फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा आता वेगळे हिंसक वळण घेणार आहे. कमरेचे पट्टे आवळा. टर्ब्युलांस अहेड.
धागा काय आणि प्रतिसाद काय.

हेमंत यांची लेखणी वॉशिंग्टन च्या कुऱ्हाडीसारखी दिसेल त्या झाडावर चालत आहे

त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ते त्यांनी एकदा मुक्तछंदात न लिहिता सरळ मराठीत लिहावं अशी विनंती
Happy

सिंपल आहे.
कायदे सरळ सोपे असावेत.
फटाके आवाज आणि वायू प्रदूषण करतात ना मग सरळ सरसकट पूर्ण बंदी हवी.

असे जमत नसेल तर दिवाळी मध्ये पण बंदी नको.
दिवाळी मध्ये बंदी नंतर परवानगी असले प्रकार नकोत.
प्रतेक कायदे असेच हवेत.
पण असे आपल्याकडे होत नाही.
जिथे असे सरसकट एकच नियम असावा तिथे तो नसतो .
आणि जिथे वर्गीकरण करून कायदे करणे गरजेचे आहे तिथे सरसकट सर्वांना एकाच मापात मोजले जाते.

आमच्या सोसायटीत काल दरवर्षीपेक्षा जाणवण्याइतके कमी फटाके वाजले...... त्यातही शोभेचे दारुकामच होते जास्तकरुन..... आवाजाचे वगैरे अगदीच कमी Happy

फटाके आवाज आणि वायू प्रदूषण करतात ना मग सरळ सरसकट पूर्ण बंदी हवी.>>>
पण सरसकट बंदी ची मागणीच कुणाची आहे??
आतिषबाजी जगभर होते त्यावर पण बंदी नाहीये

आक्षेप दिवाळीतल्या धरबंध नसलेल्या कुठंही कसेही आणि कधीही आणि कितीही फटाके वाजवण्याला आहे

1 .गल्लोगल्ली घरोघरी रस्त्यात अतिशय धोकादायक पद्धतीने फटाके वाजवले जातात दिवाळीत हे मान्य आहे का नाही?

2. वर्षभर ना ना कारणाने फटाके वाजवले जात असले तरी दिवाळीत त्याचे प्रमाण दस नई विसपटीने वाढलेलं असते हे मान्य आहे का नाही?

3. विनाकारण फटाक्याची सांगड हिंदू धर्माशी घालून त्याद्वारे राजकारण केले जात आहे हे मान्य आहे का नाही?

4. हे जे अमर्याद फटाके वाजवले जातात त्याचा लोकांना त्रास होतो आणि त्याविरुद्ध बोलले तर हे हिंदूविरोधी होत नाहीत हे मान्य आहे का नाही?

फटाक्याच्या विरोधात खालील मुद्दे चर्चेत येतात:
१. हवा व ध्वनीप्रदूषण
२. फटाक्यांच्या बेसुमार किंमती
३. फटाक्यांमुळे होणारे अपघात (जसे माझ्या यापुर्वीच्या पोस्टममध्ये बातमीची लिंक दिली होती, एकट्या पुणे शहरात ८ वाहने जळालीयेत वेगवेगळ्या अपघातात)
४. शिवकाशीतले बालकामगारांचे होणारे शोषण

जरी हे सगळे मुद्दे व्हॅलिड वाटत असतील तरीही परंपरा म्हणून फटाके उडवणारे लोक राहणारच. ज्यांना त्रास होतो ते आवाज उठवू शकत नाहीत. मनसेसारखे पक्ष मतांसाठी फटाके उडवणाऱ्यांच्या लांगुलचालनाची भुमिका घेणार. त्यामुळे यात फार बदल इतक्यात अपेक्षित नाही. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे आताची लहान मुले मोठी होतील तेव्हा ती संवेदनशीलपणे या सगळ्याकडे पाहतील आणि पर्यावरणपुरक पर्याय वापरून सण साजरे करतील. ऋन्मेश यांनी इथे कितीही वाद घातला तरी त्यांची मुले मात्र पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी स्वतः प्रयत्न करतील. त्यांना फटाक्याचा उपद्रव नक्कीच जाणवेल/जाणवत असेल.

