फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर एक मी बरेचदा ऐकले आहे -

कोणी एखाद्या नटाचे अति कौतुक करते म्हणून काही लोकांचा तो नट नावडता होतो.

कोणी दारूच्या धाग्यावर जाऊन दारूला विरोध करतो त्यामुळे लोकांना दारू प्यायची ईच्छा होते.

ईथे फटाक्यांच्या बाबत तेच होत असावे का? विरोध जास्त होत आहे त्यामुळे लोकांना जास्त फटाके वाजवायची ईच्छा होत आहे.

अश्यावेळी फटाक्यांना विरोध करताना काय स्टॅंड घ्यावा जे जाणून घेण्यास उत्सुक.

प्रघा, असे का व्हावे कळत नाही , ती youtube वरील व्हिडिओची लिंक आहे.
असो काही विशेष नाही. रस्पुतीन गाण्याचे विडंबन करुन त्यात फटाके विरोधी किती हिपोक्राइट्स आहेत, (त्यांना खान मार्केट गँग म्हटलेय) हे दाखवून, बिनधास्त फटाके फोडा असे सांगितले आहे.

हरचंद पालव,
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही. फक्त देवाच्या नावाने कुणी शोषण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. खोट बोललेल देवाला आवडणार नाही म्हणून कुणी खोट बोलत नसेल तर; माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटत नाही म्हणून मी खोट बोलणार नाही असे कुणी असतील. दोघेही एकाच प्रकारचे वर्तन करतात परंतु त्यांच्या प्रेरणा भिन्न आहेत. तसेच इथे सनातन संस्थेला अंनिसचा विरोध आहे म्हणुन त्यांनी घेतलेल्या प्रत्येकच भूमिकेला विरोध असलाच पाहिजे असे नव्हे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण : एक विनाशकारी नरकासूर ! हा सनातन प्रभात मधील आत्ताचा लेख वाचा
https://sanatanprabhat.org/marathi/622138.html

आणि हो. लोकांना ऊड्डाणपूलाचा मुद्दा कळलाच नाही. ती वेगळीच केस आहे. कोणी तो विरोध करून ईथे यावा अशी अवास्तव अपेक्षा मी बिलकुल करणार नाही.

कारण फॅक्ट हे आहे की रस्त्यावरच्या वाढत्या ट्राफिक अन वाढत्या प्रदूषणाला असा सोशलमाध्यमातून विरोध करून काहीही साध्य होणार नाही. ते तसेच चालू राहणारच. तुम्ही आम्ही ठरवले तरी यात काही करूच शकत नाही. तसेच यात आपल्या प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ लपला असल्याने याबाबतीत आपली पर्यावरणाची चिंताही हळहळ व्यक्त करण्यापलीकडे जाणार नाही.

तो मुद्दा प्रदूषणाची पातळी एखाद्या ठराविक भागात फटाक्यांमुळे जसे वाढते तसेच गाड्यांमुळेही वाढते हे सांगायला होता. पण आपल्याला मुद्दा नाही समजून घ्यायचाय तर वाद जिंकायचाय Happy

प्रकाश घाटपांडे जी, माझी ती पोस्ट उपहासात्मक होती. विरोधासाठी विरोध करणार्‍यांची खिल्ली उडवायची म्हणून. पण इथे माझीच खिल्ली उडाली, त्यामुळे आता मी गप्प बसतो. Lol

जाता जाता सांगतो, त्या माझ्या सनातनच्या पोस्टच्या आधीचीही माझी पोस्ट उपहासात्मक आहे, कुणी कृपया समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाचं सर्टिफिकेट दाखवू नये ही विनंती.

Submitted by Hemant 33 on 24 October, 2022 - 12:42
Submitted by Hemant 33 on 24 October, 2022 - 12:51
Submitted by Hemant 33 on 24 October, 2022 - 21:30

हे तिन्ही प्रतिसाद लिहिणारी एकच व्यक्ती आहे का?
गंमत म्हणजे दुस रा आणि तिसरा प्रतिसाद , मध्ये ९ तासांचे अंतर असले तरी एकामागोमाग आहेत.

