सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.
आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः
१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?
तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.
बाहुबली सिनेमातपण दाखवलेत
बाहुबली सिनेमातपण दाखवलेत
शस्त्र अस्त्र खरेदीच्या नावाने लोकांकडून पैसे सोने गोळा करतात
त्यातले 10 % शत्रू राजाशी लढताना युद्धात वापरतात
उरलेली 90 % अस्त्रे शस्त्रे पैसा गृहकलह , भावाभावातील वादात खलास होतात
आणि लोक नाचतात , वा वा काय हे हिंदू राजांचे दर्शन !!
दोन संस्कृत श्लोक अन एकादी उंच मूर्ती आणि दगडी देवळात आरती दाखवली की नतमस्तक !!!
आताच्या स्वघोषित अवतारानीही कोविड फंड , पीएम फंड असाच उडवलेला दिसतोय
Shivaji महाराजांनी कल्याणच्या
Shivaji महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली ह्याचे कौतुक केले जाते. सावरकरांनी हे चूक होते असे म्हटले आहे.
महाराजांची क्रिया चूक की बरोबर हे ठरवणे , ते पण अशा माणसाने ज्याने ब्रिटिश सरकारला माफीनामेच्या माफीनामे पाठवले आहेत आणि त्यावर इथे चर्चा. सगळंच हास्यास्पद
त्यांना हास्यास्पद
त्यांना हास्यास्पद ठरवण्याच्या आधी फक्त एक दिवस कोलु फिरवून बघणार का दामले?
आणि माफी नामा पाठवला आहे म्हणजे काहीतरी प्रचंड देशद्रोही कृत्य केलं आहे अशा अविर्भावात जेव्हा खिल्ली उडवली जाते ते पाहून कीव येते
माणूस होता तो शेवटी, तेही कवी लेखक कुळातला
हे कधी लक्षात घेणार का नाही
का फक्त त्यांचे ब्राह्मण असणे हेच लक्षात ठेवणार
आपले लोक जगणे महत्वाचे आहे,
आपले लोक जगणे महत्वाचे आहे, माफी मागोत नाहीतर पळून येवोत
वा वा काय हे हिंदू राजांचे
वा वा काय हे हिंदू राजांचे दर्शन>> माहितीसाठी धन्यवाद सर. आता थोडी जझिया कराबद्दल पण आम्हा पामरांना माहिती द्या ना.
तेही तेच करत होते
तेही तेच करत होते, म्हणून तर काँग्रेसने व जनतेने लोकशाही आणली
तेही तेच करत होते,>> थोडं
तेही तेच करत होते,>> थोडं डिटेलमध्ये सांगा ना सर. तुमचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे म्हणुन विचारतो.
आणि माफी नामा पाठवला आहे
आणि माफी नामा पाठवला आहे म्हणजे काहीतरी प्रचंड देशद्रोही कृत्य केलं आहे अशा अविर्भावात
बरं ती ब्रिटिश सरकार कडून पेन्शन घेतली ती पण माफ करायची का?
माणूस होता तो शेवटी, तेही कवी लेखक कुळातला
हे कधी लक्षात घेणार का नाही
काहींच्या काही हास्यास्पद विधान. कवि लेखक कुळातला आहे म्हणून नाजूक आहे म्हणून तुरूंगाचं आयुष्य झेपले नाही म्हणून माफीनामा लिहिला हे असले धेडगुजरी स्पष्टीकरण आले की डोक्यात जाते. उद्या म्हणाल की कवी लेखक होता म्हणून कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून प्रपंच चालवायला इंग्रजांकडे पेन्शन मागितली त्यात काय एवढं.
सिरियसली????
सिरियसली????
म्हणजे सावरकरांनी काहीही केलं नसताना इंग्रजांनी त्यांना अरे हा एक दिसतोय गरीब ब्राह्मण, लेखक कवी पेन्शन मागतोय
चला त्याला पाठवा अंदमानला कोलु फिरवायला असे म्हणून धाडले का?
