फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच सेलेब्रेटी आपल्या कर्माने ट्रोल होतात. वर्षभर जर तुम्ही प्रदूषणावर बोलला नाहीत आणि नेमके दिवाळीलाच बोललात तर ट्रोल होणे स्वाभाविक आहे. मग यात भले तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर का असेना. पब्लिकला सिलेक्टीव्ह स्टँड सापडला तर तो ट्रोल होतो.

जसे ते राजकीय चर्चांमध्ये होते. नेहमी समोरच्या नेत्याचाच भ्रष्टाचार दाखवा आणि आपल्या नेत्याचा उदो उदो करा. असे तुम्ही करत असाल तर तुमच्या राजकीय मताला काही किंमत राहत नाही.

थोडक्यात तुम्ही पब्लिक फिगर असाल तर एखादे मत व्यक्त करताना वा एखादा स्टँड घेताना त्यावर कुठल्याही परिस्थितीत ठाम आहात का नाही हे गरजेचे. तिथे अमुकतमुक गोष्टीला विरोध करण्यासाठी आधी तमुक तमुक गोष्टीलाही विरोध करणे गरजेचे आहे का वगैरे मुद्द्यांना अर्थ राहत नाही. ते मायबोलीवर वाद घालायला ठिक आहे. कारण आपण कोणी सेलिब्रेटी नाही आहोत. आपल्या मताला ती पब्लिक वॅल्यू नाहीये. सेलेब्रेटींनी काही आवाहन केले तर त्यांच्या ईतर ठिकाणी भुमिका काय आहेत हे बघितले जाणे स्वाभाविक आहे.

तो शाहरूख तर बिचारा काही बोलला नाही तरी त्याच्या नावावर काहीतरी खपवून लोकं त्याच्या मागे लागतात. त्यामानाने ईतर छोटेमोठे सेलेब्रेटी सुखी आहेत.

काही विधाने सर्वकालीन वापरतात
सर्वकालीन विधाने
1) तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?
2) त्यांच चालत आमच चालत नाही काय?
3) हे त्यांना पण सांगा
4) हे आमचे धर्मस्वातंत्र्य आहे.
5) हा आमच्या धर्मावर घाला आहे
6) आमचे बहुमत आहे व लोकशाही मधे बहुमताला महत्व आहे
7) ही आमची परंपरा आहे
8) ही आमची संस्कृती आहे
9) आमच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला आहे
10) तुम्ही कोण आम्हाला सांगणार?
11) पाकिस्तानात जा
12)आमच्या वेळी अस नव्हत
13) आजकाल हे फार वाढलय
14) हा फुरोगाम्यांचा डाव आहे
15)आता तुम्ही आम्हाला शिकवणार का?
16) हे आमच्या पूर्वजांना तेव्हाच ठाउक होत
17) ह आमच्या संस्कृतीतूनच त्यांनी पळवलय.
18) हे आमची संस्कृती भ्रष्ट करायला निघालेत

>>आपल्या मेंदूला सुखावणारं पहिलं संगीत हे लो-फ्रिक्वेन्सी आहत नादाचं संगीत आहे. व्हिएन्ना विद्यापीठातल्या टेकम्से फिच नावाच्या प्राध्यापकाने 'आपल्याला बेस म्युझिक का छान वाटतं' ह्यावर बरंच संशोधन केलं आहे. >> वॉव! धन्यवाद. शोधतो. आणखी वाचयला आवडेल. अनाहत नाद, 'ग' स्वराचा नाद असलं काय काय ऐकलं आहे. पण त्यावरचा अभ्यास करुन पेपर/ संशोधन असेल तर रोचक असेल वाचायला.
>> त्यात फटाके अ‍ॅड करून आपण नवीन पेपर पब्लिश करू शकतो; को-ऑथर होणार काय? >> Lol आपले लोक फटाक्यांची फ्रिक्वेंसी धरुन अँप्लिट्युड ची ऐशी की तैशी करतील.

