दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
फटाके पूर्णपणे बंद व्हावेत
फटाके पूर्णपणे बंद व्हावेत असं मलाही वाटत नाही
पण त्याला काहीतरी मर्यादा हवी
थोडक्यात गोडी असते हे आपल्या लोकांना समजत नाही हेच मेन आहे
हपा +७८६
हपा +७८६
मद्यप्रेमींना मद्याऐवजी थम्सअपमध्ये लिंबू पिळून प्या असा पर्याय देण्यात अर्थ नाही. त्यांना जी मद्याने झिंग चढते त्याचसाठी ते पितात. नशेसाठी पितात.
त्यामुळे त्यांना मद्याचे दुष्परीणाम पटवून द्या किंवा कायद्यानेच दारूबंदी करा.
दोन्ही दारूंबाबत हेच उपाय आहेत.
बरोबर. दारूवरचा श्लेष आवडला.
बरोबर. दारूवरचा श्लेष आवडला.
आणि जर कुणाला फराळ आणि गोड
आणि जर कुणाला फराळ आणि गोड खाण्याची परंपरा बंद ची भीती वाटत असेल आणि त्यासाठी फटाकेबंदी ला विरोध केला जात असेल तर याचप्रमाणे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो: सतीची प्रथा बंद झाली, डोक्यावरून मैला वाहून नेणे बंद झाले. आणि आता फटाके सुद्धा बंद होतील. धर्म/संस्कृती बुडण्याची ही लक्षणे आहेत. ती वाचवण्यासाठी फटाके तर अजून जोरात वाजवू, पण सती प्रथा आणि इतर बंद झालेल्या प्रथा सुद्धा सुरु करू.
इनामदार साहेब, काय च्या काय !
फटाकेबंदीला अनुमोदन आहेच. फटाके नाही वाजवले तर धर्म/संस्कृती काही बुडत नाही. आणि बुडाले तर बुडो बापडे !
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो अशी म्हण आहे. एखादे आंदोलन यशस्वी झाले की मग परत काहीतरी नवीन शोधून काढायची सवय असते काही जणांना, त्यांच्या साठी तो प्रतिसाद आहे. असो.
रोषणाई दिवाळी ला नको X-Mas ला
रोषणाई दिवाळी ला नको X-Mas ला करा मग असले प्रश्ने पडणार नाहीत. लाडू, चकली ने वजन वाढत; cookies, अँड cake चांगले शरीरासाठी . आहे काय आणि नाही काय ....New Year ला फटाके पण Udva.....
गोष्टी प्रमाणात करा; असा option नाहीये / नको आहे लोकांना.
प्रॉब्लेम असा आहे की फाटक्या
प्रॉब्लेम असा आहे की फाटक्या मुळे होणारे प्रदुषण सर्वांना दिसते पण हरियाणा आणि पंजाब ने उसाचे पाचट आणि गहू तांदूळ चे गचपान जाळल्या मुळे आमच्या दिल्लीकरांना होणारे श्वसन विकार कोणाला दिसत नाही .
दृश्यमानता कमी झाल्यामुळे फ्लाइट्स कॅन्सल कराव्या लागतात , रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतात .
म्हणून आमचा केजरीवाल दरवर्षी हरियाणा आणि पंजाब च्या नावाने शंख पुकरायचे ,अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत त्या रज्याविरोधत केसेस गेलेल्या .
पण या वर्षी बिचाऱ्याला पंजाब विरोधात बोलता येणार नाही .
हरियाणा आणि पंजाब ने उसाचे
हरियाणा आणि पंजाब ने उसाचे पाचट आणि गहू तांदूळ चे गचपान जाळल्या मुळे आमच्या दिल्लीकरांना होणारे श्वसन विकार कोणाला दिसत नाही . >> कागाळुची पंचाईत!! तिथे कुणा खान /मियाला दोष देता येणार नाही
दर वर्षी दिवाळी आली कि इथे
दर वर्षी दिवाळी आली कि इथे दळण दळणे सुरु होते....
कितीही कीबोर्ड बडवा... ज्यांना उडवायचे ते उडवणार आणि ज्यांना नाही उडवायचे ते नाही उडवणार.. कोणाचेही मतपरिवर्तन होणे शक्य नाही...
हपा, हृदयाच्या ठोक्यांच्या
हपा, हृदयाच्या ठोक्यांच्या कंपन संख्येचा आवाज हृदयाला आनंद का देईल? उलट रेझोनेट झालं ( आता हृदयातील नक्की काय वाजतं माहीत नाही/ आठवत नाही) तर हृदय फुटेल की काय वाटते तसच होईल ना?