त्यांचे काहीतरी योगदान आहे हे मान्य करणार का फक्त कुचेष्टा करत राहणार?
इतिहास वाचला आहे का? नक्की
इतिहास वाचला आहे का? नक्की कोणत्या कारणासाठी अंदमानला पाठवले होते हे परत वाचा एकदा
ओके
ओके
अवांतर-
अवांतर-
हा लेख वाचून सावरकरांच्याबद्दल अनेक प्रश्न मनात निर्माण झालेले. ते माफी बिफी पेक्षा अतिशय जास्त गंभीर प्रकाराचे आहेत. मी मिसळपाववर सुद्धा हे आर्टिकल टाकले होते, आणि माझे सावरकरांचे वाचन खूप कमी आहे तेव्हा सावरकरांच्या अभ्यासकांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी लेखावर टिप्पणी करावी असे म्हणलेले- जवळपास काहीच रिस्पॉन्स आला नव्हता.
https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-a...
अर्थात, माफीवीर इत्यादी टीका पटत नाही. जेलमध्ये राहणे हा काही व्हर्च्यु नाही, माफी मागून बाहेर पडण्यात काहीच वावगं नाही. इतर कैद्यांसाठी सुद्धा त्यांनी अर्ज केलेला असे वाचलेले.
काळ्या पाण्याची सजा मिळालेले
काळ्या पाण्याची सजा मिळालेले किती स्वातंत्र्ययोद्धे होते?
त्यातल्या कितींनी माफी मागितली?
झंपु तू अज्जीबात म्हणजे
झंपु तू अज्जीबात म्हणजे अज्जीबातच सावरकरांचा लोड घेऊ नकोस. कोल्हु सोड, तू आपला त्या मनसे वाल्यांच्या मोर्च्यालाच डायरेक्ट जाऊन टक्कर दे. ब्रिटिश काय बाहेरचे होते रे, हे आपलेच लोक हायेत. आणी हो जातांना तू ब्लॅक कॅट, जामोप्या, धीरज काटकर, काउ, कु. नर्मदा बारटक्के, कु. कमला सोनटक्के, लबाड कोल्हा, मोगा या लोकांना पण बरोबर घेऊन जा, तेवढीच आपली मदत.
सरांकडे माहिती मागितली तर सर
सरांकडे माहिती मागितली तर सर गायबच झाले. याला काय अर्थ आहे??
कसली माहिती मागितली ?
कसली माहिती मागितली ?
नेहरूने साक्षर केले , मोदीने जिओ नेट दिले , स्वतः माहिती शोधणे.
आत्मनिर्भर व्हा
धाग्याच्या मूळ विषयावर
धाग्याच्या मूळ विषयावर बोलायचं तर शिवाजी महाराजांचं नाव 'शिव' असं आहे. त्यांच्याच राजमुद्रेत 'शिवस्यैषा (=शिवस्य+एषा) मुद्रा' (शिवाची ही मुद्रा) असा उल्लेख आहे. त्यांच्या काळाला आपण शिवकाळ म्हणतो. त्यांच्या राज्याभिषेकाला 'शिव'राज्याभिषेक, शकाला 'शिव'शक अशी नावे आहेत. त्यांना शिव ह्या नावापुढे जी लावून आदराने शिवाजी म्हटले जाते. त्यामुळे शिवाजी हे नाव आदरार्थीच आहे. उगाच कुणी शिवाजी म्हटल्यावर आपल्या राजाचा अनादर झाला अशी समजूत करून घ्यायची गरज नाही.
<< त्यांना हास्यास्पद
<< त्यांना हास्यास्पद ठरवण्याच्या आधी फक्त एक दिवस कोलु फिरवून बघणार का दामले?