बायदवे, फटाक्यातून (आवाजी) निर्माण होणारी कंपने नक्की कमी वारंवारतेची असतात का? https://www.ijset.net/journal/130.pdf इथे हत्तींना पिटाळायला फटाक्यांचा एक स्टडी दिसला. मी फक्त अ‍ॅबस्टॅक्ट वाचला तर आवाजी फटाके ४०० हर्ट्झ काही वेळा १००० हर्ट्सचे वापरले असं दिसलं. हा रिसर्च श्रीलंकेतील आहे.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5373909/ इथे लिहिल्याप्रमाणे आकाशात सोडायचे फटाके कमी- वारंवारतेचा आवाज निर्माण करतात. हा रिसर्च जपानचा आहे, आणि तिकडे आकाशीतील संदर्भ दिसले.
हे वाचल्यावर वाटलं की रॉकेट्स इ. कमी वारंवारतेचा आवाज तयार करत असावीत. पण लक्ष्मी बाँब/ सुतळी बाँब पण का?
हपा, तुझं बरोबरच असेल, पण मनात प्रश्न आला म्हणून विचारले.

यु मेड माय डे!

गाण्यात र्हिदम कायम बेसला असतो (तू वर डग्ग्याचं उदाहरण दिलं आहेस) कारण आपण बेसच्या आवाजांतील टाईम डिफरंस टिपेच्या आवाजापेक्षा जास्त अचूक हेरू शकतो. आणि हा पार्ट तर सगळ्यात भारी आहे.
For louder, deeper bass notes than those used in these tests, people might also feel the resonance in their bodies, not just hear it in their ears, helping us to keep rhythm. For example, when deaf people dance they might turn up the bass and play it very loud, he says, so that “they can literally ‘feel the beat’ via torso-based resonance.”
बहिर्‍याव्यक्ती कशा नाचू शकतात तर अशा! अफलातून! Happy

प्रियंका चोप्राने दिवाळीला फटाके वाजवू नका असं आवाहन केलं. नंतर तिने राजस्थानात लग्न केलं तेव्हा भरपूर आतिषबाजी केली.
अनुष्का शर्माने दिवाळीला फटाके वाजवू नका, कुत्र्यांना त्रास होतो असं आवाहन केलं. आणि इंस्टावर कोवळ्या मटनावर ताव मारतानाचा फोटो टाकला.
आलिया भटने दिवाळीला फटाके वाजवू नका, प्राण्यांना त्रास होतो असं आवाहन केलं. ईदच्या शुभेच्छा देताना मात्र तिने प्राण्यांची कुर्बानी देऊ नका असं आवाहन केलं नाही.

या दुटप्पीपणामुळे सेलेब्रिटीजवर लोक चिडतात. प्राण्यांना एक दिवस आवाजाचा त्रास झाला तरी ते मरत नाहीत. (आमच्या शेजाऱ्यांचं 10-12 वर्षांचं कुत्रं दरवर्षी 4 जुलैला फटाक्यांचा त्रास सहन करूनही आज ठणठणीत आहे.) पण कोवळा प्राणी tender meat साठी मारणं, ईदला लाखो प्राण्यांची कत्तल करणं हे स्वतः करत असाल किंवा विरोध करत नसाल तर "प्राण्यांना फटाक्यांचा त्रास होतो" असा कांगावा करत लोकांना शहाणपण शिकवू नये. गप्प बसायला हवं.
ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. फटाकेमुक्त दिवाळी चळवळ गरजेची आहे.
पण सेलेब यात पचकले नाही तर बरं अन्यथा परिणाम उलटा होतो. इतका- की फटाक्याच्या कंपन्यांना सेल वाढवायचा असेल तर सेलिब्रिटीना फटाक्यांबद्दल कांगावा करायला पैसे द्यावे.

कमी आवाजाचे ,कमी प्रदूषण करणारे फटाके ..
फटाके वाजवणे साठी एक विशिष्ट च जागा.
असे पर्याय आहेत
वाजवू च नका हा काही पर्याय नाही.
1) ट्रेन मध्ये गर्दी होते ऑफिस ,किंवा कामावर जाणाऱ्या व्यतिरिक्त कोणालाच ट्रेन नी प्रवास करून देवू नका.
२) पाण्याची पातळी खाली जात आहे म्हणून विहरीवर बंदी घाला.
पण जलभरण करून ही समस्या कमी करता येईल हे उपाय सांगू नका.
३) प्राणी कत्तल बंद च झाली पाहिजे.
मांसाहार बंद च झाला पाहिजे.
अशा प्रकारचे अनेक बंदी वाले आहेत.
त्यांना मध्यममार्ग का नको असतो ते कळत नाही.
कारखान्यांनी जलं प्रदूषण होते.
शहरातील drainage चे पाणी नदी किंवा समुद्रात सोडल्या मुळे
मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होते .
म्हणून संडास करण्या वर च बंदी घाला असे कोणी म्हणत नाही.
किंवा सर्व उत्पादन बंद करून सर्व कारखाने बंद करा असे कोणी म्हणत नाही.
अशा प्रसंगात बंद करा ,बंदी घाला अशा मागण्या नसतात मध्यम मार्ग च निवडला जातो
..
हा दुटप्पी पना च असतो
४)

