठवला
या दिवाळीत कोणाकडे काय विशेष दारूकाम??

मी मध्यंतरी युट्युब वर बघून एक ओल्ड मंक चे कॉकटेल ट्राय केलं, सॉलिड हिट झालाय तो प्रकार

नवीन ट्राय मध्ये गोव्याची पॉल जॉन घेतली सिंगल मल्ट
सॉलिडच आहे एकदम Happy

“ ओल्ड मंक चे कॉकटेल ट्राय केलं, सॉलिड हिट झालाय तो प्रकार” - अरे नाव, गाव, फळ, फूल (रेसिपी) टाक ना, म्हणजे करून बघता येईल.

चर्रप्स द्या टाळी
माझी अत्यानंतिक आवडीची।बियर
आठवणींनीच तोपासू Happy

अरे नाव, गाव, फळ, फूल (रेसिपी) टाक ना, म्हणजे करून बघता येईल.>>>
त्यानाई सांगितलेल्या रेसिपी मध्ये थोडा बदल केला

एक ग्लासात पाणीपुरी चे हिरवे पाणी केलं, त्याचा सशे मिळतो दुकानात
अगदी साधारण दोन टेबलस्पून हे पाणी, थोडं दाटसर, त्यात भरपूर लिंबू पिळला
आल्याचे अगदी बारीक तुकडे केले अगदी छोटे छोटे पण खिसायचं नाही आलं
हे सगळं धुसळून एकजीव केलं की त्यात अपल्यालं झेपेल इतकी ओल्ड मांक (मी 60 मिली घेतो)
तयार बर्फ फोडून चुरा मिक्स आणि वरती आपि फिझ्झ ने टॉप अप
गर्निश करताना एक सफरचंद फोड, एक अर्धी कापलेली ताजी हिरवी मिरची आणि एक पुदिना पान

असे सर्व्ह करावे
ओल्ड मांक न आवडणारे लोकं पण आवडीने पितात Happy

एक अर्धी कापलेली ताजी हिरवी मिरची >> हा ताज्या हिरव्या मिरचीचा प्रयोग मी मागे एका पर्टीत केलेला.. पिताना मजा आली पण नंतर ओठांची आघआघ होऊन हालत खराब झाली.. पण रेसिपी चांगलीए, मिरची न टाकता करून बघेन

सिम्पल कोकोनट रम + कोक + लिंबू पण बेस्ट कॉकटेल आहे...

जे दारू पीत नाहीत त्यांनी फक्त कोक + लिंबू पिळून ट्राय करावे.. जन्नत स्वाद आहे....

मागल्या वेळेस बियर पिववली नाही, का कोण जाणे. होते तसे कधी कधी. त्यामुळे बियरसोबत लव्ह हेट नाते असते.

बकार्डी लिमॉन व्हाईट रम नेहमी आवडते.
स्मर्नऑफ किंवा बार भाषेत सिमरनऑफ व्होडका सुद्धा आवडते- ग्रीन ऍपल.

मला आता कोक किंवा सोड्या पेक्षा सरळ दोन बर्फाचे खडे आणि पाणी यासोबतच मस्त वाटते
कोक आणि सोडा ओरिजिनल चव घालवतो
आणि रात्री कार्बोनेटेड ड्रिंक प्यायलो की गुडगुड वाजत राहत झोपताना Happy

माझी रेसिपी नव्हे ही Happy

युट्युब वर कॉकटेल इंडिया नावाचे एक चॅनल आहे त्यात एक काका घरगुती आणि स्वस्तात मस्त कॉकटेल रेसिपी देतात
काही काही ठीक आहेत पण काही अगदीच कसंस झालंबघूनच
रम आणि नेस कॉफी, हाजमोला असे काहीही घालून केलेत

त्यातल्या त्यात मला ही सुपर वाटली, आणि सगळयांना आवडली पण
बायको व्हिस्की प्रेमी पण तीदेखील आता म्हणते बरेच दिवसात ते पाणीपुरीवाला ड्रिंक नई केलं (पाणीपुरी हे मेन असावं त्यात Happy )

लोकहो दिवाळी सुरू होतेय
सणासुदीला तरी हा धागा वर काढू नका _/\_ +111
मी पूर्वी दारू पीत असे. सरमाऊलींचे या धाग्यावरील प्रबोधन वाचून मी दारू सोडली.
_/\_
_/\_
_/\_
_/\_
आता मी फक्त चरस, गांजा, कोकेन पितो.

त्याला वेगळा धागा काढा. आमच्या नेबरहुडात एक गांजाचं नवं दुकान उघडलंय. तिकडे जाऊन काही गमी, कुकी घ्यायचा फार मोह होतोय. काय रेकमेंडेशन असेल तर सांगा.

त्याचा प्रभावच असला आहे ना Happy
ज्याचं कौतुक करतो त्या व्यक्तीबद्दल प्रचंड किळस, तिरस्कार निर्माण होतो

त्यामुळे दारुचेही असेच झालं आहे Happy

लोकहो दिवाळी सुरू होतेय
सणासुदीला तरी हा धागा वर काढू नका _/\_

>>>> उगाच कायतरी काय. उलट दिवाळी आहे, कुटुंबासमावेत आनंद घ्या असे म्हणा.

उलट दिवाळी आहे, कुटुंबासमावेत आनंद घ्या असे म्हणा.
>>>>

सिरीअसली... ?
मी तर घरी लहान मुलांसमोर एकट्याने घेण्याचाही विरोध करतो.
https://www.maayboli.com/node/52365

मूलं बघत असतात. अनुकरण करत असतात. एकीकडे आपण मुलांना चांगले वळण शिस्त लावावे यासाठी जागरूक असतो. त्यांना मारावे की टाईम ऑट करावे यावरून तावातावाने वाद घालतो. तर दुसरीकडे अश्या कृत्याचे समर्थन कसे करू शकतो Sad

आम्ही तरी घेतो बाबा
म्हणजे वडील ही घ्यायचे मीही घेतो मुलांसमोर
त्यात काय इतकं आग लागण्यासारखं झालं
त्यावरून आठवलं
आग लावून अक्खा डोंगर जाळण्याच्या फालतुपणा पेक्षा हे कितीतरी बरे Happy

सगळ्या गोष्टी मुलांसमावेत किंवा मुलांसोबत करायचा अट्टाहास कशाला म्हणतो मी ?

बाकी मुलं मूर्ख नसतात. जर व्यवस्थित मुलांशी बोलणे असेल तर अगदी त्यांच्यासमोर सुद्धा दारू पिण्यास कसलीही हरकत नाही.

Pages