मला फटाक्यांचा वास आवडतो. इथे फुलबाज्या आणून पोरांना देणार. मला आगीशी खेळायला मिळायाचं म्हणून फटके आवडायचे. आवाजाचे फोडले तरी त्यात फार इंटरेस्ट न्हवता बहुतेक. पोरांना पण आगीशी खेळायला फुलबाज्या आणणार.
गेल्या दोन दिवसात झालेल्या
गेल्या दोन दिवसात झालेल्या बिल्डिंग मीटिंग मधे ऐकलेला एक मजेदार युक्तिवाद -
पावसाळा संपल्यावर जी दमट उष्णता असते, त्यामुळे सगळीकडे डास होतात. जर भरपूर फटाके उडवले तर धुराने डास नष्ट होतात. मजेदार भाग हा होता की या कुटुंबाने दसऱ्याला दरवाजात तांब्याच्या घंगाळात झेंडूची फुले ठेवून मुख्य दरवाजासमोर सुंदर सजावट केली होती. त्याच्या बाजूला छोटी छोटी पितळ्याची सहा भांडी पाण्यात रंगीत फुलं घालून सजवली होती. आठ- दहा दिवस झाले तरी पाणी असलेली भांडी दारात तशीच. थोडक्यात काय, डास निर्माण करा आणि मग पळविण्यासाठी भरपूर फटाके उडवा. डासांना नष्ट करणारा धूर आपल्या lungs साठी आरोग्यदायी असतो.
(No subject)
किनई तांबंपितळ जंतुनाशक असतं.
किनई तांबंपितळ जंतुनाशक असतं. त्यात डास जिवंत राहू शकत नाहीत
>> फटाके उडवले तर धुराने डास
>> फटाके उडवले तर धुराने डास नष्ट होतात
पूर्वी दिवाळी अंकात कासवछाप मच्छर अगरबत्तीची जाहिरात असायची. बेडरूममध्ये थोडी फटाक्याची दारू जाळली कि झालं, कासवछापची गरज नाही
बाय द वे मी सुवर्णमध्य साधेल (म्हणजे प्रदूषणसुद्धा होणार नाही आणि फटाके सुद्धा एन्जॉय करता येतील) असे काहीसा पर्याय असू शकतो का हे सहज विचार करत होतो. इ-फटाके असे काहीसे मनात आले. आजच्या काळात इ-फटाके निर्माण करता येतील का? मजा घेता येईल इतकाच आवाज होईल, तुकडे होतील, फटाका जसा सुरवातीला अनिश्चितता देतो आणि एकदम धाड्कन वाजतो (किंवा वाजत नाही) ते सुद्धा करता येईल, आणि एकदा तुकडे झाले कि पुन्हा असेम्ब्ल करून पुन्हा वाजवता येईल असे इलेक्ट्रिसिटीवर चार्ज करता येईल, उदबत्ती सारख्या दिसणाऱ्या रिमोट वर उडवता येईल असे काहीसे इनोव्हेटिव्ह उत्पादन बनवता येईल का? एकदा घेतले कि अनेक वर्षे जाईल. त्याच प्रमाणे भुईचक्र, झाड, फुलबाजे इत्यादी सुद्धा बनवता येईल. संशोधनास बराच वाव आहे आणि मार्केट सुद्धा आहे या प्रोडक्टला इ-सिगारेट, इ-बस, इ-बाईक, इ-कार सगळे आले. आता हे सुद्धा यायला हरकत नाही. फक्त अमितव म्हणत तसे वास मात्र येणार नाही ती एक अडचण आहे यात.
असा काहीसा विचार करतो तर हे पाहायला मिळाले:
https://www.youtube.com/watch?v=fCfvgHFHwAM
अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे पण कोणीतरी सुरवात केली आहे हे ही नसे थोडके
अमित, रेझोनेट झालं तर तो
अमित, रेझोनेट झालं तर तो पदार्थ (मट्रियल ह्या अर्थाने, खाण्याचा पदार्थ नव्हे) त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने जास्त अॅम्प्लिट्युडने कंपित होऊ लागेल. त्यामुळे हृदय फुटेलच असं काही नाही. पण त्याच्याजवळ जाणारा भास होतो हे खरं आहे. मीच एकेकाळी ढोल वाजवत असे आणि तेव्हा आजूबाजूला आणखी पन्नास ढोल एकाच लयीत वाजायला लागले की छातीत हादरे बसताहेत असं वाटायचं. काहीवेळा ते तसं वाटणं हे हवंहवंसंसुद्धा वाटायचं. एक नशा असते त्यात - वरती ऋन्मेषने म्हटल्याप्रमाणे.