प्रियंका चोप्राने दिवाळीला फटाके वाजवू नका असं आवाहन केलं. नंतर तिने राजस्थानात लग्न केलं तेव्हा भरपूर आतिषबाजी केली.
>>>

लग्न आयुष्यात एकदाच होते.
दिवाळी दरवर्षी चार दिवस येते.

आज काल लग्न आयुष्यात एकदाच होत नाही खूप वेळा होते .
सेलेब्रिटी लोकांची तर अनेक वेळा लग्न होतात.
प्रियांका चे पण दुसरे ,तिसरे लग्न होणार च नाही ह्याची काही खात्री नाही

प्रदूषण वैगेरे लै नंतरची गोष्ट झाली.

आता नवरात्रीमध्ये सुद्धा प्रत्येक पाच सेकंदाला रॉकेट सोडणारा बॉक्स बऱ्याच लोकांनी लावलेला. दर पाच सेकंदानी फट्ट ! असं सलग ५-६ मिनिटं. डोक्यावरचे केस उपटावे वाटले इतके इरिटेट झालेले.

फटाकेमुक्त दिवाळी चळवळ गरजेची आहे.## मग कशाला सेलेबची उदाहरणं दिलीत? चूक ते चूक म्हणा की. की सेलेब फक्त हिंदू सणांना सांगत आहेत म्हणून हट्टापायी ती चूक प्रथा सुरू ठेवायची?

कृपया पान ११ बघा. तिथे मी उपाय सांगितले आहेत.

४. सिगरेटवर जसा टॅक्स लावला जातो, तसा भरमसाठ टॅक्स विशिष्ट डेसीबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर लावावा म्हणजे आपोआपच कमी फटाके खरेदी केले जातील.

साधं इकॉनॉमिक्स आहे. डिमांड-सप्लाय सांभाळा की आपोआप लोकंच कमी खरेदी करतील. समाजप्रबोधन चांगले आहे, पण खिशाला चिमटा बसला की तो जास्त प्रभावशाली असतो.

सिगरेटचा टॅक्स कोण वाढवतं? फटाक्यापेक्षा सिगरेट, हॉर्नचा कर्कश्श आवाज या जास्त गंभीर समस्या आहेत.

सामान्य लोकांना असे पण फटाके परवडत नाहीत.
अजून टॅक्स वाढवून काही फरक पडणार नाही .
मुळात फटाके मोठ्या प्रमाणात वाजवणारी मंडळी ही.
कोण आहेत..
नेते,
उद्योग पती.
सरकारी कर्मचारी ज्यांना फुकट ची वर कमाई असते.
दुकानदार .
ह्यांना भाव वाढला तरी काही फरक पडत नाही.
सामान्य लोक फुल बाज्या आणि लवंगी ,भुई चक्र, रॉकेट ह्याच्या पुढे जात नाहीत.
कोणत्या ही नियमात पहिला बळी सामान्य लोकांचाच जातो.
त्या मुळे कोणत्या ही निर्बंध ना सामान्य लोक विरोध करतात
फटाके बंदी ल विरोध चे हे पण एक कारण आहे.
मुस्लिम पशू बळी देतात...त्या वर निर्बंध आणले तर त्याचा वापर सामान्य लोकांना छळ न्यासाठी च होईल.
बळी काही बंद होणार नाहीत.
सिग्नल ,तोडणे,no parking मध्ये गाडी पार्क. करणे .
हे थांबवायचे असेल तर भरमसाठ दंड आकारला जातो
हाच विचार भाव वाढला की लोक सुधारतील.
लोक काही सुधारत नाहीत ..
उलट त्यांचा छळ करण्याचे हत्यार पोलिस यंत्रणेला मिळते आणि पोलिस बिघडतात.
जितके जास्त कडक कायदे तितका जास्त मोठा भ्रष्टाचार आणि भ्रष्ट यंत्रणा निर्माण होते.