आणि माफी नामा पाठवला आहे म्हणजे काहीतरी प्रचंड देशद्रोही कृत्य केलं आहे अशा अविर्भावात जेव्हा खिल्ली उडवली जाते ते पाहून कीव येते
माणूस होता तो शेवटी, तेही कवी लेखक कुळातला
हे कधी लक्षात घेणार का नाही
का फक्त त्यांचे ब्राह्मण असणे हेच लक्षात ठेवणार
Submitted by आशुचँप on 20 April, 2022 - 01:40 >>
------- इतिहासातील घटनांकडे डोळसपणे बघायला हवे असे शेंडेनक्षत्र यांनी मागच्या पानावर सांगितले आहे. ते योग्य वाटते.
माफीनामा पाठिविला म्हणजे देशद्रोह नाही.... अंदमानला पाय ठेवल्यावर केवळ दोन अडिच महिन्यांतच पहिला माफीनामा आला तो ही देशद्रोह नाही.... पुढेही एका ठराविक अंतराने माफीनामे येत राहिले, प्रत्येक माफीनामा हा अभ्यासण्याचा विषय आहे. तुरुंगांत कशाला सडायचे आणि आयुष्य वाया घालवायचे हा उद्देश असेल. माफी मागण्याचा त्यांना कायद्याने हक्क होता तो त्यांनी वापरला.
सावरकरांनी कोलू चालविला, काव्य रचले म्हणजे त्यांचे सर्व आचार/ विचार योग्यच होते याला डोळसपणा म्हणता येणार नाही. कोलू इतर अनेकांनी चालविला होता का एकट्या सावरकरांनाच अशी कष्टप्रद शिक्षा झाली होती?
ब्राह्मण असणे हेच लक्षात ठेवणार का? हे वाक्य जाम खटकले. असे का वाटले, कशाच्या आधारावर ? झम्पू यांनी जातीचा पुसटसाही उल्लेख केलेला दिसला नाही.
ब्राह्मण असणे हेच लक्षात
ब्राह्मण असणे हेच लक्षात ठेवणार का? हे वाक्य जाम खटकले. असे का वाटले, कशाच्या आधारावर ? झम्पू यांनी जातीचा पुसटसाही उल्लेख केलेला दिसला नाही.>>>>> तो तुम्हाला दिसत नाही कारण लेकी बोले सुने लागे हे तुम्हाला माहीत नसेल. विकुंनी धागा काढला होता की ब्राह्मण तरुणांना मुली मिळत नाहीत लग्नासाठी, तेव्हा याच झंपु, डिजे आणी डॉ नी गोंधळ घालुन टोमणे मारले होते. झंप्या तर कायम तन्मय चिन्मय करतो. अॅडमीन व विकुंनी धागा उडवला. पाहीजे तर विकुंना विचारुन खात्री करा. झंप्या काचेच्या घरात रहाणार्यांनी दुसर्याला दगड मारु नये रे.
झंप्या तर कायम तन्मय चिन्मय
झंप्या तर कायम तन्मय चिन्मय करतो.
तन्मय चिन्मय नावांवर कॉपीराईट आहे का?
नुकत्याच कुठल्याशा
नुकत्याच कुठल्याशा चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात पुन्हा एकदा एका पत्रकाराने 'शिवाजी' असा उल्लेख केला आणि अभिनेता शरद केळकर याने पुन्हा चिडून त्यावर 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा म्हणून आग्रह केला. मुळात शिवाजी महाराजांचं नाव 'शिव' एवढंच आहे. 'शाहसूनो: शिवस्य' - शाहच्या मुलाची, 'शिवाची' (ही मुद्रा ... इत्यादी) असं ते स्वतःच म्हणतात. शिव ह्या नावाला जी किंवा राय लावून आपण जेव्हा शिवाजी किंवा शिवराय म्हणतो तेव्हा त्यातून आदरच उल्लेखलेला असतो. मग 'शिवाजी' हा उल्लेख एकेरी कसा काय? मराठीत एक वेळ 'अरे तुरे' केल्यास एकेरी उल्लेख म्हणता येईल, पण हिंदीत 'गांधीजीने जो दिखाया वह उनका मार्ग था ..' ह्यात 'गांधीजीने' हा जसा आदरार्थीच उल्लेख आहे, तसाच 'शिवाजीने' किंवा 'शिवाजीका किरदार' हा आदरार्थीच उल्लेख आहे. 'शिवाजी, जो राजा थे, उनका' असं म्हणण्यापेक्षा 'शिवाजीका' हे बरोबरच आहे. हिंदीत आदरार्थी अनेकवचन 'शिवाजियोंका' असं होत नाही (जे मराठीत 'शिवाजींचं' असं होतं). मराठी लोकांना 'शिवाजीका' असा आदरार्थी उल्लेख ऐकायची सवय नसल्यामुळे त्यांना वाटते की तो एकेरी उल्लेख आहे. पण हा राग अनाठायी आहे.
