फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रदूषण नी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
आई च्या गर्भात असणाऱ्या मुलांच्या शरीरात पण घातक रसायने सापडतात.

विविध भाज्या ,कड धान्य,दूध ,फळं ह्या मध्ये पण घातक रासायनिक घटक. सापडत आहेत.
गंभीर विषय आहे.
फक्त फटाके बंद ,दिवाळी मध्ये करून त्या ची तीव्रता कमी होणार नाही.

कोणाचा जीव गुदमरून गेला का दिवाळी मध्ये.>>>
तुम्ही पण सरांसारखे जास्तच मनाचे श्लोक वाचता वाटतं
जे लिहाल नाही ते लिहिलं आहे असे गृहीत धरून त्याचा प्रतिवाद करताय
पण जे लिहिलं आहे ते सोयीस्कर रित्या दुर्लक्षित करताय

तुम्ही पुण्यात आणि ठाण्यात कुठं राहता ते नक्की सांगाच आता
लोकांनाही कळू देत की असे कुठले भाग आहेत या शहरात जिथं फटाके उडवत नाहीत किंवा उडवले तर त्याचा धूर होत नाही

उडवा हो. तुम्ही आज आणि उद्या पूर्ण रात्रभर फटाके उडवा.
आतापासूनच जमवाजमव करा.
तुमच्यासाखे विचार असतील त्यांना गोळा करा.
सगळ्या प्रकारचे फटाके लावा. तुमच्या घरच्या सगळ्यांनी रात्र बाहेर फटाक्यांतच जागवा.
कोणते, किती फटाके कसे कसे उडवलेत त्याचा सचित्र वृत्तान्त इथे परवा/ तेरवा द्या.

फक्त दिवाळी मध्ये फटाके वाजविण्यास रीतसर परवानगी.
बाकी सर्व प्रसंगी,फटाके वाजवणे ह्या वर संपूर्ण बंदी .
अगदी तुरुंग वासाची शिक्षा.
असा कायदा सरकार करतो असे जरी म्हणाले तरी.

आमच्या वर कसा अन्याय होत आहे.
किती किती अन्याय सरकार करत आहे.
असे गळे काढणारे धागे निघतील
.
तेव्हा प्रदूषण हा विषय च नसेल

भरत +१
खूप उडवा. ह्यावर्षी उडवून घ्या. पुढच्या वर्षी आपण पुन्हा हा धागा उघडू. १००० नवीन प्रतिसाद देऊ. पुन्हा फटाके उडवू.
सिगारेट्या जस म्हणतो तस "आता ही शेवटचीच. उद्यापासून बंद."
आज रोख उद्या उधार.
तुम्ही फटाके नाही उडवले म्हणून पोल्युशन काकणभरपण कमी होणार नाहीये.
का तुम्हाला कोणी पद्मश्री देणार नाहीये.
आलेला क्षण जगून घ्या. मानव पोल्युशन ने नष्ट होणार नाहीये. त्याला नष्ट व्हायला हजारो इतर कारणे आहेत.
तस्मात एन्जॉय.
"हाय कंबख्त ,तू ने तो उडाया ही नही."

अमेरिकन , चायनीज , मंगोलियन , कॅनडीयन , पाकिस्तानी , बांगलादेशीज झालेच तर तूर्किज आणि अरबी देशात राहणारे सांगतील का त्या त्या देशात फाटक्या संदर्भात काय कायदे आहेत ?
नाहीतर काय आपण उच्च वैचारिक बैठक वाल्यांच्या साथीत फटाके बंदीला समर्थन उगीचच द्यायचो .

स्वयं घोषित प्राणी प्रेमी पण असतात.
घरात कुत्री ,मांजर पाळतात ती पण अशी तशी नाहीत विदेशी जाती चे.
भारतीय नाही.भारतीय कुत्री मांजर त्यांना पसंत नसतात.

ते त्यांना काय भाज्या देतात का जेवणात .
नाही .
मांस च कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देतात.
पण प्राणी बळी वर ही लोक पण उपदेश देण्यात माग नसतात.

पावसात ट्रेन मध्ये पुढच्या सीट वर बुट सहित पाय ठेवून बसणारे,चिप्स खावून त्याचे pkt खिडकी मधून बाहेर टाकणारे,बिसलेरी bottle खिडकी तून बाहेर फेकणारे.
पण पाणी प्लास्टिक मुळे कसे जमा होत.
प्लास्टिक कसे वाईट.
BMC किती कामचोर.
दरवर्षी पाणी भरत.
असे उपदेश देत असतात.
.