अहो दारू १८ वर्षाखालील मुलांना द्यायची नाही हा कायदा आहे. त्याची व्यवस्थित अभ्यास करुन सापडलेली कारणं आहेत. तरी ते एक्स्टापोलेट करुन पराचा कावळा नाही तर तीन डोळ्याचा रेवन करुन 'नवजात अर्भकाला दारू पाजा' असले सल्ले वाचलेले आठवत नाहीत का इथे?
मुक्त जगात कायमची बंदी फार कमी गोष्टींवर असते/ असावी. बाकी निर्बंध घालून, नियम घालून, प्रमाण ठरवुन इ. अनेक प्रकारे प्रत्येकाला आपला आपला आनंद शोधण्याची मुभा दुसर्‍याला त्रास न देता करता येण्यात काय आडकाठी असावी?
यु नो हू १ आणि यु नो हू २ चे अटेंशन सिकींग! बाकी काही अर्थ नाही लॉजिकल बोलण्यात.

१) सरसकट देशभर फटाके बंदी का नको?

Fatakya मुळे अपघात होतात हे मान्य आहे.
आवाजाने त्रास होतो हे मान्य आहे.
फटाके बंदी आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही पण दिवाळी हा शब्द आला की धर्माचा संबंध येतोच.
तो तुम्ही कसा काय नाकारू शकता.

तरुण वयात मोठ्या आवाजाचा फार त्रास होत नाही,म्हणून मोठ्याने संगीत ऐकणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मोठ्या आवाजाच्या फटाके वाजवणे अशा गोष्टींचे आकर्षण असते. पन्नाशीच्या आसपास गर्दी, मोठे आवाज सहन करण्याची क्षमता बरीचशी कमी होते. त्यामुळे थोडाफार विरोध केला जातो. कदाचित पन्नाशीनंतर तो हिंदूविरोधी होतो का ह्यावर संशोधन व्हावे.

पन्नाशीच्या आसपास गर्दी, मोठे आवाज सहन करण्याची क्षमता बरीचशी कमी होते. त्यामुळे थोडाफार विरोध केला जातो.
>>>>

विचार करायचा मुद्दा आहे हा.

आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीतून याकडे बघू नये.

म्हणजे एखाद्याला फटाक्यांची आवड असली तरी त्याने फटाक्यांमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो याचे भान ठेवावे.

तर एखाद्याला फटाक्यांची आवड नसली तरी त्याने ईतर कोणाला त्यात आनंद मिळू शकतो हे स्विकारावे.

या दोघांनी, म्हणजे आपण सर्वांनीच मिळून यावर मार्ग काढायला हवा. आपल्या सोयीने टोकाची भुमिका घेण्यात हशील नाही.

फटाके आणि हिंदू धर्माचा संबंध नाही.
फटाके बंदी ही मागणी हिंदू विरोधी नाही.
.पण दिवाळी मध्ये फटाके बंदी हा विचार हिंदू विरोधी आहे.

काल पासून फटाक्यांच्या समर्थनार्थ ट्रेण्ड चालू आहेत .
खास करून केजरीवाल ला अगदी शिव्या घालून फटाके वाजवल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत .
त्याच प्रमाणे फटाक्यांच्या आवाजाने आमच्या डॉगी ला त्रास झाला आणि तो कित्ती कित्ती घाबरला याचे व्हिडिओ टाकले जात आहेत.
खास डॉगी प्रेमींसाठी आमची ही पाय ओढणी !20221025_214523.jpg

Doggy lover ना
भारतीय जाती ची कुत्री का आवडत नाहीत.
विदेशी च कुत्री ही लोक पाळतात.

देश विरोधी कृत्य आहे असा आरोप नशीब कोणी करत नाही

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ... Lol दर न्यु यिअर आणि फोर्थ ऑफ जुलैला नेक्स्टडोअरवर डॉग लविंग कॅरेन्स कोकलायला लागतात. (वर्षभर यांचं कुत्रं फटाक्यांपेक्षा मोठ्या आवाजात भुंकत असतं त्याचं काय नाय) त्यांच्यासाठी कॉपी करून ठेवतो.

काल कुणीतरी हजाराची लड लावली रस्यावर. मग अजून एकाने. आणि अजुन.
तेव्हा समोरच्या घरात बराच धूर गेला, वाऱ्याची दिशा तिकडे होती. तेव्हा एक बाई बाल्कनीत आली आणि म्हणाली "अरे, जरा विचार करा! माझी सासू दमेकरी आहे त्रास होतो तिला!"
हे ऐकताच लोक ख्यॅ ख्यॅ ख्यॅ हसू लागले आणि म्हणाले वर्षभर तुमची सासू यापेक्षा मोठ्या आवाजात खोकत असते त्याचे काही नाही, फक्त आमच्या फटाक्यांचा तेवढा त्रास होतो होय!
मग ती गप गुमान आत निघून गेली. अशांना असेच सडेतोड उत्तर दिले पाहिजे.