{त्यावर 'छत्रपती शिवाजी
{त्यावर 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा म्हणून आग्रह केला}
हे किमान तिसऱ्यांदा झाल़य. शरद केळकरनेच आधी एकदा केलं होतं. मग चिन्मय मांडलेकरने.
आग्रह केला नसेल, तरी दुरुस्ती सुचवली होती.
काही काही गोष्टींचं जे काही झाल़य, त्यात वाद घातला तर डोक्यावर शेकायचीही शक्यता आहे. तेव्हा सर सलामत ठेवावं झालं.
न्यूटन आईनस्टाईन यांचे एकेरी
न्यूटन आईनस्टाईन यांचे एकेरी उल्लेख सुद्धा काहींना आता खटकायला लागले आहेत. एकूण भाषा खटकण्याविषयी मी एक प्रतिक्रिया दिली होती फेसबुकवर ती डकवतो.
भाषा खटकण्याविषयी
"खेडेगावात शाळेत राहून मुलगा जर प्रमाण भाषा बोलायला लागला तर घरचे लगेच म्हणतात," जरा साळंत जायला लागला त लगीच वान्या बाम्हनावानी बोलायला लागला का?" ही प्रतिक्रिया मी एका भाषा विषयक पडलेल्या प्रश्नाविषयी असलेल्या पोस्ट ला दिली होती. भाषा, मराठी शब्द,व्याकरण, शुद्धलेखन, प्रमाणलेखन, बोली अशा भाषाविषयक असलेले अभ्यास गट फेसबुक वा वॉट्सपवर आहेत. तिथही मी हीच प्रतिक्रिया दिली होती. ती जातीवाचक म्हणुन काढून टाकली गेली. न आणी ण यातील वापराविषयी असलेले निरिक्षण या बाबत ती चर्चा होती. भाषा विषयक गुपवर अशा गोष्टी बर्याचदा मांडल्या जातात. अर्थहानी होउ नये म्हणून तो आग्रह प्रमाणभाषेसाठी योग्यही आहे. परंतु भाषेकडे केवळ संवादाचे माध्यम असे पहाता येत नाही. तो लोकसंस्कृतीचा इतिहास आहे. लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा त्यात दिसतात. मी खेड्यात वाढलो. खेड्यात बहुजनांची संस्कृती असते. शाळेमधे पुस्तकातील प्रमाण भाषा व घरी, व्यवहारात बोली भाषा यामुळे डोक्यात एक भाषिक गोंधळ तयार होतो. संस्कारक्षम वयात जेव्हा पुस्तकाचा, नागरी भाषेचा प्रभाव व आकर्षण असते त्यावेळी स्वत:मधे आपल्या नकळत होणारा बदल इतर लोक टिपत असतात. माझ्या शाळेतल्या एका मित्राशी जेव्हा शुद्धलेखन व पुस्तकी भाषा याविषयी बोलत होतो . तेव्हा त्याने घरात आई त्याला जे म्हणाली ते त्याने मला सांगितले. " लागला का वान्याबाम्हनावानी बोलायला " हे सुनावताना तिला हे सांगायच असत की अरे ती अभिजनांची भाषा. आपण आपल्या भाषेत॒ बोलावे. तुझ ते शाळेत वगैरे ठीक आहे. इथे ती भाषा कशाला? हा आशय वर्गवाचक आहे. जातीवाचक नाही. भाषेचे कट्टर अभिमानी अभिजन लोक भाषेला एका चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतात. बोली भाषा त्यात बसत