मला खालील माहिती अंनिस कडून मिळाली ती हेमंत 33 व त्यासारखे अन्य लोकांच्या साठी आहे असे दिसते

फटाकेमुक्त दिवाळी अभियान
आक्षेप आणि वास्तव
आक्षेप क्र. १ 'अंनिसला फक्त हिंदूंचीच दिवाळी दिसते,
बकरी ईदच्या वेळेला का गप्प बसता, ख्रिसमसला फटाके फोडतात तेव्हा प्रदूषण होत नाही का ?
इतर धर्माविषयी पण बोला की...
वास्तव
धर्म कोणताही असो महाअंनिस चुकीच्या कर्मकांडांना नेहमीच विरोध करीत आली आहे. अंनिसतर्फे बकरी ईदला पशुबळीला पर्याय म्हणून राज्यभर रक्तदान शिबीर अभियान
राबविले जाते. ख्रिसमस/नववर्ष प्रसंगी फटाकेमुक्त नववर्ष स्वागत अभियान तसेच व्यसनविरोधी अभियान राबविले जाते. त्यामुळे महाअंनिसला फक्त हिंदूंचीच दिवाळी दिसते,
हा दावा निखालस खोटा आहे. चला, महा-निसला जाणून घेऊया...
आक्षेप आणि वास्तव
❌आक्षेप क्र. २:
दिवाळीला फटाके फोडणे ही आमची हिंदू संस्कृती आहे, प्राचीन परंपरा आहे, आमच्या हिंदू संस्कृतीला विरोध करणारे तुम्ही कोण ?
✅वास्तव
हिंदू धर्म हा सुमारे ५००० वर्षांपूर्वीचा धर्म आहे, प्राचीन ग्रंथांनुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे.मात्र, कुठल्याही हिंदू धार्मिक ग्रंथात फटाक्यांचा उल्लेख नाही. फटाक्यांचा उगम हा आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही. फटाक्याचा शोध चीन या देशात लागला. त्या शोधाअगोदर भारतात कुठेही फटाके फोडले जात नव्हते. त्यामुळे फटाके आणि दिवाळी, फटाके आणि हिंदू संस्कृतीचा काहीही संबंध नाही.
महाअंनिस हिंदू संस्कृतीला विरोध करीत नाही; तर प्रदूषणकारी, घातक प्रथेची चिकित्सा करीत विधायक पर्याय देऊ इच्छिते.
आक्षेप आणि वास्तव
❌आक्षेप क्र. ३:
वर्षभर कारखाने आणि वाहने प्रदूषण करीत असतात, ते तुम्हाला दिसत नाही आणि आम्ही चार दिवस फटाके फोडले तर तुम्ही प्रदूषण प्रदूषण म्हणून बोंबा मारता. आम्हाला अक्कल शिकवू नका...
✅वास्तव:
हे अगदी खरं आहे की, कारखाने आणि वाहने यामुळे प्रदूषण होते. मात्र, त्या सामाजिक प्रगतीसाठी अत्यावश्यक बाबी म्हणून सर्वमान्य झालेल्या आहेत. शिवाय, कारखाने आणि वाहनांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत.
फटाके ही जीवनावश्यक बाब नाही. फटाक्यामुळे फक्त प्रदूषणच होते. आधीच वाढते प्रदूषण आपण कमी करायचे की त्यात फटाके फोडून आणखी भर घालायची ?
तब्बल ४००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेले फटाके प्रामुख्याने दिवाळीलाच फोडले जाऊन त्यांची राख होते. त्यामुळे वित्तहानी आणि प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानीही होते.
चला, पर्यावरणाचा विचार करूया!
प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी व आनंदी वातावरणात दिवाळी साजरी करूया!!

वास्तव.