आता तो हृदयाच्या ठोक्यांच्या वेळी निर्माण होणारा आवाज नक्की कुठल्या स्रोतातून येतो? तर त्यावेळी हृदयाच्या होणार्या आकुंचन प्रसरणामुळे जे पिरियॉडिक प्रेशर फ्लक्चुएशन्स होतात, त्याने त्याच्या संपर्कात येणार्या गोष्टी - हृदयाचं आवरण, रक्तनलिका, त्यांना चिकटून असणारं मांस, हाडं, छातीचा पिंजरा - अशा सर्वांना बारीक बारीक प्रमाणात हादरे बसतात. शरीरात ह्या सर्व गोष्टी जणू एकसंध असल्याप्रमाणे असल्यामुळे ह्या कम्बाइन्ड सिस्टिमची जी काही नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, त्याने त्या व्हायब्रेट होतात. (शरीरावर त्या फ्रिक्वेन्सीच्या ट्यूनिंग फोर्कने हाणल्यासही हे करता येईल, जास्त साधर्म्याकरिता शरीराच्या आतून हृदयाजवळ तो फोर्क हाणावा लागेल.) जेव्हा ती बारीक कंपने हवेच्या संपर्कात येतात (शरीरांतर्गत किंवा बाहेर), तेव्हा ती हवेत प्रेशर वेव्हच्या फॉर्ममध्ये पसरतात - ज्यांना आपण ध्वनीकंपने म्हणतो. पण ती इतकी बारीक असतात आणि हवेत मोठ्या एरियावर पसरल्यामुळे त्यांची शक्ती अगदी नगण्य असते त्यामुळे तशी ती ऐकू येत नाहीत. स्टेथोस्कोप ती कंपने एका बारीक नळीत कन्फाईन करतो त्यामुळे त्याच्या मोठ्या पडद्यावर आलेली कंपने बारीक नळीच्या आतल्या हवेत ट्रान्सफर झाल्यावर कानांना ऐकू येईल इतपत शक्तीची ध्वनीकंपने निर्माण होतात.
आता ह्या ध्वनीचा संबंध आपल्या मेंदूच्या जडणघडणीतही आहे. आपण जेव्हा आईच्या पोटात असतू तेव्हा तोच आवाज आपण पहिल्यांदा आणि काही महिने सतत ऐकत असतो. आपण जन्मानंतर अनेक दिवस कधी रडलो तर आपल्याला शांत करायला आई त्याच आवाजाची मदत घेत असते. म्हणजे आपल्या मेंदूला सुखावणारं पहिलं संगीत हे लो-फ्रिक्वेन्सी आहत नादाचं संगीत आहे. व्हिएन्ना विद्यापीठातल्या टेकम्से फिच नावाच्या प्राध्यापकाने 'आपल्याला बेस म्युझिक का छान वाटतं' ह्यावर बरंच संशोधन केलं आहे. त्यात हे काही मुद्दे आले आहेत. त्यात फटाके अॅड करून आपण नवीन पेपर पब्लिश करू शकतो; को-ऑथर होणार काय?
(वरील प्रतिसादात बेसुमार इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल मी क्षमा मागतो.)
हपा छान पोस्ट
हपा छान पोस्ट
एवढा अभ्यास तर नव्हता, पण अंदाज होता.
बहुधा याच धाग्यावर मागच्या कुठल्यातरी वर्षी लोकांनी फटाक्यांच्या आवाजातून मिळणार्या आनंदाला विकृत वगैरे ठरवलेले
लोकांना त्रास देऊन त्यातून
लोकांना त्रास देऊन त्यातून मिळणारा प्रत्येक आनंद हा विकृतच
बघा पटतंय का
लोकांना स्वार्थ चा आपण का
येथे असणाऱ्या फक्त एका आयडी नी सांगावे त्यांनी फटाके कधीच वाजवले नाहीत.
दिवाळी मध्ये.
एक पण असा व्यक्ती नसेल.
दिवाळी साजरी करण्याची ती पद्धत च आहे.
कधी पासून आहे हा प्रश्न व्यर्थ आहे.
फक्त फटाक्यांचा आवाज किती असावा .त्याची वेळ फिक्स असावी.
बिल्डिंग मधील passege आणि शिडी वर फटाके वाजवता येणार नाहीत.
असे काही नियम असावे .बस.
वाजवूच नका .
ही भूमिका अयोग्य लोकांच्या खासगी आयुष्यावर घाला आहे.
फटाके ना विरोध करणारी व्यक्ती प्रदूषण विरोधी असते असा गैर समाज मी तरी करत नाही.
पुष्कळ प्रदूषण हे आपल्या रोज च्या जीवनात करतात.
त्यांना प्रदूषण शी काही देणे घेणे नसते.
१. उच्छासातून जे कार्बनडाय
१. उच्छ्वासातून जे कार्बनडाय ऑक्साइड सोडत नाहीत फक्त त्यांनाच प्रदूषण थांबवा/कमी करा म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे.
२. समजा वरच्या शर्तीची आपण पूर्तता केली तरीही जो पर्यंत इतर सगळ्या प्रकारची प्रदूषणे आपण बंद करवून घेत नाही तो पर्यंत इतर कुठलेही प्रदूषण थांबवण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही.