खरे आहे. आपण कुठलाही कायदा आणि आव्हाने वगैरे इतर देश काय करतात हे पडताळून पहिल्या शिवाय करत नाही.
मग फक्त फटाक्यांसंबधी अपवाद का करावा, नाही का?

खरे आहे. आपण कुठलाही कायदा आणि आव्हाने वगैरे इतर देश काय करतात हे पडताळून पहिल्या शिवाय करत नाही.
मग फक्त फटाक्यांसंबधी अपवाद का करावा, नाही का?

अजून एक उदाहरण.
आमच्या गावचा एक ग्रामीण युवक नी लोकल लांब अंतर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता.
रोज ची डोंगर चढण्याची सवय असल्या मुले .
दमदार होता.
तो धावला जोरात मागे वळून बघतो तर कोणीच नाही.स्पर्थक सर्व मागे.
मग कशाला उगाच जोरात धावा मग थांबायचं थोडा आराम करायचा .स्पर्धक दिसले की परत धावायचं.
तसा प्रकार कायदेशीर राहणाऱ्या प्रामाणिक लोकांचं होतो.
ते सर्व नियम पाळतात
पण बाकी सर्व लोक नियम सर्व मोडत असतात.
मग त्याला वाटत.
फक्त आपण एकट्याने कायदेशीर वागून काही फरक पडणार नाही.
कशाला उगाच त्रास करून घ्या.

दिवाळी मध्ये फटाके पूर्ण वाजवणे स्वतचं बंद करावे तर.
मिरवणुका,बाकी प्रसंग, मध्ये लोक दणकून फटाके वाजवून. प्रदर्शन करत आहेत.
असे दृश्य दिसते.
मग आपल्या कृत्याचा फोल पण लक्षात येतो

काल आमच्या इमारतीमध्ये एकजण त्याचा कारचा हॉर्न वाजवत होता. सुरवातीला वाटले कशासाठी तरी वाजवत असेल पण एक मिनिट झाला तरी हॉर्नचा आवाज येतोय. वाटलं कुणाच्या तरी गाडीत लहान पोर वाजवत असेल, पण दोन मिनिट झाले तरी हॉर्न सुरू.
मग मी खाली गेलो इतर लोकही खाली आले. बघतो तर एक फ्लॅट ओनर हॉर्न वाजवत बसलाय आरामात .... की वाजणारा हॉर्न थांबयचा प्रयत्न करतोय?
त्याला विचारले काय झालं? हॉर्न स्विच अडकलाय का?
तर म्हणाला नाही मीच वाजवतोय.
म्हटलं का?
तर म्हणे मला वाजवायचाय.
म्हटलं का?
तर म्हणे का वाजवू नये?
म्हटलं आम्हाला त्रास होतो म्हणुन वाजवू नये.
तर म्हणाला तिकडे रस्त्यावर तर इतके सगळे हॉर्न वाजवतात की.
म्हटलं त्याला कारण असते , कुणाचे तरी लक्ष वेधून अपघात टाळण्यासाठी असते ते.

तर म्हणाला सगळेच काही योग्य कारण असले तर वाजवतात असे नाही. कुणाची लहान मुले उगाच हॉर्न वाजवतात, गमंत वाटते म्हणुन. तुम्हीही लहानपणी वाजवला असेल की विनाकारण.
आणि सिग्नल हिरवा झाला की काही लोक लगेच हॉर्न वाजवतात. जसा काही समोरच्या गाडीतला माणुस झोपला, त्याला जागे करायला हवे. काल रस्त्यात माझी कार क्लच वरचा पाय सुटून बंद पडली. गाडी स्लो झाली पण पूर्ण थांबायच्या आत मी परत सुरू केलिही पण तेवढ्या काही सेकंदात मागचे तीन चार कार वाले हॉर्न वाजवत होते.

म्हटलं हो खरं आहे, काही लोक करतात तसे. पण तू आता थांबव.

तर म्हणाला मी स्वतः वर्षभर कधीच हॉर्न वाजवत नाही अगदीच क्वचित प्रसंगी एका सेकंदा करता वाजवतो. आज माझा वाढदिवस आहे. मला हॉर्न वाजवून वाढ दिवस साजरा करायला आवडते. ती पद्धत आहे आमच्यात.

म्हटले गेल्या वर्षी पर्यंत तर नव्हता वाजवत तू.