फटाके बनवण्यासाठी जी स्फोटक पावडर लागते.
ज्याला फटाक्याची दारू म्हणतात.
तिचा शोध च नंतर लागला आहे म्हणजे फार पूर्वी आता ज्या प्रकारचे फटाके आहेत तसे असणे शक्य च नाही.
पण प्रकाश बरोबर आवाज करण्यासाठी दुसरे मार्ग नक्कीच वापरले जात.
आसूड चे उदाहरण मी एका ठिकाणी दिले आहे.
स्फोट करणारे,प्रकाश निर्माण करणारे पदार्थ लोकांना माहीत पडले तसा त्याचा वापर होवू लागला.

पण प्रकाश बरोबर आवाज करण्यासाठी दुसरे मार्ग नक्कीच वापरले जात.
आसूड चे उदाहरण मी एका ठिकाणी दिले आहे.>>>>>>पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची हे मी वर लेखात म्हटले आहेच. वर्तमान काळाशी काय सुसंगत आहे हा विचार करु या!

कारखाने हे गरजेचे आहेत.त्यांनी प्रदूषण केले तर फायद्याचे आहे.
कारखाने जीवन आवश्यकता असलेले आहेत.
रोजगार निर्माण करतात.
पण हेच रासायनिक कारखाने पिण्याच्या पाण्याचं source असणाऱ्या नद्या प्रदूषित करतात.
पाणी हे अतिशय गरजेचे आहे ते नसेल तर माणूस मरू शकतो काहीच तासात.
हवा प्रदूषित करतात .
आणि असे घटक हवेत सोडतात.
त्या मुळे अनेक रोग होतात,ऑक्सिजन ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्या विना पाच मिनिट पण माणूस जगणार नाही.
ती हवा च रासायनिक कारखाने विषारी करतात.
फायदा आणि तोटा ह्याचा विचार केला तर तोटा खूप प्रचंड आहे.
कायदे आहेत पण पाळते कोण?
गंगा,यमुना ह्या नद्यांची गटार झाली नसती कायदे खरेच अमलात आणले असते तर.
पिण्याचे पाणी,आणि शुध्द हवा,सकस आहार ह्या गरजेच्या वस्तू आहेत.
गाड्या,मोबाईल,पैसे ,अर्थ व्यवस्था हे दुय्यम आहे.
इंडस्ट्रिअल प्रदूषण चे कसल्याच प्रकारे समर्थन करता येणार नाही.
तरी काही लोक त्याचे समर्थन करतात.
म्हणजे प्रदूषणाची ह्यांची व्याख्या च जगा वेगळी आहे.
किंवा त्याच्या शी ह्यांना काही देणेघेणे नाही

आज च्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात मोकळ्या जागा नाहीत.
अगोदर च अनेक गोष्टी मुळे खूप प्रदूषण झाले आहे त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.
रोग राई वाढली आहे,दिवाळी आली तरी पावूस सुरू आहे,तापमान वाढ होत आहे.
त्याचे खूप भयंकर परिणाम काहीच वर्षात अजून दिसू लागतील.
ह्या अशा आज च्या काळात फटाक्यांना जागा नाही.
त्यांना बिलकुल स्थान नाही.
म्हणून एक तर त्या मध्ये बदल करा जेणेकरून आवाज आणि हवा प्रदूषण होणार नाही.
किंवा बंदी घाला.
ही मागणी मी पण करतो.
पण दिवाळी मध्येच फटाके बंद करा ही वाक्य रचनाच चुकीची आहे.चुकीचं संदेश ह्या मधून जातो.

इंडस्ट्रिअल प्रदूषण चे कसल्याच प्रकारे समर्थन करता येणार नाही>>>>> समर्थन नाहीच. तुलना व्हावीच. पण व्यवहार्यता व अपरिहार्यता याचा विचार आवश्यक आहे. प्रदूषणविरहीत च अशी आदर्श व्यवस्था/ अवस्था असू शकणार नाही. पण कमीत कमी घातक असा तर विचार करता येईल. त्या पेक्षाही आपल्या थेट हातात काय आहे हा विचार महत्वाचा.