बाकी सर्व तसेच चालू असते.
लोक प्रबोधन हा सर्वात खात्री चा मार्ग असतो.
वेळ लागतो पण उपाय एकदम खात्री चा.

चांगली चर्चा चालू आहे. पण फक्त दिवाळीच कशाला? सर्व प्रकारच्या celebrations ना फटाकेमुक्त करावं. त्यात जात, धर्म, सण, लग्न, मॅच असे भेदभावच नकोत. प्रदूषण हाच मुद्दा असेल तर ते फटाके कधीही फोडले तरी होणारच आहे. त्यामुळे हा विषय सर्वव्यापक करून या धाग्याचे नाव बदलावे.

अशी मागणी कोणी करत नाही.
दिवाळीमध्ये वाजवणारे फटाके बंद करा अशी साफ आणि स्पष्ट शब्दात मागणी असते.
लग्नात वाजणारे बंद करा.
मिरवणुकीत वाजणारे बंद करा...
राजकीय पक्षांचे जिंकून आल्यावर वाजणारे बंद करा.
थोरामोठ्यांच्या लग्नातील बंद करा.
अशी मागणी आज पर्यंत तरी जाहीर पने कोणी केली नाही .

हॉर्न वाजवू नका हा नियम पण कुठे वाजवू नका..
जिथे श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांची वस्ती आहे त्या भागात ..
धारावी मध्ये हवा तितका हॉर्न वाजवला तरी चालेल
असे selective नियम असतात.
फेरीवाले ..
मलबार हिल,cuffparade, किंवा अशा श्रीमंत वस्ती जवळ नसतात त्यांना हाकलून लावतात.
पण फेरीवाल्यांच्या हितासाठी हीच लोक बोंबलत असतात.

लग्न आयुष्यात एकदाच होते हे उपरोधानेच लिहिले होते.

जर तुम्ही लग्नात फटाके वाजवत असाल आणि दिवाळीत वाजवू नका म्हणून आवाहन करत असाल तर तुम्ही ट्रोल होणारच.

"मी ईतर आयुष्यात बेजबाबदारपणे वागून पर्यावरणाची बँड वाजवतो म्हणून मला दिवाळीच्या फटाक्यांविरोधात बोलायचा अधिकार नाही का??"
असे म्हणने मायबोलीवर चर्चेतील मुद्दा म्हणून ठिक आहे. पण सेलेब्रेटी म्हणून असे कराल तर ट्रोल होणे स्वाभाविक आहे.

जे मी दरवर्षी या धाग्यावर लिहितो तेच पुन्हा लिहितो. कायद्यानेच फटाक्यांवर निर्बंध आणा.
आजूबाजूला मोठी माणसे फटाके वाजवत असताना बघून लहान मुलांना जर फटाके वाजवायची ईच्छा होत असेल तर त्यांची ती ईच्छा मारणे हे फेअर वाटत नाही.

धन्यवाद अमित. आणि अरे मी आहत नाद म्हणालो, जो अनाहत च्या विरुद्धार्थी शब्द आहे. अनाहत नाद अध्यात्माचा विषय आहे, माझ्या प्रतिसादात तो नाही.

फटाक्यांच्या फ्रिकवेन्सीचा तू काढलेला मुद्दा रास्त आहे. मी त्याबद्दल खरंच काही वाचलेलं नाहीये. फक्त ऐकून जो स्वर जाणवतो त्या आधारे मी ते म्हणालो होतो, पण ते चुकीचं असू शकेल. पण ४०० ते १००० हर्ट्झ ही फारच उच्च फ्रिकवेंसी वाटते. साधारण मध्य सप्तलातला वरचा सा हा ४०० च्या आसपास असतो. ते सुईं सुइं आवाज करणारे फटाके त्यात येत असावेत. छोटे फटाके - लवंगी वगैरे मध्य सप्तकात (२०० ते ४०० च्य मध्ये) असू शकतील. लक्ष्मी (इथे जी म्हणावे का?) सुतळी वगैरे कानांना कमी फ्रिकवेन्सी चे वाटतात. पण ते वरचे आकडे ऐकून आता मी जरा सावध झालो आहे. छ्या! पेपर पब्लिश करणं एवढं सोपं राहिलं नाही आजकाल.