तर म्हणाला नवीन पद्धत आहे. या वर्षी पासूनच सुरुवात केलीय. मी आता तीन चार तास मस्त पैकी हॉर्न वाजवणार.

म्हटले, नाही तू असे करू शकत नाहीस आम्हाला त्रास होतो.

तर म्हणाला तुम्ही लोक दुटप्पी आहात. तिकडे रस्स्यावर वर्ष भर कोणीना कोणी हॉर्न वाजवत असते, कधी आपल्या इमारतीतही हॉर्नचा आवाज ऐकू येतो. पण तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच नेमका कसा काय त्रास होतो हॉर्नचा? आमच्या कडचीच प्रथा खुपते का तुमच्या डोळ्यात?
आधी बाकी सगळीकडचे हॉर्न वाजवणे बंद करा. केवळ माझ्या वाढदिवशी हॉर्न वाजवणे बंद करून रस्यावरील हॉर्न ध्वनी प्रदूषणात काहीही फरक पडणार नाही. मी वाजवणार. आमच्या घरी कुणाचाही वाढ दिवस असला की आम्ही वाजवणार हॉर्न त्या दिवशी.

त्याने एवढा सखोल अभ्यास करून इतके योग्य आणि तर्कशुध्द मुद्दे मांडल्याने सर्वांना ते पटले. सगळ्यांना त्याचा आदर वाटू लागला. तुमचे बरोबर आहे तुम्ही हॉर्न वाजवलाच पाहिजे म्हणाले.

दिवाळी संपल्यावर तरी हा धागा बंद होईल अशी अशा करावी का. प्लीज बस झाल. चकवा लागल्यासारखे लोक पिरून फिरून त्याच जागी येत आहेत. पुन्हा पुन्हा तेच तेच. आम्ही पण काही एवढे ढ नाही की ७३१+१ वेळा उजळणी केली तरी समजत नाही. नाही/होय उडवणार फटके आम्ही. बस्स?

दिवाळी च नाही तर फटाक्यांना पूर्ण बंदी असायलाच हवी .
इतका फरक केला असता .भूमिकेत तर हा धागा पुढे लांबलाच नसता.
दिवाळी मध्येच फटाके बंदी असावी.

आणि पूर्णतः फटाके बंदी असावी.

असे दोन विचार आहेत.
फटाके खूप चांगले आहेत,ते वाजवलेच पाहिजेत अशी भूमिका कोणी च घेतली नाही.
दिवाळी लं फटाके बंदी वाले दिवाळी हा शब्द गाळायला तयार नाहीत.
आणि पूर्णतः बंदी वाले दिवाळी मध्ये बंदी नको म्हणून आडून आहेत.
योग्य भूमिका कोणाची आहे.
फटाके पूर्णतः बंद.
की .
फटाके फक्त दिवाळी मध्येच बंद

ईथे कोणीही दिवसरात्र फटाके उडवा म्हणत नाहीये. लोकं उगाच ओवर रीॲक्ट होत आहेत. म्हणजे फटाके पुर्णच बंद करा नाहीतर ईतके वाजवा की शहर जाळून टाका. अधलेमधले काहीच नाही असाच आविर्भाव जणू. प्रॅक्टीकल विचार करा. वादाला वाद नको _/\_

काल लक्ष्मीपूजन झालं त्यामुळे हा पोस्टचा कचरा पडला होय. त्या कचर्‍यातून पाय तुडवत गेल्याचा एक फायदा मात्र झाला. greasemonkey code करुन मुक्ती मिळू शकते हा साक्षात्कार झाला. वेळ झाला की स्क्रिप्ट लिहुन टाकतो. भरत, तुमचं काही टेंप्लेट टाक्णं शक्य असेल तरी टाका.

वाहतुकीचे चे सर्व नियम ज्या देशात पाळले जातात.
त्या देशातील कोणी वाहन चालक .
तसाच कटोकोर नियम पाळून पुण्यात गाडी चालवायला लागला.
तर हा चालक वाहतुकीला अडचणी निर्माण करणारा आहे असे मत समस्त पुणेकरांचे होईल.
त्याचा निषेध म्हणून पुणेकर गाडी चालक त्याचा उद्धार तरी करतील किंवा प्रसाद तरी देतील .
त्या बिचाऱ्या ला कळणार पण नाही आपले काय चुकले.
नियम काटेकोर पने पाळणे हे चुकीचे कृत्य आहे असा साक्षात्कार त्याला पुण्यात होईल.
त्या मुळे एकाने सुधारून काही होत नाही.
उलट हा सुधारित व्यक्ती च अडचण hoto