ही भूमिका अयोग्य लोकांच्या
ही भूमिका अयोग्य लोकांच्या खासगी आयुष्यावर घाला आहे.>>>
अनेक देशांत अशी बंदी आहे, त्यापैकी कोणीही आमच्या खासगी आयुष्यावर घाला आहे असा टाहो फोडलेला दिसत नाही
सगळे उमाळे आपल्याच देशात
आणि इथलेच मनसोक्तपणे फटाके फोडणारे जेव्हा परदेशात जातात तेव्हा निमूटपणे दिवाळी साजरी करतात
तेव्हा यांची संस्कृती धोक्यात नाही येत, तेव्हा यांना खासगी आयुष्यवर घाला वाटत नाही
दुटप्पी लेकाचे
उच्छ्वासातून जे कार्बनडाय
उच्छ्वासातून जे कार्बनडाय ऑक्साइड सोडत नाहीत फक्त त्यांनाच प्रदूषण थांबवा/कमी करा म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे.
>>>>>
१) श्वासातून कार्बन डाय ऑक्साईड सोडणे
२) गाड्यांचा धूर काढणे / हॉर्न वाजवणे
३) फटाके फोडणे
हे तिन्ही एकाच तागडीत का तोलत आहात?
क्रमांक २ आणि ३ ला विरोध केले तर क्रमांक १ वाल्यांना त्यांच्यात का आणून बसवत आहात?
असो, मला नाही आवडत कार्बन डाय ऑक्साईड सोडायला. नाईलाजाने सोडतो. कोणी पर्याय सुचवला तर आवडेल.
असो, मला नाही आवडत कार्बन डाय
असो, मला नाही आवडत कार्बन डाय ऑक्साईड सोडायला. नाईलाजाने सोडतो. कोणी पर्याय सुचवला तर आवडेल.>>>> वेगलीकडून श्वास घेऊन वेगळीकडून उच्छ्वास सोडता आला तर पहा
अनेक देशात आवाजी फटाक्यांवर
अनेक देशात आवाजी फटाक्यांवर बंदी आहे. desible limit आहे. परदेशात बरीच लोक दिवाळीला/ match च्या दिवशी/ Halloween ला कमी डेसिबलचे फटाके वाजवतात. डेसिबल लिमिट आपल्याकडेही असावं.
नववर्षला बऱ्याच देशांत व्यवस्थित आवाजी फटाके उडवले जातात.
noise pollution मुळे बऱ्याच देशात हॉर्न्स ला बंदी आहे; ती करूया ना..... १२ महिने शांतता मिळेल.
मोठ्ठया आवाजच एक झिंग असते; त्यासाठी स्पेसिफिक एरिया असावा.... त्यात काय मिळत; असे बोलून काही होणार नाहीये.
कोणी पर्याय सुचवला तर आवडेल.>
कोणी पर्याय सुचवला तर आवडेल.>> मिथेन. सी एच फोर
वाह काय पर्याय आहे
नाही आवडला पर्याय
Methane is the primary contributor to the formation of ground-level ozone, a hazardous air pollutant and greenhouse gas, exposure to which causes 1 million premature deaths every year. Methane is also a powerful greenhouse gas. Over a 20-year period, it is 80 times more potent at warming than carbon dioxide.
तिकडे लोकसत्ता मधे जितेंद्र
तिकडे लोकसत्ता मधे जितेंद्र जोशीने फटाकेमुक्ती साठी आवाहन केले तर त्याला ट्रोल करण्यात आले. वाजवू नका असे आवाहन आहे का मग आम्ही मुद्दामून दुप्पट वाजवणार.
त्याच्या नाटक सिनेमावर
त्याच्या नाटक सिनेमावर बहिष्कार घालायची धमकी नाही का दिली? फटाकेमुक्त दिवाळीवरून विराट कोहलीलाही गेल्या वर्षी ट्रोल केलं होतं.
सरांनी मायबोलीवर धागा न काढता
सरांनी मायबोलीवर धागा न काढता स्वतःहून गुगल करून माहिती घेतली आणि ती इथं शेअर केली याबद्दल त्यांचे या अभिनंदन
<<त्याच्या नाटक सिनेमावर
<<त्याच्या नाटक सिनेमावर बहिष्कार घालायची धमकी नाही का दिली?>>
आपल्या देशबांधवांसाठी दिवाळी
आपल्या देशबांधवांसाठी दिवाळी आठवड्यात देशाचा टेंपररी गॅस चेंबर बनवणार्या आपल्या देशप्रेमी देशबांधवांना आपण तेवढ्याच प्रेमाने नाझी म्हणू शकतो का?
फारच स्फोटक विचार
फारच स्फोटक विचार
Pages