कारखाने आणि वाहनांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत.
>>>

कठोर नसतील. सोयीचे असतील. कारण वाहने आणि कारखाने आपली गरज आहे.
पण फटाक्यांना रोखायला कठोर कायदे करायला हरकत नाही. हे मुद्दाम दिवाळीत न करता १ जानेवारीपासून करावे. म्हणजे दिवाळी येईपर्यंत बिनफटाक्यांचे लग्नसमारंभ आणि उत्सव साजरे झाले असतील. लोकांना फटाकेमुक्त आयुष्याची सवय झाली असेल.

काही राजकीय पक्ष आणि संघटना धार्मिक राजकारण करायला पुढे येतील. त्यांना पकडून लागलीच जेलमध्ये टाकावे.

गरज आहे.
गरजेची व्याख्या खूप नाजूक आहे.
गरज संपून ऐश कधी चालू होते ह्याची सीमा रेषा अगदी पुसट आहे
त्या मुळे गाडी ही गरज आहे असे सर्रास म्हणता येत नाही.
सिगारेट आणायला पण ५०० मीटर अंतरावर गाडी घेवुन जाणारे महाभाग आहेत.
तिथे गाडी ही गरज नाही.ऐश आहे सिगारेट गरज आहे.
थोडक्यात हे उदाहरण आहे.
गरजेच्या वस्तू गरज म्हणूनच वापल्या जात नाहीत.
ऐश म्हणून वापरल्या जातात.
मध्ये एक फोटो बघितला होता.
हायवे वर ४० car उभ्या आहेत प्रतेक गाडी मध्ये एकच व्यक्ती आहे .
म्हणजे ४० प्रवासी च आहेत ४० कार मध्ये.
आणि बाजू ला एक बस उभी आहे .त्या एक बस मध्येच ४० प्रवासी आहेत.
विनाकारण ,गरज नसताना अशा वागण्या मुळे प्रदूषण होत आहे ना.
प्रवास करणे ही गरज आहे .
पण असा प्रवास करणे ही गरज नाही.
ऐश आहे.

ऐश म्हणजे आपल्याला त्या मधून आनंद मिळतो.
फटाके वाजवून पण ते वाजवणाऱ्या लोकांना आनंद मिळतो.
पण आवाजाचा त्रास बाकी लोकांना होतो.
आरामदायी गाडी मधून एकट्या नी प्रवास
करण्या मुळे आनंद मिळतो त्या व्यक्ती la.
पण रस्त्यावर जागा aadvun ट्रॅफिक जाम होते .
बाकी लोकांना त्रास होतो.
इंधन ज्वलन होते .
प्रदूषण होते.
बाकी लोकांना त्रास होतो.
ह्या दोन्ही मध्ये काही फरक नाही.
दोन्ही कृत्य एकच लायकीचे आहेत.

<<<पण फटाक्यांना रोखायला कठोर कायदे करायला हरकत नाही. >>>

बरोबर. राजकारणी लोक आपले हित संबंध बघुन हे केव्हा करतील माहीत नाही. पण ज्या राज्यात/शहरात असे कायदे केले तिथे दुसरे त्यांना अँटी हिंदु ठरवून त्याला विरोध करताना दिसतात. तर काही ठीकाणी सरकार आता लोकांना फटाके प्रदूषण थांबवण्याचे आव्हान करताना दिसत आहे. तेव्हा असे कायदेही पुढे येतील ही अपेक्षा. तो पर्यंत आपण फटाके बंद करणे अथवा कमी करणे, वेळेचे बंधन पाळणे, फटाके मुक्त दिवाळी आव्हानाची टवाळी न करणे एवढे करू शकतो.

फटाके वाईट हे मान्य आहे.
फटाके बंदीसाठी नियम असावेत असे वाटते.
पण जे लोक फटाके उडवू नयेत इ. म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो.
मलातरकैकळतचनै.