मग ती गप गुमान आत निघून गेली. अशांना असेच सडेतोड उत्तर दिले पाहिजे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 25 October, 2022 - 23:00

असहमत!!!

हे ऐकताच लोक ख्यॅ ख्यॅ ख्यॅ हसू लागले आणि म्हणाले वर्षभर तुमची सासू यापेक्षा मोठ्या आवाजात खोकत असते
>>>>>

प्लीज शहराचे नाव लिहा.
कारण आजवर मी जिथे जिथे (प्रामुख्याने मुंबईत) राहिलोय तिथे असे कधी पाहिले नाही.

दिवाळी मध्ये मुंबईत सगळ्या भागात गस्त घालतोस का?
मला एखादी हैदराबादेत घडलेली गोष्ट स्वतः पाहिली नाही तर इथे ती घडूच शकणार नाही अशी खात्री नाही देऊ शकणार मी.
असो, तर योगायोग असा की नेमकी मुंबईचीच घटना आहे.
मला मुंबईची इत्थंभूत माहिती नाही पण रे रोड वरून दक्षिणेकडे (बलार्ड पियरला) जाताना एक दीड किलोमीटर अंतरावर एका भागात टॅक्सी पंक्चर झाली. ड्रायव्हर चाक बदलवत असताना ही घटना घडली आणि पाहिली.

दिवाळी मध्ये मुंबईत सगळ्या भागात गस्त घालतोस का?
>>>

आते जाते हुए मै सब पे नजर रखता हू..
नाम ऋन्मेssष है मेरा, सब की खबर रखता हू.. Happy

जोक्स द अपार्ट,
रे रोड पट्ट्यात असे अनुभव येऊ शकतात. अनधिकृत झोपडपट्टी बरीच आहे तिथे. बाहेरची लोकंच असे करू शकतात मुंबईत.

31 December ल नववर्षाच्या नावाखाली धिंगाणा चालू असतो.
दारू पिऊन रात्रभर शहरात लोक फिरत असतात.
ट्रेन,बस मध्ये नशेत असणाऱ्या लोकांची संख्या खूप असते.
अगदी सार्वजनिक ठिकाणी पण दारू पिली जाते
त्या रात्री सज्जन लोक,सज्जन स्त्रिया ,मुल हे भीतीच्या छायखाली असतात.
मी स्वतः 9 च्या आत घरी येतो .
घरातील सर्व लोक घरीच लवकर येतात.
लवकरात लवकर घरी पोचून सुरक्षित राहावे असा सज्जन लोकांचा प्रयत्न असतो.
पण त्या 31 ustvacha उदो उदो केला जातो.
.
अंध श्रद्धा निर्मूलन वाले पण ह्या वर भाष्य करत नाहीत.
नशा करून नवीन वर्षाचे स्वागत करणे ही अंध श्रद्धा च आहे.
मीडिया त्याचे गुणगान गात असते.
त्या वर कोणी विरुद्ध मत दिले की ह्यांना सरळ राज्य घटना,व्यक्ती स्वतंत्र हे सर्व आठवते.
बेवड्यांची बाजू घेतली जाते.
फटाके आणि गणपती ustav ह्या पेक्षा किती तरी गंभीर ,धोकादायक वातावरण त्या दिवशी असतें

रे रोड पट्ट्यात असे अनुभव येऊ शकतात. >> Biggrin
अनधिकृत झोपडपट्टी बरीच आहे तिथे. >> Biggrin Biggrin
बाहेरची लोकंच असे करू शकतात मुंबईत. >> Biggrin Biggrin Biggrin
बोलण्यासारखं बरंच आहे. पण मनोरंजन महत्त्वाचे. इथे कुठला प्रश्न सुटणार थोडीच आहे. चार घटका आनंद मिळाला की बास!

चार घटका आनंद मिळाला की बास! >> चूक.
अनधिकृत झोपडपट्टी बरीच आहे तिथे. बाहेरची लोकंच असे करू शकतात मुंबईत. >> बरोबर.

मानव "परी तू जागा चुकलासी."
अगदी असाच किस्सा दादर हिंदू कोलनी येथे आणि बांद्रा हिल रोड येथे घडलेला. ते बघून मला राग आला व मी त्यांना जाब विचारला. तेव्हा ख्यॅ ख्यॅ ख्यॅ हसू लागले व त्यांनी माझ्या अंंगावर एक फटाका सोडला आणि म्हणू लागले, "We are just जोकिंग."
कुछ समझमे आया?

Pages