दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
मानव
मानव
भोंदू फॉरवर्ड आणि ह्या धाग्याची सांगड घालून चार्मिक भावनांना हात घातलात.
Mumbai has lost the charm>>
Mumbai has lost the charm>> नाही. आमच्याकडे समुद्र आहे.
>>>>
अगदीच +७८६
समुद्रही असा आहे जसा ईतर कुठे नाही.
ही मजा फक्त मुंबईतच
https://www.maayboli.com/node/82547
खरंय, मी भारताची जवळपास सगळी
खरंय, मी भारताची जवळपास सगळी किनारपट्टी फिरलोय, कोकण केरळ, तमिळनाडू ओरिसा वगैरे
मुंबई इतका काळसर, वास मारणारा समुद्र कुठंही नाही
ही मजा फक्त मुंबईतच
Mumbai has lost the charm>>
Mumbai has lost the charm>> बीकेसी, बांद्रा वरळी सी लिन्क. कॅफे लिओपोल्ड, एन सी पी ए. / नरीमन पॉइन्ट, टाउन सगळेच.
बांद्र्याची जामा मसजिद, हाजी अली दर्गा, वरळी सी फेस , बाबुल नाथ, लाडु सम्राट, लालबागचा राजा. आमची मेट्रो. बायकांची सुरक्षितता, मोतमावली चर्च. पाली हिल,
अजून बरेच आहे.
लाव रे तो व्हिडीओ.
मुंबईचा वेगळा धागा काढा
मुंबईचा वेगळा धागा काढा कोणीतरी ... मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ ईंडिया..
फुल्ल राडा झाला पाहिजे. सगळा धुरला उडाला पाहिजे.. धाग्यांची जाळपोळ. प्रतिसादांची दगडफेक. प्रत्युत्तरांचे स्फोट. मायबोलीवर दंगे होतील. त्यामुळे प्रशासनाची आगाऊ परवानगी घ्या..
मुंबई इतका काळसर, वास मारणारा
मुंबई इतका काळसर, वास मारणारा समुद्र कुठंही नाही
ही मजा फक्त मुंबईतच Happy
Submitted by आशुचँप on 20 October, 2022 - 13:46
आमच्याकडे तेवढा तरी आहे ओ, पुण्यात तोही नाही!!!
ऋन्मेऽऽष, तो मुंबईचा धागा तूच काढ. आणि मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया नको, मुंबई विरुद्ध पुणे (त्यात जास्त मजा येईल!!!)
काही ही असू पण दिल्ली आणि
काही ही असू पण दिल्ली आणि मुंबई ची तुलना होवू शकत नाही.
मुंबई is ग्रेट.
बंगलोर.किंवा दक्षिण भारतातील प्रगत शहराशी तुलना होईल.
पण दिल्ली किंवा उत्तर भारतातील कोणतीच शहर मुंबई ची बरोबरी पण करू शकत नाहीत.
विक्षिप्त मुलगा
विक्षिप्त मुलगा
ना पुणे, ना दिल्ली, ना हैदराबाद..
उगाच का कोणाला टारगेट करून कमी लेखा
पण आपल्या मुंबईच्या समुद्राला हलके लेखले जात असेल तर मात्र उत्तर द्यायला हवे
ईथे अवांतर चर्चा नको म्हणून वेगळा धागा कोणीतरी काढा म्हटले
कोणत्याही product चे उत्पादन
कोणत्याही product चे उत्पादन दिल्ली किंवा यूपी चे असेल .
तर फ्लिपकार्ट वरून ती वस्तू पण मी विकत घेत नाही.
Hp,Punjab चालेल .
किंवा दक्षिण आणि पश्चिम भारत असेल तरी विश्वास वाटतो.
मी तर दिल्ली वरून सुटणाऱ्या
मी तर दिल्ली वरून सुटणाऱ्या विमानाने, ट्रेनने किंवा बसनेही प्रवास करत नाही. कुठे नेऊन सोडतील सांगता येत नाही.
दिल्लीला जाताना विमानात किंवा ट्रेनने माझी कार घेऊन जातो. परत येताना तिथून माझ्या कारने चंदिगढ किंवा जयपूरला जातो आणि तिथुन विमानात/ट्रेनमध्ये कार लोड करून परत येतो.
चला मग लोकहो या दिवाळीला
चला मग लोकहो या दिवाळीला दिल्लीला जाऊन बघूया सारे कशी आहे दिल्ली
अस्सल मुंबईकराला मुंबई चांगली
अस्सल मुंबईकराला मुंबई चांगली कशी हे पटवून देण्यात जराही रस नसतो. आता एकतर मुंबईकर बदलले किंवा मुंबईचा खरंच चार्म राहिला नाही. किती तो न्यूनगंड मुंबई कशी चांगली आहे दाखवुन द्यायचा!
उच्च शिक्षित मुलांना त्या
उच्च शिक्षित मुलांना त्या मध्ये खास करून अभियांत्रिकी ची डिग्री घेतली आहे त्यांना पुणे सिटी नीच नोकऱ्या दिल्या आहेत
मुंबई नी आधार दिला आहे
बंगलोर ,हैद्राबाद ,चेन्नई नी मदतीचा हात दिला आहे .