अमितव, एकाचे तर प्रतिसाद उभे असतात, व्याकरणही वेगळं आहे, त्यामुळे सहज ओळखता येतात.
दोन ओळींपेक्षा मोठा प्रतिसाद असेल तर आधी खाली जाऊन नाव वाचता येतं आणि प्रतिसाद वाचणं टाळता येतं. लहान प्रतिसाद असेल तर नकळत वाचला जातो. पण लगेच मनातून डिलीट करायचा. Wink

पुण्यातली वाहतुक आणि बहुतांश रस्ते स्वच्छ आणि रुंद आहेत. तिकडे गर्दी असली तरी गर्दीला गती आणि शिस्त आहे. मुंबईसारखी बजबजपुरी नाही. सगळीकडे घाण, कसंही केलेलं पार्किंग, वाट्टेल तशा जाणार्‍या बसेस, मोटारी, रिक्षा, टॅक्सी. कर्णकर्कश्य हॉर्न्स, मरणाचा उकाडा, धूळ, गर्दी, घाम. आणि कसलीच शिस्त म्हणून नाही. पुण्यात बहुतांश रस्तांवर पादचारी क्रॉसिंगच्या आधी मोटार सायकली थांबतात. ठाण्यात एका सिग्नलला दाखवा मला असं होताना. मुंबईतही मामू नसला तर दाखवाच. Wink
तेच तर शिकायचं आहे. :फेस पामः

ना. मुंबईतही मामू नसला तर दाखवाच.

माझ्या पोस्ट मधील पुणे हे नाव बदलून मुंबई,ठाणे करा.
मुळ अर्थ बदलत नाही.
त्या पोस्ट मधून काय सांगायचे आहे ते बदलत नाहीं

Plastic बंदी बाबत पण हाच घोळ घातला.
पूर्णतः प्लास्टिक बंदी न करता इतक्याच mm जाडी चे प्लास्टिक बंद,फक्त किरकोळ प्लास्टिक पिशव्यां च बंद.
प्लास्टिक हे प्लास्टिक आहे त्याच्यात भेदभाव करून चालणार नाही..
भेदभाव केला तर त्या बंदी चा काहीच उपयोग नाही.

अमितव
तुमची पुण्यावरची पोस्ट छान व्याजोक्तीपूर्ण आहे. किंवा तुमचे पुणे दुसऱ्या विश्वातले असावे.

मग आता काय करायचे?
मुंबईकरांनी फटाके फोडायला पुण्यात जायचे का?
वड्याची साल वांग्याला चालू आहे ईथे आता..

जगात मांसाहारी लोकांची संख्या प्रचंड आहे.
भारतात च ती कमी असेल .
नाही तर मांसाहार हाच मुख्य आहार अनेक देशात आहे.
त्या मुळे पशू बळी ची चळवळ चालवताना मोठा वांदा होतो.
हिंदू जे परंपरा म्हणून पशू बळी देतात त्याला विरोध करावा तर.
मांसाहार करण्यासाठी जी कत्तल होते त्याचे समर्थन कसे करावे..
ही मोठी अडचण असते.
फक्त शाकाहार चे पाठीराखे पण मोठ्या अडचणीत येतात..

म्हणून तो विषय काही पुढे जात नाही.

पुरुगामी लोकांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळावेत

Submitted by भ्रमर on 25 October, 2022 - 09:40
>>>>>>>
भुंग्या ,सगळ्या धाग्यावर घाण करत फिरणे गरजेचे आहे का ?

प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी mati च्या मूर्ती हा प्रयोग गेल्या वर्षी झाला .
कोणी विरोध केला नाही.
माती ही नैसर्गिक आहे त्या मुळे फक्त गाळ साचेल पण पाणी प्रदूषित होणार नाही.
पण मागणी काय असते. मूर्ती विसर्जन केल्या मुळे पाणी प्रदूषित होते .विसर्जन वर बंदी घाला.
पण फक्त माती च्याच मुर्त्या असाव्यात आणि रंग नैसर्गिक च असावेत.
ही मागणी मात्र. प्रगत विचाराची लोक ज्यांना पृथ्वी ची मोठी काळजी असते ते करत नाहीत.
मग जे खरेच प्रदूषण विषयी गंभीर असतात .ती लोक पण बिथरतात आणि विरोध करतात

Pages