कारण वाद घातला आणि पुढचा काही बोलला नाही की तो त्यांना त्यांचा विजय वाटतो आणि त्यांचा अहं सुखावतो
सगळा अट्टाहास याचसाठी तर आहे Happy

आतापर्यंत मी एकाचे प्रतिसाद वाचले जाऊ नयेत यासाडी greasemonkey code वापरत होतो.
त्यात दुसऱ्याचं नाव जोडायची वेळ आली आहे.

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

यांचं याच्या बरोबर उलट.

लोक का विरोध करतात त्यांची मानसिकता मी सांगितली आहे .
न्यायालयात पण ही केस गेली होती.
उत्पादन आणि विक्री वर बंदी घालता येणार नाही असे कोर्ट पण म्हणत आहे.
पण जी रसायने प्रदूषण करतात त्यांचा वापर बदलून कमी प्रदूषण करणारी रसायने फटाके निर्मिती मध्ये वापरता येतील .
असा बदल केला तरी बरीच समस्या नष्ट होईल.

असलेच उपाय करावे लागणार आहेत.
आवाज कमी करता येईल.
वेळेचे बंधन घालता येईल.
हे सर्व शक्य असणारे उपाय आहेत.
दिवाळी मध्ये बंदी घाला.
ही मागणी आततायी पणाची आहे.
तेच तर मी सांगत आहे.
दिवाळी मध्ये बंदी.
मग बाकी प्रसंगात का नको?
कोणी पण हा प्रश्न उपस्थिती करणार च.
इथे धार्मिक पना नाही .धर्माचा संबंध पण. नाही.
फटाके विषयी नियम सर्व प्रसंग,सर्व सण ह्यांना सारखेच असतील.
ही इच्छा काही चुकीची नाही

फटाके वाईट हे मान्य आहे.
फटाके बंदीसाठी नियम असावेत असे वाटते.
पण जे लोक फटाके उडवू नयेत इ. म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो.
मलातरकैकळतचनै.
>>>>>>>>>>>>>>>>>>
दारू पिणे वाईट हे मान्य आहे.
दारूबंदीसाठी नियम असावेत असे वाटते.
पण जे लोक दारू पिऊ नये म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो.
मलाहीबाईकैकळतचनै.

प्रश्न फक्त दिवाळी चा नाही त्याच्या इंटेसिटीचा आहे
लाडूमुळे साखर वाढते शरीरात मग वर्षभर लोकं गोड खातात त्यावर काही बोलत काही दिवाळीत का बोलतात
जर दिवाळीत तुम्ही किलोभर लाडू एकदम फस्त केलेत तर तब्येतीवर परिणाम होणारच ना

नदीत वर्षभर प्रदूषण असते मान्य पण विसर्जन दिवशी एकदम हजारो टन प्लास्टर ऑफ पॅरिस त्यात ओतलं तर वाट लागणारच ना

अन्य वेळी फटाक्यांची उदाहरणे देणाऱ्यांनी सांगावे दिवाळी वगळता कुठल्या वेळी असे रात्री बेरात्री, घरोघरी, सोसायटी, रस्ते, गल्ल्या सगळीकडे फटाके फोडतात? घरात बसूनही धुराने वास गुदमरून जातो हे अन्य कुठल्या वेळी वाटतं?

जे लोक दारू पितो म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो.
पण जे लोकं दारूची जाहिरात करतात त्यांची आम्ही जिथेतीथे लाल करतो
>>>>>
मलाहीबाईकैकळतचनै.

जे लोक दारू पितो म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो
>>>>>

चूक!
जे लोक दारू पितात त्यांची काळजी वाटते.
जे लोकं दारूचे उदात्तीकरण करतात. मद्यपानाचे समर्थन करतात. तिथे वाद घालतो.
आणि हे आयुष्यभर करत राहणार.

फटाके वाईट हे मान्य आहे.
फटाके बंदीसाठी नियम असावेत असे वाटते.
पण जे लोक फटाके उडवू नयेत इ. म्हणतात त्यांच्याशी आम्ही वाद घालतो.
मलातरकैकळतचनै.