नाही. त्यांचा हा शिस्तीचा वा बिंदुगामीपणा एका भाषिक तर्कटता वा दुराग्रहाकडे नेतो. अर्जुनाला जसा माशाचा डोळाच फक्त दिसतो तसे यांना भाषेतील व्याकरण, प्रतिशब्दाचा अट्टाहास, प्रमाणीकरण वा काटेकोरपणा दिसू लागतो त्याचेच भिंग लावून ते पहात असतात. मग भाषिक विद्रोही लोकही अभिजनांची टिंगल उडवताना दिसतात. एकदा एक व्यक्तिचित्रण करताना मी दत्तू बाम्हन असे लिहिले. ते प्रूफरिडर ने दत्तू ब्राह्मण असे केले. त्यामुळे व्यक्तिचित्रणाच्या पार्श्वभूमीचे भाषिक सौंदर्यही हरपले. शिवाय आशयहानी झाली. एका नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे..... असे श्रावणातल्या कहाण्या वा कथासार मधील शब्दरचना ही साहित्यातील नागर संस्कृतीचा पगडा दर्शवते. त्या ठिकाणी बाम्हन शब्द वापरुन चालणार नाही. जातीवाचक या शब्दाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक भांडवल करताना त्याचे अर्थ बदलले जातात. त्या अर्थात एक कडवटपणा चिकटतो. ब्राह्मण्य या शब्दाचे असेच अर्थ विद्रोही चळवळींनी बदलले आहेत. भाषेकडे " लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा " म्हणून कसे पहायचे याचे तारा भवाळकरांच्या पुस्तकात अतिशय उत्तम रित्या विवेचन आहे. वाचनीय पुस्तक आहे.
घाटपांडे सर, उत्तम प्रतिसाद.
घाटपांडे सर, उत्तम प्रतिसाद.
शिवसेना या शब्दात एकेरी
शिवसेना या शब्दात एकेरी उल्लेख आहे. त्याचं काय करायचं?
मी १३-१४ वर्षांपूर्वी भारतात
मी १३-१४ वर्षांपूर्वी भारतात (आयटीत) जेव्हा काम करायचो तेव्हा सर्वांना नावाने हाक मारायचीच पद्धत होती. त्यानंतर भारतातील आयटीशी रेग्युलर संबंध आला नाही. या सध्याच्या कंपनीत भारतातले लोक भारतातील मॅनेजरांना 'सर' म्हणतात आणि इकडच्यांना नावाने हाक मारतात. हा काय नवा विचित्रपणा चालू आहे भारतात कोण जाणे. आमच्याच कंपनीत आहे का लागण सार्वत्रिक आहे त्याची कल्पना नाही. न्यूटन-आईनस्टाईनला एकेरी उल्लेख वरुन लिहावसं वाटलं. धागा घसरवायचा नाहीये तसं झालं तर सॉरी हरचंद (जी)
सॉरी हरचंद (जी) >>> मध्यंतरी
सॉरी हरचंद (जी) >>> मध्यंतरी आपल्याकडे "शरदरावजी पवार" चे पेव फुटले होते. ते आता कमी झालेले दिसते.
अमित
अमित
“मध्यंतरी आपल्याकडे "शरदरावजी
“मध्यंतरी आपल्याकडे "शरदरावजी पवार" चे पेव फुटले होते. ” - ते ‘मान्नीय मुख्यमंत्री साहेब‘ राहिलं.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra/sharad-pawar-poster-with-shivaji-ma...
Pages