दिवाळीमध्ये वाजवणारे फटाके बंद करा अशी साफ आणि स्पष्ट शब्दात मागणी असते.
लग्नात वाजणारे बंद करा.
मिरवणुकीत वाजणारे बंद करा...
राजकीय पक्षांचे जिंकून आल्यावर वाजणारे बंद करा.
थोरामोठ्यांच्या लग्नातील बंद करा.
अशी मागणी आज पर्यंत तरी जाहीर पने कोणी केली नाही .>>>>>>>>>>>>> दिवाळीत हे प्रमाण खूपच प्रचंड असते म्हणून दिवाळी एवढेच. कमी वेळात कमी जागेत जास्तीत जास्त वायु व ध्वनी प्रदूषण

Screenshot_2022-10-19-16-12-13-133_com.miui_.weather2.jpg
ही दिल्लीतली आजची स्थिती आहे. अजून फटाके किंवा पराली जाळणे सुरू झालेले नाही. दिवाळी मूळे ट्रॅफिक नेहमीपेक्षा वाढला आहे. पाच - दहा मिनीटे रस्त्यावर उभे राहिले तर अस्वस्थ वाटायला लागले. ओळखीत 2-3 जणांनी तरी कालपासून श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरवात झाली म्हणून सांगितले मला.
मी दिवाळीला कधीच दिल्लीत थांबले नाही. इथल्या भौगोलिक स्थानामुळे आख्खा हिवाळा असाच जातो. दिल्ली तरी बरे म्हणावे अशी स्थिती नोएडा आणि लगतच्या युपीमधल्या शहरांमध्ये असते.
यात दिवाळीचे आणि गुरूपुरब चे फटाके मिळाले तर किती वाईट स्थिती होईल याचा विचार करा.
नवीन वर्षाच्या वेळी तेवढ्या प्रमाणात फटाके जाणवले नाहीत.

प्रदूषणामूळे फटाक्यांवर नेहेमी साठी बंदी घातली तर चालेल मला. लग्न करताना फटाक्यांची गरज नाही. पण शहरामध्ये एकावेळी 50 -60 लग्नांमध्ये फटाके वाजल्यामूळे झालेले त्या दिवशीचे प्रदूषण आणि दिवाळीच्या दिवशी हजारो ठिकाणी फटाके फोडल्याने झालेले प्रदूषण यात दिवाळीतल्या प्रदूषणाची तीव्रता नेहेमीच जाणवेल.

असे विभाग ठरवून त्याच भागात बंदी किंवा नियंत्रण ठेवले तर योग्य निर्णय म्हणता येईल.
एक देश एक बंदी असला घाणेरडा प्रकार नको.
जिथे विरळ वस्ती आहे .खूप मोठी जागा आहे तिथे बंदी किंवा नियंत्रण दोन्ही नको.

आजूबाजूला मोठी माणसे फटाके वाजवत असताना बघून लहान मुलांना जर फटाके वाजवायची ईच्छा होत असेल तर त्यांची ती ईच्छा मारणे हे फेअर वाटत नाही. >> बरोबर.

अल्पना 165 तर आहे Happy मी गेल्या वर्षी NCR सोडल‌ सो प्रदुषणा पासून वाचलो पण हे दोन महीने सोडले तर दिल्ली सारखी मजा नाही. Mumbai has lost the charm हे अवांतर :-‌)

Mumbai has lost the charm>> नाही. आमच्याकडे समुद्र आहे.

त्यामुळे तळणाची अचूक वेळ समजते. त्यामुळे जास्त तेल पोटात जात नाही. त्यामुळे फ्रेश वाटते. त्यामुळे चार्म वाढतो.

मुंबई चे सम हवामान आहे दिल्ली चे विषम हवामान आहे.
मुंबई चे हवामान ,वातावरण दिल्ली पेक्षा किती तरी पटी नी उत्तम आहे
मुंबई ही मुंबई आहे

Pages