फक्त दिवाळी शब्द कसा काय गाळता येतो तसाच.
अस दिसतंय लोकांना फक्त दिवाळीला फटाके बंदी हवीये; नियम नकोयेत
इतकी वर्ष लोक हेच सांगतायत के फक्त दिवाळी ला फटाके बंदी चुकीची आहे. नियम प्रत्येक ठिकाणी करा पण हे धागाकर्ता सकट कोणालाच नको आहे. मग ती दिल्ली मधली फटाके बंदी किंवा लहान मुलांना शपथा देणं; equally हिप्पोक्रेटीक.

दिवाळी मध्ये इतके फटाके वाजले जातात की जीव गुदमरतो.
असे नक्की कुठे घडतं.
कोणत्या शहरात.
मी मुंबई ,ठाणे दोन्ही ठिकाणी राहतो मग माझा कधी fatakya मुळे जीव गुदमरला नाही.
पुण्यात राहणारी पण लोक आहेत.
कोणाचा जीव गुदमरून गेला का दिवाळी मध्ये.
दिल्ली चे उदाहरण देवू नका.
त्या शहराची संस्कृती आणि भौगोलिक स्थान विचित्र आहे.
पण प्रदूषण होत नाही असे नाही ते होते .
त्या साठी मुळातून च अनेक गोष्टी बदलल्या पाहिजेत.
प्लास्टिक ,डम्पिंग ग्राउंड ,रासायनिक कारखाने,गाड्या चे इंधन ज्वलन,अन्न पदार्थ चे wrapper, पाण्याच्या बाटल्या .
फटाके, सर्व जे काही प्रदूषण साठी जबाबदार आहे .
त्यांच्या वर नियंत्रण अगदी असावेच.
फटाके वर बंदी घाला,विसर्जनावर बंदी घाला.
प्रदूषण कारण.
आणि प्रचंड प्रदूषणकारी वस्तू रोज वापरून
त्याची मजा घेणे हे चांगले.
Plastics roj वापरणे हे चांगले,शहरांचा कचरा डंप करणे हे चांगले.त्या वर पूर्ण प्रक्रिया करा अशा मागण्या कोणाच्या नसतात.
फटाके बंद दिवाळी मध्ये करून काही काडी चा फरक पडणार नाही प्रदूषणात.

फटाके बंदी नको आहे फक्त दिवाळी मध्ये. फटाके नको.
हे विचित्र मानसिकता नाही का?

रासायनिक कचरा कारखाने,शहर नदीत सोडतात त्या वर आक्षेप नाही .
पण विसर्जन वर मात्र बंदी हवी.
ही पण त्याच प्रकार ची मानसिकता आहे.

फटाके बंद दिवाळी मध्ये करून काही काडी चा फरक पडणार नाही प्रदूषणात
>>>>

हो बरोबर आहे
ओवरऑल प्रदूषणावर विशेष असा काही फरक पडणार नाही.

फटाके विरोधकांचा मुद्दा असा आहे की एकाचवेळी एकाच ठिकाणी जास्त वाजवले गेल्याने तिथल्या लोकांना फरक पडतो.
आणि हे सुद्धा बरोबर आहे.

पण हे कायदे नियम करून टाळता येईल. विशिष्ट फटाक्यांमधून होणाऱ्या धूरावर प्रदूषणावर मापदंड लावता येतील.

हे ईतके सर्वांना मान्य झाले तर हा अंतहीन वाटणारा वाद संपुष्टात येईल Happy

वर्षाचे ३६५ दिवस फटाक्यांना बंदी आणा, बंदी नसली तरी उडवू नका.
मला नाही वाटत, इथे दिवाळीत फटाके नको म्हणणारी कोणी बाकीच्या वेळी हवे असं म्हणतोय. अल्पना यांनी लग्नाच्या मिरवणुका, मी निवडणूक निकालानंतरच्या फटाक्यांचा उल्लेख केला आहे.
फटाके उडवल्याने डोळ्यांत भरलेल्या धुराने तो वाचता येत नसेल किंवा वाचायचा नसेल.

Pages