नाही तर भज्जी विकायला लागली असती.
ह्या भागावर टीका करता च येणार नाही.
उच्च शिक्षित लोकांचे शिक्षण ह्यांनी च सार्थ केले आहे.
कुठे त्या दिल्ली ल ह्यांच्या जोडी ल आणता.
आता एकतर मुंबईकर बदलले >> मी
आता एकतर मुंबईकर बदलले >> मी पुणेकर मुंबई कर दोन्ही आहे. जोडीला हैद्राबाद पण. क्या बोलते.
दिल्लीत AAP ने फटाके बंदी
दिल्लीत AAP ने फटाके बंदी केली आहे. आता नेहमीप्रमाणे BJP ने त्याला हिंदू विरुध्द AAP अस वळण दिले आहे.
म्हणून उत्तर भारता पेक्षा दक्षिण भारत चांगला आहे.
मी विजापूर अमरावती नागपूर
मी विजापूर अमरावती नागपूर मुंबई पुणे हैद्राबाद बंगलोर त्रिवेंद्रम दिल्ली चंदिगढ वडोदरा आणि अहमदाबादकर.
मुंबईच्या किनाऱ्यांच्या
मुंबईच्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न
मुंबई शहरात दररोज सुमारे ८-१० हजार टन कचरा गोळा केला जातो. यात वरकरणी निरूपद्रवी भासणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, काचा, पत्र्याचे डबे किंवा इलेक्ट्रोनिक वस्तूंचे तुकडे हे सर्व समुद्रात मिसळतात. कचऱ्यातील अनेक पदार्थ समुद्राच्या पाण्यात विरघळतात किंवा त्यांचे कण तरंगतात आणि पाणी प्रदूषित करतात.
स्वयंपाकघरातील पाण्यापासून ते स्नानगृह व संडासातील मैल्याबरोबर दररोज अंदाजे ३०० कोटी लीटर सांडपाणी पाच मल:निस्सारण केंद्रांतून मुंबईच्या समुद्रात सोडले जाते. यांत झोपड्या व नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा समावेश नाही, परंतु ज्या अर्थी ५०% लोक अशा वस्त्यात राहतात, त्याअर्थी बाहेर पडणारे सांडपाणी किमान १०० ते १५० कोटी लीटर असू शकते. या सांडपाण्यात सेंद्रीय पदार्थ, अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू तसेच साबणाचे घटक असतात. ई. कोलाई व व्हिबरियोसारखे रोगकारक बक्टेरिया खाऱ्या पाण्यातही वाढतात आणि त्यातील सेंद्रीय पदार्थांमुळे या जंतूंची वाढ जोमाने होते. समुद्र गढूळसर दिसतो आणि कुजणाऱ्या पदार्थांतून सल्फर डायऑक्साइड व हैड्रोजन सल्फाईड गॅस बाहेर पडून दुर्गंध पसरतो. यामुळे किनाऱ्याचे पर्यावरण बिघडून जाते. साबणातील पॉलिफॉस्फेट व सेंद्रीय पदार्थांमुळे या जंतूंची वाढ अतिशय जोरात होऊन ते पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन संपवून टाकतात. पाणी ऑक्सिजन विरहित झाले की समुद्रातील जलचर, मासे आणि वनस्पती मरायला लागतात. यामुळे हजार मासे मरुन पडतात आणि किनाऱ्यावर आढळण्याच्या अनेक घटना मुंबईच्या किनारपट्टीवर घडतात.
>>> हे मी नाही पर्यावरण तज्न म्हणत आहेत, आणि मला जेव्हा जेव्हा कधी मुंबईचा समुद्र बघायची वेळ आली तेव्हा तो लांबूनच बरा म्हणावा वाटलं
इतक्या घाणेरड्या पाण्यात पाय सुद्धा बुडवावा वाटत नाही
तरी मुंबईकरांना कौतुक पण नुसते सांगायला
प्रत्यक्ष सगळे मुंबईकर किनारा आणि स्वछ समुद्र अनुभवायला कोकणात पळतात
यात दिवाळीच्या फटाक्यांचा
यात दिवाळीच्या फटाक्यांचा कचरा समुद्रात जातो तो राहिलाच.
प्रत्यक्ष सगळे मुंबईकर किनारा
प्रत्यक्ष सगळे मुंबईकर किनारा आणि स्वछ समुद्र अनुभवायला कोकणात पळतात>> ना ना गोवा. गोवा मजेदार है एक घंटेका फ्लाइट है.
सालाबादप्रमाणे यंदाही
सालाबादप्रमाणे यंदाही राज्यातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत मुंबईने आपला नंबर कायम ठेवला आहे. भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावलेला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात समोर आले आहे.>>>
फक्त समुद्र च नव्हे तर हवाही प्रचंड प्रदूषित आहे मुंबईची
ऋ, धागा काढानाईच पडेगा तेरेको
ऋ, धागा काढानाईच पडेगा तेरेको.
पुणेकर अस्सल पुणेरीपणाकरू लागले.
कैसा मुंबैकर बनेगा रे तु
डोंबिवली कल्याण वाले जेव्हा स्वतःला मुंबैकर म्हणतात तेव्हा..... WHAT?????
सगळ्यानी दिवे घ्या.
ऋ, धागा काढानाईच पडेगा तेरेको
ऋ, धागा काढानाईच पडेगा तेरेको.
पुणेकर अस्सल पुणेरीपणाकरू लागले.
कैसा मुंबैकर बनेगा रे तु
डोंबिवली कल्याण वाले जेव्हा स्वतःला मुंबैकर म्हणतात तेव्हा..... WHAT?????
सगळ्यानी दिवे घ्या.
डोंबिवली कल्याण वाले जेव्हा
डोंबिवली कल्याण वाले जेव्हा स्वतःला मुंबैकर म्हणतात तेव्हा..... WHAT?????>> सस्मित तु मा ख मै. मेरी रेपुटेशन पहलेसे वाइट है. इसलिये मै चुप बैठी.
पण हाय समुद्र काय दिसतो. संध्याकाळी एन सी पी एत आत जाताना. व बाहेर आल्यावर रात्री अकराला व्हीटीला जायला लगेच टॅक्सी. लायटिन्ग च्या रथात बसलेली रोमांटी क जोडपी. जिग्नेस व पाखी. फुग्याचा हट्ट करणारी मुले. हवा दमट खारट. पन सध्या पुणे बंगलोर पेक्षा बरी वाट्ते.
पृथ्वी थिएटर व कॅफे!!
यात पुण्याचा काय नाय वो
यात पुण्याचा काय नाय वो
बिचारे आम्ही पुणेकर आम्हाला न समुद्र ना लोकल ट्रेन
10 च्या ऑफिस साठी 6 वाजता घर सोडायची गंमत आम्हाला कधी मिळतच नाही
तडफडत 9.30 ला तयार होऊन 10 ला ऑफिस ला पोचावं लागतंय
ना तेलकट लोकांच्या रंध्रे स्त्रवणारा घाम सोसत रणधुमाळी करत इच्छित स्थळी पोचण्याचा आनंद मिळत
पुणे फार मागास आहे, तरी आता ट्रॅफिक मध्ये लोकं आडव्या तिडव्या गाड्या घालून दिवसाच्या कोणत्याही क्षणी जॅम करण्याचे चॅलेंज घेतात म्हणून बराय
नैतर कसलं हो हे सपक आयुष्य
<10 च्या ऑफिस साठी 6 वाजता घर
<10 च्या ऑफिस साठी 6 वाजता घर सोडायची गंमत आम्हाला कधी मिळतच नाही>
बॉरं.
धाग्याचा विषय "फटाकेमुक्त
धाग्याचा विषय "फटाकेमुक्त दिवाळी" असा आहे. विसरला असलात तर आठवण करून देतो.
धाग्याचा विषय "फटाकेमुक्त
धाग्याचा विषय "फटाकेमुक्त दिवाळी" असा आहे. विसरला असलात तर आठवण करून देतो.>>>
हे सगळं त्यातच येतं
भरत हे सगळे मुंबईकरच असणार, खरा पुणेकर जॉब सोडून कोथरूड मध्ये प्रेमाचा चुलीवरचा चहा विकेल पण जीवाची उरस्फोड करून मुंबईत जाणार नाही
@ समिस्त
@ समिस्त
ऋ, धागा काढानाईच पडेगा तेरेको.
>>>>
हो, मी धागा काढणार याचे भय ईथे आधीच दिसू लागलेय.
ते आधी एंजॉय करतो
लाल करून घेण्यात सर पटाईत
लाल करून घेण्यात सर पटाईत आहेत
ते तर बबुन्सना पण कॉप्लेक्स देत असणार
अस्सल मुंबईकराला मुंबई चांगली
अस्सल मुंबईकराला मुंबई चांगली कशी हे पटवून देण्यात जराही रस नसतो. आता एकतर मुंबईकर बदलले किंवा मुंबईचा खरंच चार्म राहिला नाही. किती तो न्यूनगंड मुंबई कशी चांगली आहे दाखवुन द्यायचा! Lol
Submitted by अमितव on 20 October, 2022 - 16:46
>>>>
खरं सांगा अमितव
हे सुद्धा मी धागा काढू नये म्हणूनच ना
पण छे, कोणाला पटवून द्यायला नाही.. कोणाला हलके दाखवून चिडवायला नाही.. कोणाला जळवायला नाही...
मुळात मुंबई एक जिव्हाळ्याचा विषय आहे. मातृभुमी आहे, कर्मभुमी आहे. समुद्र हे आमचे प्रेम आहे. त्यावर लिहायची आणि धागा काढायची संधी मिळतेय तर कोण सोडणार
उगाच चार ओळीचा धागा काढण्यातही मजा नाही. दिवाळी होऊन जाऊ द्या. मग छान सचित्र धागा काढूया मुंबईच्या समुद्राचा
Pages